काय, हवय तरी काय? :) :)
💬 प्रतिसाद
(7)
व
विकास
Mon, 08/03/2009 - 17:17
नवीन
"मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं" असे बहीणाबाईंनी का म्हणले असेल ते आत्ता समजले! :-)
बाकी अजून लिहीण्यासारखे बरेच विषय या स्पर्धेत आहेत त्यावर लिहू शकता :-)
>>समजा माझ्या मित्रांच्या "प्रगत" देशात(की संयुक्त "राज्यात") हे लग्न होतय...<<
या संदर्भात कायम सांगितले जाणारे एक उदाहरणार्थ वाक्यः My children and your children are fighting with our children".
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Mon, 08/03/2009 - 17:21
नवीन
"मन" उधाण विचारांचे .... हा प्रयोग आवडला.
काही काही प्रश्न खरोखरच ठ्ठ्या ऽऽऽ करुन हसवणारे होते ...
असो, बाकीच्या विषयांचा असाच "उहापोह" करावा अशी मनरावांना नम्र विनंती.
------
छोटा डॉन
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 08/03/2009 - 19:12
नवीन
मना,
गृहितके धरणारा तू आहेस त्यामुळे ते तुझ्यावर अवलंबून आहे. नाही का?
अर्धवट प्रश्नांमधून स्पष्ट होणार नाही विषय. नीट विचार केलास तर उलगडा आपोआपच होईल.
ते पब्लिक बघून घेईल ना. त्याची चिंता करण्यात तू का तुझा अमूल्य वेळ वाया घालवतोयस?
निबंधस्पर्धेचा विषय वाचून मनात निर्माण होणार्या साधकबाधक विचारांचा/प्रश्नांचा परामर्श घेऊन स्वतःचे मत सुस्पष्टपणे मांडणारा निबंध.. बस्स!
तुला जर ते योग्य वाटत असेल तर कोण अडवतंय तुला? लिही की बिनधास्त!
बक्षिसाच्या अपेक्षेने लिहायचे की स्वतःचे मत कळवण्याचे माध्यम म्हणून वापरायचे, हा सर्वस्वी निर्णय तुझा असणार आहे. स्पर्धेचा निर्णय हा केवळ निबंधाच्या परिपूर्णतेवर अवलंबून असेल असे वाटते, त्यामुळे बक्षिसाची अपेक्षा धरायला हरकत नसावी बहुदा.
अमुकतमुक विषयावरच निबंध लिहिला तर बक्षिस मिळेल असे काही नमूद केलेले मलातरी दिसले नाही पण तुला जर इतकी अनिश्चिती वाटत असेल बक्षिस मिळण्याबद्दल आणि ते मिळण्यानेच जर सहभागी होण्याला मतलब येत असेल तर मग छोट्या बक्षिसाच्या स्पर्धेत कशाला लिहितोस? प्रमोदकाकांनी सांगितलेल्या निबंधस्पर्धेतप्रयत्न कर. घसघशीत बक्षिस मिळेल.. शिवाय त्यातले विषयही ('विषय' नव्हे!) सुस्पष्ट आहेत!
विनोद, मौजमजा म्हणून जरी वरचे लेखन तू केले असलेस तरी तू उत्तम निबंध लिहू शकतोस याची कल्पना असल्याने निबंधलेखनाचे कौशल्य अधिक योग्य जागी वापरावेस असे आग्रहाने सुचवावेसे वाटते. चु.भु.दे.घे.
निबंधलेखनासाठी शुभेच्छा.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 08/03/2009 - 19:42
नवीन
हा विषय पोरी-बाळींना घेऊन वाचण्याच्या लायकीचा आहे का ? आम्ही बर्याच वेळेला (दुसर्यांच्या) पोरीबाळींना घेऊन वाचायला येतो मिसळपाव वर !!
आणि ह्या असल्या धाग्यांमुळे ओशाळायला होतं !! काय आहे हें ?
तुम्ही याल का हो मन साहेब ? पोरीबाळींबरोबर वाचायला ? येणार असाल तर प्रश्नच मिटला ..
असो .. पोरीबाळींसह अवघडल्यासारखा विषय काढल्याने त्याच्या होणार्या परिणामांचा इथे 'उहापोह' व्हावा !
- टन
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Mon, 08/03/2009 - 20:19
नवीन
हा विषय पोरी-बाळींना घेऊन वाचण्याच्या लायकीचा आहे का ? आम्ही बर्याच वेळेला (दुसर्यांच्या) पोरीबाळींना घेऊन वाचायला येतो मिसळपाव वर !!
पोरी-बाळी बरोबर असताना तुम्ही कळफळक बडवत असता होय? त्याच्यापेक्षा इम्रान हाश्मीच्या क्लासला जा ना!
चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 08/03/2009 - 21:40
नवीन
लेका इन्या ... इम्रान हाश्मी पिक्चरचे पुर्ण दोन तास एकाच पोझ मधे असतो का रे ?
आणि हावरटाला खावे कसे ह्याचा क्लास ? =)) भलताच विनोदी झालाय हो विनोबा !!
- टार्या हावरट
- Log in or register to post comments
म
मन
Mon, 08/10/2009 - 17:47
नवीन
विकास , डॉन्या, वेदश्री, इनोबा, टार्या....
मनापासुन धन्यवाद.
टार्या/इनोबा,
मनोबा तसाही शामळु छाप असल्यानं (इतरांच्या)पोरीबाळिंबरोबर यायचा प्रश्न मला काही सतावत नाही.
डॉन्या,
इतर विषयांचा प्रयत्न करुन पाहिला. पण भट्टि काही जमेना राव.
क्षमस्व.
वेदश्री दी,
सर्व वाचकांपैकी आपणच एक आहात ज्यांनी प्रश्नांची पुरेशी उत्तरं दिलीत. तुम्हाला पेश्शल धन्यु.
विनोद, मौजमजा म्हणून जरी वरचे लेखन तू केले असलेस तरी तू उत्तम निबंध लिहू शकतोस याची कल्पना असल्याने निबंधलेखनाचे कौशल्य अधिक योग्य जागी वापरावेस असे आग्रहाने सुचवावेसे वाटते. चु.भु.दे.घे.
कसचं कसचं.....उगी आपलं खरडात अस्तो झालं.
पण प्रयत्न जरुर करीन.
सर्व वाचकांचे पुनश्च आभार.
आपलाच,
थोडासा चावट
मनोबा
- Log in or register to post comments