सरकारी अरेरावी गेली की जवळ जवळ ९५% प्रश्न संपल्यात जमा होतील !
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
तर मंडळी आता सांगा आजच्या घडीला नक्की तुम्हाला अशी कुठली गोष्ट वाटते की त्याला आपल्या देशातून, राज्यातून, समाजातून आणि स्वत:तून "चले जाव" म्हणायची गरज आहे?
मला वाटते 'आपलेपण' सिद्ध करताना येणार्या त्राग्यातुन हे होत असाव.
अवांतर- गावाकडे बाहेर जाताना 'चपला' घालुन जा अस आई सारख सांगायची. कारण काटे पायात मोडतील या काळजी पोटी. आम्ही मात्र विसरतील या काळजी पोटी चपला घालायचो नाही. हळु हळु चपला घालुनच बाहेर पडायची सवय लागली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
(माझ्याच लेखाला मीच अवांतर करत असल्याने, कुणालाही चांदणी मिळणार नाही!)
आम्ही मात्र विसरतील या काळजी पोटी चपला घालायचो नाही.
या वरून आठवले. तत्कालीन माहीती आणि प्रसारण मंत्री विठ्ठलराव गाडगीळ ह्यांच्या काँग्रेसकचेरीच्या बाहेर काढून ठेवलेल्या चपला कोणीतरी पळवून नेल्या. नंतर ईद अथवा तत्सम मुस्लीम सणानिमित्त त्यांना कुठल्याशा मशिदीत येण्याचे निमंत्रण होते. हा (चपलाचोरीचा) प्रकार कुणाला माहीत नसेल असे त्यांना वाटत होते. पण मशिदीच्या बाहेर (नवीन) चपला काढताना ते जरा कुरकुर करू लागले. ती पाहून त्यांना निमंत्रीत केलेल्या यजमानांपैकी एक विठ्ठलरावांना म्हणाला, अहो काढा काढा चपला इथे ही काही काँग्रेस कचेरी नाही आहे!
अगदि माझ्याच मनातलं कुणीतरी आधीच बोलुन गेलेत!
सहि सहि .....
अगदी हेच म्हणायचय.....
बाय द वे ; हे प्रकाश राव येव्हढे अचुक संदर्भ देतात कसे काय हर टायमला?
आपलाच,
मनोबा
सगळं एका दमात नि असंच लिहिलं नसतं मी कदाचित.. पण प्रतिक्रिया वाचून वाटलं की मलाही यापेक्षा वेगळं काही वाटत नाहीये..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
चांगला चर्चा विषय. चले जाव कशाला म्हणावं का हा प्रश्न पडला.. बर्याच प्रश्नांना फारतर फार "बाजुला हो आमच्या वाटेत येऊ नकोस" असे म्हणावेसे वाटले. मात्र काही वृत्तींना मात्र चले जाव म्हणावेसे वाटते:
अवक्तशीरपणा
अस्वच्छता
माणूसघाणेपणा (आपण सोडल्यास इतर माणसे ही माणसेच नाहीत अश्या तोर्यात वावरणेही त्यात आलेच)
ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून ४० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "अजिंक्य भारत अजिंक्य जनता...."
जर आपण ...ला चलेजाव म्हणले तर. तर मंडळी आता सांगा आजच्या घडीला नक्की तुम्हाला अशी कुठली गोष्ट वाटते की त्याला आपल्या देशातून, राज्यातून, समाजातून आणि स्वत:तून "चले जाव" म्हणायची गरज आहे?
लोकसंख्यावाढीच्या बेसुमार कॅन्सरला 'चले जाव' केले पाहिजे! या बाबतीत अत्यंत म्हणजे अत्यंत कडक शिक्षा असलेला कायदा (डिटेल्स पुन्हा केव्हातरी) अंमलात आला पाहिजे. माझ्या मते बेसुमार लोकसंख्यावाढ एवढा एक जरी आजार कंट्रोलमध्ये आला तरी भारत कायच्या काय सुखी होईल, पुढे जाईल...!
आपला,
(लोकसंख्यावाढीत कोणतीही औरस,अनौरस भर न टाकलेला) तात्या.
(आणि हो, हा लेख सगळ्या मिपासदस्यांसाठी आहे. कृपया, "आम्ही", "तुम्ही", "इकडचे", "तिकडचे" करू नये ही विनंती!)
नाय करणार! साला, नंदनला सबुत दिला आहे. आणि नंद्या म्हणजे माझा वीक प्वॉईंट! :)
आपला,
(वचनबद्ध) तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
- अवक्तशीरपणा
- अस्वच्छता
- माणूसघाणेपणा (आपण सोडल्यास इतर माणसे ही माणसेच नाहीत अश्या तोर्यात वावरणेही त्यात आलेच)
ऋषिकेश ------------------ दूपारचे १ वाजून ४० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "अजिंक्य भारत अजिंक्य जनता...."