कलादालन
घरीच गणपतीची मुर्ती केली
Primary tabs
या वेळी आम्ही घरीच मुर्ती बनवली. माझे मित्र श्री मुकुंद जहागिरदार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला आहे. छोटासा स्लाइड शो बनवला आहे.
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=pathak333&target=ALBUM&id=5373460967945285361&authkey=Gv1sRgCK3O7MrD8pS4kgE&feat=email
आस्वाद घ्यावा
धन्यवाद
चिंतामणराव
प्रयत्न खूपच दाद घेऊन गेला. स्वतःच मूर्ति बनवायची अभिनव कल्पना. आणि जमलीये पण छान. डोळेही खूपच जमले आहेत. सगळ्यात जास्त तेच मह्त्वाचे असतात गणपतीची मूर्ति घडवताना.
अवांतर: प्रसिद्ध गायक सुदेश भोसलेचे वडिल गणपतीच्या मूर्ति बनवायचा व्यवसाय करायचे. आणि सुदेशची मास्टरी गणपतीचे डोळे रंगवायची होती. तो फक्त तेच काम करत असे.
बिपिन कार्यकर्ते
व्हिडिओ. मूर्तीला असं टप्प्याटप्प्याने 'मूर्त' रूप येताना पहायला छान वाटलं. फारा वर्षांनी कॅमलचे बॉटल्ड रंग आणि फुलपाखराच्या आकारातली ती डिश पाहून शाळेतला चित्रकलेचा तास आठवला :). 'निजरूप दाखवा हो' हे पार्श्वभूमीवर वाजणारं गाणं आणि छायाचित्रं यांचा कल्पक वापरही सुरेखच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
चांगला वाटला उपक्रम.
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
मस्तच आहे स्वतः मुर्ती बनवण्याची संकल्पना.
आपल्या प्रयत्नांना आणि कष्टांना तसेच उत्साहाला दाद देतो, फारच सुरेख झाले आहे ...
------
छोटा डॉन
खूपच सुंदर!!!
'चिंतामणराव',
सर्वप्रथम आपले अभिनंदन!
आपला हा प्रयत्न फार प्रशंसनीय आहेच आणि मुख्य म्हणजे 'पर्यावरणाच्या हिता'चाही आहे.
प्रसन्न वाटले!
छायाचित्रांबद्द्ल धन्यवाद.
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
आपले मनःपुर्वक अभिनंदन!
चांगला प्रयत्न आणि योग्य सुरुवात ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
सुरेख गणपती बनवलाय...
दिपाली :)
तुमच कराव तेवढ कौतुक कमीच..डोळे खूपच छान जमले आहेत. सगळ्यात जास्त तेच मह्त्वाचे असतात जीवन्त वाटताहेत अग्दी.
../मुक्ता
हेच म्हणतो. तुमचे आणि तुमच्या कुटूंबाचे अभिनंदन.
गणपती बाप्पा.... मोरया!
-अनामिक
अती सुंदर! डोळे खूपच सुरेख! =D> =D> =D> =D>
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
पाहताना खूप छान वाटले.
पार्श्वभूमीवर वाजणारे निजरुप दाखवा हो.. अगदी चपखल.
स्वाती
कौतुकास्पद प्रयत्न. मुर्ती अगदी सुंदर तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला. :)
अतिशय सुरेख :)
!! गणपती बाप्पा मोरया !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
खरतर स्वःता घरी पुजायची मुर्ती स्वःता बनवणे ही एक अभिनव कल्पना आहे.तुमचे हार्दिक अभिनंदन.
वेताळ
सुंदर मूर्ती..! आपल्या सर्वांच्या कलाकारीचे कौतुक वाटले...
एक खटकलेली गोष्ट -
ध्वनिचित्रफितीत बाबुजींच्या आवाजातले मूळ गाणे ऐकायला मिळायला हवे होते..!
तात्या.
सुरेख गणपती. स्लाईड शोही छान!
स्लाईड शो उत्तम. खूप छान आहे मूर्ती.
आपणा सर्व कुटुंबाच्या उत्साह वाखाणण्याजोगा आहे. योग्य मार्गदर्शक मिळाला हे ही आपले भाग्य.
मस्तच आहे बाप्पा.
मीनल.
वा ! मूर्ती छान केली आहेत. अभिनंदन.
घरी मूर्ती करुन ती पुजण्याचा आनंद और असतो :)
मूर्ती खरेच फार सुंदर, प्रमाणबद्ध आणि प्रसन्न झाली आहे.
-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
मुर्ती फारच सुंदर बनवली आहे. मातीची आहे का कसली? हे कळले तर आवडेल. (उत्सुकतेपोटी).
इतकी सुंदर मूर्ती बनवल्याबद्दल आपले व आपल्या कुटुंबीयांचे अभिनंदन!
स्लाईडशोमध्ये गणपतीच्या मस्तकावर ठेवलेले जास्वंदीचे फूल हे फेट्यासारखे वाटले. फारच सुंदर मूर्ती!
रेवती
सुरेख!!!!!
सुरेख!!
माझे सासरे त्यांच्या लहानपणापासून घरीच गणपतीची मूर्ती बनवतात दरवर्षी. त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना होते चतुर्थीला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
चिंतामणराव गजाननाची मुर्ती घडवण्याची ही आपली कला फार आवडली... :)
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
डोळे रेखीव आहेत. तुमचा बाप्पा आवडला काका.
अतिशय बोलके डोळे असलेली सुरेख व सुबक मुर्ती !
अभिनंदन!
सुंदर बनवलीय मुर्ती. घरी मुर्ती बनवणे हाच एक वेगळा आनंद आहे.
सर्व प्रतिसादांबद्दल मनापासुन धन्यवाद.
डोळे माझी मुलगी नंदिनी हिने रंगविले आहेत.
मुर्ती शाडुच्या मातीची होती, कालच विसर्जन केले.
धन्यवाद