सुविधा स्पॉन्सर कोण करणार ? नाहीतर ३०० रुपये लागतील...
हॅ हॅ हॅ कल्झी घेने.
बाय द वे, तू सध्या निवासी भारतीय असल्याने तुला फाट्यावर मारण्यात आलेले आहे.
-- मिसळभोक्ता
हॅहॅहॅ ..
लेखही फाट्यावर मारण्यात आला हाये ... म्हणूनच अशी प्रतिक्रिया चपला घालून दिलीये सर !!!
बाय द वे , ३०० रुपये ... ह्म्म्म बाण मारायला आमचाच धनुक्ष सापडला का ?
-- मलाईकोफ्ता
अधिक सुविधांसाठी आम्हालाच भेटा !
समजा आपण रहात असलेल्या देशाचे भारताशी (काही कारणामुळे) वितुष्ट आले, किंवा युद्ध झाले, तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल (युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?) ?
जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ येईल तेव्हा भारत-विरोधी समर्थन करणार्यांना किंवा लढणार्यां मिपाकरांवर 'देशद्रोही'/'मातृभूमीद्रोही' असा ठपका ठेऊन मिपावरील त्यांचे सभासदत्व रद्द केले जाईल इतकेच मिपा व्यवस्थापनाच्या वतीने सांगू इच्छितो...
बाकी चालू द्या...
तात्या.
आणि मिपाचा परदेशी सर्वर देखील बंद केला जाईल, असे का नाही बरे ?
हॅ हॅ हॅ...
चांदण्या शिंपीत जाशी चालता तू चंचले...
(तात्याचा मला अभिमान वाटतो.)
-- मिसळभोक्ता
आणि मिपाचा परदेशी सर्वर देखील बंद केला जाईल,
त्यांनी तो जरूर बंद करावा..
पण आम्ही दमड्या मोजतो त्यामुळे बिचारे सर्व्हर आम्हाला विकून दोन टाईम जेवतात
तात्या.
तात्या,
अरे तुझ्याविषयी आधीच अभिमान आहे. आणखी किती वाढवशील ? फुटून जाईल ना !
परवा ओबामा देखील म्हणाला, हेल्थकेयरच्या बिलासाठी टॅट्याची मदत घ्यायची म्हणून.
च्यामारी अमेरिकेतील कुठल्यातरी फडतूस मंडळाने वेबसाईट करायला कॉल केल्यामुळे अभिनंदन करण्याचे प्रस्ताव टाकणे, हे फाट्यावर टाकण्याच्या भूमिकेशी सुसंगत आहे काय रे ?
जाऊ दे.. हा प्रस्ताव फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे, तेव्हा हॅहॅहॅ कल्जी आनि चपला घेने.
-- मिसळभोक्ता
जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ येईल तेव्हा भारत-विरोधी समर्थन करणार्यांना किंवा लढणार्यां मिपाकरांवर 'देशद्रोही'/'मातृभूमीद्रोही' असा ठपका ठेऊन मिपावरील त्यांचे सभासदत्व रद्द केले जाईल इतकेच मिपा व्यवस्थापनाच्या वतीने सांगू इच्छितो...
जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ येईल तेव्हा भारत-विरोधी समर्थन करणार्यांना किंवा लढणार्यां मिपाकरांवर 'देशद्रोही'/'मातृभूमीद्रोही' असा ठपका ठेऊन मिपावरील त्यांचे सभासदत्व रद्द केले जाईल इतकेच मिपा व्यवस्थापनाच्या वतीने सांगू इच्छितो...
ओ सहजराव .. आणि प्रभु मास्तर .. हे आंधारात गोल्ड क्लास मधे काय चाल्लय तुमचं ?
तुम्हालाही हॉस्टेल ला पाठवेल हो !! नाय तर परसातल्या पोफळीच्या झाडाखाली जाऊन २ दिवस कंटुनी( मराठीत कंटिन्यू) वास घ्यावा लागेल वर शपथ घ्यायला लागेल बरं !!
-सावज
मेडीकल लीव्ह टाकून, स्वित्झर्लंडमधे उपचारास दाखल.
जिथे नुकसान होउ शकेल तेथील मालमत्ता वाचवायचे उपाय सुरु.( खोटे बोलायचे नाही असे शिकवले गेले आहे ना. )
नैतिक पाठींबा योग्य वेळी जाहीर.(परत शिकवणी)
शेवटी विजय सत्याचाच! (नेहमीचेच)
हे असे कूट्प्रश्न ही टग्यारावांची खास आवड.
सहजकाका,
जिथे नुकसान होउ शकेल तेथील मालमत्ता वाचवायचे उपाय सुरु. खोटे बोलायचे नाही असे शिकवले गेले आहे ना.
निफ्टीचे कॉल्स खरेदी करणारे, निफ्टीतील किती कंपन्या अमेरिकेवर अवलंबून आहेत, हे बघतात, का त्यांना फाट्यावर मारतात ?
खोटे बोलायचे नाही, असे शिकवले आहे ना ?
-- मिसळभोक्ता
सर्वपक्षीय शेपुट्घाले राज्यकर्ते असताना , मुळात भारत कशाला इतर देशांशी लढायला जाईल.
--
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला अस्स्ल भारतीय कसे म्हणवते तुम्हाला?
माझा एक शिंपल प्रश्न आहे ...
"मिसळभोक्ताशेठचे मराठी संकेतस्थळावर आगमन म्हणजे काही जणांसाठी युद्धजन्य परिस्थितीच नव्हे का ?"
लै पळापळ होते म्हणे मोर्चांवर व लै खणखणीही होते असे एक निरीक्षण आहे...
------
( झाडावर चढुन, लपुन युद्ध पहाणारा ) छोटा डॉन
त्यांना कशाला बोलावताय?
विजुभौंची मजल पार्ले ते फार फार तर सदाशिव पेठ पुणे ३० पर्यंत....
ते तुमची अमेरिका की फिमेरिकात त्यांनी 'स्वप्नप्रवास'सुद्धा केलेला नसेल! :)
>>बाय द वे कुणीतरी चांदण्या मोजताहेत ना ?
आँ आँ आँ ?
कुणाची एवढी मजाल ?
काकांच्या धाग्यावर "चांदण्या मोजण्याचा" मुर्खपणा केलात तर आंतरजालावर "दिवसा तारे पहावे" लागतील हे काय माहित नाही काय ? ;)
मग "चांदण्या शिंपीत जाशी " सोडुन चक्क "तारें जमिन पे" गाणे म्हणावे लागेल ...
------
छोटा डॉन
का हो, हे नारायणगाव मराठवाड्यात येते का हो ? तिकडे अशेच एक परशिद्ध गाव आहे म्हणे जिथुन निरीक्षण वगैरे चालते म्हणे समद्या दुनवेवर ...
आमचा जरा भुगोल कच्चा आहे म्हणुन विचारतो आहे
------
(भुगोलात १०० पैकी ३ मार्क ) छोटा डॉन
फार फार तर हा एवढा उत्तम काथ्याकुट उडवला जाणार ...
लोक २-४ दिवस चर्चा करणार की "नक्की काय झाले होते ? "
निदान "५०-६० व्यनींची देवाणघेवाण " होणार, शेकडो खरडी डागल्या जाणार ...
मग ?
मग काय नाय ?
मिभोशेठ पुन्हा ८-१० दिवसांनी रणवाद्यांचा गजर करत पुन्हा चालुन येणार, पुन्हा युद्धाला तोंड फुटणार व पुन्हा आम्ही झाडावर चढुन सेफली "युद्ध पहात बसणार" ...
असो.
------
छोटा डॉन
अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या संकेतस्थळाच्या बाजूने लढणार? जिथे लिहायला सुरूवात केली त्या, का जिथे आता पडीक असता त्या??
आता पळते, व्यायामाचा टाईम झाला ;-)
अदिती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी