अंनिस व धर्मश्रद्धा
💬 प्रतिसाद
(101)
अ
अप्रतिम
Wed, 08/21/2013 - 06:56
नवीन
दाभोलकरच योग्य आहे.
- Log in or register to post comments
न
निश
Wed, 08/21/2013 - 10:04
नवीन
दाभोलकर योग्य आहे. कोकणातील ब्राम्हण लोक दाभोलकर अस नाव वापरतात. व ईतर जातीतील लोक दाभोळकर अस नाव लावतात. दाभोलकर हे मुळचे दाभोली ह्या गावातले. त्यांचे वडिल सातार्याला जाऊन स्थायिक झाले होते.
गौड ब्राम्हण समाजातील होते.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 08/21/2013 - 10:25
नवीन
अरेरे! डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धे इतकाच जातपात पाळण्याविरुद्ध लढा दिला आहे. लोकांनी जातपात आणि धर्म विसरुन समाजाने एकोप्याने राहावे असे त्यांना वाटायचे. त्यांनी आपल्या एकुलत्याएक मुलाचे नांवही 'हमीद' असे ठेवले आहे.
- Log in or register to post comments
प
पेस्तन काका
Wed, 08/21/2013 - 10:31
नवीन
+१
- Log in or register to post comments
द
दशानन
Wed, 08/21/2013 - 10:50
नवीन
+१ असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
न
निश
Wed, 08/21/2013 - 10:33
नवीन
पेठकर सर, माफ करा पण त्यांचि जात सांगण्यामागे कारण हे की, आ़ज काल जो येतो तो ब्राम्हण समाजाला झोडपुन काढतो त्याना नाव ठेवतो. मला ऐकच सांगायच होत की ब्राम्हण समाजातील असुनही त्यानी हिंदुतील चुकीच्या प्रथांविरुद्ध लढा दिला व शेवटी आपला जींव हि देऊन ते अमर झाले.इतकच सर मला खरच जातीच राजकारण करायच नाही. खरच भावना दुखावल्या असतील तर मनापासुन माफी.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 08/21/2013 - 10:50
नवीन
सहमत..
मलाही तुमचा उद्देश गैर होता असे वाटले नाही.. तुम्हाला ल की ळ ह्यातला फरक सांगायचा होता आणि तोच मांडण्यासाठी तुम्ही तसे "सपोर्टींग स्टेटमेंट" केलेत असे मलाही वाटले..
- Log in or register to post comments
न
निश
Wed, 08/21/2013 - 10:53
नवीन
पिलीयन रायडर जी, अतिशय खर बोललात तुम्ही. मी तुमचा आभारी आहे.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 08/21/2013 - 10:56
नवीन
नाही, नाही. भावना वगैरे कांही दुखावल्या नाहीत.
'दाभोलकर' की 'दाभोळकर' ह्याचा आंतरजालावर शोध घेत असता. डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धानिर्मुलना व्यतिरिक्त ( मला स्वतःला तेवढेच ठावूक होते.) इतर कार्याचीही माहिती मिळाली. त्यात जाती धर्माविरुद्ध त्यांच्या विचारांना त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात कृतीने जोड देताना आपल्या एकुलत्या एक मुलाचे नांव 'हमीद' असे ठेवल्याचे वाचले. ह्या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचा 'ब्राह्मण' हा उल्लेख, त्यांच्या विचारांविरोधात म्हणून, खटकला.
ह्या वाक्यात आलेला 'ब्राह्मण' हा शब्द खटकत नाही पण तुमच्या प्रतिसादाच्या शेवटी 'गौड ब्राम्हण समाजातील होते.' हे विधान अनावश्यक वाटले.
मलाही जातीचे राजकारण करायला आवडत नाही हे सहज नमूद असावे.
(आणि ते 'सर' कशाकरिता? नुसते 'प्रभाकर पेठकर' म्हणा किंवा मिपावर सर्वमान्य असणारे नांव, 'पेठकर काका' म्हणा.)
- Log in or register to post comments
न
निश
Wed, 08/21/2013 - 11:02
नवीन
पेठकर काका, समजुन घेतल्या बद्दल मी खरच आभारी आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 08/21/2013 - 19:44
नवीन
हे जादूटोणा विधेयक नक्की काय आहे ते कधीच समजले नाही. जादूटोणाविरोधी, नरबळीविरोधी कलमे त्यात आहेत असे म्हणतात. पण वारकरी व अनेकांचा या विधेयकाला विरोध आहे. सरकारची सुद्धा या विधेयकाला मंजुरीसाठी विधिमंडळात हिम्मत झालेली नाही.
दाभोळकरांनी या विधेयकाचा संपूर्ण मसुदा एखाद्या मराठी वृत्तपत्रातून प्रसिद्ध करून व ते सविस्तररित्या स्पष्ट करून त्यावर वाचकांचे, संघटनांचे, वकीलांचे आक्षेप मागवून आक्षेपांवर खुलासा केला असता तर या विधेयकाचा विरोध नक्की कमी झाला असता. पण हे विधेयक नक्की काय आहे हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिले. त्याचे आधीचे नाव "अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक" होते, ते बदलून "जादूटोणा विरोधी विधेयक" असे केले गेले. या विधेयकानुसार सत्यनारायणीची पोथी वाचणे हासुद्धा गुन्हा ठरेल असे काही लेखातून वाचले होते. निदान मलातरी या विधेयकाचा नक्की मसुदा कोठेही वाचायला मिळालेला नाही. या विधेयकाचा मसुदा जाहीरपणे प्रसिद्ध करून त्यावर चर्चा झाली असल्यास मला त्याची माहिती नाही.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 08/21/2013 - 21:24
नवीन
अनिंसच्या संस्थळावर त्यातील प्रमुख भाग ठेवला आहे. त्यातरी कुठे काही आक्षेपार्ह वाटले नाही.
प्रस्तावित कायद्याचा मसुदा माहीत नाही. पण तो न मिळण्यास पक्षी गुलदस्त्यात रहाण्यास दाभोलकर जबाबदार असण्यापेक्षा सरकार जबाबदार आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 08/21/2013 - 23:29
नवीन
त्या लिस्ट मधे दिलेली सगळी कलमे लागु करतो म्हटलं तर हा कायदा मुद्दलातच त्रुटी घेऊन येईल... शिवाय त्यात धार्मीक तणाव निर्माण करणारे एलिमेण्ट्स तर प्रचंड आहेत.
अर्धवटराव
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/22/2013 - 03:00
नवीन
मला त्या कायद्यात काही गैर वाटले नाही. त्यातील बहुतांशी कलमांचा नुसता श्रद्धा-अंधश्रद्धांशी संबंधच आहे असे नाही तर त्या शारीरीक आणि आर्थिक (+मानसीक) त्रास पण होणार्या गोष्टी आहेत. त्यातून माझ्या नजरेतून काही निसटले असले तर माहीत नाही. पण सर्व कायद्याच्या मसुद्यात आणि शब्दांमधे आहे... त्यामुळेच जरी सरकार वटहुकूम काढणार असे म्हणले असले तरी त्यात नक्की काय आहे हे पाहीले पाहीजे. कारण वटहुकूम तर अक्षरशः चर्चेशिवायच अधिकृत करता येऊ शकतो. (जरी त्याला नंतर विधीमंडळाची संमती लागत असली तरी..)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 08/22/2013 - 03:56
नवीन
जि कलमं त्या लिस्ट मधे दिली आहेत त्यातले बरेचसे भीक नको पण कुत्रा आवर टाईपचे आहेत. शारिरीक वा मानसीक त्रास देणे, कुठल्याही बहाण्याने, तसंही बेकायदा आहे.
अर्धवटराव
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/22/2013 - 14:16
नवीन
1) to perform Karni, Bhanamati,
2) to perform magical rites in the name of supernatural power,
3) to offer ash, talisman, charms etc. for the purpose of exorcism and to drive out evil spirits or ghosts,
4) to claim possession of supernatural powers and to advertise this claim,
5) to defame, disgrace the names of erstwhile Saints/ Gods, by claiming to be there reincarnation and thus cheating the gullible and God-fearing simple folks.
6) to claim to be possessed by divine power or evil power and then perform miracles in the name of such powers.
7) to punish and to beat mentally ill patients in the belief that they are possessed by evil spirits.
to perform Aghori rites.
8.) to perform so called black magic and spread fear in society.
9) to perform "Gopal Santan Vidhi" to beget a male offspring.
10) to oppose scientific medical treatment and to coerce to adopt Aghori treatment.
11) to sell or deal in so-called magic stones, talisman, bracelets, charms.
12) to become possessed by supernatural powers and then pretend to give answers to any questions in this mental state.
13) to sacrifice innocent animals for the appeasement of gods or spirits.
14) to dispense magical remedies for curing rabies and snake bites.
15) to dispense medical remedies with claims of assured fertility.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/22/2013 - 14:52
नवीन
>>> 4) to claim possession of supernatural powers and to advertise this claim,
कानात भिकबाळीसारखी एक रिंग घातली की मधुमेह बरा होतो असा एक डॉक्टरही जाहीरात देऊन प्रचार करतात. असे डॉक्टरही या कायद्यांतर्गत येऊ शकतील का? हैद्राबादमधील एक कुटुंब एक जिवंत मासा गिळायला लावून त्यामुळे दमा संपूर्ण बरा होतो. अशा लोकांना या कायद्याने प्रतिबंध करता येईल का? जर दैवी शक्तीने रोग बरा करण्याचा दावा करणे हा गुन्हा असू शकतो तर आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करून जगात कोठेही सिद्ध न झालेली उपचारपद्धती वापरून रोग बरा करण्याचा दावा करणे हे का बेकायदेशीर असणार नाही?
>>> 5) to defame, disgrace the names of erstwhile Saints/ Gods, by claiming to be there reincarnation and thus cheating the gullible and God-fearing simple folks.
पूर्वी होऊन गेलेल्या संतांचा आपण अवतार आहोत असा दावा करणारेच फक्त या कायद्याखाली येतील का अत्यंत गलिच्छ व शिवराळ भाषेत पुस्तके लिहून पूर्वीच्या संतांची लिखित बदनामी करणारे सुद्धा या कायद्याखाली येतील? संत श्री समर्थ रामदास यांच्याविरूद्ध अत्यंत खालच्या दर्जाचे लेखन करणारे ब्रिगेडी, खेडेकर, पोळके, कोकाटे इ. या कायद्याखाली अडकू शकतील का? पूर्वी होऊन गेलेल्या संतांचा आपण आधुनिक अवतार आहोत असे सांगणे ही संतांची बदनामी होऊ शकते तर पूर्वी होऊन गेलेल्या संतांविषयी अत्यंत गलिच्छ व शिवराळ लेखन असलेली पुस्तके प्रसिद्ध करणे हा का गुन्हा होऊ शकत नाही?
>>> 11) to sell or deal in so-called magic stones, talisman, bracelets, charms.
नवरत्नांचा प्रभाव सांगणारे असंख्य रत्नशास्त्री व ज्योतिषी आहेत व अशी रत्ने विकणारे असंख्य सोनार महाराष्ट्रात आहेत. या कायद्याने हे सर्वजण अडकतील का? यांच्याप्रमाणेच वास्तुशास्त्र व फेंगशुई च्या नावाखाली पिरॅमिड, प्रिझम इ. वस्तू विकणारे व आपल्या ज्ञानाची जाहिरात करणारे असंख्य जण आहेत. या कायद्यामुळे तेदेखील अडकू शकतील का?
>>> 13) to sacrifice innocent animals for the appeasement of gods or spirits.
हा सर्वात जबरदस्त मुद्दा आहे. हा मुद्दा या कायद्यात असेल तर जत्रेत/नवरात्रात कोंबड्या/बकरे बळी देणारे व ईदच्या दिवशी धर्माच्या नावाखाली लाखो बोकड कापणारे सर्वजण या कायद्यांतर्गत अडकतील. विरोध करणार्यांचा याच कलमाला सर्वाधिक विरोध असेल. हे कलम कायद्यात असेल तर उलटा प्रश्न हा येईल की जर धर्माच्या नावाखाली प्राणी मारण्यास विरोध असेल तर जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केल्या जाणार्या हत्या कशा समर्थनीय आहेत?
एकंदरीत या कायद्यातील वरील काही कलमे ही संदिग्ध आहेत व त्यांचे दूरगामी परीणाम होऊ शकतील. त्यामुळेच हा कायदा विधानसभेत मंजूर होताना दिसत नाही कारण वरील कलमांना सर्वांचाच विरोध असणार आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/22/2013 - 17:37
नवीन
या सगळ्याचे थोडक्यात उत्तर दोन वाक्यांमधे मोडते: (१) म्हणूनच कायद्याचा मसुदा / भाषा काय आहे ह्यावर बरेचसे अवलंबून असणार. आणि (२) कायदा कितीही केला तरी जो पर्यंत कोणी तक्रार करत नाही तो पर्यंत पोलीस आपणहून जाऊन काहीच करणार नाहीत....
आता काही तुम्ही मांडलेल्या मुद्यांबाबत विस्तृतपणे, पण त्या आधी एक स्पष्टी़करणः वर मांडलेल्या कुठल्याही गोष्टी मी स्वतः करत नाही, करणार नाही आणि माझ्या जवळच्या व्यक्तींना करून देणार नाही. तरी देखील ते कायद्यात बसवताना त्याची भाषा कशी असेल यावरच सर्व अवलंबून असल्याने आणि मला ती भाषा तुर्तास माहीत नसल्याने, ढोबळ मानाने असा कायदा येणे योग्य आहे इतकेच तुर्तास म्हणेन. थोडक्यात मी त्या कायद्याला डिफेन्ड करण्यासाठी लिहीत नाही... त्याव्यतिरीक्त अंनिसबद्दल अथवा तत्सम सुधारणांबद्दल माझे मत काय आहे हे २००९ मधील वरील अनेक प्रतिसादात दिसेल.
१. वैद्यकीय उपचार पद्धती आणि त्यातील बनावट पणा. एकंदरीत "मेडीकल मालप्रॅक्टीस" हा प्रकार सुप्रिम कोर्टाने १९८६ पासून "कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट" अंतर्गत ठेवलेला आहे. त्यामुळे असल्या भानगडी त्याच पद्धतीने हाताळल्या जातात आणि जातील. पण सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, लोकशाहीत कायदा हा स्वतःलाच हातात घेऊन काही करू शकत नाही. त्यामुळे भिकबाळी आणि तत्सम संदर्भात कोणी तक्रार केली तर त्याला कायद्याने उत्तर देणे आत्ताही शक्य होईल. वेगळे उदाहरणच देयचे झाले तर हुंड्याचे देता येईल. आज हुंडाबंदी असली तरी आपण असे म्हणू शकतो का की हुंडा कोणी घेतच नाही म्हणून? मग तो कसा चालतो? कारण पोरीचा बाप मुकाट्याने देतो, पोलीसात जाऊन तक्रार करत नाही म्हणून... माझ्या आठवणीतील माहितीप्रमाणे लग्नानंतर सात वर्षाच्या आत अथवा लग्न झालेल्या ३०च्या आतील स्त्रीचा अनैसर्गिक मृत्यू झाला तर पोलीस हुंडाबळीच्या संशयाची सुई नवरा आणि सासू-सासरे आदींवर रोखू शकतात पण तसे होतेच का? प्रत्येक वेळेस पोलीसांना करायचे नसते असेच काही नसावे इतकेच तुर्तास म्हणेन.
२. कालौघात ज्यांचे संतत्व सिद्ध झाले आहे आणि टिकून आहे त्यांच्या नावाच्या गैरवापराबद्दल : परत कायदा हा "अंधश्रद्धा निर्मूलनासाठी" आहे. त्यामुळे त्यात ब्रिगेडी मंडळी बसू शकत नाही. त्यांना खरे म्हणजे आत्ता देखील जातीयवादाखाली जो काही कायदा असेल त्यात ओढता येईल. दाभोलकर हे जातपंचायतीच्या विरोधात काम करत होते/करू लागले होते. ह्या जात पंचायतींचे म्होरके कोण?
३. नवरत्नांचा प्रभाव सांगणारे ज्योतिषी, वास्तूशास्त्रवाले वगैरे त्याबाबत कायद्याची भाषा कशी असेल यावर अवलंबून राहील.
४. पशूबळी संदर्भात देखील कायद्याची भाषा कशी असेल यावर अवलंबून राहील असेच म्हणावेसे वाटते. जर धर्माच्या नावाखाली प्राणी मारण्यास विरोध असेल तर जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केल्या जाणार्या हत्या कशा समर्थनीय आहेत? इंटरेस्टींगली त्या पानावर विधेयकासंदर्भात कुठेही धर्म अथवा रिलीजन हा शब्द वापरलेला नाही... त्यामुळे मी असे गृहीत धरतो की खाणे आणि सणासुदीच्या वेळा या अपवाद म्हणून धरल्या गेल्या असाव्यात.
एकंदरीत या कायद्यातील वरील काही कलमे ही संदिग्ध आहेत व त्यांचे दूरगामी परीणाम होऊ शकतील. खरे आहे. तसे होऊ शकते नाही होईलच. पण प्रत्येक विधेयकाचा कायदा झाल्यावर त्यात सुधारणा (अमेंडमेंड) पण पाठोपाठ येतात, तसे होऊ शकेल.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 08/22/2013 - 18:44
नवीन
अंधश्रद्धा म्हटलं कि "मनाची विक्षीप्त अवस्था" हा तिचा भाऊ तिच्या पाठोपाठ येतो, व त्यामुळे गुन्ह्याची तीव्रताच बोथट होते. आपल्याकडे सुतावरुन स्वर्ग गाठणारे वकील त्याचा फायदा घेऊन गुन्हेगाराच्या शिक्षा डायल्युट करवतील. चोराला सरळ सरळ चोर म्हणुन गजाआड करण्याऐवजी त्याने कुठल्या भ्रमात येऊन हे कृत्य केलं असं म्हटलं तर वाजले ना बारा. सर्वात महत्वाचं म्हणजे या असल्या पळवाटेमुळे हा कायदा गमतीचा विषय होऊन बसेल व त्याचा थेट परिणाम अंधश्रद्ध निर्मुलन कार्यावर होईल. भ्रष्टाचारी माणुस "कायद्याने सिद्ध होऊ दे" म्हणुन राजरोस फिरतो. त्याच्यावर आरोप करायला निदान काहि ना काहि कागदपत्रांचा आधार तरी असेल... पण गुन्हेगारावर त्याच्या मनाच्या संदिग्धतेवरुन आरोप करतो म्हटलं तर काय कडबोळं होईल कायद्याचं.
अर्धवटराव
अर्धवटराव
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/22/2013 - 19:31
नवीन
तुमचा प्रतिसाद वाचताना अजून एक गोष्ट लक्षात आली. (परत मसुद्यात काय लिहीलयं ते माहीत नाही त्यामुळे assuming संस्थळावरील मुद्देच आहेत आणि तशीच काहीशी भाषा आहे). अंनिसच्या संस्थळावरील मुद्यांमधील काही अपवाद वगळता फक्त सकर्मक शब्द फक्त खाली लिहीत आहे... ते वाचले तर लक्षात काय येते? तर बहुतांशी वेळेस अंधश्रद्धाळू व्यक्तीस गुन्हेगार ठरवले जाणार नसून एखाद्या व्यक्तीस अंधश्रद्धेच्या मार्गास लावणार्या व्यक्ती-संस्थेस गुन्हेगार समजले जाऊ शकेल. फक्त # ७, आणि १० मधे तुम्ही (अर्धवटराव म्हणतात तसे) "मनाच्या विक्षिप्त अवस्थेत" समोरच्या व्यक्तीस चोप दिला अथवा वैद्यकीय उपचार केले नाहीत असे म्हणता येईल. #१० मधे जो "गोपाल संतान विधी" म्हणलेले आहे त्यात नक्की काय भानगड आहे माहीत नाही. पण जर त्यात स्त्रीस काही (मुलगा होउंदेत म्हणत) त्रास होणार असेल तर त्यास देखील तो विधी सांगणारा आणि करणारा दोन्ही दोषी ठरले तर आश्चर्य वाटत नाही.
1) to perform 2) to perform 3) to offer 4) to claim 5) to defame, disgrace 6) to claim
7) to punish and to beat mentally ill patients in the belief that they are possessed by evil spirits.
to perform Aghori rites. 8.) to perform
9) to perform "Gopal Santan Vidhi" to beget a male offspring.
10) to oppose scientific medical treatment and to coerce to adopt Aghori treatment.
11) to sell or deal 12) to become possessed by 13) to sacrifice 14) to dispense
15) to dispense
बाकी राहीली पारंपारीक सवय. त्याला या निमित्ताने हात लावायचे डोक्यात असले तरी काही उपयोग नाही... कॉ. डांगे यांचे या संदर्भात एकदा वाचल्याचे आठवते. त्यांना स्टॅलीनने भारतात (निधर्मी) कम्युनिझम आणण्याच्या भानगडीत पडू नको असे सुचवले होते. कारण अठरापगड जातींचा हा देश कधीच बदलणार नाही असे त्याचे मत होते. तसेच अजून एक रोचक उदाहरण देतो... इराण या देशाचे अधिकृत नाव देखील "इस्लामिक रिपब्लीक ऑफ इरान" असे आहे. तेथून पारश्यांना हाकलून लावल्याचे पण सगळ्यांना माहीत असते. तरी देखील आजही त्या देशात (आणि इराणी समाजात) पारशी नवरोज हेच नववर्ष मानले जाते आणि त्याची १३ दिवस अधिकृत सोहळ्यासाठी सुट्टी असते!
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 08/22/2013 - 20:13
नवीन
बापु उवाचः
मला स्वप्नदृष्टांत झाला कि माझ्या देहात विष्णू भगवान प्रवेश करते झाले. आता मी हि गोष्ट जाहिर करणार. मी कायद्यानुसार काहि गुन्हा केला का? माझ्या मनाच्या विक्षीप्त अवस्थेत मी बुवाबाजी केली आहे. मी स्वतःच अंधश्रद्धेचा बळी आहे.
मला अगदी मनापासुन खात्री आहे कि कुणीतरी माझ्या कानात समोरच्या व्यक्तीचं भविष्य, रोगावर इलाज, धनप्राप्ती बद्दल सांगुन जातं. मी फक्त मॅसेज कन्व्हे करतो. मी स्वतःच व्हीक्टीम आहे अंधश्रद्धेचा.
आता या बापुला कायदा कसा पकडणार?
अर्धवटराव
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/22/2013 - 20:33
नवीन
जर बापू या निमित्ताने खिसेकापूचा धंदा करत असेल तर व्हिक्टीम नाही कॉन्स्पिरेटर आहे. तुम्ही म्हणता त्या संदर्भात नवरात्रात (आणि इतर काही वेळेस विशिष्ठ पुजाअर्चांना) अंगात येणार्या, घागर फुंकणार्या स्त्रीया येऊ शकतील (ज्यांच्या त्या दिवशीच्या, नवरात्रात अष्टमीच्या रात्रीच्या प्रचंड उर्जेचे मला आजही आश्चर्य वाटते). कारण त्यात त्या काही पैसे घेत नाहीत अथवा इतर वेळेस कायम स्वरूपी त्या देवत्व येण्याचा धंदा करत नाहीत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 08/22/2013 - 20:50
नवीन
"भक्त" स्वखुशीने पैसे देतो. त्यामुळे कुठलाच कायदा बापुंचा खिसेकापुपणा सिद्ध करु शकत नाहि. फार फार तर बापुंच्या इन्कमवर टॅक्स लावल्या जाऊ शकतो.
भक्ताच्या या स्वखुषीशिवाय जर खिसेकापुपणा सिद्ध होत असेल तर त्याला अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचं काय प्रयोजन? खिसे कापणे, कुठल्याही प्रकारे, तसंही गुन्हा आहे. आणि तो तसाच शिक्षेस पात्र असायला हवा.
एक लक्षात घ्या... या कायद्याचा सर्व भार दोन बाबींवर अवलंबुन आहे:
१) बापुंना व्यवस्थीत माहित आहे कि तो खोटं बोलतोय
२) ते माहित असुनही बापु आपला खोटेपणा भक्तांना विकतोय, भक्त स्वतः ते विकत घेत नाहिए.
दोनपैकी एक जरी पॉईण्ट सिद्ध झाला नाहि तर कायदा लंगडा पडेल. तसं आपल्याकडे एखादा कायदा लंगडा पडणं नविन नाहि... पण एकदाका कायद्याने बापुला गुन्हेगार सिद्ध करता आलं नाहि तर त्याची "आमचे काम कायदामान्य आहे" अशी जाहिरात होईल, व त्याचा सरळ फटका अंधश्रद्धा निर्मुलन आंदोलनाला बसेल.
छडीने मारुन शिस्त बाणवायची असेल तर छडी मोडता कामा नये. अन्यथा बेशिस्तीला मान्यतेचं अधिष्ठान मिळतं. आज गुन्हेगारी राजकारणात ठाण मांडुन बसली आहे त्याचं हेच कारण आहे. कायदामान्य अंधश्रद्धा तर समाजाची काय वाट लावेल.
अर्धवटराव
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/22/2013 - 21:10
नवीन
पण एकदाका कायद्याने बापुला गुन्हेगार सिद्ध करता आलं नाहि तर त्याची "आमचे काम कायदामान्य आहे" अशी जाहिरात होईल, व त्याचा सरळ फटका अंधश्रद्धा निर्मुलन आंदोलनाला बसेल.
मुद्दा आवडला. तसे देखील कायद्यातून पळवाटा काढणारे असतातच. त्यामुळे अंनिस चळवळीस जरा फटका बसून त्यांना पण विचार करायला लागला तरी काही फरक पडत नाही.
तुमच्या आधीच्या प्रतिसादाच्या संदर्भात जेंव्हा एखादा बापू एखादी सिस्टीम तयार करून अंगात देव, हातात ताईत घेऊन भक्ताच्या मागे जाईल तेंव्हा तांत्रिक दृष्ट्या त्याला वेडं ठरवणे अवघड जाईल. आणि तसे ठरवले गेले त॑र त्याला कायमचे अवघड जाईल. कारण खरेच वेड्यांच्या बाजारात त्याला बुवाबाजी करत बसावी लागेल आणि तिथले वेडे त्यासाठी खुळे नसावेत. ;)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 08/22/2013 - 15:03
नवीन
त्यातले बरेचस्र मुद्दे फ्रॉड, खोट्या मेडीकल प्रॅक्टीस वगैरे कायद्यात अगोदरच कव्हर झालेत. पशुबळी वगैर गोष्टी 'त्यांच्या बकरा ईद ला हात लाऊन दाखवा' अशा टाईपच्या धार्मीक टेन्शन वाढवणार्या आहेत, गंडे-ताईत प्रकार पण त्याच पद्धतीचा आहे.
नरबळी त्यात दिलेलं नाहि, पण नरबळीला अंधश्रद्धेचा कायदा लावणे म्हणजे कसाबला अनस्टेबल मेण्टल स्टेटचा अधार देणे झाले... नरबळी सरळ सरळ सदोष मनुष्यवध आहे व त्याकरता ३०२ लावणे हेच उत्तम.
अर्धवटराव
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/22/2013 - 15:10
नवीन
>>> त्यातले बरेचस्र मुद्दे फ्रॉड, खोट्या मेडीकल प्रॅक्टीस वगैरे कायद्यात अगोदरच कव्हर झालेत.
याविरूद्ध आधीच कायदे आहेत का या नवीन जादूटोणा कायद्यात या गोष्टींविरूद्ध कलमे आहेत? जर आधीचेच कायदे असतील तर त्या कायद्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
>>> पशुबळी वगैर गोष्टी 'त्यांच्या बकरा ईद ला हात लाऊन दाखवा' अशा टाईपच्या धार्मीक टेन्शन वाढवणार्या आहेत, गंडे-ताईत प्रकार पण त्याच पद्धतीचा आहे.
पशुबळी म्हटल्यावर जत्रेत देवीला दिलेले बळी किंवा मशिदीत मारलेले बळी याच्यात भेद करता कामा नये कारण दोन्हीमध्ये धार्मिक कारणावरून प्राणीहत्या केली जाते. पण तरी शेवटी प्रश्न राहतोच की धर्माच्या नावाखाली केलेली पशुहत्या आणि आहाराच्या नावाखाली केलेली पशुहत्या यात फरक काय? एकावर बंदी व दुसर्या प्रकाराला मान्यता हा विरोधाभास आहे.
>>> नरबळी त्यात दिलेलं नाहि, पण नरबळीला अंधश्रद्धेचा कायदा लावणे म्हणजे कसाबला अनस्टेबल मेण्टल स्टेटचा अधार देणे झाले... नरबळी सरळ सरळ सदोष मनुष्यवध आहे व त्याकरता ३०२ लावणे हेच उत्तम.
सहमत. नरबळी हा सहेतुक खुनाचाच गुन्हा आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/22/2013 - 17:49
नवीन
नरबळी हा सहेतुक खुनाचाच गुन्हा आहे.
नरबळीस सहेतुक गुन्हा मानण्यास कोर्टाचे आधीचे निकाल ("case law") आहेत. "मानवत हत्याकांड" हा महाराष्ट्रास काळीमा लावणारा नरबळीचा प्रकार ४० एक वर्षांपूर्वी झाला होता. त्यातील एका पोलीस प्रमुखाचे भाषण नंतर अनेक वर्षांनी गणेशोत्सव अथवा नवरात्रोत्सवात ऐकल्याचे आठवते. लहान असल्याने त्यावेळेस ही पण आत्ता देखील अंगावर काटा येईल असले घॄणास्पद कृत्य त्यातील आरोपींनी केले होते. आत्ता जालावर शोधले तेंव्हा त्यावरील हा लेख मिळाला. त्यातील प्रमुख आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि सहआरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/23/2013 - 04:55
नवीन
पशुहत्या ही खाण्यासाठीच केली जाते ;)
म्हणून तर (धर्माच्या/प्रथेच्या नावाखालीदेखिल) कोंबडी, बकरे अशा पशूंचाच बळी दिला जातो. मनुष्य सहसा खात नसलेल्या पशूचा बळी दिलेला पाहिला आहे कधी? ;)
जोवर प्रत्यक्ष कायद्यात काय भाषा वापरली आहे ते समजल्याविना निष्फळ चर्चा करण्यात अर्थ नाही.
असो.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 08/22/2013 - 06:30
नवीन
कायदा नीट समजून अंमल बजावणी होत असेल तरच कायद्याचा उपयोग असतो. शेषन यांच्या अगोदरच्या आयुक्तानी हा अर्थ कधी समजूनच घेतला नाही. शेषन यानी कोणताही नवीन कायदा आणला नाही.फक्त उपलब्ध कायद्याचा पाठपुरावा केला. म्हणूनच व तरीही शेषन आज जिवंत असूनही भारतीय मनांत अजरामर झालेले आहेत. त्याच प्रमाणे आजच्या भारतीय दंडविधानातील अनेक कलमांचा उपयोग करून अघोरी प्रथांवर मात करता येईल. पण पोलीस खात्याचा बेसच मुळी तक्रार येणे असा असल्याने आपण होऊन पोलीस समाजसुधारणेसाठी कायद्याचा उपयोग करण्यासाठी आणखी शंभर वर्षे जावी लागतील.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 08/22/2013 - 06:53
नवीन
नाही पटले.
शेषन यांचे उदाहरण गैर लागू आहे. त्यांनी जे केले ते "निवडणूक आयुक्त" या 'घटनात्मक पदावरून' केले (अर्थात ते तेव्हा सरकारी 'नोकर' नव्हते). ते स्वतः इतर पदांवर तितकेसे प्रभावी नव्हते.
दुसरे असे की शेषन काय किंव इतर तत्सम कुणी काय नवे काय्दे आणू शकत नाही - आणूही नये. ते काम केवळ जनतेच्या प्रतिनिधींनीच केले पाहिजे आणि तेच योग्य आहे.
कोणत्या?
गैरसमज आहेत. काही गुन्हे असे आहेत जे घडल्याचे कळताच्ग तक्रारीची वाट न बघता पोलिसांना FIR देणे आवश्यक असते. प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यासाठी असे होणे शक्य नाही आणि योग्यही नाही!
- Log in or register to post comments
र
राही
गुरुवार, 08/22/2013 - 07:28
नवीन
या जुन्या धाग्याच्या निमित्ताने दोन गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे मिपावर त्यावेळी आणि आता प्रकट होणारी मते यात संख्यात्मक आणि विचारात्मक झालेला बदल. अमुक एका विचारांच्या सभासदांची संख्या वाढल्यामुळे हे झाले असावे. दुसरे म्हणजे त्या वेळी दाभोलकरांच्या सर्व कार्याविषयी नसलेली माहिती. अंधश्रद्धाविरोध या कार्यामुळे जरी त्यांना माध्यमप्रसिद्धी लाभली असली तरी त्यांची देवदासी आणि वाघ्यामुरळी प्रथानिर्मूलन तसेच एक गाव एक पाणवठा ही कामे अधिक व्यापक आणि अधिक यशस्वी होती. देवदासी प्रथा तर आज महाराष्ट्रात नष्टप्राय आहे. पुणे जिल्हा किंवा जवळपास एका दर्ग्याजवळ एक भली मोठी शिळा आहे. ती काही माणसांना केवळ एक अंगळी लावून उचलता येते या अंधश्रद्धेला आव्हान देऊन अंनिस.ने मोठाच विरोध ओढवून घेतला होता. 'साधना' चे संपादकत्व बरीच वर्षे समन्वयाने त्यांनी चालवले. (समाजवादी आणि समन्वय-- विचार करा किती कठिण!). ते आणि त्यांचे विस्तारित कुटुंब हे सर्व 'सोशल रीफॉर्मर्स होते/आहेत. १९२५ ते १९७५ या दरम्यान कर्वे-परांजपे परिवाराने महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेत जशी मोलाची भर घातली, (आणि आजही घालीत आहेत,) जवळपास तसेच कार्य हा दाभोलकर परिवार १९६०पासून आजतागायत करीत आलेला आहे. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळ्या क्षेत्रात असले तरी महत्त्वाच्या कामात सर्वांची मदत असते.स्वातंत्रानंतरच्या पहिल्या दशकात हिरीरीने समाजकार्यात उतरलेला हा गट आहे. हे भरीव कार्य सगळ्यांना माहीत असतेच असे नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 08/22/2013 - 08:17
नवीन
+१११११११११११११११११११११११११११.
दाभोळकरांचे हे कार्य नक्कीच अतिमहत्त्वाचे आहे.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 08/23/2013 - 06:33
नवीन
आम्ही काही मित्र एकदा बोटाने दगड उचलला जाणार्या ठिकाणी गेलो होतो. पहिल्या प्रयत्नात मी व अपरिचित चार जण
अशा पाचांनी दगड उचलला. मग मी माझ्या बरोबरच्या पाच मित्राना बाजूल घेतले व नुसतेच बोट लावा काही करू नका असे सांगितले. दगड जागचा जाम हलेना.
यातून माझ्या वेळेस अपरिचित असलेले ते कोण असावेत? एखादी सिद्धी प्राप्त झालेले भाग्यवान की रस्त्यावर ताईत विकणार्याचे ताईत विकत घेणारे त्याचे साथीदार ?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 08/22/2013 - 12:42
नवीन
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या.
--------------------------------------------------------------
सुरवातिपासुनच त्यांनी जर नि:पक्षपातीपणाचे धोरण अवलंबले असते ,
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात गफलत न करता काम केले असते,
सरसकट संपुर्ण धर्माला टार्गेट केले नसते,...
अंधश्रद्धा निर्मुलनाच्या क्षेत्रामध्ये सर्वच धर्मांसाना समाविष्ठ केले असते,
अनेक प्रकरणांमध्ये खोटेपणा केला नसता
.
.
.
तर कदाचीत आजची वेळ त्यांच्यावर आली नसती !!
तरिही,
दाभोळकर हे एक सच्चे देशभक्त होते,
अंधश्रद्धा समाजातुन नष्ट व्हावी अशी त्यांची मनापासुन तळमळ होती,
त्यांनी हिंदु धर्मातील अनेक ढोंगी आणि धर्माच्या नावावर पोटे भरणार्या दललांना त्यांची जागा दाखवुन दिली होती.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो , ही परमेश्वराचरनी प्रार्थना ! दाभोळकरांसारखा वैचारीक विरोधक लाभणे ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे !
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 08/22/2013 - 13:19
नवीन
आँ?????
हे नक्कीच सनातन प्रभात किंवा तत्सम लोकांचं अपडेट असणार.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 08/22/2013 - 13:27
नवीन
ज्या मित्राने हे लिहीलय तो थोडा डोक्यावर पडलेला आहे.. त्याने हे चोप्य पस्ते केलं आहे असं वाटतय.. मी त्याला थोड्या शिव्या घालुन आलेय.. पण नक्की काय खोटेपणा केलाय ते मी विचारलं नाहि.. :(
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 08/22/2013 - 13:32
नवीन
आणि विचारलं असतं तरी घंटा काही उत्तर मिळालं नसतं हा भाग अलाहिदा.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 08/23/2013 - 07:24
नवीन
विचारलं.. चांगलं खडसावुन विचारलं.. तर उत्तराच्या ऐवजी "गीता वाचा.. शुद्ध सात्विक देव म्हणजे काय तुम्हाला कळलंच नाहिये" असं काही तरी बरळणे चालु आहे. मी मुद्द्यवरुन भरकटु न देता "दाभोळकर खोटारडे आणि पक्षपाती कसे ते सांग आधी" हा एकच प्रश्न रेटत आहे.. बघु काय उत्तर देतो ते..
आणि कायद्या विषयी तर फार घोळ चालु आहे.. म्हणे की "जर हा कायदा आला तर देव मनल्या बद्दल पण तुरुंगवास होऊ शकतो"... काय बोलणार ह्यावर?
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 08/23/2013 - 08:01
नवीन
म्हणजे देवात पण शुद्ध-अशुद्ध, सात्विक-तामसिक भेदभाव??
कमाल आहे!! :-)
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 08/23/2013 - 08:39
नवीन
मला वाटतं शंकर महादेव हे तामसी वृत्तीचे देव असावेत.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 08/23/2013 - 08:52
नवीन
म्हणजे त्या व्यक्तिसाठी शंकराचे रँकींग खूपच खाली असेल नाही!! :-)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 08/23/2013 - 09:22
नवीन
मला वाटतं शंकर महादेव हे तामसी वृत्तीचे देव असावेत.
हॅहॅहॅ मग त्यांना भोलेनाथ का बरं म्हणत असावेत ? ;)
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 08/23/2013 - 13:47
नवीन
शंकर महादेवन वाचले आणि अंमळ गडबडलो! :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 08/23/2013 - 13:46
नवीन
ही डोक्यावर पडलेली लोकं अशीच असतात. त्यांना कोंडीत पकडताय ते चांगलंच आहे.
तरी हे वायझेड लोक काही सुधारणार नाहीत हेही तितकंच खरं. :(
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 08/23/2013 - 08:36
नवीन
नरेन्द्र दभोलकर की हत्या कहीं खान्ग्रेस और एनसीपी के द्वारा पूर्व नियोजित षडयंत्र द्वारा की गयी है इसाई मिशनरीयो के इशारे पे। ????????????
निष्कर्ष तक पहुचने क...े कारण :-
1) हत्या के तुरंत बाद से ही सारे मराठी चैनल्स पे सिर्फ नरेन्द्र दभोलकर के प्रोग्राम ही दिखाए जा रहे हैं और हत्या के लिए सीधे सीधे बिना किसी सबूत या साक्ष्य के सनातन संस्था, हिन्दू जनजाग्रति व् अन्य सनातनी संस्थाओ को दोषी बताया जा रहा है जबकि पुलिस ने अभी तक इस मामले पे कोई आधिकारिक बयान नही दिया है।
2) हत्या के तुरंत बाद ही आनन् फानन में अंध्श्रधा उन्मूलन कानून बिना किसी चर्चा के पास करके गवर्नर के पास भेज दिया गया है। ये महाराष्ट्र चुनाव से पहले हिन्दुओ को बाटने और मुस्लिम-इसाई तुष्टिकरण का षडयंत्र है।
3) हत्या के तुरंत बाद ही दभोलकर समर्थको के भेष में खान्ग्रेस और एनसीपी के कार्यकर्ताओ ने महाराष्ट्र में उत्पात मचाना शुरू कर दिया और पुणे बंद का एलान कर दिया गया।
इस कानून का पास हो जाना भारत में सनातन धर्म पे सबसे बड़ी चोट होगी क्यूंकि महाराष्ट्र में पास होते ही अन्य राज्यों में बिल पास होने के दरवाजे खुल जायेंगे। ये कानून केवल हिन्दू रीती रिवाजों को कवर करता है, इस कानून में हाथ पे कलावा बांधना, टीका लगाना, हवन करना, सत्यनारण का पाठ करना जैसी हिन्दू रीतियो को ढोंग बताया गया है और इन सब के लिए 7 साल तक की सजा है। इस्लाम और ईसाइयत को इस कानून में पूरी छुट है।
अंध्श्रधा उन्मूलन कानून बनाने वाले नरेन्द्र दभोलकर को भाई राजीव दिक्षित ने काफी समय पहले expose किया और बताया है की किस तरह दभोलकर को विदेशो से पैसा लेकर केवल सनातन धर्म के खिलाफ कार्य करता था और इस दभोलकर के बेटे का नाम हमीद है और वो इस्लाम कबूल कर चूका है।
हम सब को मिलकर एक स्वर में इस कानून का विरोध करना होगा अन्यथा वो दिन दूर नही जब हाथ जोड़कर प्रार्थना करना भी ढोंग बता के आपको जेल में ठूस दिया जायेगा।
आपके मन मे सवाल आएगा कि आखिर ऐसा क्या है इस अंधश्र्धा निर्मूलन कानून मे जो सब हिन्दू इसका विरोध कर रहें है ????
एक बार यहाँ जरूर जरूर click कर देखें !
http://www.youtube.com/watch?v=Lw7ZNxnllGM
हर हर महादेव
---------------------------------------------------------------------------
प्लिझ कुणीतरी त्या विडिओ मध्ये काय आहे हे सांगाल काय? तुनळी बॅन आहे इथे..
- Log in or register to post comments
प
पुष्कर जोशी
Fri, 08/23/2013 - 15:20
नवीन
बापरे हा ३तास २६ मिनिटांचा विदेओ आहे ... त्या ऐवजी हा पहा
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 08/23/2013 - 09:13
नवीन
अजून एक कायदेशीर शंका
>>> 9) to perform "Gopal Santan Vidhi" to beget a male offspring.
हा "गोपाळ संतान विधी" नक्की काय आहे हे मला माहिती नाही. हा विधी नक्की कोण करतात व कोण हा विधी करून घेतात हे देखील मला माहिती नाही. बहुतेक आपल्याला "मुलगाच" व्हावा यासाठी विवाहीत जोडपी हा विधी करून घेत असावीत असे वाटते.
कायदेशीरदृष्ट्या पाहिले तर "मुलगाच" व्हावा ही इच्छा बेकायदेशीर किंवा घटनेविरूद्ध कशी ठरते? गर्भ मुलीचा असल्यास मुलगी नको या एकमेव कारणास्तव मुद्दाम कोणतेही वैद्यकीय कारण नसताना गर्भपात करणे मुलीचा गर्भ नष्ट करणे हे नक्कीच बेकायदेशीर व अत्यंत नीच कृत्य आहे. पण एखाद्या जोडप्याने आम्हाला मुलगाच हवा अशी इच्छा व्यक्त करणे व त्यासाठी गोपाल संतान विधी करणे हे कसे बेकायदेशीर ठरू शकेल? मुळात "मुलगाच हवा" ही इच्छाच घटनेनुसार बेकायदेशीर ठरते का?
सूचना - कृपया मी "मुलगाच" हवा याचे समर्थन करत आहे असा अजिबात गैरसमज करून घेऊ नये. मला दोन मुली आहेत व त्या दोघी माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत. "मुलगाच" हवा असा विचार माझ्या मनात कधीही निर्माण झाला नव्हता. फक्त या जादूटोणा कायद्यातून ज्या पळवाटा निघू शकतील असे मला वाटते ते मी लिहीत आहे.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 08/23/2013 - 09:27
नवीन
"गोपाळ संतान विधी" नक्की काय आहे हे मलादेखिल माहिती नाही. पण तुमच्या अंदाजाप्रमाणे असल्यास..
असा विधी करुन मुलगा होईल असा क्लेम करणारा जो यातून जोडप्यांची आर्थिक फसवणूक करतो त्याला शिक्षा करणे हा हेतु आहे.. जोडप्यांना आत टाकणे हा हेतु नाही.. यातुन जोडप्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे ही अपेक्षा आहे.. आणि असा विधी करुन असे होते असा विचार पसरवणार्यांवर चाप बसवणे हा हेतु आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 08/23/2013 - 13:14
नवीन
येथे हा विधी दिलेला दिसतोय. बहुदा हा उत्तरेकडील प्रकार असावा. मिपा काही १००% प्रातिनिधिक आहे असे म्हणायचे नाही. पण येथे देखील जर कोणालाच हा विधी ऐकून देखील माहीत नसला तर त्याचा अर्थ हे प्रकरण महाराष्ट्रात एकदम कमीत कमी होत असावे असे वाटते...
फक्त मुलगाच होउंदेत असे वाटणे योग्य नसले तरी, हा गुन्हा ठरू शकत नाही. बर बाकी वर दुवा दिलेल्या संस्थळावरील विधी म्हणजे कुठल्यातरी प्रकारातली पुजा आणि जपजाप्य आहे. त्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर सर्वच पुजा-अर्चांवर घ्यावा लागेल. त्यामुळे काहीतरी खरेच कारण असावे अथवा उगाच काहीतरी घुसडले असावे अशी दोनच टोके दिसतात.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प
Fri, 08/23/2013 - 15:28
नवीन
दुवा वाचला तसेच विधी हा सर्वसामान्य शान्ती विधी सारखा वाटला यात अघोरि असे काही आढळले नाही याचा एव्हडा बागुलबुवा का करण्यात यावा हे अनाकलनीय आहे, की अनिस ला दुसरा कुठला विधी अपेक्षीत असावा हे कळत नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »