पाककृती

बनाना-नट ब्रेड ( केळ्याचा केक )

Primary tabs

केळी जास्त पिकलेली असली कि खाविशी वाटत नाहित. अश्यावेळी उरलेल्या केळ्यांचा हा झटपट होणारा बनाना नट ब्रेड अतिशय चविष्ट होतो. साहित्य : ४ पिकलेली केळी, १/२ कप वितळवलेल बटर, १ १/२ कप मैदा , २ फेटलेली अंडी, ३/४ कप बारीक वाटलेली साखर, १ टिस्पुन बेकिंग सोडा, १ टिस्पुन वनिला, १ चिमुट मीठ १/४ कप बरीक कापलेले अक्रोड, मुठभर मनुका केळी कुस्करुन घ्यावीत. एका भांड्यात केळी आणि बटर मिसळावे. त्यात फेटलेली अंडी, वनिला घालुन एकत्र करावे. नंतर मीठ, साखर, बेकिंग पावडर सगळे घालून १ मिनिट फेटावे. त्यात मैदा घालावा. चांगले फेटून घ्यावे. नंतर त्यात अक्रोड आणि मनुका घालाव्यात. अवन ३५० फारनहाईट वर गरम करुन घ्यावा. बेक करायच्या भांड्याला बटर लावुन त्यात वरील मिश्रण ओतावे. १ तास बेक करावे. गरमागरम बनाना-नट ब्रेड तयार. Image removed.
रेवती

लवंगीताई, तू ग्रेट आहेस!
किती दिवसांपासून ह्या पाकृच्या शोधात होते.
माझ्याकडच्या प्रमाणानुसार (जे वर दिल्यापेक्षा खूप वेगळे आहे) ह ब्रेड कधीही नीट जमला नाही व बाहेरून विकत आणत असे. आता मात्र हवा तसा ब्रेड जमेल अशी आशा आहे.
धन्यवाद!

रेवती

लवंगी

मीपण २-३ प्रकारे करुन पाहिला. पण या प्रमाणाने मस्त होतो. यात मैद्याऐवजी ऑल पर्पज वापरुनपण छान होतो.

मदनबाण

व्वा.असा केक बनावला जाऊ शकतो याचा कधी विचारच केला नव्हता !!! :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

सोनम

केक छान आहे. :)
पण अंड्याशिवाय केक चांगला होऊ शकेल का? :?

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

लवंगी

पण केळ्यामुळे मऊ होतो त्यामुळे अंड्याशिवाय होऊ शकेल. अंड्याऐवजी १ केळ जास्त घाल.

शाल्मली

मस्तच दिसतो आहे बनाना केक..

+१

--शाल्मली.

स्वाती२

मस्त दिसतोय ब्रेड. मी वेगळ्या पद्धतीने करते. आता असा करुन बघेन.