Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोणी नोकरी देता का नोकरी ???

छ
छोटा डॉन
गुरुवार, 08/27/2009 - 07:31
🗣 25 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8741 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 08/27/2009 - 07:51 नवीन
आय मीन... सर्च फॉर टू जॉब्स. 'पैशासाठी धावाधाव' करून मलाही कंटाळा आलाय. जॉब चेंज करावा म्हणतोय. (दमलेला बाप) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे गुरुवार, 08/27/2009 - 08:04 नवीन
सर्च फॉर थ्री जॉब्स. ("कचर्‍यात फेकुन देण्याच्या लायकीच्या मनोवृत्तीचा")निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शैलेन्द्र गुरुवार, 08/27/2009 - 08:00 नवीन
मीही मिसळ्पावमध्ये करीअर करण्याचा विचार करतोय.. तात्या हल्ली ऑप्शन्स्मधे बरेच कमावतायत अस खात्रिलायक सुत्रांकडुन कळलय...
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE गुरुवार, 08/27/2009 - 08:08 नवीन
अरे वा ..फ्युचरचे नवे ऑप्शन शोधता शोधता मग आता ऑप्शन मध्ये फ्यूचर काय ? :)
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर गुरुवार, 08/27/2009 - 08:12 नवीन
आयला काँपीटीशन वाढली? आता आजून दमणूक (माझी, बाबांची नाही) (आधीच दमलेला) महेश ----------------------------------------------------------------- येथे तेराव्याचे कूपन्स जमा करून घेतले जातील आणि त्यांचे नि:पक्षपाती पणे वाटप केले जाईल. -----------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 08/27/2009 - 08:18 नवीन
व्हिजीट मॉन्स्टर डॉट कॉम!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 08/27/2009 - 08:20 नवीन
जाऊ द्या टिंग्याशेठ, आंतरजालावर प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट समजावीच असा आमचा मुळेच आग्रह नसतो आणि अट्टाहास तर अजिबातच नसतो .. बाकी सल्ल्यासाठी आभार ...!!! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 08/27/2009 - 08:22 नवीन
कुठेही जा! मानेवरचं जु बदलता येईल....मुसक्या मात्र कायम इतरांच्या हातात राहतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/27/2009 - 08:47 नवीन
आमच्याकडे तुम्हाला हव्वी तश्शी एक नोकरी आहे बघा. आमच्या एका मित्राच्या खापरपणजोबाचा घोड्यावर बसलेला पुतळा त्याच्या वाड्यात आहे. पुतळा मोठा भव्य आहे. कामाचे स्वरुप :- १) रोज सकाळ दुपार संध्याकाळ घोडा व खापरपणजोबा दोघांची इमाने इतबारे साफ सफाई करणे. २) रोज सकाळ दुपार संध्याकाळ आजोबाच्या तलवारीला आणी घोड्याच्या लगामाला पॉलीश करणे. वेतन :- गरजेला पुरुन उरेल येव्हडे निश्चीत मिळेल. अन्न :- १)सकाळी नाष्ट्याला चणे मिळतील. (भिजवलेले) २) दुपारी १ वाजता २+२ भाकर्‍या अथवा रोट्या (रात्री काय उरलय त्यावर अवलंबुन) १ सुकी भाजी १ पातळ भाजी, डाळ व वाटीभर भात मिळेल. (स्वखर्चाने चटणी, लोणची आणल्यास हरकत नाही) ३)सकाळी ९ ला व संध्याकाळी ५ ला चहा मिळेल. ४) रात्रीच्या जेवणात (वेळ घरच्यांचे जेवण उरकल्या नंतरची) २+२ भाकर्‍या अथवा रोट्या, १ सुकी भाजी, १ पातळ भाजी व भात मिळेल. (तुरीचे भाव वाढल्याने दिवसातुन एकदाच डाळ मिळेल.) (ताट, वाटी, भांडे आपले आपण घासुन ठेवावे. जेवताना तोंडाचा 'मचमचा' आवाज करु नये') वस्त्र :- १)महिन्यातुन एकदा २ फडकी (पुतळ्यांसाठी) २) वर्षातुन २ वेळा १ शर्ट, १ टी-शर्ट, २ प्यांटी मिळतील. (बोहारणीने काही कपडे नाकरल्यास ह्यात वाढ होउ शकते) निवारा :- हिवाळा व उन्हाळ्यात घोड्याच्या पायात झोपण्यास ऐसपैस जागा आहेच. पावसाळ्यात वाड्याची पडवी वापरता येईल. आकर्षक संधीचा त्वरीत लाभ घ्या. ©º°¨¨°º© परा.कॉम ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 08/27/2009 - 08:47 नवीन
लेख डॉन्राव. लेख वाचून अंमळ हळवा झालो. पण असे होणे हे संवेदनशीलतेचे नसून पैशामागे धावणार्‍या, हपापलेल्या वृत्तीचे लक्षण असल्याचे ठरवण्यात आल्याचे लक्षात आले आणि मग ती चूक सावरण्याचा प्रयत्न केला. काय वाचून हळवे व्हावे किंवा होऊ नये याची जंत्री सध्या तयार होत असल्याचं समजतं. तयार झाल्यावर तिचा समावेश वाविप्रमध्ये करता येईल काय? म्हणजे अशी चूक पुन्हा होऊ न देण्याची दक्षता घेता येईल :) असो, लेख उत्तम असला तरी तपशीलात एक चूक आहे. हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर स्कॅनिंगच्या वगैरे भानगडीत पडत नाही. ते थेट निर्वाळ्याचा फतवा काढतं. 'सटॅनिक व्हर्सेस' न वाचताच अयातुल्ला खोमेनींनी काढलेला तसा. अर्थात हा चर्चाविषय असल्याने त्याला चुकीच्या गृहीतकाशिवाय शोभा नाही, हेही बरोबरच म्हणा. तेही असो. काही दिवसांपूर्वी मीच लिहिलेल्या लेखातला एक परिच्छेद इथे देण्याचा मोह आवरत नाही. (ही सवय स्वाईन-फ्ल्यू सारखी संसर्गजन्य असावी असा दाट संशय आहे.)
बहुतेक म्हणूनच प्रत्येक धर्मात, समाजात या सुप्त पण खदखदणार्‍या द्वेषभावनेचा निचरा करायला एक जागा असते, आणि नसलीच तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या कलाप्रमाणे ती शोधत असते. ज्याचा त्याचा बागुलबुवा. ज्याला कृतीने किंवा उक्तीने झोडपून काढलं की मन शांत होतं, रोजच्या आयुष्यातलं वैफल्य कमी होतं असं काहीतरी. उदाहरणं शोधली तर अनेक सापडतील. मक्केत सैतानाचं प्रतीक म्हणून उभारलेल्या खांबावर त्वेषाने दगडफेक करणारे भाविक, वाय टू केच्या चक्रात नोकरी गेल्यावर घरी बायकोला येऊन मारहाण करणारे काही पुरूषोत्तम, मुलांवर राग काढणार्‍या आया, बेणारे बाईंवर खटला चालवणारे सभ्य लोक, 'वॉर अँड पीस'मधल्या वेरेश्चागिनचा जमावाने घेतलेला बळी; एक ना अनेक.
त्यामुळे ह्या गोष्टी चालायच्याच (अधिक माहितीसाठी वाचा - अंतू बर्वा). हडप्पा-मोहेंजदरोच्या अवशेषांतही कुठेतरी हे लोथल शहरातले, परकीयांशी संबंध ठेवून असणारे लोक फार माजले आहेत असा एखादा शिलालेख मिळाला तरी आश्चर्य वाटू नये. ऋग्वेदात कितीही 'आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वत:' असे कानीकपाळी ओरडून सांगितले तरी 'त्याचा येळकोट जाईना' त्याला काय करणार? (शेवटचं वाक्य बळंच या सदरात मोडतं. त्याचा अर्थ खुद्द प्रतिक्रियालेखकालाच अद्याप कळला नसल्यामुळे स्पष्टीकरण मागू नये ;))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 08/28/2009 - 19:14 नवीन
हडप्पा-मोहेंजदरोच्या अवशेषांतही कुठेतरी हे लोथल शहरातले, परकीयांशी संबंध ठेवून असणारे लोक फार माजले आहेत असा एखादा शिलालेख मिळाला तरी आश्चर्य वाटू नये. हा शिलालेख औरंगाबादेजवळ सापडला म्हणतात. त्यात अर्धमागधीत "लोथल मुलांनी वार्‍यावर सोडलेल्या वृद्धांची काळजी" असे काहीसे खरडलेले होते म्हणतात. बरेच दिवस आम्ही "लोकल" समजत होतो. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/27/2009 - 09:09 नवीन
डानराव, बर्‍याच काळानंतर आपण मोठा उद्भोदक आणि वाचकांच्या विचारशक्तीला, सारासारबुध्दीला पुनःश्च कामाला लावणारा चर्चाप्रस्ताव सादर केला आहे त्याबद्दल आपलं करावं तेव्हढं अभिनंदन थोडंच. आपल्या उपरोल्लेखित विचारधारेशी सहमत असणारे लोक निदान आंतरजालावर तरी शेकडा सत्त्तर तरी नक्कीच सापडतील असा आम्हाला विश्वास आहे. एकुणच ह्या असल्या हिणकस मनोवृत्तीने आजचा समाज पुरता ढवळुन गेला आहे. पैशासाठी धावाधाव करणार्‍यांना भाव-भावनांचं मोल ना उमजतं, ना त्याकडे लक्ष द्यायला रिक्कामा वेळ असतो. आणि मग उग्गाच कसल्यातरी कविता फिविता वाचुन अचानक आपण हळावे असल्याचा साक्षात्कार होतो. ह्या सर्वाचा आम्हालाही मोठा कंटाळा आलाय..एक माणुस म्हणुन जगायचंय...भले चार पैसे कमी का मिळेनात! (ते वाढवुन कसे घ्यायचे ते चांगलंच कळ्तं की! नाहीच कळलं तर आस्थापनेतले शिनियर्स शिकवतीलच )
आमच्या कडव्या "स्वामीनिष्ठे"बाबत काळजी नसावीच. जॉब बदलण्याचा व "पैशामागे धावाधाव" करुन स्विच मारण्याचा विचारही करणार नाही.
हे वाक्य तर काळजाला भिडलं साहेब! आम्ही पाहतो ते स्वतःच्या करियरवर,पात्रतेवर (अवाजवी?) विश्वास असलेले सगळॅ.. म्यानिजराला दिसेल असा आपला स्क्रीन ठेऊन त्यावर वॉलपेपर म्हणुन सिंव्हाचं चित्र आणि शब्द "I work for money & appreciation...If u need loyalty, hire a dog" ! मग आहेच, "दे पगारवाढ नायतर चाल्लो...एकाला धा नोकर्‍या मिळतील मला!" पण आपलं वरचं वाक्य वाचलं आणी जीव भरुन आला...
मात्र तुमचे जे काही नियम असतील त्याप्रमाणे पगारवाढ मिळावी नाहीतर आम्ही ... हॅ हॅ हॅ ...
अर्थातच! नाही मिळत म्हणजे काय? त्याचे मार्गही असतातच की! ऐन सणासुदीच्या तोंडावर किंवा मोठ्या सुट्ट्यांच्या आधी बरोब्बर वेळ हेरुन ब्यांका बंद अभियान करायचं...गप सगळॅ सरळ येतात. उपोषणं, संप, चक्का जाम... एक हत्यार आहे का? वर पैसे बुडण्याचीही भिती नाही! एकुणातच अश्या सगळ्या गोष्टींमुळेच छोट्या छोट्या गोष्टी मनाला लाऊन घेण्याची आपली सवय वाढली आहे का हो? @टिंगोजीराव,
व्हिजीट मॉन्स्टर डॉट कॉम!
अहो त्यांना पैशामागे धावाधाव न करता पैसा मिळवणारी नोकरी हवी आहे हो.. मॉस्टर कितीही नाही म्हणलं तरी आयटीवाल्यांचीच सद्दी असलेलं प्रकरण आहे.
कुठेही जा! मानेवरचं जु बदलता येईल....मुसक्या मात्र कायम इतरांच्या हातात राहतील!
पण निदान पराकोटीचा हळवेपणा तरी कमी होईल ना? त्या मुसक्यावाल्यांशी लढायला कंपू तरी मिळेल ना? आपलाच, (पैशामागे धावाधाव करुन अतिहळवा झालेला) ध.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/27/2009 - 15:53 नवीन
हा धमालराव आमच्या मनातलं लिहीतो बरंका अगदी.. म्हणूनच आता "बा#@*ला त्या अमेरीकेच्या" असे म्हणून आम्ही स्वदेशी परतायचा निर्णय घेतला आहे. :) त्यामुळे पुण्यात आल्यावर भेटून तुम्हास अधिक मार्गदर्शन करू. त्याहून अधिक माहीती तुम्हास हवी असल्यास "अधिक चर्चा" खरडवहीत करावी. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विजुभाऊ गुरुवार, 08/27/2009 - 09:27 नवीन
नोकरी शक्यतो माझ्या गावीच असावी म्हणजे मला पुढचे डावपेच ठरवणे सोपे जाईल. अरे वा छान. तुम्ही देवाच्या गावचे. तेथे विठोबाला तात्पुरती एक रीप्लेसमेन्ट हवीच आहे बिचारा कंटाळलाय. त्याने कंटालून हात जर्रा नुस्ते कमरेवर ठेवले तर लोकानी त्याला त्याच अवस्थेत युगानुयूगे उभे केले. बघा नव्या मॉडीफाइड अवतारातला विठोबा लॅपटॉपावर मिपा ब्राऊज करणारा असेल पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/27/2009 - 10:45 नवीन
शहरातला कवी,गावावर कविता करतो आणी गावाकडचा कवी शहरावर कविता करतो...चालायचच ...असमाधानी रहाण हा देखील प्रगतीचा एक मार्ग आहे.... सू हा स...
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 08/27/2009 - 11:00 नवीन
कहि भी जाओ कव्वे सब जगह कालेही होते है| ;) ऋषिकेश ------------------ दूपारचे २ वाजून २९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "पैलतो गे काऊ कोकताहे...."
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 08/27/2009 - 11:20 नवीन
डान्रावांकडुन गंभीर आणि विचार प्रवर्तक विषयावर काथ्याकुटाचा प्रस्ताव पाहुन अतिशय आनंद झाला.. चला कोणी तरी मार्गी लागला! खरे तर अशा प्रस्तावांवर जन्मजात टवाळखोर असल्याचा शिक्का असल्याने प्रतिक्रिया देण्याची लायकी नाही तरी खरडुन पाहतो. टिकला तर आनंद, उडाला तर त्याहुन अधिक आनंद.. असो. डान्राव तुमच्यासाठी एक जाब आहे. आमचे एक अनाथाश्रम आहे. त्यात अनेक त-हेची अनाथ मुले, मुली आणि माणसे आहेत. काही मुले आणि मुली फार हुशार आहेत. सतत विचारात गढलेली असतात. तत्वचिंतन करत असतात. काही खोडकर मुले आणि मुली पण आहेत. काही माणसे पण अशी आहेतच. त्यांच्यातच काही मानसिक संतुलन बिघडलेली, मानसिक वय कमी असलेली, बोलतांना लाळ गळणारी, एक टक नको त्या ठिकाणी पहाणारी, गलिच्छ अशी मुले पण आहेत. तुमचे काम या सर्वांवर नीट लक्ष ठेवुन कुणी काही गडबड करणार नाही ना हे पहायचे आहे. ज्याला जे करायचे असेल ते करु द्यायचे, फक्त दंगा होवु द्यायचा नाही. मात्र काही विवक्षित मुलांना मात्र त्यांनी काहीही केले तरी फटके मारायचे. फार कोडगी मुलं आहेत ती.. त्यांची यादी एक्सेल शीट मधून तुम्हाला दिली जाईल. दंगा होत नसतांना सुद्धा या मुलांना झावडात मारली तर तुमच्या अप्रेझल मधे विशेष नोंद केली जाईल, ज्याचा फायदा तुम्हाला पगारवाढीसाठी होईल. अशा मुलांबरोबर मिळुन गप्पा मारायला सुद्धा तुम्हाला बंदी असेल, जर बोलतांना दिसलात तर ..... त्या दिवसाचा पगार कापला जाईल. जर जमत असेल तर कळवा (खव वा व्यनीतुन) आई भवानी आपल्याला यश देवो हीच इच्छा ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 08/27/2009 - 14:55 नवीन
मला बी हवा आहे नवीन जॉब.... जास्त अपेक्षा नाहीत... ईडी-काडी व ताडी (विस्कि..रम.. बीयर चालू शकेल) व दोन टाईमचं चिकन-मटनचे जेवणं व आठवड्यातूण एकदा चेंज म्हनूण एकदा शाकाहारी ! ;)
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर गुरुवार, 08/27/2009 - 15:43 नवीन
राहाय ल्यायच काय? न्हाय पैशे बी मागनास आन् कापडं बी म्हून इचारलं. राग मानु नगस. पर तसच र्‍हानार हायस का? बग बाबा. ----------------------------------------------------------------- येथे तेराव्याचे कूपन्स जमा करून घेतले जातील आणि त्यांचे नि:पक्षपाती पणे वाटप केले जाईल. -----------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अभिज्ञ गुरुवार, 08/27/2009 - 16:00 नवीन
हम्म्, डॉनराव प्राध्यापकांचा संप मिटला आहे अन प्राध्यापकांच्या बहुतेक अटी मान्य देखील झाल्यात. आता बोला. :) (सुज्ञ) अभिज्ञ -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 08/27/2009 - 18:18 नवीन
मंदीच्या दिवसात आलेले हे शीर्षक पाहून अंमळ हळवा झालो, सचिंत झालो. तू तर अनेकांची व्यथा मांडली आहेस असेच वाटले. शांतपणे जीवन जगण्याची, काम न करता पैसा मिळवण्याची इच्छा कोणाची नसते रे.. (या पुढे.. रे..मित्रा..उसासा..वगैरे वगैरे) अरे ((या पुढे.. रे..मित्रा..उसासा..वगैरे वगैरे)),
शुद्धलेखनाचा व हिब्रु भाषेचा मनापासुन तिरस्कार करतो कारण यातले आम्हाला घंटा कळत नाही, "स्वाहिली" भाषेवर पीयच्च्डी कारण्याचा विचार आहे,
शुद्धलेखनाची तिरस्कार कर रे..पण दुसर्‍या कोठल्या भाषेचा असा तिरस्कार नको ! -- लिखाळ. आम्ही पैशामागे पळत नाही. त्याला आम्ही दामटून खिशात भरून ठेवतो ;)
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 08/27/2009 - 19:15 नवीन
पुन्याच्या नायडुमध्ये (हास्पीटलात) संगणकावर याद्या करणारा हवा आहे, जाता काय? तुमी धंद्याला का नाही लागत? धंदा सुखाचा बरा, मानेवर जु नाय आणि मुसक्या आवळण्याचा, कुणाचा शेंबूड पुसण्याची पन गरज नाय... १ नंबर.. .तुमी धंदा करा राव !!
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 08/27/2009 - 20:12 नवीन
वेळ जात नाहीये का डॉणराव ? ;) बाकी धागा अंमळ मजेशिर .. फक्त मस्करीची कुस्करी होणार नाही एवढी काळजी घ्या ! @ परा : "वर्षातुन २ वेळा १ शर्ट, १ टी-शर्ट, २ प्यांटी मिळतील." ह्यासाठी "प्यांटा" हा शब्द वापरता येत नव्हता का ? असो ! -(जॉबप्रेमी) टारोबा रिकृटर
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 08/28/2009 - 08:26 नवीन
साधा. नक्कीच दिलासा मिळेल.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Fri, 08/28/2009 - 19:23 नवीन
कुणावर रोख आहे, संदर्भ काय आहे काही समजले नाही सामान्य मिपाकरांच्या आकलना बाहेरचा धागा आणि प्रतिसाद. त्यामुळे आमचा पास..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा