Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वाईन फ्लू चा विळखा...

व
विसोबा खेचर
Sun, 08/09/2009 - 12:31
🗣 78 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
38976 वाचन

💬 प्रतिसाद (78)
अ
अवलिया Sun, 08/09/2009 - 12:39 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4855246.cms हे वाचा अजुन लिंक देतो Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 08/09/2009 - 12:41 नवीन
http://www.unipune.ernet.in/Stud_Medical/Swine%20Flu.pdf ही अजुन एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन Tue, 08/11/2009 - 13:35 नवीन
स्वाइन फ़्लू क्या है? इंफ़्लुएंज़ा-ए (एच1 एन1) को आम बोलचाल की भाषा में स्वाइन फ़्लू कहा जाता है. स्वाइन फ्लू के शुरूआती मामले अब से करीब दो महीने पहले मैक्सिको में सामने आए थे. तब से अब तक लगभग सौ देशों में इस संक्रमण ने लोगों को अपनी चपेट में ले लिया है. प्रयोगशाला में किए गए परीक्षणों से पता चला कि इस वायरस के जींस उत्तरी अमरीका के सूअरों में पाए जाने वाले जींस जैसे हैं इसलिए इसे स्वाइन फ़्लू कहा जाने लगा. वैज्ञानिक भाषा में इस वायरस को इंफ़्लुएंज़ा-ए (एच1 एन1) कहा जाता है. कैसे फैलता है स्वाइन फ़्लू? शुरुआत में ये माना जा रहा था कि इसके संक्रमण में सूअरों की भूमिका होती है. लेकिन बाद में पाया गया है कि ये इंसान से दूसरे इंसान के संपर्क में आने से फैलता है. स्वाइन फ़्लू के लक्षण क्या हैं? इसके लक्षण आम फ़्लू से मिलते जुलते ही हैं इसलिए इसकी पहचान खून की जाँच से ही संभव है. वैसे इसके प्रमुख लक्षण हैं- सिर में दर्द, बुखार, गले में खराश, खांसी, बदन में दर्द, सांस लेने में दिक्कत. वैज्ञानिकों को चिंता सता रही है कि भारत सहित जिन देशों में आजकल आम फ़्लू का सीज़न चल रहा है उसके वायरस के साथ मिलकर एच1एन1 परेशानी पैदा कर सकता है. इसके गंभीर संक्रमण के कारण शरीर के कई अंग काम करना बंद कर सकते हैं जिसके कारण मौत भी हो सकती है. क्या इसका इलाज संभव है? कुछ हद तक इसका इलाज संभव है. इसके मरीज़ों का उपचार टैमीफ़्लू नामक वायरसरोधी दवा से किया जा सकता है. डॉक्टरों के अनुसार ये दवा इस फ़्लू को रोक तो नही सकतीं पर इसके ख़तरनाक असर को कम ज़रूर कर सकती है. डॉक्टरों का कहना है कि इस समय वायरस इतना कमज़ोर है कि ज़्यादातर लोग बिना किसी दवा के उससे उबर जाते हैं. इसके बचाव के क्या उपाय हैं? स्वाइन प़्लू से बचने का सबसे अच्छा तरीका स्वच्छता के नियमों का पालन करना है. भीड़-भाड़ वाली जगहों या सार्वजनिक स्थानों पर जाने से बचें, खांसते और छींकते वक्त मुंह और नाक को रूमाल या कपड़े से ढंकें. फ्ल़ू प्रभावित व्यक्ति से दूरी बनाकर रखें और सार्वजनिक स्थानों पर जाने पर तीनस्तरीय मास्क लगाएँ. क्या इसका टीका उपलब्ध है? स्वाइन फ़्लू को रोकने के लिए अभी तक कोई टीका नहीं विकसित हो पाया है. विश्व स्वास्थ्य संगठन ने घोषणा की है कि सितंबर से स्वाइन फ़्लू का टीका आम लोगों को उपलब्ध हो सकेगा. कई दवा निर्माता कंपनियों ने एच1एन1 टीका तैयार किया है और कई देशों में इसका परीक्षण चल रहा है. दुवा : http://www.bbc.co.uk/hindi/india/2009/08/090810_swineflu_factsheet_ac.shtml बीबीसी ! ***** *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
_
_समीर_ Tue, 08/11/2009 - 13:44 नवीन
अरे हे काय आहे? एखादी ओळ/परिच्छेद अमराठी भाषेत ठीक आहे. इथे अख्खा लांबलचक प्रतिसाद हिंदीत लिहिला आहे. अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Tue, 08/11/2009 - 14:04 नवीन
तु कोण आहेस बे :? साला.... फुकटचा हाफ चड्डी हवलदार.... ! तुम्ही काय करु नका दुस-याला काय करु देऊ नका.... ! चड्डीछाप .... हुड ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _समीर_
द
दशानन Sun, 08/09/2009 - 12:44 नवीन
छान दुवा ! मिडियामुळे तर आहाकार माजल्यासारखं हाल करुन ठेवला आहे... ह्यांना आधी कोणीतरी सांभाळा रे.... :( गुडगावं मध्ये हाल ठीक आहे पण चांगला नाही आहे ! *** Image removed. तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विशाल कुलकर्णी Tue, 08/11/2009 - 07:53 नवीन
http://magevalunpahtana.wordpress.com/2009/08/11/what-is-swine-flue/ माझ्याकडे एक पी.डी. एफ. मधील बुकलेट आहे H1N1 Virus च्या संदर्भात ते इथे कसे डकवता येइल? सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गोगोल Sun, 08/09/2009 - 13:04 नवीन
स्वाइन फ्लु बद्दल नेमकी आणि प्रतिबंधात्मक माहिती काहीच मिळत नाही. एखादा रोग एपिडेमिक चे स्वरूप धरण करतो आणि तुम्ही रुग्ण नी घरी राहावे, हात धुवावे, त्याच्यापासून लांब राहावे अशी जनरल माहिती काय देता? मी नेटवर थोडा फार शोध घेतला. सर्जिकल आणि नॉर्मल मास्क्स फारसे काही कामाचे नाहीत. या वाइरस ची काही लांबी असते ती नॉर्मल मास्क्स मधून फिल्टर होत नाही. असे मास्क पेशेंट लोकांनी लावले पाहिजेत ज्याणेकारून त्यांचे जंतू दुसर्यांच्या अंगावर डाइरेक्ट्ली पडणार नाहीत. पण जर का तुम्हाला प्रिकॉशन म्हणून मास्क लावायचा असेल तर रासायनिक युध्ाच्या वेळी लावतात तसे हवबंद मुखवटे पण नानो फिल्टर सोबत लावले तारा 100 टक्के खात्री देता येईल की तुम्ही बचावाल. न-95 मास्क्स च्या सुरक्षेविषयी मत भिन्नता आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/09/2009 - 16:28 नवीन
दुवे फालतू वगैरे म्हणू नये, असे वाटते. कारण प्रत्येकाला जशी माहिती मिळते ते सांगण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. बाकी स्वाइन फ्लु बद्दल नेमकी आणि प्रतिबंधात्मक माहिती काहीच मिळत नाही. एखादा रोग एपिडेमिक चे स्वरूप धरण करतो आणि तुम्ही रुग्ण नी घरी राहावे, हात धुवावे, त्याच्यापासून लांब राहावे अशी जनरल माहिती काय देता? याच्याशी किंचीत सहमत आहे. हात धुवावे, रुग्णापासू दूर राहावे, हा उपाच आहेच असे वाटते. स्वाइन फ्लू च्या प्रतिबंधात्मक उपायाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. टॅम्लिन फ्लू आणि अन्य औषधी ही स्वाइन फ्लूची लागण झाल्यावर त्यानंतरचा उपाय आहे. पण तो पर्यंत या विषाणूंना प्रतिबंध व्हावीत यासाठी काही औषधी घ्यावीत का ? त्याची नेमकी माहिती मिळत नाही, ती मिळाली पाहिजे. त्यावर भर दिला पाहिजे असे वाटते. दैनिकातून ज्या काही बातम्या वाचायला मिळत आहे, त्यात हे विषाणू एखादा माणूस शिंकल्यानंतर उडणार्‍या तुषारातून म्हणे आठ तास जिवंत राहतात आणि त्याच्या संपर्कात येणार्‍यांना त्याची लागण होऊ शकते. आता या आठ तासात गर्दीच्या ठिकाणी कितीतरी लोकांचा संपर्क येऊ शकतो तेव्हा सर्वांनाच त्याची लागण होते का ? किंवा ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, अशाच रुग्णांना याची लागण होते या बद्दलही काही माहिती मिळत नाही. गर्दी टाळणे, रुग्णाशी संपर्कात न येणे, हा उपाय आहेच. मेक्सिकोने जे काही उपाय केले होते, ज्या 'मॅक्सिको मॉडेल' ची जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसा केली होती. [माहिती संदर्भ दै. स़काळ ] त्यात शिक्षण संस्था बंद ठेवणे, उद्रेक झालेल्या राज्यात पाच दिवस संचारबंदी, नागरिकांना फ्लू रोधक मास्क, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी, हॉटेल, बार, चित्रपटगृहे बंद, सार्वजनिक ठिकाणी दहा दिवस बंद तशाच काही उपाययोजना आपल्याला करावी लागते की काय असे वाटायला लागले आहे. अर्थात स्वाईन फ्लू:संशयितांना देणार टॅमिफ्लू ही बातमी चांगली वाटली, तेव्हा ज्यांना स्वाइन फ्लूचा संशय वाटतो त्यांनी टॅमिफ्लू घ्यावी असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
व
वेदश्री Sun, 08/09/2009 - 17:00 नवीन
टॅमिफ्लूच्या गोळ्या म्हणजे काय लिमलेटच्या गोळ्या आहेत का? त्याच्या साईड इफेक्ट्सचे काय? समजा मी स्वाईन फ्लूची संशयित आहे म्हणून मला टॅमिफ्लूचा डोस दिला आणि मग निष्पन्न झालं की प्रत्यक्षात मला स्वाईन फ्लू झालेलाच नाहीये. मग? माझे काय? मला जो काही आजार झालेला आहे त्याच्या उपचाराला उशीर झाला म्हणून मी मरणार??!!! समजा मी वाचलेच तर टॅमिफ्लूच्या साईड इफेक्ट्सचे काय? एकतर गोळ्यांचा साठा मर्यादित आहे जो योग्यप्रकारे वापरला गेला पाहिजे. असे संशयितांना देऊन औषध खलास करून प्रत्यक्षात ज्यांना गरज आहे त्यांनाच कमी पडायचे! शिवाय त्या विषाणूला या औषधाची 'सवय' झाल्यास काय होईल ते तर राम जाने! मलातरी वाटते की चाचणी परीक्षा लवकरात लवकर कशी करून घेता येईल यावर जोर देऊन 'योग्य उपचार'च केले गेले पाहिजे. साप समजून दोरीला धोपटण्याचे प्रकार किमान स्वास्थ्याच्या क्षेत्रात तरी करू नयेत असे प्रामाणिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नितिन थत्ते Sun, 08/09/2009 - 17:23 नवीन
टॅमिफ्लू (आणि रेलेंझा) अमेरिकेत बंदी असलेली औषधे आहेत परंतु तातडीची उपाययोजना म्हणून वापरायला अमेरिकन सरकारने परवानगी दिली आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर उलगडा होऊ शकेल.
  1. स्वाईन फ्लू ची लागण झाली म्हणजे माणूस मरणार असे निश्चित आहे का?
  2. (भारतात) साध्या फ्लू वर आपण अ‍ॅण्टीवायरल औषधे न घेता पॅरासिटॅमॉल/निमेसुलाइड घेतो ते पुरेसे नाही का?
  3. अ‍ॅमॉक्सिसिलिन किंवा सेफ्टम वगैरे अ‍ॅण्टीबायोटिक काम करीत नाहीत का?
  4. स्वाईन फ्लू सापडलेल्या इतर रुग्णांची स्थिती काय आहे?
नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
ध
धनंजय Mon, 08/10/2009 - 16:27 नवीन
१. स्वाईन फ्लू ची लागण झाली म्हणजे माणूस मरणार असे निश्चित आहे का?
नाही. मृत्यू अटळ नाही - प्रभावितांपैकी काही टक्के लोकांना मृत्यू येऊ शकेल. ही टक्केवारी बहुधा खूप लहान आहे. पण किती आहे, हे आता सांगता येत नाही. गणित संदिग्ध का आहे, त्याचे कारण मागच्या धाग्यात दिले होते. काही लहान टक्केवारीलाच मृत्यू आला, तरी ही लक्ष देऊन काळजी घेण्याची स्थिती आहे.
२. (भारतात) साध्या फ्लू वर आपण अ‍ॅण्टीवायरल औषधे न घेता पॅरासिटॅमॉल/निमेसुलाइड घेतो ते पुरेसे नाही का?
बहुतेक लोकांना पुरेसे आहे. पण "श्री. क्ष"ला सौम्य आजार झाला, पॅरॅसेटामॉल पुरेसे आहे, तरी त्याची कार्यालयीन सहकारी "मिस. य", त्याचे मूल "कु. य" आणि त्याची वृद्ध आत्या "सौ. ज्ञ" यांना लागण होऊ नये अशी काळजी "श्री. क्ष" याने घ्यावी. हात धुवावेत, शिंका आवराव्यात, घरीच राहावे, इ.इ.
३. अ‍ॅमॉक्सिसिलिन किंवा सेफ्टम वगैरे अ‍ॅण्टीबायोटिक काम करीत नाहीत का?
विषाणूंविरुद्ध प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) काम करत नाहीत. विषाणूंमुळे नाजुक झालेल्या फुप्फुसांमध्ये जर कीटाणूंचा (बॅक्टेरियांचा) संसर्ग झाला, त्यातून न्युमोनिया झाला, तर त्याविरुद्ध प्रतिजैविके वापरावी लागतात. मात्र त्यांनी विषाणूंचा निचरा होत नाही. उगाच प्रतिजैविके घेऊन फ्लूचा प्रतिबंधही होत नाही.
४. स्वाईन फ्लू सापडलेल्या इतर रुग्णांची स्थिती काय आहे?
प्रश्न समजला नाही. बहुतेक रुग्ण सावरले आहेत. काही रुग्णांची स्थिती बरी आहे. काही मेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 08/10/2009 - 16:54 नवीन
>स्वाईन फ्लू सापडलेल्या इतर रुग्णांची स्थिती काय आहे? >प्रश्न समजला नाही. प्रश्नाचा उद्देश बहुतेक रुग्ण सावरले आहेत आणि काही मेले आहेत या सारखे (किंवा उलट) उत्तर मिळवणे हाच होता. ते आपण दिलेच आहे. अजून एक प्रश्न. सध्या चांगले असलेल्या (ताप वगैरे काही न आलेल्या) लोकांची परीक्षा केली तर किती लोकांच्यात साध्या फ्लूचे आणि स्वाईन फ्लूचे विषाणू सापडण्याची शक्यता आहे? याचा उद्देश विषाणूची लागण झाली तरी ताप आला नाही असे होण्याची शक्यता आहे का? हे जाणण्याचा आहे. तसे होत असेल तर ते अधिक धोकादायक आहे असे वाटते कारण ताप न आल्यामुळे क्वारंटाइन वगैरे होणार नाही आणि रोग मात्र पसरत राहील. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ल
लिखाळ Mon, 08/10/2009 - 17:17 नवीन
अजून एक प्रश्न. सध्या चांगले असलेल्या (ताप वगैरे काही न आलेल्या) लोकांची परीक्षा केली तर किती लोकांच्यात साध्या फ्लूचे आणि स्वाईन फ्लूचे विषाणू सापडण्याची शक्यता आहे?
अतिशय रास्त प्रश्न. सकाळ मध्ये आताच एक चांगला लेख आला आहे. स्वाइन फ्लू - ओळख आणि प्रतिकार त्यामध्ये लिहिल्या प्रमाणे ''या विषाणूंचा Incubation Period ७-८ दिवस असतो म्हणजे विषाणू शरीरात शिरल्यापासून १ ते ८ दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात.'' त्यामुळे हे आठ दिवस रोग पसरण्याचे असू शकतील असे मला वाटते. सकाळ मधला तो लेख जरूर वाचावा. तसेच स्वाइन फ्लू'बाबत कोणती खबरदारी घ्यावी? हा लेख सुद्धा वाचनीय. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
वेदश्री Tue, 08/11/2009 - 04:11 नवीन
अनावश्यक टॅमिफ्लू घेऊ नका हा सकाळमधला लेख पाहून हुश्श झाले! कोणीतरी तर आहे या गोष्टीकडेही लक्ष देणारे..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
ऋ
ऋषिकेश Mon, 08/10/2009 - 18:10 नवीन
पण तो पर्यंत या विषाणूंना प्रतिबंध व्हावीत यासाठी काही औषधी घ्यावीत का ?
माझ्या अत्यल्पशा माहितीप्रमाणे अशी कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. वेळोवेळी हात धुतले, दिवसात ठरविक अंतराने स्वच्छ रूपाल वापरायला घेतले, सार्वजनिक ठिकाणी खाताना (जसे कँटीन) शक्यतो घरचे ताट-वाटी-चमचा नेले, व घरी गेल्यावर ते गरम पाण्याने धुतले, ऑफीसातील कॉफीमग पिण्याआधी गरम पाण्याने नीट खंगाळून धूऊन मग पेयपान केले तरी ह्या फ्लू ची लागण होण्याची शक्यता अतिशय कमी होते. अर्थातच ही माझ्यासारख्या एका आय्टी क्षेत्रातील काम करणार्‍या व्यक्तीची जुजबी माहिती आहे. डॉ. धनंजय, डॉ.दाढे आदी वैद्यकीय क्षेत्रातील/क्षेत्राशी निगडीत मिपाकर म्हणतीत त्यावर अधिक विश्वास ठेवेन/मिपाकरांनी ठेवावा असे वाटते (सचिंत)ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अवलिया Mon, 08/10/2009 - 07:45 नवीन
>>>दोन्ही दुवे फालतू आहेत अगदी अगदी... सहमत आहे. चुक झाली साहेब... थोडी आपल्याला मिळालेली माहिती सांगावी या उद्देशाने लिंक दिल्या.. पण त्या लिंक किती उपयोगी किंवा चांगल्या आहेत की फालतु आहेत हे माझ्या सुमार बुद्धिला काही उमगले नाही. भविष्यात अशी चुक होणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करेल. माझ्या मुळे झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे व आपली माफी मागत आहे... ! आमच्या सारख्या मुर्ख व गांवढळ लोकांनी दिलेले दुवे फालतु असतात तस्मात त्याकडे मिपावरील लोकांनी दुर्लक्ष करावे ही जाहीर विनंती. --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
ग
गोगोल Tue, 08/11/2009 - 04:21 नवीन
2. मला वाईट या गोष्टीच वाटला की पुणे यूनिवर्सिटी च्या दुव्यावर सुद्धा चांगली माहिती मिळाली नाही. पुणे यूनिवर्सिटी कडून तरी जरा बर अपेक्षा होती. 3. तुम्ही दुवे बघितले आणि ते पोस्ट केले. यात तुमची चुकी ती काहीच नाही. त्यामुळे नको त्या गोष्टी पर्सनली घेऊ नका ही विनंती. पुन्हा एकदा..मी दुवे फालतू आहेत अस म्हणालो, दुवे देणारे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन Sun, 08/09/2009 - 13:26 नवीन
हे वाचा आपल्या देशाच्या स्वास्थ मंत्रीच्या अकलेचे तारे..... ही नेता मंडळी मुर्ख असतात की निवळ मुर्खासारखे वागतात :? काही कळत नाही.. आधीच देशात अडचणींची कमी नाही त्यात ह्यांची नाटके ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 08/09/2009 - 13:23 नवीन
खालील प्रतिसाद मी अन्यत्र अशाच प्रश्नांना दिला होता. विषयाच्या गांभिर्यामुळे तो इथे जसाच्या तसा उधृत करण्यास हरकत नसावी असे मला वाटते. मी तज्ञ नाही, तरी सार्स व स्वाईन फ्ल्यू ह्या दोन्ही संसर्गजन्य रोगांच्या हल्ल्याला सामना कराव्या लागणार्‍या ठिकाणी राहतो, तेव्हा जे काही माहिती आहे, ते सर्वसाधारण व्यक्तिच्या दृष्टिकोनांतून लिहीत आहे. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे साध्या फ्ल्यू बरीचशी सारखीच असली तरी काही बाबतीत फरक आहे. स्वाईन फ्ल्यू मध्ये घसा धरतोच. आणि महत्त्वाचा फरक म्हणजे स्वाईन फ्ल्यूत उच्च स्वरूपाचा ताप (High fever) असतो, तो पॅनॅडॉलने कमी होत नाही, साध्या फ्ल्यूचे तसे नसते. स्वाईन फ्ल्यूचे वैशिष्ट्य हे की त्याचे जीवाणू फुफुसांत वाढू शकतात, व तेथील स्नायूंवर हल्ला करून ते त्यांना कमजोर करतात. त्यामुळे खोकला व श्वासोश्वासास त्रास ही लक्षणेही चढत्या प्रमाणात असतात. रक्ततपासण्यांनी स्वाईन फ्ल्यू आहे किंवा नाही, हे तज्ञांना समजू शकते. त्या वेळीच झालेल्या बर्‍या. वेळीच उपाययोजना करून स्वाईन फ्ल्यूवर (अद्यापतरी) मात करता येते. ओसेल्टामिविर (ब्रँड नावः टॅमिफ्ल्यू ) हा एक उपाय आहे. पण ही उपाययोजना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच व्हावी.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 08/09/2009 - 13:31 नवीन
साथ झपाट्यानी पसरते आहे.जर या वेगानी पसरत राहीली तर औषधाचा तुडवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. टॅमीफ्लू सारखे आणखी एक औषध रेलांजा आहे. टॅमीफ्लूचा पुरवठा ताबडतोबीने होणे कठीण आहे.या गोळ्यांचे शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे साठा मोठ्या प्रमाणात केला जात नाही.टेमीफ्लूचे साईड इफेक्ट बरेच आहेत. अशी साथ येण्याची शक्यता हॉफमन ला रोश या कंपनीने २००५ साली वर्तवली होती.(बर्डफ्लूच्या साथ आली तेव्हा) दाट लोकवस्तीत हा रोग फैलावण्याची शक्यता जास्त आहे.( हवेतून संक्रमण होत असल्यामुळे )हा रोग अन्नपाण्यतून पसरत नाही.शक्यतो गर्दीच्या सार्वजनीक ठिकाणी न गेल्यास प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी आहे.परंतू भारतापुरतं बोलायचं झाल्यास परीस्थिती गोंधळाची आहे.आज संध्याकाळी मंत्रीमंडळ शाळा बंद ठेवण्यासारखे निर्णय घेण्याची शक्यता आहे. रोगाची लक्षण इतरवेळी होणार्‍या फ्लू सारखी आहेत.त्यामुळे भितीपोटी हॉस्पीटलमध्ये गर्दी वाढण्याची आणि नवा गोंधळ होण्याची शक्यता आहे. मी व्हिटामीन सी आणि सेप्टलीन नावाचे औषध घेतो आहे . http://www.himalayahealthcare.com/researchpaper/septilin.htm मिपाच्या जाणत्या सदस्यांनी आणखी माहीती द्यावी.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 08/09/2009 - 13:42 नवीन
* यदि किसी व्‍यक्ति में स्‍वाइन फ्लू के लक्षण नजर आएं और वह टैमीफ्लू नाम की एंटीवायरल दवा ले तो, क्‍या वह संक्रमण से बच सकता है। - स्‍वाइन फ्लू से बचने के लिए एंटीवायरल दवा लेनी चाहिए, इससे संक्रमण फैलने के आसार कम हो जाते हैं। लेकिन सभी संक्रमित लोग एक ही एंटी वायरल दवा नहीं ले सकते हैं। * यदि किसी गर्भवती स्‍त्री को इसका संक्रमण हो जाए, तो। - गर्भावस्‍था के दौरान स्त्रियों को सलाह दी जाती है, कि वो ऐसा कुछ भी न करें, जिससे उन्‍हें सर्दी या जुकाम हो जाए। क्‍योंकि इसका सीधा असर गर्भ में पल रहे बच्‍चे पर पड़ता है। इसलिए गर्भवती महिलाओं को स्‍वाइन फ्लू के इंफेक्‍शन से बचना चाहिए। * क्‍या बर्ड फ्लू, स्‍वाइन फ्लू और एनफ्लुएंजा एक ही बीमारी के अलग-अलग प्रकार हैं। - नहीं यह तीनों अलग-अलग बीमारियां हैं। * स्‍वाइन फ्लू के बारे में कैसे पता चला। क्‍या यह सामान्‍य फ्लू से ज्‍यादा खतरनाक है। - स्‍वाइन फ्लू पहले सिर्फ सूअरों में पाया जाता था, धीरे-धीरे यह सूअरों से पक्षियों तक पहुंच और अब इनसानों में भी इसका संक्रमण होने लगा है। पहले किसी को इस बात की उम्‍मीद नहीं थी कि इसके संक्रमण से मौत भी होती होगी, पर मैक्सिको में मौत के मामले सामने आए तब इसके बारे में पता चला। * स्‍वाइन फ्लू से बचने के लिए क्‍या सफाई रखना भी जरुरी है। - स्‍वाइन से बचने के लिए आसपास सफाई रखने के साथ ही साथ हाथों की सफाई भी मायने रखती है। इसके लिए एल्‍कोहल मिले हुए साबुन से हाथ धोना चाहिए। लोगों को सामान्‍य से ज्‍यादा मात्रा में साबुन से हाथ धोना चाहिए और कम से कम 30 सेकंड तक हाथों को अच्‍छी तरह धोना चाहिए। * क्‍या अस्‍थमा से पीडि़त मरीजों को विशेष क्‍योरमेंट की जरुरत है। - इसके लिए अपने डॉक्‍टर से सलाह लें। (स्‍वाइन फ्लू के बारे में यह जानकारी मात्र है। किसी भी प्रकार की दवा या प्रिकॉशन के लिए अपने डॉक्‍टर से सलाह लें।) दैनिक भास्करहून सभार. *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय तुझ सम नाही दुसरा ध्वज रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sun, 08/09/2009 - 14:32 नवीन
माझ्या ओळखीतल्या एका डॉक्टरच्या माहितीप्रमाणे हा रोग सामन्य फ्लु पेक्षा थोडा वेगळा आणी धोकादायक आहे. झपाट्याने पसरतो आणी रोग्याला असाध्य अवस्थेपर्यंत नेऊ शकतो विकिपेडियावर याची पुर्ण माहिती उपलब्ध आहे. स्वाईन फ्लु बद्दल माहिती लहान मुले, वयोवृद्ध आणी अशक्त व्यक्तींना हा रोग झाल्यास ते दगावण्याची शक्यता वाढते. तरुण आणी सशक्त लोक यातुन लवकर बरे होऊ शकतात. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा स्वाईन फ्लू होऊ देऊ नये ;) !!
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 08/09/2009 - 14:38 नवीन
अजुन काहि महत्वाचे... वरिल सर्व गोष्टी तर कराच पण आधी शरिराची तट्बंदी म्हणजे इम्युन सिस्टीम बळकट करा. असे काहिही करु नका ज्याने तुम्ही आजारी पडाल. जर आपण आधीच आजारी असाल तर सरळ दुरच्या, कमी लोक्वस्तिच्या गावी निघुन जा.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 08/09/2009 - 15:24 नवीन
सेंटर फॉर डिसिज कंट्रोल च्या संकेतस्थळावर याची खूप माहीती विविध पद्धतीने ठेवली आहे. लेखी, वेबकास्ट, पॉडकास्ट (ध्वनीमुद्रीत), व्हिडीओ (चित्रफीत) आणि ते फेसबूक, ट्विटर, ब्लॉग्ज सगळ्याचाच उपयोग करत विविध पद्धतीने जनतेला सांगत आहेत. हात धुणे, लांब रहावे वगैरे माहीती साधी वाटते (आणि आहे सुद्धा), पण जनतेने तेच करणे अधिक महत्वाचे असते. नाहीतर घबराटीमुळे अधिक वाईट परीणाम होऊ शकतात. सिडीसीने केलेली माहीतीपत्रके पहाण्यासारखी आहेत. त्यातील एका माहीतीपत्रकातील थोडी मधील माहीती खाली देत आहे, (संपुर्ण माहीती येथे पहा): 203075-A HEALTH ALERT Novel H1N1 Flu Look for these symptoms: FEVER AND • Cough • Sore throat • Runny or stuffy nose Other symptoms may include: • Body aches • Headache • Fatigue • Chills • Diarrhea • Vomiting People with certain chronic medical conditions, adults 65 years or older, children younger than 5 years old, and pregnant women may be at higher risk for severe illness. हे दुसरे माहीतीपत्रक. फ्लूसंदर्भातील पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वाईन फ्लूला पण ही माहीती लागू आहे. Flu is a serious contagious disease. Each year in the United States, on average, more than 200,000 people are hospitalized and 36,000 people die from seasonal flu complications. This flu season could be worse. (अमेरिकेत सप्टेंबर नंतर फ्लू सिझन चालू होईल). There is a new and very different flu virus spreading worldwide among people called novel or new H1N1 flu. This virus may cause more illness or more severe illness than usual. Flu-like symptoms include: ■ fever (usually high) ■ headache ■ extreme tiredness ■ dry cough ■ runny or stuffy nose ■ muscle aches ■ sore throat ■ vomiting ■ sometimes diarrhea सगळ्यात शेवटी शिंकणे अथवा खोकणे कसे करावे याचे एक चित्र! Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 08/09/2009 - 16:40 नवीन
पुणेकर , मुंबईकर मिपाकरांनी सांभाळून रहावे. सगळ्यांनी हात वरचेवर धुवातेत.. हात अँन्टीबॅक्तेरिअल ने वरचेवर धुण्याने या रोगाचा प्रसार बराच आटोक्यात येऊ शकते असे इथल्या तज्ञांचे म्हणणे आहे. खास करून लहान मुलांसाठी. साधी गोष्ट आहे ही पण फार परिणाम कारक आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 08/09/2009 - 23:10 नवीन
आता तर गणेशोत्सव जवळ येत आहे. हा तर गर्दी जमण्याचा सार्वजनिक सण . पण लोकांनी भान ठेवून गर्दीत जाणे टाळले पाहिजे. गर्दी टाळणे, शेकहँड करणे शक्यतो टाळणे , वारंवार अन्टीबॅक्टेरिअल सोलूशन ने हात धुणे हे प्राथमिक उपाय केलेच पाहिजेत. वारंवार इतर लोकांचा संपर्क होतो अशा वस्तूंना आपण हात लावण्याचे जेवढे टाळता तेवढे चांगले . उदा, खुर्ची, टेबलं, पेन, संगणकाचा की-बोर्ड -माउस; तसेच दरवाजाच्या मुठी, कठडे व टेलिफोन ... (हे सर्व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वस्तूंबद्द्ल बोलतोय. पर्सनल वस्तूंबाबत नाही.)
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 08/10/2009 - 05:00 नवीन
पुण्यामध्ये तिसरा मृत्यु ! डॉक्टर बाबासाहेब माने ! * पुणेकरांनो जपुन रहा ! स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 08/10/2009 - 05:57 नवीन
सहावा मृत्यु ! :( चैन्ने मध्ये ! एक काम करा रे सर्वजण... टॉमीफ्लुच्या गोळ्याचा साठा करा ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
स
समंजस Mon, 08/10/2009 - 07:39 नवीन
लवकरात लवकर संभाव्य रूग्णाच्या घशाची तपासणी हे होणे खूपच आवश्यक आहे. आणि हे झालं तरंच वेळेवर योग्य उपचार होउन रूग्ण वाचू शकतो(Tamiflu) च्या गोळ्या घेउन (सध्यातरी फक्त हेच एकमेव औषध उपलब्ध आहे या रोगावर) :( मात्र गंभीर समस्या ही आहे की, ही तपासणी महाग आहे.(साधारण रूपये ५००० ते ६५०० दर रूग्ण), आणि ती सुदधा फक्त मोजक्याच प्रयोग शाळेत(Labs) मध्ये. त्यामुळे अर्थातच रूग्णालयात येणार्‍या सर्वच रूग्णांवर ही तपासणी सरकार नाही करू शकणार/करणार नाही. पण यामुळे दोन शक्यता आहेत एक, रूग्णांवर उशीरा तपासणी होउन, औषधोपचाराला उशीर होउ शकतो. दोन, हे कळायला उशीर झाल्यामुळे, जवळचे नातेवाइक आणि संर्पकात आलेल्या इतर व्यक्तीना सुदधा ह्या रोगाची लागण होउ शकते. (ह्या रोगाच्या तपासणीचा खर्च कमी करण्या करीता संबधीत व्यक्तीनी काही तरी करायला हवे)
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 08/10/2009 - 07:54 नवीन
स्वाइन फ्लूची रोगनिदान चाचणी कोणकोणत्या इस्पितळांत केली जाऊ शकते याची शहरनिहाय यादी मिळू शकेल काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 08/10/2009 - 09:05 नवीन
कोणी तरी सांगितले आहे की व्हिस्की मुळे पण बचाव होऊ शकतो... खरं आहे का ??? *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
_
_समीर_ Tue, 08/11/2009 - 03:12 नवीन
ओ राजे जरा गप बसा आता!! अर्धवट माहितीवर काहीतरी अफवा पसरवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
श
शैलेन्द्र Tue, 08/11/2009 - 04:52 नवीन
माहीती बरोबर आहे हो... फक्त ती व्हीस्की श्व्सन मार्गाने (नाकाने) आणि तोंडानेही घशापर्यंत आणि फुफ्फुस्सात न्यायची... पोटात नाही, बाकी अन्टीसेप्टीक ऐवजी अब्सोलुट अल्कोहोलने हात वरचेवर साफ करणे हा उत्तम उपाय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _समीर_
अ
अश्विनीका Mon, 08/10/2009 - 21:00 नवीन
बापरे ! आम्ही पुण्यात २ छोट्या मुलांसह नोव्हेंबर चा शेवटचा आठवडा आणि डिसेंबर पूर्ण महिना सुट्टीसाठी येत आहोत. आता ही ट्रिप पुढे ढकलावी की काय? >> पुणेकरांनो जपुन रहा ! >>स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या ! असेच म्हणते - अश्विनी
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 08/11/2009 - 04:24 नवीन
सकाळ मधे आज बालाजी तांब्यांचा सल्ला आला आहे. त्यात आयुर्वेदाबद्दल नेहमी म्हणले जाते त्याप्रमाणे उपाय झाला नाही तरी अपाय नक्की होणार नाही असे वाटते म्हणून शक्यतितका तो सर्वांनी पाळावा असे म्हणावेसे वाटत आहे. लोकशिक्षणासंदर्भातील माहीती असल्याने मी जशीच्या तशी येथे चिकटवत आहे (अर्थात मूळ स्त्रोताचा दुवा देऊन). सकाळ वृत्तसेवा * Posted: 11/08/2009 12:17 AM IST भरपूर पाणी प्या; पंधरा मिनिटे प्राणायाम करा पुणे - "भरपूर पाणी प्या, किमान पंधरा मिनिटे प्राणायाम करा; घरात, कार्यालयात धूप जाळून धूर करा आणि सार्वजनिक ठिकाणांचा सहभाग शक्‍यतो टाळा, "मास्क'चा आवर्जून वापर करा,'' असे आवाहन ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले आहे. "स्वाइन फ्लू'च्या वेगाने पसरणाऱ्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे. वातावरणातील असंतुलनामुळे हवेच्या माध्यमातून जंतुसंसर्गाचे संकट येऊ शकते, याची जाणीव डॉ. तांबे यांनी "फॅमिली डॉक्‍टर'मधून यापूर्वीच करून दिली होती. पावसाळ्यात हवेत खूप आर्द्रता असते; शिवाय सूर्यप्रकाश कमी असतो. हे सर्व वातावरण कृमी व जंतूंना पोषक असते. म्हणूनच या काळात जंतुसंसर्गजन्य रोगराईचे प्रमाण बरेच वाढते. पावसाळ्यात पाणी दोषयुक्‍त होऊ शकते, अग्नी मंद झाला म्हणजेच शरीरातील एकंदर तेजस्विता कमी होते, शरीराचे स्वाभाविक बल कमी झाले, की रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते आणि यातून अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले होते. उद्याचे नागरिक असलेल्या मुलांना या साथीपासून वाचवणे ही आपली पहिली जबाबदारी आहे, असे स्पष्ट करून डॉ. तांबे म्हणाले, ""मुलांमध्ये ही साथ वेगाने पसरत आहे. त्यांना वाचविण्यास प्राधान्य द्यायला हवे. त्याचबरोबर इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यायला हवी. या दृष्टीने सार्वजनिक हित लक्षात घेऊन या समस्येकडे पाहायला हवे.'' सार्वजनिक ठिकाणांचा सहभाग शक्‍यतो टाळण्याचे आवाहन डॉ. तांबे यांनी केले आहे. त्याचबरोबर साथ आटोक्‍यात येईतोवर "मास्क' आवर्जून वापरण्यासही त्यांनी सुचवले आहे. शाळांमध्ये आरोग्यासंदर्भातील दक्षता खूपच कमी घेतल्या जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शाळांमध्ये पाच-सहा तास मुले असतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे करायला हवे ते प्रत्यक्षात केले जात नाही. ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्राथमिक तत्त्वावर सर्व शाळा दहा दिवस बंद ठेवायला हव्यात. या काळात शाळांमधील सर्व स्वच्छतागृहे नीट साफ करून घ्यायला हवीत. पाण्याच्या टाक्‍या स्वच्छ करून मुलांना पिण्यासाठी मुबलक पाणी द्यायला हवे. मुलांनी वारंवार स्वच्छतागृहात जाऊ नये, म्हणून कित्येक शाळांत मुलांना पुरेसे पाणी पिऊ दिले जात नाही, हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे, याकडेही डॉ. तांबे यांनी लक्ष वेधले, तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ज्या ज्या भागांत "स्वाइन फ्लू'चा प्रादुर्भाव झाला आहे, अशा सर्व भागांत व उपनगरांत तसेच या भागाशी संपर्क येणाऱ्या गावांमध्येही ही दक्षता घेतली जावी, असे आवाहन डॉ. तांबे यांनी केले आहे. ""कोणत्याही कारणाने शाळा सुरू असतील, तर मुलांनी भरपूर पाणी घरून न्यावे व शाळेत भरपूर पाणी प्यावे. प्रार्थनेच्या वेळी किमान पंधरा मिनिटे मुलांकडून प्राणायाम करून घ्यावा, म्हणजे मुलांची श्‍वसनक्षमता वाढायला मदत होईल. वर्गांमधून, कार्यालयातील दालनांतून, घरात, थिएटरमध्ये, धूप जाळून धूर पसरेल असे करावे; त्यामुळे हवेतील संसर्ग किमान कमी व्हायला मदत होईल. गोमूत्र प्राशन करावे. गोमूत्र क्षाराच्या गोळ्यांचा किंवा गोमूत्र अर्काचा वापरही करता येईल. हे घरोघरी करण्याजोगे उपाय आहेत. पाणी पिताना त्यात सितोपलादी चूर्ण टाकावे, त्यामुळे शुद्धता वाढेल. चहा किंवा तत्सम पेय घेताना तुळशीची पाने, गवती चहा, वावडिंग, सुंठ पावडर टाकून त्याचा काढा करावा. दूधही अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून प्यावे,'' असे डॉ. तांबे यांनी सुचवले आहे. विमानतळांवरील तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी. कमी वेळात व नेमकेपणाने तपासणी होईल, अशी यंत्रणा सर्व विमानतळांवर कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • Log in or register to post comments
_
_समीर_ Tue, 08/11/2009 - 04:38 नवीन
जुनी /नवी, हिंदी/मराठी अशी कोणकोणती गाणी स्वाईन फ्लू वरती गुणकारी ठरू शकतात ते तांबेंनी कुठे दिले आहे का?
गोमूत्र प्राशन करावे. गोमूत्र क्षाराच्या गोळ्यांचा किंवा गोमूत्र अर्काचा वापरही करता येईल. हे घरोघरी करण्याजोगे उपाय आहेत.
शिवांबू घेतली तर चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Tue, 08/11/2009 - 04:44 नवीन
जुनी /नवी, हिंदी/मराठी अशी कोणकोणती गाणी स्वाईन फ्लू वरती गुणकारी ठरू शकतात ते तांबेंनी कुठे दिले आहे का? मस्त! गोमूत्र प्राशन करावे. गोमूत्र क्षाराच्या गोळ्यांचा किंवा गोमूत्र अर्काचा वापरही करता येईल. हे घरोघरी करण्याजोगे उपाय आहेत. शिवांबू घेतली तर चालेल का? त्या भागाकडे दुर्लक्ष केले तर भरपूर पाणी पिणे आणि प्राणायम नक्कीच (कधिही) चांगले आहे असे वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _समीर_
श
शैलेन्द्र Tue, 08/11/2009 - 04:59 नवीन
प्राणायाम चांगला पण शाळेत करु नये, खोल श्वास घेताना, इतरांचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त. एक घरगुती आयुर्वेदिक उपाय, नाकात थोडे तुप किंवा खोबरेल तेल टाकायचे, आणि थोड्या थोड्या वेळाने शिंकरुन टाकायचे... हवेतिल धुलिकण- माय्क्रोब्स ५०-६०% ट्रॅप होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Tue, 08/11/2009 - 06:18 नवीन
केवळ माहीतीम्हणून देत आहे, endorsement म्हणून नाही :-) गोमुत्र अर्क व पंचगव्यघृताचा स्वाईन फ्लूवर उपाय -डॉ. चक्रवर्ती नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी पुण्यासह भारतातील इतर शहरात मोठय़ा प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोमुत्र अर्क व पंचगव्यघृताचा उपयोग केल्यास मनुष्याची प्रतिकारक्षमता वाढू शकेल, असे मत नीरीचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. तपन चक्रवर्ती यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. गो विज्ञान अनुसंधान केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तपन चक्रवर्ती म्हणाले, नीरीच्या प्रयोगशाळेत पंचगव्यघृत हे शरीराची प्रतिकारक्षमता वाढवून व्याधींपासून मुक्ती मिळवून देणारे असल्याचे सिद्ध झाले आहे. पंचगव्यघृताचा वापर करून रुग्णाचा आजार बरा होऊ शकतो. गेल्या महिन्यातच नीरीने केलेल्या गोमुत्र अर्काच्या संशोधनाला चीनचे पेटेंट मिळाले आहे. या पेटेंटला जगभरातील १४० देशांची मान्यता आहे. गोमुत्र अर्क अ‍ॅन्टीमायक्रोबायल अँटीफंगल असून त्याला यापूर्वीच अमेरिकेच्या पेटंटची मान्यता होती. आता त्यात अँटीऑक्सीडंट प्रश्नॅपर्टीचादेखील समावेश करण्यात आला असून त्यास चीनच्या पेटंटद्वारे मान्यता मिळाल्याची माहिती डॉ. चक्रवर्ती यांनी दिली. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता मीरा औरंगाबादकर यांनी सांगितले, स्वाईन फ्ल्यू ही विषमज्वराशी संबंधित व्याधी आहे. संधीपात ज्वर किंवा संक्रमक विकाराचा हा एक प्रकार असू शकतो. याला जनपदोध्वंसक व्याधी म्हणता येईल. या सर्व व्याधींची लक्षणे एकमेकांशी मिळतीजुळती आहेत. शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली की या व्याधी होण्याची शक्यता जास्त असते. विशेषत कफ, सर्दी, वात, आंगपाय दुखणे ही त्याची लक्षणे आहेत. त्यावर उपाय म्हणून पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या गोमुत्र अर्क किंवा पंचगव्यघृताचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. गोमुत्र गंधाचा उपयोग केल्यास घरातील वातावरण शुद्ध होते. पंचघृताचे दोन थेंब दोन्ही नाकपुडीत दिवसातून तीन वेळा घालणे, पंचघृत गाईच्या दुधात मिसळून त्याचे सेवन करणे, त्रिफळाचा, आल्याचा काढा करुन गुळण्या करणे, आलं आणि गुळाचे एकत्र सेवन करण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते, असेही डॉ. औरंगाबादकर यांनी सांगितले. आयुर्वेदाने वेगवेगळ्या औषधी वेगवेगळ्या अवस्थांसाठी सांगितल्या आहेत. नुसते गायीचे तूपसुध्दा आपली प्रतिकारक्षमता वाढवण्यास उपयुक्त आहे, असे डॉ. औरंगाबादकर म्हणाल्या. यावेळी गोविज्ञान केंद्राचे प्रभारी सुनील मानसिंहका यांनी पंचगव्याच्या संशोधानात्मक कार्याची आणि स्वाईन फ्ल्यूवर पंचगव्याचा प्रभाव यासंबंधीची माहिती दिली. घसा खवखवणे, श्वासकष्टता, थकवा येणे, अंग दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजणे, नाकातून पाणी येणे, पातळ संडास, उलटय़ा अशी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. पंचगव्यासंबंधी अधिक माहितीसाठी गो विज्ञान अनुसंधान केंद्र, महाल, नागपूर किंवा २७७२२७३ व २७३४१८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. पत्रकार परिषदेला सुरेश डवले, डॉ. कृष्णमुर्ती गिरी, वैद्या अनुराधा गोसावी, वैद्य रवींद्र कोमेजवार व वैद्य प्रगती चोरघडे उपस्थित होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _समीर_
श
शैलेन्द्र Tue, 08/11/2009 - 10:54 नवीन
कुठल्याही मुत्रामधे, अ‍ॅन्टिबॅक्टेरिअल व अ‍ॅन्टिफंगल गुण असतात.. गाय, म्हैस डुक्कर, माणुस सर्वांच्या... These are primary/secondary immune system barriers. not only urine, but even body fluids like eye drops have these properties. They protect body channels from fungal/bacterial growths. म्हणुन मुत्रच वापरायचे असेल तर गायीकडे कशाला जा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विंजिनेर Tue, 08/11/2009 - 05:40 नवीन
त्यात आयुर्वेदाबद्दल नेहमी म्हणले जाते त्याप्रमाणे उपाय झाला नाही तरी अपाय नक्की होणार नाही असे वाटते म्हणून शक्यतितका तो सर्वांनी पाळावा असे म्हणावेसे वाटत आहे.
आयुर्वेदाबद्दल मला आदर आहे. किंबहुना रोगनिवारण/आरोग्य वर्धन करण्यासाठी ज्या ज्या औषध पद्धती आहेत त्यांच्याशी माझे काहिही वाकडे नाही. तरी सुद्धा एखाद दुसरा उपायाचा अपवाद वगळता (जसे सार्वजनिक/वैयक्तिक स्वच्छता) वरील माहितीत दिलेले उपाय वराहज्वरावर कसे उपयुक्त ठरतील याचा काहिच ठोस पुरावा/हवाला श्री. तांब्यांनी द्यायची तसदी घेतलेली दिसत नाही.(किमान मला तरी तो लेख वाचून सहज समजले नाहीत). शास्त्रीय समुहात एक म्हण प्रचलित आहे - जितका मोठा शोधा(चा दावा) तितकेच भक्कम प्रमाण/पुरावा... (An extra ordinary concept needs an equally extra ordinary proof) आणि हे प्रमाण देण्याची जबाबदारी शोध कर्त्यावर असते (burden of proof is on the proponents ) अर्थात वराह ज्वरावर त्वरेने (खात्रीशीर/ आधीच सिद्ध झालेले)उपाय करण्या ऐवजी आपण तांब्यांच्या विधानांना प्रमाण शोधत बसणे अंमळ वेडगळ पणाचे ठरेल. असो. हा लेख म्हणजे श्री. तांब्यांनी आयुर्वेदावर असलेल्या लोकांच्या गाढ विश्वासाचा (स्व प्रसिद्धी साठी)गैर फायदा घेतला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात असे सल्ले कितपत मानायचे हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा झाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
N
Nile Tue, 08/11/2009 - 05:48 नवीन
जर तुम्ही त्यांचे लेख नियमित वाचलेत तर तुमचे वरील मत दृढ होइल. जास्त बोलत नाहि. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
व
विकास Tue, 08/11/2009 - 06:05 नवीन
तुमच्या तांब्यांच्या संदर्भातील मुद्यांशी पुर्ण सहमत आहे. बाकी तांब्यांनी सांगितलेले उपाय हे केवळ वराहज्वरासाठी म्हणून मी पाहीले नाहीत तर व्हायरस इन्फेक्शन होऊ नये म्हणून जे असतात त्याच्या संदर्भात बघितले. (preventative actions). पाणी पिणे हे कुठल्याही व्हायरस इन्फेक्शनसंदर्भात बर्‍याचदा इथले डॉक्टर्सही सांगतात. (माझे डॉक्टर भारतीय नसूनही ते देखील तेच सांगतात). त्याच्या मुळे आपली सिस्टीम सतत साफ होत रहाते आणि व्हायरस सहजतेने शरीराबाहेर जाऊ शकतो. थोडक्यात हे वर म्हणल्याप्रमाणे preventative actions मधे बसते असेच मी समजतो. त्यात तांब्यांनी कुठला शोध लावला असे म्हणत नाही की आयुर्वेद म्हणजे ग्रेट असे समजत नाही की ज्याच्या पोतडीत सगळ्याला औषधे आहेत. पण औषधे घेयची वेळ येऊ नये म्हणून काय करता येईल हे पहाण्यासाठी उपयोग नक्कीच आहे. स्वाईन फ्लूच्या बाबतीत श्वासोच्छवासाला त्रास होऊ शकतो असे सिडीसीच्या एका पानावर पण वाचले. अर्थात प्राणायमाने तसे होण्यापासून टाळता येऊ शकते... परत सिडीसीच्या preventative actions पानावर पहा. स्वच्छतेचे, संसर्गापासून दूर रहाण्याचे नियम सांगून झाले की शेवटी असेच म्हणले आहे:
Get plenty of sleep, be physically active, manage your stress, drink plenty of fluids, and eat nutritious food.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
व
विंजिनेर Tue, 08/11/2009 - 06:20 नवीन
उपाय हे केवळ वराहज्वरासाठी म्हणून मी पाहीले नाहीत तर व्हायरस इन्फेक्शन होऊ नये म्हणून जे असतात त्याच्या संदर्भात बघितले.
हा अर्थातच महत्वाचा मुद्दा आहे. लेखकालासुद्धा हाच अर्थ अभिप्रेत असेल तर तसे तांब्यांनी लेखात तसे अधिक जोरकसपणे मांडायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विसोबा खेचर Tue, 08/11/2009 - 06:24 नवीन
डॉ बालाजी तांबे? हा हा हा! चालू द्या..... :) तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
श
शाहरुख Tue, 08/11/2009 - 04:50 नवीन
हे जे ७ मृत्यू झाले आहेत त्यांची सरकार दफ्तरी 'स्वाईन फ्लू ने मृत्यू' अशी नोंद झालीय का ? त्यांना काही ना काही इतर आजार होते आधी.. आणि माध्यमं "सरकारचा निष्काळजीपणा" वगैरे जी बोंब ठोकत आहेत ती कितपत खरी आहे ?? सरकारला (म्हणजे कोणत्याही संस्थेला) विषाणूंचे संक्रमण होऊ न देणे कितपत शक्य आहे ?
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 08/11/2009 - 04:56 नवीन
त्यांना काही ना काही इतर आजार होते आधी.. यातील प्रत्येकाला काही ना काही आजार होते? आणि असले तरी देखील जर स्वाईन फ्लू झाला नसता तर त्यांचे जीवन धोक्यात होते का? नसल्यास त्यांच्या मृत्यूस स्वाईन फ्लू हेच धरावे लागेल. सरकारला (म्हणजे कोणत्याही संस्थेला) विषाणूंचे संक्रमण होऊ न देणे कितपत शक्य आहे ? सुरवातीला कदाचीत जमणार नाही. पण नंतर अर्थातच तात्काळ पाऊले पडली पाहीजेत. तसे होताना दिसत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
व
विकास Tue, 08/11/2009 - 04:32 नवीन
(खालच्या दुव्यावर बातमी पहायला जरा स्क्रोल करून खाली जावे लागेल). स्वाइन फ्लू’ प्रतिबंधास आता कार्यकर्ता प्रशिक्षण पुणे, ९ ऑगस्ट / खास प्रतिनिधी, लोकसत्ता, मंगळवार, ११ ऑगस्ट २००९ ‘स्वाइन फ्लू’ च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण रक्तपेढीने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ च्या सहकार्याने कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. त्यामधून प्रशिक्षित झालेले ७५ कार्यकर्ते वैद्यकीय मदतनीस म्हणून १५ उपचार केंद्रांवर कार्यरत राहणार आहेत. ‘आयएमए’ चे डॉ. शरद आगरखेडकर व माया तुळपुळे यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले. २२ स्वयंसेवी संस्थांमधील ७५ कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले. पालिकेच्या उपचार केंद्रांबरोबरच गृहसंकुले, कार्यालये आदी ठिकाणी जनजागृती करण्यासाठी हे कार्यकर्ते उद्यापासून मोहीम हाती घेणार आहेत. पुढील रविवारीसुद्धा प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा - डॉ. अतुल कुलकर्णी - ९२२६८२४३३६, सचिन कुलकर्णी - ९७६३७०४८१८ आणि बाळासाहेब फाटक - ९८२२६१००२४.
  • Log in or register to post comments
म
मि माझी Tue, 08/11/2009 - 06:47 नवीन
मी पुण्यात राहते. प्रचंड टेन्शनच वातावरण आहे इथे. ऑफिस मधे पण तेच विषय चालू असतात.. लहान मुलांची अजुन जास्त काळजी वाटते.शाळांना सुट्टी दिली तरी रस्त्यावरची गर्दी कमी नाहीये. सगळ्यांनी काळजी घ्या.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा