>>नविन शोध लागला ... मुक्तसुनित हेच खरे मिसळभोक्ता आहे !!
व्वा टारझनराव, मला तुमचा अभिमान वाटला.
वास्तविक पहाता ह्या शोधाबद्दल आपल्याला खचितच "शांततेसाठीचे नोबेल प्राईज" मिळालले हवे पण आपण ते पुन्हा "फेकलेल्या परदेशी तुकड्यांची औकाद ती काय ?" म्हणुन फाट्यावर माराल ह्याची खात्री आहे ...
म्हणुन निदान आपल्याला "ज्ञानपीठ" द्यावे अशी शिफारस मी करतो ...
------
छोटा डॉन
मुळ धागा मिसळभोक्तांनी सुरू केल्या मुळे विशेष करून हा त्यांना प्रश्न आहे.
आपण विचारत आहात की: तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल...युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?
समर्थन आणि लढणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहील्याच्या बाबतीत नुसता कळफलक बडवावा लागतो तर दुसर्याच्या बाबतीत शत्रूला बडवावे लागते. तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे? "त्या देशाकडून लढीन" असे म्हणताना नक्की तुम्ही कसे लढणार?
बाकी आम्ही लहानपणा पासून असेच शिकत आलो आहे युद्ध एकच आहे आणि बाजूही ठरलेली: "माणूसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू!" ;) (ऐकीवात आहे: आचार्य अत्रे हे गाणे ऐकल्यावर म्हणाले की बहुतेक मरूच!8} कदाचीत त्यांना टिस्टा, शबाना, महेश भट्ट सारखी मंडळी तयार होणार हे माहीत असावे...:-) )
माझ्या दृष्टीने समर्थन आणि युद्ध करणे फारसे वेगळे नाही. कळफलक हा दुधारी तलवारीपेक्षा अधिक इफेक्टिव्ह असतो. सायबर वारफेअर मध्ये कळफलकानेच युद्ध होते.
माणुसकीचे वगैरे कविता म्हणून ठीक आहे. पण माणुसकीच्या बाजूने तुमचा देश नसला, तर तुम्ही स्वतःच्याच देशाशी युद्ध कराल का ?
-- मिसळभोक्ता
>>>मरुच नको ना असे कोणी का सांगत नाही.<<<
वर माझ्या विधानात अत्र्यांना कुठल्या अर्थाने म्हणायचे होते ते लिहीले आहेच. "मरूच नको ना" हा मुद्दा बरोबर आहे पण त्याच बरोबर लढणे, जबाबदारी पार पाडणे हे विसरू नको हे सांगणे देखील महत्वाचे आहे. दुर्दैवाने ते सांगितले जात नाही. त्यामुळे तसे व्यवहारात मग वागताही येत नाही...
माझ्या इथल्या एका भारतीय मित्राने (तत्कालीन इथल्या विद्यालयातील प्राध्यापकाने) सांगितलेले एक पंधराएक वर्षांपुर्वीचे उदाहरणः "सबवे ला (दोन डब्यांची रस्त्यावरची आणि भुयारात पण जाणारी ट्राम) अचानक कसला तरी हादरा बसला आणि सर्वजण जागीच हलले अथवा पडले. ताबडतोब दारे उघडली गेली (कारण रस्त्यावर होती) आणि मी बाहेर जीव वाचवायला पळत आलो. नंतर बघितले तर लक्षात आले की दुसरापण एक बाहेर पळत आला आणि तो ही भारतीयच होता. बाकी त्या डब्यातील काळे-गोरे (वर्णीय, आडनाव नाही!) स्वतःला सावरून झाल्यावर इतरांना मदत करत होते..."
मला माहीत आहे, असे सगळेच नसतात, सगळीकडे असे होत नाही आणि याला जिथे गरज आहे तिथे उलट उदाहरण पण मी देऊ शकेन. पण तरी देखील हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे...
विकासभौ,
आपण दिलेल्या उदाहरणावरून "भारतीय हे माणुसकीचे शत्रू आहेत" असे दिसते, कारण संकटात सापडलेल्यांना मदत करणे, हीच माणुसकी. आता तुमचे युद्ध कुणाशी ?
-- मिसळभोक्ता
आपण दिलेल्या उदाहरणावरून "भारतीय हे माणुसकीचे शत्रू आहेत" असे दिसते, कारण संकटात सापडलेल्यांना मदत करणे, हीच माणुसकी. आता तुमचे युद्ध कुणाशी ?
तसे म्हणायचे नाही. एक अब्ज बिंदूंमधील हे केवळ दोन बिंदू आहेत. बाकीचे एक्स-वाय अॅक्सिस वर मांडून मग लाईन होते, की कर्व्ह, पॅराबोला की हायपरबोला (अॅसेम्प्टोटीक - इव्हर अॅप्रोचेस बट नेव्हर रिचेस) होतोय ते समजेल...
बाकी, हे म्हणजे केवळ ९/११ झाले म्हणून सर्वच मुसलमान (आणि मुस्लीम राष्ट्रे) वाईट म्हणण्या सारखे झाले. आपल्याला माहीतच असेल की आपल्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झुडूप ने इस्लाम इज रीलिजन ऑफ पीस असे सातत्याने म्हणले होते (त्याने हल्ला केलेले, अटकेत टाकलेले अपराधी आणि निरपराधी हे मुस्लीम धर्मीय होते हा निव्वळ योगायोग! ;) )
गीतेच्या पहिल्या अध्यायात भगवंताने "स्वकीयांशी लढताना ते स्वकीय आहेत ह्याचा विचार करू नये" असे सांगितले आहेच. त्यामुळे बाय लॉ, तुम्हाला स्वतःच्या देशाविरुद्ध लढण्याची परवानगी आहे.
(अवांतरः भग = भोक, वंत = असलेला.)
-- मिसळभोक्ता
यातून काहीतरी वेगळच तर सुचवायचं नसेल? :W
आम्ही कुठल्या बाजूने लढणार हे आमच्याकडे कोण मदत मागायला येणार आणि ते कुठे बसणार यावर ठरवलं जाईल..
-(तो पर्यंत पहुडलेला कॄष्ण)
इंग्लंड किंवा वेस्टइंडिज मधले भारतीय त्यांच्या संघाविरुद्ध भारतीय संघाला पाठिंबा देतात आणि विजयाचा जल्लोषही करतात.
(अरे हे काय? धागा माझ्यासाठी नाहिये) :)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
इंग्लंड किंवा वेस्टइंडिज मधले भारतीय त्यांच्या संघाविरुद्ध भारतीय संघाला पाठिंबा देतात आणि विजयाचा जल्लोषही करतात.
मग दंगली मस्जिद बंदर, भायखळ्यात का होतात ?
-- मिसळभोक्ता
तसंही माझ्या वजनाने फांदी मोडेल! पण तो पिंपळावर चढला आहे आणि मी हरबर्याच्या झाडावर त्यामुळे भेटणार नाही तो मला!!
डान्राव, या हो, तुम्हाला हे काका बोलावत आहेत. आल्यावर तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही. ज्यांना कोणाला डान्राव दिसतील त्यांनी कृपया त्यांना त्वरित मिपावर पाठवून द्यावे.
अदिती
काय चढाचढी चाल्लीये रे मुलांनो ??
गुढग्याचे त्रास संभवतील आं ! मंग नानावटीत टाकावं लागेल आणि तिकडेही वराहज्वर आला आहे म्हणे !!
-(फुटबॉल एल्बो ने त्रस्त) टचिन टेंडुलकर
मग दंगली मस्जिद बंदर, भायखळ्यात का होतात ?
तिथलेच बहुतेक सगळे लोक अनिवासी इंग्रज अथवा वेस्टइंडिज असावेत.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
काय रे, आत्ता खरंच प्रतिसाद उडवला का उगाच वावड्या उडवत आहेस रे?
इनोबावर आरोप करणं ही फ्याशनच झालीये हल्ली. असो.
चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
संभाव्य कारणे:
१. तुम्ही अमेरीकन कंपनीत काम करता
२. तुमच्या चपलेचा ब्रँड अमेरीकन आहे (घातल्या आहेत का?)
३. अमेरीकन कम्पु शी निगडीत आहात
वगैरे वगैरे वगैरे.
१. तुम्ही अमेरीकन कंपनीत काम करता
नाही
२. तुमच्या चपलेचा ब्रँड अमेरीकन आहे (घातल्या आहेत का?)
नाही
३. अमेरीकन कम्पु शी निगडीत आहात
आमचा स्वतःचाच कंपू आहे.
चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
खालीलपैकी एक प्रतिसाद निवडावा आमचा प्रतिसाद म्हणून -
१. काय ट्यँवट्यँव लावलं आहे. आहे हे असं आहे. ज्यांना इथलं वातावरण आवडत नाही, त्यांनी चालू पडावे. सगळे गेलात नि XX बंद पडले तरी बेहत्तर (हे बाळासाहेब ठाकरे अधूनमधून निवृत्तीची घोषणा करत तसं. )
२. बरं बाबांनो. तुमच्या मनासारखं होऊ देत. काय कवतिकं करायची ती करा अमेरिकेची. आपण साला एक शब्द बोलणार नाही. XX मारली आणि पदरचे पैसे खर्चून संकेतस्थळ काढलं. (पडलो तरी नाक वर)
३. आपलं घर, आई-बाप सोडून सुखासुखी कुणी परदेशी जात नाही, हे मला ठाऊक आहे. पण दुर्दैवाने माझ्या ओळखीत दहा तरी असे लोक आहेत जे.... सगळ्यांचा मित्र. (हा आधी तीनदा येऊन गेलेला प्रतिसाद)
४. साला मजा आली. एक काडी टाकली की हे लोक कसे भांडत बसतात ते बघायला. &#$@ (प्रतिवादाचे मुद्दे संपल्याने निरुत्तर झालो आहोत हे कबूल न करण्याचा एक मार्ग)
या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे आपल्याला उद्देशून तर नसेल अशी शंका कोणी घेऊ नये :). त्यामुळे या प्रतिसादाला "माझ्या लेखनाचा बराच बारकाईने अभ्यास केला आहेस, हो. छान, छान" अशी ठेवणीतली प्रतिक्रिया आली तर आश्चर्य वाटेल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी