(प्रतिसाद घुसखोरीबद्दल क्षमस्व)
आजपर्यंत एक ओळीचे कौल, काथ्याकूट, लेख खूप बघितले. पण आज एक ओळीचा वृतांत वाचून अक्षरशः धन्य झालो.
अहो राव, लिहा की नीट भरभरून. कट्टा हुकला, वृत्तांत तरी कळू दे की आम्हाला. आणि सध्या अशा देशात आहे जिथून फ्लिकर बॅन आहे. कोणीतरी पिकासावर चढवेल का फोटो?
फोन केला तेव्हा कट्टा संपत आला होता. मंडळी घरी जायला निघाली होती. टारोपंतांकडून थोडी फार गंमत जंमत कळली. डिट्टेल ल्ह्या रे कोणीतरी.
बिपिन कार्यकर्ते
सुनील व सौ.सुनील,प्रभू भाय,संतोष जोशी
तात्या अभ्यंकर,नीलकांत
यांची ओळख तुम्हाला हवी ??? ;)
तात्या,विजूभाऊ
मी आणि ब्रिटिश टिंग्या
बैठक सुरु...
कट्टा फारच छान झाला,नेहमी वाचनमात्र आणि फार कमी वेळा लॉगिन असणारे मिपाकर या कट्ट्याला हजर होते हे या कट्ट्याच वेगळेपण...:)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
पिडाकाकांशी सहमत्त ...
बर्या बोलाने गुमानं वॄत्तांत आणि डिटेलवारी रिपोर्ट द्या, उगाच हुंबपणा करु नका, गाठ आमच्याशी आहे हे लक्षात असु द्या ...
अन्यथा मला "गल्लत होते आहे" ह्या टायटलखाली एक सविस्तर "उहापोह" करणारा दिर्घ प्रतिसाद लिहावा लागेल, मग बघाच तुम्ही काय ते ;)
------
(कांदेपोहे ) छोटा डॉन
गाठ आमच्याशी आहे हे लक्षात असु द्या ...
क्या बात है!!!! दोस्त असावा तर असा!!!!
डॉन्या आणि आम्ही मिळून दिवसरात्र हैराण करू तुला!!!!
-------
(दडपेपोहे) यल्लो डॉन
मला फोटो दिसत नाहीत. :-(
फ्लिकरवर आहेत का? माझ्याकडे ब्लॉक आहे फ्लिकर :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
कट्टा एकदम झकास झाला. श्रीयुत संतोष जोशींचे आयोजन खुप उत्तम होते. त्यांनी उत्तम बडदास्त ठेवली होती.
मिसळपाव तर खुप मस्त झाली होती.
यावेळे बर्याच जूण्या लोकांची भेट झाली आणि काही नवीन मित्र झाले.
- नीलकांत
:)
विजुभाउंचं एक शिक्रेट टल्ली झाल्यावर उजेडात आलं
टल्ली कोणरे..ऑ उगाचच्या उगाच कायबी बोलतोस.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
मंडळी आम्हाला ह्या कट्यात सहभागी होता नाहि आल त्यामुळे फार खेद वाटतो आहे कारण काहि कामामुळे हापिसात अडकुन पडलो होतो त्यामुळे हापिसातुन लवकर सुटका नाहि झाली असो कट्टा फार झकास झालेला दिसतोय :( =D>
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
सर,आता तुम्हीच असं सांगितल्यावर पब्लिकच्या डोक्यात किडे वळवळणारच ना.
लग्नाबद्द्ल होता काय प्रश्न
की रौशनी कधी पूर्ण करणार त्याबद्द्ल?
बाकि कट्टा छान झालेला दिसतोय. सर्वांचे अभिनंदन. फोटो पण छान.
तात्यांनी शर्ट का एवढा टाईट घातलाय?
मिसळपाव ठाणे कट्टा..सुन्दर गप्पा पहिल्यान्दाच मिपाकराना भेटुन मजा आली.तात्या, संतोश जोशी ह्यांचे सुन्दर आयोजना साठी हार्दिक अभिनंदन व आभार , आणि सर्व हजर मिपकराना धन्यवाद अस्साच मिसळपाव ठाणे कट्टा होत राहावा हि सदिच्या......
कट्टा फारच छान झाला. श्रीयुत संतोष जोशींचे आयोजन खुप उत्तम होते. माझ्यासारख्या वाचनमात्र सदस्याला पण कुठेही संकोचल्यासारखे वाट्ले नाही.
फोटो नं
२. प्रभु मास्तर, संतोष जोशी, संकेतजी कळके, हर्षद बर्वे
३. रामदास काका, विकास (हा तो नव्हे), श्री, निखिल देशपांडे कि कुलकर्णी ???
४. श्री, बहुतेक निखिल देशपांडे , अमोल खरे
११. नितिन थत्ते ऊर्फ खराटा
सर्वसाक्षी यांचा फोटो कुठे आहे ?
तमसो मा ज्योर्तिगमय
हे काय नुस्तेच फोटो?
वृत्तांत कुठाय?
फोटो झ्याक आहेत (हसरे.. निरागस वगैरे वगैरे...) पण ना फोटोतील व्यक्तींची नावे ना खुमासदार प्रसंग!
प्लीज येऊ द्या पाहु एक डिट्टेलवार वृत्तांत
(प्रतीक्षेत)ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून ३९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "कधी रे लिहिशील तू... "
अरे कट्टा केलात ना लेको? फुल्ल दंगा केला ना? गप्पाटप्पा पोटभर झाल्या ना?
मग आम्हाला का असं छळताय? नुसतंच आपलं चित्राहुती घातल्यासारखं चिमुटभर लिहुन आणी चार फोटु दाखवून मजा घेताय काय आमची? :(
अरे लिव्हा की वृत्तांत! पार छत्तीस तास उलटून गेले, अजुन उतरली नाय काय लेको? :D
चुचु ते आपले विजुभौ अहेत
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
पर्या मी बांधल्या होत्या लिंबु आणि मिर्च्या गळ्यात पण घरी आल्यावर त्या पोह्या च्या डीशमध्ये शहीद झाल्या. वर; गळ्यात कांदे अडकवायला काय झाले होते? या सवालाने निरुत्तर झालो
अरे.......कट्ट्याला एक खास पेश्यल आयटम होता.
रामदास काकानी मोरोपन्तांच्या मस्त द्वयार्थी आर्या सांगितल्या.
परबु मासतर नेहमीप्रमाणे उठुन दिसत होते.
बळवंतराव पटवर्धन ( कसे भरभक्कम नाव आहे की नाही)आल्यावर जरा मैफलीत रंग भरला. त्यानी वातावरण एकदम स्वातन्त्र्याच्या संग्रमात नेले. सुभाष बोस / मदनला धिंग्रा यांच्या काळात नेले
खोटी नावे घेतलेल्या सभासदांचा पर्दाफाश कसा केला जातो हे नीलकान्तने आजवर जपलेले शिक्रेट सांगितले.
टिंग्या एकदम उत्साहत होता. तो बोलत नव्हता पण त्याची उपस्थिती जानवत होती . म्हणजे मैफीलीत जान आणत होती मदन बाण अधूनमधून एकदा कॅमेरा आणि एकदा ग्लास असे आलटूनपालटून करत होता. मला तर भितीच वाटली की हा बाबा चुकुन ग्लासने फोटो काढेल आणि कॅमेरा ओठाला लावेल. पण तसे काही घडले नाही
सोहम सुहास वगैरे मंडळी थोडीशी बिचकून होती. कट्ट्याला नवेच होते म्हणून असेल . मग एकदम धम्याचा फोन आला. सर्वानी यथेच्च बोलुन घेतले. त्याचे महिनाभराची बील एकाच बैठकीत संपले असेल बहुतेक.
टार्याला माझे एक सिक्रेट कळाले असे तो म्हणतोय. मलाही ते माहीत नसावे बहुतेक.
गटणे येणार होता पण तो गायब झाला.
अमोलखरे मला एकदम सामन्त काकांच्या बॅचमेट असावा असे वाटले होते पण तो माझ्या आणि टिंग्याच्या वल्गात्ला दुशली ब मधलाच निघाला.
क्रमश: लिहिणारांचा निषेध करायाचा असे कोणितरी बोलायचा विचार करत होते. पण मी त्याला पाठिंबा देईन म्हणून तो अव्यक्त राहिला.
ब्रीटीशला क झाल कोन जाने बालाला क झाल तो क झ्येला त्ये कलालाच न्हाई.
संतोशने जेवण इतके फस्क्लास अॅरेन्ज केले होते...श्रीखंडाची बोटे चाटतच जेवण संपवले.
आता आपण एखादा मस्त जोरदार निसर्गाच्या कुशीत नेक्ष्ट कट्टा करुया
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
निषेधः कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्यात काटकसर केल्याचा जाहीर निषेध !
सूचना: आगामी इस्ट कोस्टचा कट्टा (जेव्हा कधी) होईल (तेव्हा) त्याचा वृत्तांत 'भेटलो' ह्या तीन अक्षरांत लिहिण्यात येईल :)
>>>सूचना: आगामी इस्ट कोस्टचा कट्टा (जेव्हा कधी) होईल (तेव्हा) त्याचा वृत्तांत 'भेटलो' ह्या तीन अक्षरांत लिहिण्यात येईल
+१, संदिपशेठशी सहमत आहे.
इथुन पुढे बेंगलोरच्या कसल्याही समारंभ / कट्टा / भेटिगाठी / ओसर्या / ढोसर्या ह्यांचा वॄत्तांत "झाला/झाल्या" असा केवळ २ शब्दात दिला जाईल. उगाच जास्त आग्रह करु नये, अपमान होईल.
------
( १ अक्षराचा "मुनाफा"वाला ) छोटा डॉन पटेल
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी