Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्राध्यापकांचा संप मिटणार कधी ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/16/2009 - 06:17
🗣 112 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23517 वाचन

💬 प्रतिसाद (112)
अ
अवलिया Sun, 08/16/2009 - 07:44 नवीन
हं.... प्राध्यापक मंडळीच्या मागण्या योग्य असतील तर त्यांना न्याय मिळायला हवा. सगळे काही त्यांच्या मनाप्रमाणे झाले की शिक्षणक्षेत्रातील आपली जबाबदारी ते अधिक चांगल्या रितीने पार पाडतील अशी भाबडी अपेक्षा बाळगतो. सर्व संपकरी प्राध्यापकांना शुभेच्छा ! -- अवलिया
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 08/16/2009 - 08:00 नवीन
असेच म्हणतो. *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/16/2009 - 08:00 नवीन
जवाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वच पुढे आले पाहिजेत, विशेषतः विद्यार्थी वर्गात आले पाहिजेत. विद्यार्थी वर्गात आले की, प्राध्यापकांना शिकवावेच लागेल. म्हणजे येतच नाही असे म्हणत नाही. पण जे येतात त्यांची संख्या खूपच कमी आहे. अर्थात विद्यार्थी असो की नसो, हॉल वर / ष्टाफ रुममधे विद्यार्थ्यांचे वाट पाहणारी प्राध्यापक मंडळी असतातच. तेव्हा प्राध्यापक आपापली जवाबदारी पार पाडतात असे वाटते. अवांतर : काल अजितदादा पवार एका भाषणात म्हणाले, प्राध्यापकांना खूप पगार आहे. पुन्हा बायको प्राध्यापिका असली की, विचारुच नका. च्यायला या मंत्र्यांच्या... मंत्र्यांना वाढीव भत्ते-आणि अनुषगिक फायदे [मरणापर्यंत नव्हे तर सरणापर्यंत] द्यायचे असा प्रस्ताव आल्याबरोबर तो शुन्य मिनिटात 'मंजूर' होतो. त्याची ना बोंब होते ना चर्चा...चालायचेच नै का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sun, 08/16/2009 - 08:09 नवीन
>>जवाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वच पुढे आले पाहिजेत, विशेषतः विद्यार्थी वर्गात आले पाहिजेत. आता आपले शिक्षान काही जास्ती नाय .. त्यामुळे जास्त बोलात नाय. पण आमचे दोस्त कधी कधी कालिजात जायचे... पेश्शल काही काही मास्तरच्या लेक्चरला कदीच बंक नाय करायचे... का? झ्याक शिकवायचे म्हणे ते.. ! आता कालिजातली पोरं ... इशेषतः शिणीयर कालीजातली.. जास्ती नाय पण थोडी अक्कल असेलच ना? कोन कसं शिकवतं ? का नाय शिकवतं.. ! काय ? तशी मास्तर काय अन पोरं काय .... दोघं बी चांगली आहेत कमी जास्त होत असलं इकडं तिकडं.. :) बाकी, आमच्या अजितदादांची चर्चा दुस-या धाग्यावर... या धाग्यावर अवांतर होईल ती चर्चा ! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
य
यशोधरा Tue, 08/18/2009 - 08:12 नवीन
>>विशेषतः विद्यार्थी वर्गात आले पाहिजेत. विद्यार्थी वर्गात आले की, प्राध्यापकांना शिकवावेच लागेल>>> पुण्यातल्या एका प्रथितयश महाविद्यालयात माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीने कला शाखेत प्रवेश घेतला आहे. गणित ह्या विषयासाठी शिकवायला कोणी नसल्याने ह्या विद्यार्थ्यांना बाहेरच क्लास लावा अशी अनऑफिशिअल सूचना मिळालीय म्हणे! तेह्वा विद्यार्थी वर्गात असले तरी प्राध्यापक असतीलच असे नाही, असे वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मिसळभोक्ता Tue, 08/18/2009 - 08:19 नवीन
पुण्यातल्या एका प्रथितयश महाविद्यालयात माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीने कला शाखेत प्रवेश घेतला आहे. कुणावरही अशी वाईट वेळ येऊ नये... पुढे कला शाखेत प्राध्यापक होऊन मिसळपावावर टवाळकी करायला लागणार.. आपल्या दु:खात सामील आहे. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अवलिया Tue, 08/18/2009 - 08:23 नवीन
कुणावरही अशी वाईट वेळ येऊ नये... पुढे कला शाखेत प्राध्यापक होऊन मिसळपावावर टवाळकी करायला लागणार.. सहमत आहे. पुन्हा टवाळकी करता करता भलत्या जबाबदा-या गळ्यात पडुन टवाळकी पण करता न येणे हे तर अजुनच दुर्देव... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 08/18/2009 - 08:28 नवीन
संपादक ला पाली अर्धमागधीत काय म्हणतात हो ? ऊचक्रम वर विचारायला हवे. हल्ली संपामुळे तिकडूनच ज्ञानसंकलन करावे लागते म्हणतात. (कॉमनरूम मध्ये गप्पा मारायला कुणी नसतोच मुळी.) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 08/18/2009 - 08:32 नवीन
मराठीत मॉडरेटर किंवा एडिटर असे म्हटले जाते असे काल कॅन्टीन मधे चर्चेत कळले. तसेही हल्ली संस्कृत शिकवणा-या प्राध्यापिका स्टाफरुम मधे येत नसल्याने स्टाफरुममधे बसुन कंटाळाच येतो. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 08/18/2009 - 08:36 नवीन
संस्कृतच्या शिक्षिकेला तुम्हीच टोमणे मारून घालवले. आता इतिहासाच्या शिक्षिका, पुरातन धार्मिक वांगमयाचे शिक्षक, पूर्वेकडील राज्यांचे भुगोलाचे शिक्षक येतात की स्टाफरूम मध्ये. त्यांच्याशी गप्पा मारा. हिकडं कशापायी, म्हन्तो म्या ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 08/18/2009 - 08:42 नवीन
छ्या छ्या त्यांच्यात तो स्पार्क नाही. बाकी टोमण्यांचे जरा चुकलेच... घाईत लक्षात आले नाही कुठे थांबायचे. आता जे झाले ते झाले.... म्हणुन इकडे हातपाय मारुन पहावे असा सुज्ञ विचार. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
य
यशोधरा Tue, 08/18/2009 - 08:24 नवीन
LOL! मिभो! आज ह्या धाग्यावर कृपादृष्टी वळलीय का? चालूद्यात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
वेताळ Sun, 08/16/2009 - 08:07 नवीन
अत्यंत कमी पगार, आठवड्याचे पाच सहा तास काबाडकष्टाचे काम,खुपच कमी सुट्ट्या व इतर काही हालाखीच्या बाबी ह्या मुळे मुळातच आपल्या मागण्याबाबत मवाळ असणारा प्राध्यापकवृंद अगोदरच होरपळुन गेला आहे.त्यात माजोरी सरकार निवडणुकीच्या घाईमुळे अक्षरशःखिरापत वाटल्यासारखे सगळ्याच्या मागण्या मान्य करत असताना , बिचार्‍या प्राध्यापकानी काय वाईट केले आहे?. माझ्यामते तर महाराष्ट्रसरकारने त्याना आताच सातव्या वेतन आयोग स्थापन करुन त्याप्रमाणे वेतन श्रेणी जाहिर करावी व देशात आघाडी घ्यावी.संप लवकर मिटावा नाहीतर आणखी एका विक्रमी संपाचे आपण परत एकदा साक्षीदार होवु शकतो. वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/16/2009 - 08:14 नवीन
अत्यंत कमी पगार, आठवड्याचे पाच सहा तास काबाडकष्टाचे काम,खुपच कमी सुट्ट्या व इतर काही हालाखीच्या बाबी ह्या मुळे मुळातच आपल्या मागण्याबाबत मवाळ असणारा प्राध्यापकवृंद अगोदरच होरपळुन गेला आहे. हा हा हा ... मस्त ! :) एक महिन्याचा पगार कापला ना राव आमचा ! महाराष्ट्रसरकारने त्याना आताच सातव्या वेतन आयोग स्थापन करुन त्याप्रमाणे वेतन श्रेणी जाहिर करावी व देशात आघाडी घ्यावी. अहो, दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू होतोच. फक्त देईपर्यंत खूप उशीर होतो. आता हा आयोग २००६ लाच लागू झाला. आणि अजून तो आम्हाला मिळत नाहीहे :( संप लवकर मिटावा नाहीतर आणखी एका विक्रमी संपाचे आपण परत एकदा साक्षीदार होवु शकतो. धन्यवाद ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ए
एकलव्य Sun, 08/16/2009 - 09:00 नवीन
हा असा काही संप चालला आहे याचीच माहिती आम्हाला नव्हती. कळविल्याबद्दल आभार आणि प्राध्यापकांना चर्चेसाठी शुभेच्छा. एक प्रश्नः हे नेट-सेट पास होणे प्राध्यापकांना सक्तीचे करण्यात काय चुकीचे आहे? सर्व प्राध्यापकांनी ते केले की समस्या/प्रशासन-प्राध्यापक वाद तेव्हढे राहतच नाही असे संपाकडे वरवर पाहता वाटते. चूभूद्याघ्या! इतकी काही अवघड नसते हो ती परीक्षा. (प्रा.पासून गेली काही वर्षेतरी दूर असलेला) एकलव्य
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 08/16/2009 - 10:35 नवीन
लवकरात लवकर तोडगा निघून संप मिटावा.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 08/16/2009 - 18:06 नवीन
>>सर्वात मोठा संप चोपन्न दिवसाचा रेकॉर्ड आहे होय. १९७८. आम्ही तेव्हा १०वीत होतो. परीक्षा पुढे ढकलली गेल्यामुळे झालेला त्रास भोगला. संप होणे हे करंट्या समाजवादाचे लक्षण आहे. आता समाजवाद हे 'नकोसे' तत्त्व आहे म्हणून नव्या आर्थिक धोरणाच्या काळात संप करणे हे महापाप समजले जाते त्यामुळे जरी तुमची बाजू बरोबर/न्याय्य असली तरी समाजाच्या पाठिंब्याची शक्यता कमीच. तेव्हा संभाळून. हे पे कमिशन नावाचे प्रकरण काय कसोट्या लावून पगार ठरवते त्याचे थोडक्यात विवेचन कोणी करेल काय? नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/16/2009 - 18:29 नवीन
समाजाच्या पाठिंब्याची शक्यता कमीच. कोणत्या संपाला समाजाची सहानुभूती असते ? बँक वाले, बसवाले चालक-वाहक, शिक्षक, कामगार,कर्मचारी, डॉक्टर, शासकीय अधिकारी, या पैकी कोणत्या शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांबद्दल समाजातील सर्व वर्गाची सहानुभूती समाजात असते, मला वाटते कोणाचीच नसावी. जो पर्यंत स्वतःचे काही जळत नाही, तो पर्यंत त्याकडे पाहायचे नाही. ही आपली (स्वार्थी) प्रवृती आहे, असते. तेव्हा सहानुभूतीची अपेक्षा कोणाकडूनच नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया Sun, 08/16/2009 - 18:37 नवीन
>>>संप होणे हे करंट्या समाजवादाचे लक्षण आहे. संप करावा की करु नये हा वादाचा मुद्दा असु शकतो. जेव्हा कारवाई होईल अशी भिती असतांना सुद्धा जेव्हा कुणी मनुष्य किंवा मनुष्यांचा समुह प्रस्थापित सत्तेविरुद्ध आवाज उठवत संपासारखे हत्यार उपसतो, तेव्हा त्या मनुष्यांना स्वतः करत असलेल्या कृत्याची साधक बाधक जाणीव असावी. जरी नसेल तरी त्यांना करंटे म्हणवुन हिणवणे योग्य वाटत नाही. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 08/17/2009 - 18:29 नवीन
गरज पडली तर संप करणे योग्यच असे माझेही मत आहे. आणि इतरांनी ते समजून घेऊन पाठिंबा द्यायला हवा हेही मान्य आहे. परंतु गेल्या काही वर्षांत नव्या युगाच्या प्रचारकांनी युनियन करणे, संप करणे हे देशाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीस मारक असते म्हणून संप करणे महापाप असा उद् -घोष लावलेला आहे. (संप करणार्‍यांना त्यांच्या योग्यतेनुसारच मोबदला मार्केटमध्ये मिळत असतो पण त्यांना स्वतःची योग्यता काय हे समजत नसते म्हणून ते अवाजवी मागण्या करीत असतात आणि संघटनेच्या झुंडशक्तीने त्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करतात असे त्यांचे म्हणणे असते) (अवांतरः बोनससाठी महापालिकेचे सफाईकामगार संप करतात तेव्हा प्राध्यापकांच्या संघटनेची भूमिका काय असते हे जाणून घेणे योग्य ठरेल). हा प्रतिसाद प्राध्यापकांच्या विरोधात नसून नव्या युगाच्या उद्गात्यांविरोधात आहे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
च
चित्रा Mon, 08/17/2009 - 21:43 नवीन
ठीक आहे, पण किती दिवस संप करायचा याला काही मर्यादा असाव्यात. सहाव्या वेतन आयोगामुळे अर्थातच प्राध्यापकांचे भले व्हावे ही इच्छा मनात धरूनही मुलांची परवड होते आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुले वर्गात येत नाहीत म्हणून वर्ग न घेतल्याने फारसे नुकसान होणार नाही असा काही लोक युक्तिवाद करतील आणि तो काहींना पटू शकतो, पण तो बरोबर नाही. नात्यातल्या ज्या काही मुलांशी मी बोलले त्यांना या गोष्टीचा त्रासच होतो आहे, कॉलेजमध्ये काय शिकवले जाते याकडे त्यांचे लक्ष आहे आणि त्यावर अवलंबून ही मुले आहेत असेच मला दिसले. पुढचे वेळापत्रक अनिश्चित असल्याने त्यांना इतर आखण्या करणे अवघड जाते आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्याबद्दलची सहानुभूती ओसरण्याआधीच त्यांनी संप संपवला पाहिजे. (संपाशिवाय इतर काही मार्ग नसतात का?)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/18/2009 - 03:56 नवीन
संप लवकरच मिटेल असे चिन्ह आहेत. महाराष्ट्राचे मुख्यंत्र्यांनी प्राध्यापकांची भुमिका समजावून घेतली. १९ किंवा २१ ला अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. संप काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होते हे मान्य. झालेले नुकसान सुट्यांमधे किंवा अधिकचे तासेस घेऊन पूर्ण केल्या जातात. तशी अटच काहीएक निर्णय घेण्यापूवी शासन लादते. >>(संपाशिवाय इतर काही मार्ग नसतात का?) उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना संपाबाबत नोटीस दिली होती. संप सुरु झाल्यानंतरही काही दिवसांनी मा. मंत्री म्हणतात. मला संपाबाबत काहीच माहिती नाही. काय बोलावे. असो, प्राध्यापकांच्या न्याय्य मागण्यांसाठी दुसरा मार्ग नसावा असे वाटते ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
प
पिशी अबोली गुरुवार, 04/04/2013 - 15:16 नवीन
संप काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होते हे मान्य. झालेले नुकसान सुट्यांमधे किंवा अधिकचे तासेस घेऊन पूर्ण केल्या जातात.
आणि यातही विद्यार्थीच भरडून निघतात. आधी सक्तीची महिनाभर सुट्टी. नंतर ढोरासारखं काम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/04/2013 - 17:13 नवीन
आत्ताच्या संपासंबंधी म्हणाल तर तासिंकावर बहिष्कार नव्हता तर प्रात्यक्षिक परिक्षा, लेखी परिक्षा आणि त्यानंतरच्या कामावर बहिष्कार चालू आहे. विद्यार्थी भरडला जातो याच्याशी सहमतच आहे. पण, सहावा वेतन आयोग लागू सर्वांना झाला आणि फरकांची रक्कम सर्वांना केव्हाच मिळाली आहे. २००७ ला मिळणारे लाखभर रुपये आज उद्या मिळाले तर त्याचे काही मूल्य राहीले आहे का, असे असूनही आहेत ते देण्याचे सरकारच्या जीवावर येत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली गुरुवार, 04/04/2013 - 18:35 नवीन
मी मागच्या संपाचा स्वानुभव सांगितला. मला प्राध्यापकांचे प्रश्न मान्य आहेत. मी फक्त विद्यार्थ्यांची बाजू सांगितली..शेवटी सगळ्यात जास्त नुकसान त्यांचंच होतं.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अवलिया Tue, 08/18/2009 - 04:05 नवीन
यावर्षी प्राध्यापकांनी शिकवले नसल्यामुळे निकाल चांगला लागेल अशी अफवा ऐकण्यात येत आहे. :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/18/2009 - 04:07 नवीन
प्राध्यापकांनी शिकवले नसल्यामुळे निकाल चांगला लागेल अशी अफवा ऐकण्यात येत आहे. :) अवलिया, कधीच सुधारणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 08/18/2009 - 04:10 नवीन
>>>अवलिया, कधीच सुधारणार नाही. प्राध्यापकांकडुन शिक्षण न घेण्याचा परिणाम म्हणावा काय ? :? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
J
JAGOMOHANPYARE Tue, 08/18/2009 - 08:05 नवीन
आय वॉज बॉर्न इन्टेलिजन्ट. एजुकेशन रुइन्ड मी...
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/18/2009 - 09:56 नवीन
मागण्या न्याय्य असल्या / नसल्या तरी संप हे योग्य हत्यार वाटत नाहि. मागण्या जर खरोखरच न्याय्य आहेत तर न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेऊन न्यायालयात न्याय मिळेलच त्यासाठी संप का? बाकी "शिक्षणाने मला काय दिले असेल तर न्यूनगंड" हे अनिल अवचटांचे वाक्य उगाच आठवले ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून २५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "मोत्या शिक रे अ आ ई ...."
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 08/18/2009 - 17:06 नवीन
न्यायालय हे या गोष्टीत (म्हणजे असलेला पगार योग्य आहे की नाही किंवा पगार किती असावा याबद्दल) हस्तक्षेप करणार नाही. मागण्या न्याय्य असणे म्हणजे बहुधा कायदेशीर असे नसून वाजवी असणे असे असावे. न्यायालयांचा रोल संपामुळे कुणाच्या घटनादत्त अधिकारांवर अतिक्रमण होते आहे का किंवा संप कायदेशीर आहे का वगैरे पाहण्यापुरताच आहे. पगार किती असावा ही प्रशासकीय बाब आहे त्याचा तोडगा प्रशासनानेच काढलेला बरा. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
आ
आजानुकर्ण गुरुवार, 04/04/2013 - 20:42 नवीन
शासनाने मान्य केलेला सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावता येणे शक्य होते काय? (४२० कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे वगैरे) की संप हेच एकमेव शस्त्र नव्या आंदोलनात उपलब्ध होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
श्रावण मोडक गुरुवार, 04/04/2013 - 20:47 नवीन
शक्य आहे. फक्त अट असावी एक. 'क्ष' गोष्ट केलीस तर 'य' गोष्ट देतो, असे समोरच्याने म्हटलेले असेल, तर आधी 'क्ष' ही गोष्ट सिद्ध करावी लागेल. तर, आणि तरच, 'य' न देणं ही समोरच्याकडून झालेली फसवणूक ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/18/2009 - 11:20 नवीन
वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा संप सुरु होऊन आज तीस दिवस होत आहेत
मराठीत प्रोफेसर, रीडर आणि लेक्चरर या तिन्ही पदांसाठी प्राध्यापक हा एकच शब्द आहे का? नसेल तर, वरिष्ठ महाविद्यालयात किती टक्के शिक्षक प्राध्यापक आहेत? तेवढेच फक्त संपावर गेले आहेत का बाकीचे रीडर्स, लेक्चरर्सही संपावर गेले आहेत? अदिती
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 08/18/2009 - 12:12 नवीन
मराठीत प्रोफेसर, रीडर आणि लेक्चरर या तिन्ही पदांसाठी प्राध्यापक हा एकच शब्द आहे का? नाही. चढती भाजणी खालीलप्रमाणे ट्यूटर / डेमोन्स्ट्रेटर - मराठी प्रतिशब्द माहीत नाही. (फ्रेश पासआउट) लेक्चरर - अधिव्याख्याता. (दोन वर्षे) सिनियर लेक्चरर - वरीष्ठ अधिव्याख्याता (तीन वर्षे) रीडर - प्रपाठक (चार वर्षे) प्रोफेसर - प्राध्यापक (पाच वर्षे) पूर्वी रीडर आणि प्रोफेसरमध्ये आणखीन एक पोस्ट होती 'असोसिएट प्रोफेसर' ती आता अनेक विद्यापीठांनी खालसा केली आहे. रीडरनंतर डायरेक्ट प्रोफेसर होतो पाच वर्षांनी. (सध्यातरी निदान महाराष्ट्र आरोग्यविज्ञानपीठात असे आहे) डॉ. प्रसाद दाढे वरीष्ठ अधिव्याख्याता मुखशल्यचिकित्सा महाराष्ट्र आरोग्यविज्ञानपीठ
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/18/2009 - 12:22 नवीन
वरीष्ठ अधिव्याख्याता, डॉक्टरसाहेब! कुणाहीबाबत व्यक्तीगत नाही, पण ट्यूशनक्लासेसमधेही शिकवणारे लोकंही स्वतःला "प्रा.अमुकतमुक" म्हणवून घेतात म्हणून वैतागून विचारलं. मागे पिडाकाकांनी जॉर्ज कोल्डवेलमधे, प्रोफेसर शब्दाबद्दल काही लिहिलं होतं, ते आठवलं अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
ऋ
ऋषिकेश Tue, 08/18/2009 - 12:29 नवीन
ओह असंय होय .. तरीच
नेट-सेट पात्रताधारक महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून आले पाहिजेत. याबाबत प्राध्यापक महासंघ सहमत आहे.
म्हणजे जे आता प्राध्यापक झालेत ते सुटले ह्या परिक्षेतून!! का म्हणून? सगळ्यांना परिक्षा कंपल्सरी करा म्हणून ह्या अधिव्याख्याता लोकांनी संप केला पाहिजे नाही? ;) ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ३ वाजून ५९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "मी मोर्चा नेला नाही...मी संपही केला नाही."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/18/2009 - 12:46 नवीन
महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या सेवेत अधिव्याख्याता म्हणून यायचे असेल किंवा प्राध्यापक म्हणून यायचे असेल तरी नेट-सेट पात्रता परिक्षा आवश्यकच ! महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ महाविद्यालयातील अधिव्याख्यात्यांना सहावा वेतन आयोग लागू केल्याचा शासन निर्णय काढला आहे. (पण देणार कधी त्याचा काही खुलासा नाही) फक्त एकच पण महत्वाचा प्रश्न शिल्लक राहिलाय...तोही मार्गाला लागेल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/18/2009 - 12:41 नवीन
अधिव्याख्याता आणि प्रपाठक ही महाविद्यालयात असलेली पदे. विद्यापीठात 'अधिव्याख्याता' आणि 'प्राध्यापक' महाविद्यालयातील अधिव्याख्याता पीएच.डी असेल तर चार वर्षांनी वरिष्ठ श्रेणीला येतो, तो वरिष्ठ अधिव्याख्याता आणि सेवेच्या बारा वर्षानंतर प्रपाठक (रिडर) डॉ.दिलीप बिरुटे (रिडर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
म
मिसळभोक्ता Tue, 08/18/2009 - 22:43 नवीन
महाविद्यालयातील अधिव्याख्याता पीएच.डी असेल तर चार वर्षांनी वरिष्ठ श्रेणीला येतो, तो वरिष्ठ अधिव्याख्याता आणि सेवेच्या बारा वर्षानंतर प्रपाठक (रिडर) अशी गारंटी आहे का ? म्हणजे शिकवतो कसा, शिकतो कसा, मार्गदर्शन कसा करतो, संशोधन कसा करतो, याला काहीच महत्व नाही का ? तरीच. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ल
लिखाळ Tue, 08/18/2009 - 13:00 नवीन
दर्जा ढासळला आहे का उमेदवारांचा ? ही शक्यता मला जरा वास्तवाच्या जर जवळ वाटते, अनेक प्रकारच्या राजकारणाला वैतागुन आज अनेक हुशार लोक ह्या क्षेत्राकडे वळतच नाही. मग नगाला नग म्हणुन भरती चालवल्यास कनिष्ठ पातळीच्या उमेदवारांना ही परिक्षा अवघड जाऊन शुन्य टक्के निकाल लागु शकतो. ज्यासाठी ही परिक्षा डिसाईन केलीच नाही त्याने १० वेळा डोके फोडले तरी त्यातुन पास होणे कठिण आहे, दोष मग नेट-सेटला तरी का द्या ?
डॉनच्या मताशी सहमत आहे. तसेच,
एका विषयाची आवड असताना (माझ्या बाबतीत खगोलशास्त्र, क्लासिकल मेकॅनिक्स इ) इतर विषयांचा (उदा. सॉलिड स्टेट फिजीक्स, इलेक्ट्रॉनिक्स) आळस यायचा. शिवाय एकदा बी.एस्सी., एम.एस्सी.ला ज्याचा अभ्यास करून परीक्षा दिली तेच पुन्हा पुन्हा काय करायचं या विचारानेही कंटाळा यायचा.
नेट परिक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतचे अदितीचे हे मत सुद्धा बरोबर आहे. शिक्षकवर्गाला मिळणारा पगार आणि कायमस्वरुपी नोकरीची शक्यता हे दोन महत्वाचे विषय असावेत असे मला वाटते. हुशार विद्यार्थी करियर करण्यासाठी या मार्गाकडे (अतिशय आवड) असल्याशिवाय फिरकत नाहीत आणि मग जो येईल त्याला संधी देऊन वर्ग चालूच ठेवण्याकडे कल होतो असे मला वाटते. भरपूर पागार मिळण्यासाठी आणी नेट-सेट-पिएच्डी वर योग्य तोडगा निघावा या साठी शिक्षण खात्यातल्या लोकांना शुभेच्छा ! -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट गुरुवार, 05/17/2012 - 10:05 नवीन
प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याची बातमी समजली होती. त्याचे पुढे काय झाले? प्राध्यापक तपासणार आहेत का पेपर? की सिनियर मुलांकडून तपासून घेणार आहेत? काही कळले का?
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/17/2012 - 13:31 नवीन
अजुन ६व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळाली नाही असे कळते, ती कधी मिळणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/17/2012 - 14:02 नवीन
तुम्हा दोघांची प्रश्नोत्तरे संपली की मी सवडीने उत्तर देईन. च्यायला, कुठेच सूख नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
न
नाना चेंगट गुरुवार, 05/17/2012 - 15:40 नवीन
>>>>च्यायला, कुठेच सूख नाही. नशीब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कपिलमुनी गुरुवार, 05/17/2012 - 10:38 नवीन
संपाचे स्वातंत्र्य नाही .. :(
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 04/04/2013 - 14:56 नवीन
परत एकदा प्रा.चा संप चालू झाला आहे असे दिसते. लोकसत्ताने प्राध्यापकांची चांगलीच हजामत केली आहे असे दिसते. http://www.loksatta.com/sampadkiya-news/excess-demand-of-teachers-92608/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/04/2013 - 17:06 नवीन
मा.श्री शरद पवार साहेबांनी प्राध्यापकांच्या संपाबाबत प्रश्न समजून घेतला आणि मध्यस्थी घडवून आणली आहे. लवकरच सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा आणि नेट-सेट संदर्भातल्या लाभांचे प्रश्न सुटतील असे वाटते. बाकी, लोकसत्ताचे लेख तेव्हाचे तेव्हा (ताजं दैनिक) वाचले आहेत. रिसर्च पेपरच्या (शोधनिबंध) बाबतीत सहमत असलो तरी असे का होत आहे, याबाबत फारसा कोणी विचार करत नाही. चालायचंच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 04/04/2013 - 19:16 नवीन
तरी असे का होत आहे, याबाबत फारसा कोणी विचार करत नाही. चालायचंच.
का होत आहे हे कळाले तर बरे होईल. यामागच्या कारणांचा विचार संप पुकारणाऱ्या प्राध्यापक संघटनेने केला आहे काय? शिक्षणक्षेत्राचा दर्जा सुधारावा, प्राध्यापकांचे ज्ञान वाढावे या कारणांसाठी ते पुढचा संप जाहीर करण्याची काही शक्यता आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/04/2013 - 19:34 नवीन
पदोन्नतीसाठी काही गुणांची विभागणी विद्यापीठ अनुदान आयोगाने केली. त्यात शोधनिबंध लिहिणार्‍यांसाठी दहा गुण ठेवण्यात आले आहेत आणि असेच गुण इतर विषयांसाठीही ठेवण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने चर्चासत्रासाठी (राज्यस्तरीय,देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय) अनुदान महाविद्यालयांना द्यायला सुरुवात केली. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणताही विचार न करता भाराभर प्रस्तावांना निधी दिला आणि मग महाविद्यालयांनी जमेल तसे चर्चासत्र आयोजित केली आणि मग शोधनिबंध,पेपर वाचनाचा बाजार उठला, याला सर्वस्वी जवाबदार युजीसी आहे, असं माझं मत आहे. चर्चासत्र आणि त्यामागची कल्पना व्यवस्थित राबविली गेली नाही, त्यामुळे काही दोष निर्माण झाले आहेत असे वाटते. >>> यामागच्या कारणांचा विचार संप पुकारणाऱ्या प्राध्यापक संघटनेने केला आहे काय ? प्राध्यापक संघटनेचा तो विषय आहे असे मला वाटत नाही. >>> शिक्षणक्षेत्राचा दर्जा सुधारावा, प्राध्यापकांचे ज्ञान वाढावे या कारणांसाठी ते पुढचा संप जाहीर करण्याची काही शक्यता आहे काय? प्राध्यापक संघटनांचे प्रतिनिधी शिक्षणक्षेत्राचा दर्जा, प्राध्यापकांचे ज्ञान, वाढावे अशा कोणत्या समितीवर नियुक्त नसतात असे वाटते त्यामुळे अशा गोष्टींसाठी त्यांचा पुढचा संप जाहीर होईल असे वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा