Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संगीत महर्षीने निरोप घेतला!

न
नीधप
Sun, 07/26/2009 - 10:37
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3566 वाचन

💬 प्रतिसाद (20)
व
विसोबा खेचर Sun, 07/26/2009 - 10:43 नवीन
माझीही श्रद्धांजली.. निळूभाऊ, गंगूबाई आणि आता भास्कर चंदावरकर! कला क्षेत्रातले तीन दिग्गज असे एका मागोमाग एक गेले याचंही वाईट वाटतं! तात्या.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 07/26/2009 - 10:48 नवीन
भास्कर चंदावरकरांना विनम्र आदरांजली. त्यांच्या संगीताच्या रूपाने त्यांची स्मृती चिरकाल टिकून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने अत्यंत वाईट कालावधी. आधी विदुषी डी. के. पट्ट्मल, मग गंगूबाई आणि आता भास्कर चंदावरकर. या महान व्यक्तींच्या जाण्याने शास्त्रीय संगीतात खरोखर एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. - भटोबा
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 07/26/2009 - 10:47 नवीन
'घाशिराम'चे संगीत, त्यांच्या अनेक चित्रपटांचे संगीत--- एकदम वेगळे होते, चंदावरकरांनी मराठी संगीतजगतावर स्वतःची मुद्रा उमटवली आहे. माझ्या आठवनीनुसार ते अनेक वर्षे एफ. टी. आय. आय. मधे कार्यरत होते.
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 07/26/2009 - 10:50 नवीन
१९६५-८० ते एफ. टी. आय. आय. ला शिकवत होते. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
क
केशवराव Sun, 07/26/2009 - 11:02 नवीन
विनम्र श्रद्धांजली. संगीत विश्वातील एक एक तारें निखळायला लागले. ईश्वरी ईच्छे पुढे ईलाज नाही.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 07/26/2009 - 11:09 नवीन
निळू भाऊ, गंगुबाई आणि आता भास्कर चंदावरकर ही सर्व त्यांच्या क्षेत्रातील ऋषितुल्य माणसे होती. आता पण नवीन गाणे, संगीत,अभिनय आवडणे असे नवीन कलाकारांबद्दल साहजीक होत असले तरी त्यांच्यात त्यांच्या क्षेत्रासाठी "रोल मॉडेल" म्हणता येतील असे फार कमी असू शकतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sun, 07/26/2009 - 11:40 नवीन
भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. - प्रशांत
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 07/26/2009 - 14:45 नवीन
क्षेत्रातील या महान व्यक्तिमत्वाला माझीही भावपूर्ण आदरांजली. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 07/26/2009 - 15:20 नवीन
भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 07/26/2009 - 15:42 नवीन
विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 07/26/2009 - 16:14 नवीन
भास्कर चंदावरकरांना माझीही विनम्र आदरांजली. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Sun, 07/26/2009 - 16:23 नवीन
माझीही श्रद्धांजली... एक एक तारे निखळत चालले.. - वा
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 07/26/2009 - 16:24 नवीन
अतिशय दु:खद बातमी. त्यांच्या निकटवर्तीयांना कदाचित त्यांच्या कॅन्सरबद्दल कल्पना असेल ; परंतु ज्याना काही कल्पना नव्हती त्या माझ्यासारख्याना जबर धक्का बसला. त्यांची अनेकानेक गाणी चिरस्मरणीय आहेत. "अजब सोहळा , माती भिडली आभाळा " , "सख्या रे घायाळ मी हरिणी" , "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" , "थोडासा रुमानी हो जाएं" , "बांधले मी बांधले" ...कितीतरी आणखी. सतारीबरोबरच सूरबहार नावाचे , अतिशय कठीण वाद्य वाजविण्यात निपुण असणार्‍या थोड्या लोकांपैकी ते एक. शरीराने ते गेलेत इतकेच. त्यांच्या कामामुळे आणि त्यांनी ज्या लोकांना घडविले , ज्यांच्या आयुष्याला स्पर्श केला अशा कलावंत-रसिकांच्या मनात ते नेहमीच रहातील. विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 07/26/2009 - 16:36 नवीन
"कुणाच्या खांद्यावर .. कुणाचे ओझे" हे बहुद्देशिय गाणं माझंही फार आवडतं आहे ... माझी ही श्रद्धांजली धन्यवाद सुनित आणि नी ! - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
न
नीधप Sun, 07/26/2009 - 16:57 नवीन
>>त्यांच्या निकटवर्तीयांना कदाचित त्यांच्या कॅन्सरबद्दल कल्पना असेल<< मे महिन्यात आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते रिकव्हर होतोय असं म्हणाले होते. आधीचं दीड वर्षं जवळजवळ त्यांनी सगळं सहन केलं होतं तेव्हा. त्यांच्याच घरात, त्यांच्याच कपड्यात होते आणि आवाज त्यांचाच होता म्हणून केवळ ओळखू शकले मी त्यांना पण ते तेव्हा आनंदी होते. पांढरे केस, पांढरी दाढी त्यामुळे एखाद्या ऋषिमुनीसारखे दिसत होते. सांगितल्यावर नेहमीचं प्रसन्न हसले. आमच्या नवीन फिल्मचं म्युझिक करण्याबद्दल एक्सायटेड वाटले. नेहमीप्रमाणेच भरपूर वेळ वेगळ्या चित्रपट, नाटक, विचारांबद्दल काय काय सांगत होते खूप शिकायला मिळत होतं. लवकरच स्क्रिप्टचं सिटींग करायचं ठरवू असं म्हणून ती मिटींग संपली. तेव्हा काय कल्पना की हे शेवटचंच.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 07/26/2009 - 19:49 नवीन
खरोखरच एक अतिशय मोठा माणूस गेला... अतिशय अजरामर गाणी देणारा कलावंत गेला. मला त्यांच्याबद्दल त्यांच्या संगिताशिवाय काहीच माहित नाही. पण आज एक तपशील कळला... साक्षात अन्नपूर्णादेवींकडून सतार शिकले होते ते.... बाब्बौ!!! आज घाशिराम कोतवाल आणि सामना परत बघणार. त्यांच्या संगिताच्या आठवणी जागवणार. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/27/2009 - 07:22 नवीन
आज घाशिराम कोतवाल आणि सामना परत बघणार. त्यांच्या संगिताच्या आठवणी जागवणार. येस! आज दिवसभर गाणी ऐकणार ते भास्कर चंदावरकरांचीच. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विशाल कुलकर्णी Mon, 07/27/2009 - 06:11 नवीन
भास्कर चंदावरकरांना भावपुर्ण आदरांजली. त्यांच्या संगीताच्या रूपाने त्यांची स्मृती चिरकाल टिकून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सस्नेह विशाल
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 07/27/2009 - 13:11 नवीन
भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Tue, 07/28/2009 - 06:39 नवीन
अजब सोहळा म्हणजे गारम्बीचा बापू मधले का? छान आहे ते गाणे.. अजब सोहळा अजब सोहळा माती भिडली आभाळाला...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा