पाककृती

खरवस

Primary tabs

गाय/ म्हैशीच्या चीकापासुन ख्ररे तर हा खरवस बनवला जातो. पण हा त्याला पर्यायी म्हणा किंवा त्यासारखा पदार्थ.. कोकणी पद्धतीची पाककृती देत आहे. पाव लीटर साध्या थंड दुधात एक अंडं फेटुन घाला. १/२ चमचा जीरे , १/२ वाटी ओले खोबरे रवाळ वाटुन घ्या. थोडा गुळ किसुन घ्या. हे सगळ दुधात नीट मिसळुन घ्या. गुळाचे खडे रहाता नये, चवीला अतिगोड असता नये. हे मिश्रण कुकर मधे / ढोकळ्या प्रमाणे वाफवुन घ्या. नीट जुळला तर छान वडया पडतात. हा खरवस कोकणातील लोकाना अतिप्रिय आहे. Image removed.
विंजिनेर

हा खरवस कोकणातील लोकाना अतिप्रिय आहे

चित्तपावन कोकणे अंडी कधीपासून खायला लागले बुवा? अब्रम्हण्यम्!
('सर्वा'हारी ) विंजिनेर
बाकी, खर्‍या खरवसाला पर्याय नाही.... (अर्थात हे वैयक्तिक मत)

मितालि

कोकणात फक्त चित्तपावन राह्त नाहीत..
हो खर्‍या खरवसाला पर्याय नाही. पण तो कुठे मिळतो एवढ्या सहज..

पक्या

>>पुण्यामधे लक्ष्मी पथावर जनसेवा मधे खरवस हमखास मिळतो
पण तो तरी अस्सल असेल कशावरून?

आशिष सुर्वे

खरवस.. नाव घेताच लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..

तेव्हा गावच्या घरी आणि एकंदर आमच्या वाडीत बर्‍यापेकी गुरे होती.. उन्हाळी सुट्टीत गावी जाणे होत असे तेव्हा कोणाकडे नुकतेच वासरु जन्माला आले असेल तर आम्हा मुंबईकरांच्या (चाकरमान्यांच्या) घरी प्रेमाने हमखास खरवसाचा द्रोण यायचा.

त्या प्रेमाची ओल आज डोळ्यात दाटून आली.

'मितालि' ताई, धन्यवाद.. आठवणींचा 'कोलाज' डोळ्यांसमोर उघडल्याबद्दल!

*श्रावण संपताच पाककृती करणार आहे!!

मस्त मजा माडी!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

आमच्याकडे शेतात म्हशी कमी व गायी जास्त होत्या. त्यामुळे भरपुर खर्वस खायला मिळायचा. मला म्हशीचा खर्वस जास्त आवडायचा. कारण तो जास्त घट्ट व पांढरा असायचा. सुरवातीच्या दोन दिवसात चिक घट्ट असल्याने एकदम मस्त वडी व्हायची. नंतर पातळ व्हायला लागायचा. नंतर जर्सी गाय आल्यावर 'हल्ली काय खर्वस पुर्वीसारखा राहिला नाही ब्वॉ' हे वाक्य असायचे.
(नॉस्टॅल्जिक)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.