Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डार्वीन चा सिद्धान्त असाही

व
विजुभाऊ
Sun, 08/23/2009 - 19:35
🗣 45 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
13098 वाचन

💬 प्रतिसाद (45)
अ
अवलिया Sun, 08/23/2009 - 19:38 नवीन
श्रावण संपलेला दिसतोय ...... --अवलिया ============ काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/23/2009 - 20:09 नवीन
अवतार आणि डार्विनचा सिद्धांत याचा संबंध बाकी भारी जोडलाय. लेखनाची मांडणी आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 08/23/2009 - 20:11 नवीन
आज पासून आमचे विजुभाऊ हे मिसळपाव वरचे "डार्विन" आहेत , असे मी जाहीर करतो, आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. ते दोन शब्द शांतपणे ऐकुन घेतल्याने मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे! विजुभौं .. आपल्या विठुरायाचा कुठे उल्लेख नाही दिसला हो ? आपला खुप खुप फॅनलेला विज्युश्री
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 08/24/2009 - 07:19 नवीन
>>.. आपल्या विठुरायाचा कुठे उल्लेख नाही दिसला हो ? अहो टारझनराव, त्यासाठी आधी विठुरायावर श्रद्धा असायला हवी ना ! मग त्यापुढे सर्व काही ... जोक्स अपार्ट, वाचतो आहे. बरीच अतर्क्य, अचाट,क्लिष्ठ माहिती मिळते आहे वाटते आहे, लिहा तुम्ही आम्ही वाचतो आहोत. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विजुभाऊ Mon, 08/24/2009 - 10:56 नवीन
विजुभौं .. आपल्या विठुरायाचा कुठे उल्लेख नाही दिसला हो ? दशावतारात प्रत्येक अवतारात भगवंताने प्रत्यक्ष कर्म केले आहे. विठुराय हे विष्णुचे एक नाव आहे.पुंडलीकाच्या भेटीला जेंव्हा विष्णु आला होता तेंव्हा पुंडलीकाने( पुंडरीकाक्षाने) वीट फेकली आणि देवास त्यावर वाट पहात उभे रहाण्यास सांगितले. विटेवर उभा म्हणून त्याचे नाव विठ्ठल. हा वेगळा असा अवतार नाही. प्रत्येक अवताराला निश्चीत असे कार्य आहे. अवतार कार्य समाप्ती देखील आहे. विठुरायाला निश्चीत असे ठरवून दिलेले कार्य नाही. त्याने प्रत्यक्ष कोणतेही कार्य केलेले नाही.( जनाबाई/एकनाथ यांच्या घरी केलेले काम उदा: दळणे पाणी भरणे वगैरे.हे करीअरट्रॅक सोडून होते त्यामुळे ते विचारात घेता येणार नाही. नामदेवासोबत केवळ पी आर म्हणून जेवण घेतले होते हे ही प्रत्यक्ष काम म्हणता येत नाही) पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
N
Nile Mon, 08/24/2009 - 02:39 नवीन
झालेल्या घटनांचा नॉस्ट्रेडॅमच्या अगम्य/ वाट्टेल तितके अर्थ लावता येण्यार्‍या 'भविष्यवाणीशी' कसा संबध लावतात याची ही सुंदर झलक आहे. अ‍ॅडम-एव्ह आणि त्ययोगे इतर अनेक 'समजुतींचा' ( ;) ) पत्ता कट केल्याबद्द्ल लेखक महोदयांचे अभिनंदन. आता पहिला अवतार, i.e. copy, मत्स्य तर मग मुळ प्रत असायला हवीच की! झालीका पंचाईत! उत्क्रांतीच्या आधीच मुळ प्रत! पुढील संशोधनास शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
ए
ए.चंद्रशेखर Mon, 08/24/2009 - 03:04 नवीन
लेख जरा ओढून ताणूनच आणल्यासारखा वाटतो आहे. या पद्धतीने कोणतीही गोष्ट कोणत्याही गोष्टीशी जोडता यावी. चंद्रशेखर
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/24/2009 - 19:32 नवीन
पण लेख गमतीदार आहे. (असाच लेख मी मागे "आजचा सुधारक" मध्ये वाचला होता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर
प
प्राजु Mon, 08/24/2009 - 05:37 नवीन
डार्विन!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :S 8| बापरे!! नको रे बाबा पुन्हा! :$ :$ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 08/24/2009 - 06:44 नवीन
विजुभाउ सायणाचर्याचे वंशज दिसतात. अस्मा़कं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरू:...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/24/2009 - 06:55 नवीन
अस्मा़कं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरू:... आपल्याकडून फार अपेक्षा होत्या महोदय. उत्क्रान्तीचा सिद्धान्त इथे किती फिट बसला आहे त्या बद्दल जरा मार्गदर्शन कराल असे वाटले होते. बादरायण संबन्ध लावायचा असता तर तो कशालाही लावता येऊ शकतो. ( तसे म्हणाल तर बील गेट्स हा आपल्या सगळ्यांचा नातेवाईक आहे. हो आपण सगळेच एका मूळ पुरुषापासून जन्मलो आहोत म्हणे) असो.... दशावतार ही संकल्पना आहे .ती आपण अगदी ठाम स्वरुपात स्वीकारली आहे की त्यासंदर्भात आपण कोणतीही चर्चासुद्धा करु इच्छीत नाही. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
J
JAGOMOHANPYARE Mon, 08/24/2009 - 06:56 नवीन
लेख डार्विन ला दाखवा, तो एवढेच म्हणेल.. हे राम! :) अवतारान्चा सिक्वेन्स उत्क्रान्ति दाखवतो, हे मान्य आहे.. विकिपेडियावर दशावतार मध्ये हे 'कुणीतरी' आधी लिहिलेले आहेच.. पण काळानुसार हे सुसन्गत वाटत नाही... १. म्त्स्य ते वराह कधी जन्मले याचा नेमका थान्गपत्ता लागत नाही.. २. नरसिन्ह हिरण्यकश्यपू ला मारण्यासाठी आला... बळी हा प्रल्हादाचा नातू की पणतू आहे... म्हणजे १०० -२०० वर्षात लगेच वामनाच्या रूपात उक्रान्त होऊन त्याने पुन्हा बळीलाही मारले. ३. त्यानन्तर परशु राम आला... नेमका कधी माहीत नाही... पण परशुराम हा स्वता एक अवतार होता... आणि हा अवतार राम सीता लग्नाच्या वेळी उपस्थीत होता... जनकाला आपण दिलेले धनुष्य रामाने का मोडले, म्हणून रामाबरोबर भान्डला देखील... राम तर या सिरीज मधला पुढला अवतार... मागचा अवतार तेन्व्हा आला कसा ? उत्तर नाही.. ४. रामाचा अवतार झाला.. नन्तर कृष्ण आला... त्यावेळीही परशुराम होता.... कर्ण, भीष्म आणि द्रोण याना अस्त्र विद्या परशु रामाने दिली... दोन पुढचे अव्तार येऊनही मागचा अवतार तेन्व्हा काय करत होता ? उत्तर नाही.. ५. दोन अवतारामधील काळ न पटणारा आहे... प्रत्येक अवताराचा कालावधी देखील असाच न पटणारा आहे... १००-२०० वर्षात ( ४ पिढ्यान्च्या अन्तरात) नरसिन्ह व वामन दोन अवतार झाले... आणि कलियुग ५००० वर्शे चालूनही मध्ये काही अवतार नाहीत.... कूर्म अवतार काही तासातच सम्पला आणि परशु राम तीन तीन अवतार होई पर्यन्त फिरतच होता.... ६. काळ अनन्त आहे... आता फक्त एकच अवतार उरला आहे.... मग तोही होऊन गेला तर त्यानन्तर काय ? उत्तर नाही... दशावतार ही केवळ एक सन्कल्पना आहे... उत्क्रान्तीशी केवळ काही अन्शी जुळते... हा निव्वळ योगायोग आहे.. आता हा विषय सोडा आणि नवा विषय घ्या... परशुराम अवतार आणि टारझन अवतार हे एकच का ? :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/24/2009 - 07:09 नवीन
दशावतार ही केवळ एक सन्कल्पना आहे... उत्क्रान्तीशी केवळ काही अन्शी जुळते... हा निव्वळ योगायोग आहे.. हा योगायोग नसावा. दशावतर ही केवळ एक संकल्पना आहे हे खरेच पण हिन्दुधर्म त्या संकल्पनेभोवती फिरतो. हिन्दु धर्म ही संकल्पना साधारणतः जेंव्हा दशावताराची संकल्पना आस्तित्वात आली त्या वेळेसच जन्म पावली. दशावतार काही ठिकाणी बारा अवतारही मानले जातात. त्यात लक्ष्मण आणि बलराम हेही अवतार म्हणून गृहीत धरले गेले आहेत. ( बारा अवतारांच्या मूर्ती पाटेश्वरा च्या गुहेत आहेत) मग अवतार म्हणजे नक्की काय असावे? तो द्वैत आहे की अद्वैत. अवतार ही कल्पना कशावरून आली? परशुराम/रामाने स्वतःला कधीच अवतार म्हणवले नव्हते. कृष्णावतारात तर कृष्णाने स्वतःला सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ म्हणवून घेतले आहे. बुद्धाचे तत्वज्ञान वैदीक मंडळीना पचायला जडच गेले त्याला नाकारणे आणि स्वीकारणे दोन्हीही एकूणात अवघडगेले. त्यामुळे बुद्धाला अवतार म्हणून मान्यता देउन त्याला अडगळीत टाकले त्याचे तत्वज्ञान हे पाखंड म्हणवले गेले. सामान्यतः ज्या ज्या लोकानी तत्काली ऋढ मताना छेदण्याचा प्रयत्न केला आणि ज्याना खोडून काढणे अवघड होते त्याना देवत्व देऊन अप्राप्य केले आणि अवतार बनवून टाकले व तथाकथित वैदीक धर्म अबाधीत ठेवला. कृष्ण हा बंडखोर विचारांचा होता. त्याने त्यावेळच्या राज्यपद्धतीला तसेच कर्मकांडाला विरोध केला.( उदा: गोवर्धन पर्वत प्रकरण) एकदा अवतार ठरवल्यानन्तर कृष्णाने सांगितलेले विचार त्यात सोयीस्कर भेसळ करून मगच सांगितले. शिवाय एकदा कोणाला देवाचा अवतार म्हणाले की त्या बद्दल चिकित्सा वर्ज्य . पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
अ
अवलिया Mon, 08/24/2009 - 07:13 नवीन
=)) आजपर्यत वाचलेला सगळ्यात विनोदी प्रतिसाद. विजुभाउ, लगे रहो.... :) च्यामारी जपानी गादी घेतलीच पाहिजे, विनोदी लेखन करण्यासाठी ! --अवलिया ============ काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विशाल कुलकर्णी Mon, 08/24/2009 - 08:34 नवीन
दोन पुढचे अव्तार येऊनही मागचा अवतार तेन्व्हा काय करत होता ? उत्तर नाही..>>> पुराणानुसार परशुराम हा अवतार सप्त चिरंजिवांपैकी एक मानला जातो. परशुरामाला मृत्यु नाही, तो चिरंजीव आहे. त्यामुळे तो पुढील अवतारात पुन्हा दिसला असेल तर त्यात नवल नाही. अर्थात मानला तर देव ! नाहीतर केवळ एक समजुत !! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
J
JAGOMOHANPYARE Mon, 08/24/2009 - 08:43 नवीन
परशुरामाला मृत्यु नाही, तो चिरंजीव आहे. त्यामुळे तो पुढील अवतारात पुन्हा दिसला असेल तर त्यात नवल नाही. मग दोन अवतारातच का दिसला ? सध्या कुठे आहेत ते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
क
कालिन्दि मुधोळ्कर Mon, 08/24/2009 - 09:02 नवीन
>>सध्या कुठे आहेत ते ? मजकूर संपादित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/24/2009 - 09:11 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांना नम्र विनंति आणि सावधानतेचा इशारा कोणत्याही धार्मिक अथवा ऐतिहासिक श्रध्दास्थानांविषयी परखड मते जरूर मांडावीत पण त्यात काही अभ्यासपूर्ण असावे. कोणत्याही प्रकारे निंदाव्यंजक / अपमानकारक अथवा चेष्टा करणारी वक्तव्ये / लेखन करू नये. तसे आढळल्यास आणि संपादकमंडळास योग्य वाटल्यास असे लेखन उडवले जाईल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर
स
स्वप्नयोगी Fri, 08/28/2009 - 16:20 नवीन
त्यानन्तर परशु राम आला... नेमका कधी माहीत नाही... पण परशुराम हा स्वता एक अवतार होता... आणि हा अवतार राम सीता लग्नाच्या वेळी उपस्थीत होता... जनकाला आपण दिलेले धनुष्य रामाने का मोडले, म्हणून रामाबरोबर भान्डला देखील... राम तर या सिरीज मधला पुढला अवतार... मागचा अवतार तेन्व्हा आला कसा ? उत्तर नाही.. ४. रामाचा अवतार झाला.. नन्तर कृष्ण आला... त्यावेळीही परशुराम होता.... कर्ण, भीष्म आणि द्रोण याना अस्त्र विद्या परशु रामाने दिली... दोन पुढचे अव्तार येऊनही मागचा अवतार तेन्व्हा काय करत होता ? उत्तर नाही माझ्या माहीतीनुसार परशुराम सप्तचिरंजीवांपैकी एक मानला जातो. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
J
JAGOMOHANPYARE Mon, 08/24/2009 - 07:13 नवीन
आणि एक राहिले.... दशावतार नेमके १० कोणते हा एक नवा मतभेद आलाय... आपण परम्परेने दशावतारात कूर्म आणि बुद्ध घेतो... पण काही लोक बुद्धाला वगळतात आणि त्याऐवजी मोहिनी अवतार मानतात.. ( गुगल सर्च करुन पहा.. )मग तर उत्रान्तीचा सिद्धान्त आणि जास्तच गोत्यात येतो..... म्हणजे समुद्र घुसळताना कासव आणि अमृत बाहेर पडल्यावर लगेच मोहिनी अवतार देखील... प्रभाकर पणशीकरान्चा हा आद्यावतार असणार बहुधा ! कुर्मावतार झाला कारण एका राक्षसाने वेद पळवले आनि समुद्रात लपवले... मग ऋशी मुनी देवाकडे गेले मदत करा म्हणून... मग हे ऋशी मुनी कोणत्या स्वरूपात होते ? मनुष्य रूपातच ना ? डार्वीनच्या सिद्धान्तानुसार असते तर रुशी मुनी देखील मासेच असायला हवे होते.... रुशी मुनी तेवढे माणूस होते आणि देव बिचारा उत्क्रान्ती साठी म्हणून मासा बनला.. आनि त्यान्न्तर कासव आणि वराह ही बनला.... हे कुठे उत्क्रान्तीशी सुसन्गत आहे ?
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 08/24/2009 - 17:20 नवीन
>>कुर्मावतार झाला कारण एका राक्षसाने वेद पळवले आनि समुद्रात लपवले... मग ऋशी मुनी देवाकडे गेले मदत करा म्हणून. हो का? मला वाटले की तो वराह अवतार होता. कूर्म अवतार 'समुद्रमंथन' स्पेषल होता. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
J
JAGOMOHANPYARE Wed, 08/26/2009 - 05:50 नवीन
सॉरी मला मत्स्यावतार म्हणायचे होते.... मत्स्यावतार असाच आहे ना ? की तो मनुचा मासा म्हणजे मत्स्यावतार... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/26/2009 - 14:26 नवीन
बरोबर.. मनुचा मासा म्हणजे मत्स्यावतार.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
J
JAGOMOHANPYARE गुरुवार, 08/27/2009 - 07:57 नवीन
म्हणजे मनु तेवढा पूर्ण वाढलेला माणूस आणि देव तेवढा मासा ? हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद हे तेवढे मनुष्य... नरसिन्ह तेवढा अजून उत्रान्तीच्या मधल्या टप्प्यात......... लगे रहो... ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मन Mon, 08/24/2009 - 08:20 नवीन
आप्लाच मनोबा
  • Log in or register to post comments
म
मन Mon, 08/24/2009 - 08:35 नवीन
१.त्या काळात केलेलं ब्रम्हास्त्र का काय त्याच्म वर्णन अण्वस्त्राशी जुळतं. म्हणजे तेव्हा अण्वस्त्र होती! आणि ती अण्वस्त्र मनात आल्याक्षणीच हातात प्रकट होउन वाटॅल त्याचा "गेम" वाजवायची प्रगतीही आपण केली होती!(जे अजुनही फडतुस विज्ञानाला जमलेलं नाही.) २. माणसं विमान चालावायची.(रावणाचं पुष्पक विमान हो!) ते विमान कम अएरो स्पेस कम गरुड कम चारचाकी लिमो असलं "ऑल इन वन " कॉम्बिनेशन होतं. ३.राम्-दशराथ घ्या किंवा अगदि कृष्ण घ्या. तुम्ही कधी वाचलय की तोंडाला चश्मा लावुन हे सद् गृहस्थ किंवा ह्यांचे शिकवणी मास्तर(विश्वामित्र वसिष्ठ वगैरे) ग्रंथात तोंड खुप्सुन बसलेले? नाहिच! आहात कुठं राजे? त्या काळात माणसाला आजच्या सारखी भुक्कड चश्मे लावयची गरज होती कुठं? डायरेक्क लेसर ऑपरेशन व्हायचं तेव्हा! हे य वरुन शिद्ध होतं. ४. येक साथ शंभर पोरं होउ शकतात का आजच्या काळात (ते ही एकाच बाइला, एकाच नवर्‍यापासुन)? नाही ना? अहात कुठं? शंभर च्या शंभर पोरं त्यावेळेस क्लोनिंग्/टेस्ट ट्युब ह्यासारख्य आजच्या अप्रगत तंत्र्ज्ञानाच्या हजार्पट विकसित तंत्र वापरुन विक्सित झाली होती. ५. शेवटचा प्रश्न आणि उत्तर. ह्यंच्या कडॅ ब्रम्हास्त्र वगैरे असताना एका फटक्यात खेळ खलास करण्यापेक्षा मग हे उगिच तल्वार्-तल्वार नाही तर गदा-गदा अगदिच गेला बाजार बाण्-बाण का खेळायचे? याचं कारण एकच. आजच्या पेक्षा हजार पट विकसित तंत्र्ज्ञान त्यांच्याकडॅ होतं हे खरं. पण दहा हजारपड विकसित असं तत्वज्ञन्/नितीमत्ता होती.म्हणुनच ह्या अण्वस्त्रांचे दुष्परिणाम ओळखुन त्यांनी आपापले states फटाफट disarm करुन टाकले. म्हणुनच अण्वस्त्र प्रसार बंदी करणारे जगातली पहिली संस्कृती ही आमाची प्राणप्रिय संस्कृतीच आहे हे मी इथं बोंबलुन जाहिर करु इच्छितो. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/24/2009 - 08:48 नवीन
उकाटाआ.
ह्यंच्या कडॅ ब्रम्हास्त्र वगैरे असताना एका फटक्यात खेळ खलास करण्यापेक्षा मग हे उगिच तल्वार्-तल्वार नाही तर गदा-गदा अगदिच गेला बाजार बाण्-बाण का खेळायचे? याचं कारण एकच. आजच्या पेक्षा हजार पट विकसित तंत्र्ज्ञान त्यांच्याकडॅ होतं हे खरं. पण दहा हजारपड विकसित असं तत्वज्ञन्/नितीमत्ता होती.म्हणुनच ह्या अण्वस्त्रांचे दुष्परिणाम ओळखुन त्यांनी आपापले states फटाफट disarm करुन टाकले. म्हणुनच अण्वस्त्र प्रसार बंदी करणारे जगातली पहिली संस्कृती ही आमाची प्राणप्रिय संस्कृतीच आहे हे मी इथं बोंबलुन जाहिर करु इच्छितो.
खरं खोटं करण्याची इच्छा नाही, पण अण्वस्त्र वापर बंदी झालीच पाहिजे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
J
JAGOMOHANPYARE Mon, 08/24/2009 - 09:14 नवीन
आणि पुरातन उत्खन्नात कुठे ही टेलेफोन च्या वायर्स मिळाल्या नाहीत ... यावरून सिद्ध होते की पूर्वी वायरलेस आणि मोबाईल होते ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
क
केळ्या Wed, 08/26/2009 - 08:45 नवीन
एक राहिलेच,ब्रम्हास्त्र सोडून ते लक्ष्यावर पोचेपर्यंत मागेसुद्धा घेता येत होते.ही टेक्नॉलॉजी अजून कुठे आली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
प
प्रसन्न केसकर Mon, 08/24/2009 - 08:40 नवीन
सुंदर मांडलात विजुभाऊ. एकदम वीस वर्षांपुर्वीच्या एस पी, वाडीया, फर्गसन मधल्या फिलॉसॉफिच्या क्लासच्या आठवणी जाग्या केल्यात. कॉलेजात फिलॉसॉफिच्या क्लासमधे मेटॅफिजिक्स शिकताना असे प्रयत्न केले होते तेव्हा शिक्षकांनी प्रलय ही संकल्पना, मनुचा मासा आणि नोहाची नौका या कथांबाबत अश्या थिअरी असल्याचे सांगितले होते असे आठवते. सरांनी तेव्हा मेटॅफिजिक्सचे वर्णन तेव्हा धर्माची शास्त्राशी घातलेली सांगड असे तर एथिक्सचे वर्णन धर्माधिष्टीत कायदा आणुन सुव्यवस्थित समाजव्यवस्था करण्याचा अनादी अनंत काळपासुन सुरु असलेला प्रयत्न असे केले होते. सुंदर प्रतिपादनाला फिलॉसॉफिचा विद्यार्थी म्हणुन माझी दाद विजुभाऊ! असेच तर्कविवेचन अजुन वाचायला मिळेल ही अपेक्षा. लगे रहो! --- कोणत्याही धर्मामधील कर्मकांडे, कालबाह्य रुढी जरी झुगारणे योग्य असले तरी शेवटी प्रत्येक धर्म हा मानवाला पडणार्‍या कोड्यांना तत्कालिन ज्ञानाच्या आधारे उत्तरे शोधण्याचा आणि सुव्यवस्थित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न असतो अन अनेकदा असा तार्किक प्रयत्न पुढे कधीतरी विज्ञानाच्या प्रगतीशी मेळही खातो. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 08/27/2009 - 19:11 नवीन
>>प्रत्येक धर्म हा मानवाला पडणार्‍या कोड्यांना तत्कालिन ज्ञानाच्या आधारे उत्तरे शोधण्याचा आणि सुव्यवस्थित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न असतो इतके म्हणणे मान्यच असते. वाद तेव्हा निर्माण होतो जेव्हा धर्म सगळी फायनल उत्तरे आगोदरच सापडलेली (कुणीतरी सांगून ठेवलेली) आहेत असा दावा करतो. या लेखाच्या अनुषंगाने अधिक वर मनोबांच्या उपरोधिक प्रतिसादात लिहिलेले दावे खरेच केले जात असतात. कोणताही नवा शोध आधीच माहित होता असे सांगणारे अनेक लेख प्रसिद्ध होत असतात. (विश्वाचे वय ४५० अब्ज वर्षे~ २८ युगांचा/मन्वंतरांचा काळ वगैरे). गंमतीचा भाग म्हणजे आजच्या विज्ञानाने प्रकाश कण आणि तरंग दोन्ही स्वरूपात आढळतो म्हटले तर त्यात अद्वैतवाद की कायसे दिसते. उद्या विज्ञानाने प्रकाश कणस्वरूप आहे असे म्हटले तरी त्यात कायसे दिसेलच. हायझेनबर्गचे अनिश्चितता तत्त्व म्हणजेच मायावाद हे मी प्रत्यक्ष ऐकले आहे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
ज
ज्ञानेश... Mon, 08/24/2009 - 08:47 नवीन
हा उत्क्रांती- दशावतार संबंध आधीही वाचला आहे कुठेतरी. मत्स्य- कूर्म वगैरे काही अंशी जुळतात. पण तो योगायोग असावा. बाकीचे अवतार मात्र अगदीच ओढून ताणून बसवले आहेत असे वाटले. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/24/2009 - 08:59 नवीन
तसा बुद्धावतार ही दशावतारात ओढून ताणूनच बसवला आहे पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Mon, 08/24/2009 - 09:12 नवीन
विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड बसलीच पाहिजे असा आग्रह का असतो काही लोकांचा? (विजुभाऊंचा तसा आग्रह आहे असे म्हणत नाही, हा असाच अवांतर प्रश्न समजावा.) दोन्ही 'सेपरेट' स्वीकारायला काय हरकत आहे? "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Mon, 08/24/2009 - 09:32 नवीन
विज्ञान आणि धर्म फारसे वेगळे नाहीत. निदान इतिहासकाळात तरी ते तसे होते बर्‍याच धर्मात जे आचरण सांगितले आहे ते तात्कालीन स्थानीक विज्ञानानुसारच सांगितले आहे. सोवळ्याओवळ्याच्या बर्‍याचशा प्रथा स्वच्छतेशी आणि आरोग्या संदर्भीत आहेत. सामान्य लोकाना देवाची भीति दाखवली की ते विज्ञानाचे नियम पाळतात. धर्म आणि विज्ञानात फरक असेल तर तो त्यातील तत्व समजवून घेऊन मग त्याची अम्मलबजावणी करण्याच्या पद्धतीत. तज्ञानी बनवलेल्या नियमाना धर्म आंधळेपणाने विश्वास ठेवायला भाग पाडतो तर विज्ञान डोळसपणे त्याची चिकित्सा करुन मगच एखादी गोष्ट स्वीकारते. अर्थात्...... हे झाले पुस्तकातले. धर्माचे तीनशे चारशे वर्षांपूर्वीचे नियम आजही जसेच्या तसे स्वीकारायला लावणे ही धर्माचीही फसवणूकच आहे. शिवाय तो शुद्ध अतीरेकीपणा आहे. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
ज
ज्ञानेश... Mon, 08/24/2009 - 09:54 नवीन
बर्‍याच धर्मात जे आचरण सांगितले आहे ते तात्कालीन स्थानीक विज्ञानानुसारच सांगितले आहे. शक्य आहे. (विज्ञान 'स्थानिक' किंवा 'जागतिक' कसे असेल?) सोवळ्याओवळ्याच्या बर्‍याचशा प्रथा स्वच्छतेशी आणि आरोग्या संदर्भीत आहेत. सामान्य लोकाना देवाची भीति दाखवली की ते विज्ञानाचे नियम पाळतात. विज्ञानाचे नियम पाळण्यासाठी कशाची तरी भीती घालावी लागणे, हेच मुळात अनैसर्गीक आहे. विज्ञान ही तुम्ही म्हणता तशी डोळसपणे स्वीकारण्याची गोष्ट आहे. तसा दृष्टीकोन लोकांमधे येणे प्रचंड वेळखाऊ आणि कष्टाचे काम आहे. पण हाच मार्ग श्रेयस्कर आहे. धर्म आणि विज्ञानात फरक असेल तर तो त्यातील तत्व समजवून घेऊन मग त्याची अम्मलबजावणी करण्याच्या पद्धतीत. तज्ञानी बनवलेल्या नियमाना धर्म आंधळेपणाने विश्वास ठेवायला भाग पाडतो तर विज्ञान डोळसपणे त्याची चिकित्सा करुन मगच एखादी गोष्ट स्वीकारते. पटले. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
J
JAGOMOHANPYARE Mon, 08/24/2009 - 10:10 नवीन
,,,,,,,,,,,,,विज्ञान आणि धर्म फारसे वेगळे नाहीत. निदान इतिहासकाळात तरी ते तसे होते ,,,,,,,,,,,,,,,,,,, त्यावरून, विज्ञान = धर्म म्हणून उत्क्रान्ती = दशावतार म्हणून डार्विन = व्यासमुनी... हुश्श ! सम्पलं एकदाचं गणित ! गृह्पाठ : सिद्ध करा : १. डार्विन - व्यासमुनी = ० २. दशावतार - उत्क्रान्ती = ०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
J
JAGOMOHANPYARE Mon, 08/24/2009 - 09:06 नवीन
कुठे तरी ? विकिपेडिया वर आहे......... इतर ही अनेक लोक असे म्हणतात........ http://m-k-vinod.sulekha.com/blog/post/2002/04/darwinian-dashavatara.htm
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/24/2009 - 09:47 नवीन
आवाक्याबाहेरचा विषय. चालू द्या! तात्या.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 08/25/2009 - 08:14 नवीन
असेच म्हणतो आयला अवलिया आणि विजुभौ ना एका रुममधे कोंडले तर काय होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विजुभाऊ Mon, 08/24/2009 - 10:43 नवीन
(विज्ञान 'स्थानिक' किंवा 'जागतिक' कसे असेल?) कोणताही धर्म हा त्यात्या भौगोलीक परिस्थितीत निर्मान होतो व तरतो अथवा प्रसरीत होतो. तो जी तत्वे सांगतो ती सुद्धा ठरवतात की धर्माचे जागगितीकीकरण व्हावे किंवा नाही ते. उदा :बौद्ध धर्म आणि जैन धर्म...... बौद्ध धर्म जगात पसरला. जैन धर्म भारतातच मर्यादीत राहिला. भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात वस्त्रे न वापरणे/रोज अंघोळ करणे शाकाहारी असणे हे वैज्ञानीकरित्या योग्य ठरु शकते पण तेच इतरत्र अयोग्य असेल . या अर्थाने स्थानीक परिस्थितीत योग्य ठरणारे विज्ञान असे म्हणालो. तुम्हाला माहीत आहे की दक्षीण गोलार्धातून धृव तारा दिसत नाही. त्यामुळे ती खूण जागतीक ठरु शकत नाही मर्यादीत अर्थानी स्थानीकच ठरते. पृथ्वीच्या धृवांवर दिशा संपतात. ( उत्तर धृवावर दक्षीणेकडून सूर्योदय होईल) ही परिस्थीती स्थानीकच आहे. तेंव्हा त्या ठीकाणी जे विज्ञान अ‍ॅप्लीकेबल असेल ते स्थानीकच असेल पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Mon, 08/24/2009 - 11:44 नवीन
समजले. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! :) "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/24/2009 - 11:47 नवीन
सू हा स...
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Wed, 08/26/2009 - 05:51 नवीन
चर्चा बन्द ? डार्विनच्या आत्म्याला मुक्ती मिळाली की काय ?
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE गुरुवार, 08/27/2009 - 08:03 नवीन
...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा