पाककृती
पाण्यात शिजवलेले अंडे
Primary tabs
अंडयाचा एक सोपा आणि पौष्टिक प्रकार.
साहित्य -
अंडे
पाणी
विनेगर
मीठ-मिरी (चवीप्रमाणे)
कृती -
१) पाणी उकळत ठेवावे
२) त्यात थोडे विनेगर घालावे
३) पाण्याला उकळी आली की त्यात अंडे फोडून घालावे आणि आच मंद करावी
४) अंड्याचा पांढरा भाग घट्ट झाला (सुमारे २ मिनिटे) की आचेवरून काढावे
५) पाणी गाळून टाकावे
६) शिजलेल्या अंड्यावर मीठ-मिरी भुरभुरावी
टीप - सध्या श्रावण सुरू असल्यामुळे मला फोटो टाकता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
क्लासिक !! जियो सुनील साहेब !!
करपलो. ... उकडलो ... भाजलो ... तळलो .. वाफाळलो ... शिजलो ... शिळा झालो :(
- टारझन
ह्याप्रकारात एक-से-एक पाकृ सुचल्या होत्या .. पण काहींना उगाच "मचमचपुरी" वर आल्याचं फिलींग येतं म्हणून टाळलं .. असो
माझ्या डोल्यांसमोर 'चांदण्या' चमकल्या वो!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
वा!! किती वळणदार रहस्यकथा आहे...
सुहास
(म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला... )
उकललेल्या पाण्यात उडी मारावीशी वाटते.
फोटो न दिल्याचे...
टीप - सध्या श्रावण सुरू असल्यामुळे मला फोटो टाकता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
हे कारण पटले.
वेताळ
पिवळा भाग पण घट्ट होतो का?
श्रावणानंतर फोटो टाका. आणि हो
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
सुंदर :D !
कालच प्रिंट काढली होती.. आज सकाळीच प्रयोग केला.
छान लागते चवीला !
तुमच्या मुळे माझा हरवलेला आत्मविश्वास परत आला आहे आता पुर्ण संडे किचन मध्ये प्रयोग करणार मिपावरील नमुने (पाककृतीचे) घेऊन ;)
जगलो-वाचलो तर सोमवारी लेख लिहीनच मग कय केले किचन मध्ये =))
+++++++++++++++++++++++++++++
चहापासून श्रीगणेशा करा. ;)
मसाला टी!!!! बेस्ट!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मागचे अनुभव वाचता, राजाचा नोकर कम् कूक राजाच्या डोक्यात दगड घालणार नाहीतर स्वतःचं डोकं फोडून घेणार.
सोमवारची वाट पहातोय!
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
ग्यार्यान जिम (एग कॅसॅरोल) म्हणतात. त्यात भाज्या वगैरे घातल्या तर अजून छान लागते. थंडी च्या दिवसात दगडी भांड्यात शिजवले तर तोंड पोळत असतानासुद्धा हा-हु करत खायला लई धमाल येते.
हा घ्या फोटू:
(फटूत शेजारी दिसतायत ती क्वेलची उकडलेली अंडी आहेत)
ओ.. इंजिनवर आपलं विंजीनेर सायेब..
याची रेशिपी कोन देनार्??आँ?? निस्ता फुटू बगून कंदी कळ्ली व्हती का रेशिपी??
आन ते क्वेल का काय.. ते कसलं पक्षी असतंय म्हनाचं? त्याचं बी येकांद फुटू लावा की जरा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मापी द्या येक डाव प्राजु तै!
ही घ्या रेशिपी:
(२ माणसांकरिता)
साहित्यः
१. अंडी - ४
२. कोंबू - १५x१५सें चा एक तुकडा
३. अँचोव्हीची (छोटी सुकी मांदेली) - पावडर - ही भारता बाहेर सहजी मिळते १ टिस्पु. / वाळविलेली मासोळी असेल तर ४ मासोळ्या.
४.पातीचा कांदा - २ पाती (कांदे नकोत) बारिक चिरून
५. वितभर गाजर - बारिक तु़कडे करून.
६. मिठ - चवी प्रमाणे. अँचोव्ही पावडर किंवा सुकी असेल तर ती
खारटच असते त्यामुळे वरून मिठ जपून घालावे.
७. कुकर मधे बसतील असे छोटे बोल/भांडी - २
कृती:
१. कोंबू छोट्या वाडगाभर पाण्यात १०-१५ मि. भिजत घालावा.
२. अंडी एका भांड्यात फोडून व्यवस्थित फेटून घ्यावी. मिठ घालावे
३. कोंबूचे पाणी अंड्यात मिसळावे (कोंबूची पाने टाकुन द्यायची.)
४. गाजर, कांद्याची पातीचे तुकडे, अँचोव्हीची पूड वरिल मिश्रणात घालावे.
५. छोट्या भांड्यांत ८०% पर्यंतच मिश्रण भरावे (नंतर हे फुगुन वर येते त्यामुळे पूर्ण भरले तर ओतू जाईल) आणि प्रेशर कुकर मधे शिट्टी काढून १०-१२ मि. मोट्या आचेवर वाफवावे (इडल्या जशा करतो तसेच)
६. आवडी प्रमाणे मिरपूड घालून शिजविलेले भांडेच जेवताना ताटाशी ठेवावे.
टिपः (अ) हा पदार्थ नुसता किंवा गरम भाताबरोबर पण छान लागतो.
(ब) कोंबू भारतात मिळणे कठिण आहे त्यामुळे वगळल्यास चालेल पण
वापरल्याने चव सुधारते, मिश्रण छान दाटसर होते.
बाकी क्वेल पक्षी असा दिसतो:


आणि त्याची अंडी अशी:
ही सुपर मार्केट मधे हमखास मिळतील.
चमचाभर सोया सॉस घातलेल्या पाण्यात उकडली तर चव अजून खुलून येते.
छायाचित्रे: आंतर जालावरून साभार
अमेरिकेत कोंबू मिळते का? :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कोंबू ला काही पर्याय आहे का? त्याला अमेरिकन नाव आहे कां काही? म्हणजे तसं शोधायला बरं आणि कुठल्या दुकानातुन आणायचं ?? :)
दिपाली :)
कोंबू चिनी/कोरियन दुकानात सहज मिळावा. त्याला इंग्रजीत केल्प म्हणतात. आणि चिनी भाषेत "हाईदाई" तर कोरियन भाषेत "दाशिमा" :)
छान... सहीच्च आहे हा प्रकार .... पण श्रावण संपेपर्यंत थांबावे लागेल असे दिसतेय...
वा वा वा! नवीच प्रकार आहे.. ह्या विकांतालाच करून पाहतो.
(श्रावणात आहार बदल म्हणून मांसाहार करणारा) ऋषिकेश
------------------
दुपारचे २ वाजून १७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
चांगला दिसतोय प्रकार!!! करून बघायला पाहिजे एकदा.
बिपिन कार्यकर्ते