थांब ना..
💬 प्रतिसाद
(13)
द
दशानन
गुरुवार, 08/06/2009 - 05:57
नवीन
गंजल्या खाणा खुणा, या भूतकाळाच्या जरी
कोपरा सांगेल सारी, ती कहाणी थांब ना
सुंदर !!!
छान लिहली आहे कविता.. प्राजु ... आवडली !
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
गुरुवार, 08/06/2009 - 06:03
नवीन
'एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ?
घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना' ...हे फारच छान.
- Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे
गुरुवार, 08/06/2009 - 06:16
नवीन
>>एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ?
घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना
छान आहे कविता. या ओळी विशेष आवडल्या.....
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 08/06/2009 - 06:21
नवीन
ए प्राजू,
गझल ठीकच वाटली हो.
तात्या.
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 08/06/2009 - 07:56
नवीन
सांजवेळा होत आली, वाकल्या या सावल्या
भास्कराची साथ निवली, मात्र तू रे थांब ना
प्राजु ताई..एक नंबर ओळी आहेत..
पण व्यापारी आणी दुकानांचा संदर्भ नाही समजला...
- Log in or register to post comments
प
पॅपिलॉन
गुरुवार, 08/06/2009 - 08:03
नवीन
कल्पना आणि त्याची मांडणी आवडली
वरती विसोबा खेचर म्हणतात त्याप्रमाणे ही गझल मात्र नाही. गझलेच्या व्याकरणाचे नियम फार कडक असतात, ते इथे पाळलेले नाहीत.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 08/06/2009 - 17:55
नवीन
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
गुरुवार, 08/06/2009 - 08:03
नवीन
"गंजल्या खाणा खुणा या भूतकाळाच्या जरी,
कोपरा सांगेल सारी ती कहाणी.. थांब ना !"
हे आवडले.
आपण वर 'गझल' म्हटले आहे म्हणून लिहितो, सदर रचनेत काफिया (यमक) कुठेच नाही. ('थांब ना' ही रदीफ आहे). त्यामुळे तांत्रीकदृष्ट्या ही रचना गझल नाही.
"Great Power Comes With Great Responsibilities"
- Log in or register to post comments
प
प्रअका१२३
गुरुवार, 08/06/2009 - 14:57
नवीन
कविता एकदमच मस्त आहे, लयबद्धही आणि अर्थवाहीही.
गजल नाही... तांत्रिक भानगडींमुळे. पण त्यापेक्षा कमीही नाही.
- Log in or register to post comments
म
मीनल
गुरुवार, 08/06/2009 - 15:50
नवीन
गझल आहे की नाही या बद्दल मी लिहू शकत नाही. तेवढा माझा अभ्यास नाही.
पण गर्दी,व्यापारी, दुकाने हे शब्द निश्चितच खटकले.
या कवितेतील प्रसंगाचे सेटींग `संध्याकाळी रस्ता` हे असावे
(the setting- time and place or the physical world described in the poem)
दुसर म्हणजे
मला वाटत की एक प्रेयसी निघून जाणा-या प्रियकराला सांगते आहे की ---थांब ना
हे काव्य कुणाला उद्देशून आहे असे तुम्हाला वाटतय?ती कुणाला थांबायला सांगते आहे?
मीनल.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 08/06/2009 - 17:58
नवीन
मनाशी चाललेला संवाद आहे.
पण गर्दी,व्यापारी, दुकाने हे शब्द निश्चितच खटकले.
साधा सोपा अर्थ आहे.. सगळीकडे फक्त दुकाने आहेत जिथे फक्त व्यापार होतो, पण घरटे.. जिथे केवळ प्रेम माया असते ते दिसले तर (रे! मना) तू थांब..
यात खटकण्यासारखं काही आहे असं नाही वाटत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
म
मीनल
गुरुवार, 08/06/2009 - 18:18
नवीन
मनाचा रेफरेन्स मला संपूर्ण कवितेत लागला नाही.
तू सांगितल्यावर ते कळल्रे.
पण हाच संवाद प्रियकराशी होऊ शकतो... जसे मला वाटले.
साधा सोपा अर्थ आहे..
माझ्या बुध्दीला तो ही कळला नाही.माझी कमतरता!दुसर काय?
बाकी कवितेतील शब्दांत `गर्दी,व्यापारी, दुकाने`मला खटकले.
पुन्हा माझी कमतरताच असेल!
मीनल.
- Log in or register to post comments
अ
अश्विनीका
गुरुवार, 08/06/2009 - 22:51
नवीन
मीनल शी सहमत.
मला ही मनाचा रेफरन्स लागला नाही.
एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ?
घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना
ह्या ओळीत तर मनाशी संवाद चालू आहे असे अजिबात वाटले नाही
- अश्विनी
- Log in or register to post comments