Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सूर्य नमस्कार

स
संदीप चित्रे
Wed, 09/02/2009 - 15:44
🗣 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6847 वाचन

💬 प्रतिसाद (17)
अ
अवलिया Wed, 09/02/2009 - 15:47 नवीन
चतुरंग शेटने एक लेख लिहीला होता... त्यांना जरा जागे करुन विचारा. http://www.suryanamaskar.info ही साईट बघा --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/02/2009 - 17:00 नवीन
सूर्य नमस्कार हा सर्वांग व्यायाम आहे. त्याने कॅलरीज किती बर्न होतात माहिती नाही.. मात्र पोट कमी होतं, वजनही कमी होतं. पण नुसतेच सूर्यनमस्कार न घालता त्या सोबत श्वास आणि उत्श्वास यांचेही गणित जमले पाहिजे. नमस्कार घालताना केव्हा श्वास घ्यायचा केव्हा सोडायचा याचेही नियम आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/02/2009 - 17:02 नवीन
मलाही ही माहिती कळून घ्यायला आवडेल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Wed, 09/02/2009 - 17:36 नवीन
इथे कुणाला उलटे सुर्यनमस्कार माहित आहेत का? माझ्या माहिती प्रमाणे वासूची सासू ह्या नाटकात त्याचा उल्लेख होता.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/02/2009 - 18:39 नवीन
>>इथे कुणाला उलटे सुर्यनमस्कार माहित आहेत का? विकिपीडियावर माहिती वाचायला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
ट
टारझन Wed, 09/02/2009 - 20:20 नवीन
घ्या ... लोकांना "उलटे" उद्योग करायला "निमीत्त मात्र' लागतं ! - (सरळ) आंबेचोख्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मिसळभोक्ता Wed, 09/02/2009 - 19:51 नवीन
त्यांना चंद्र नमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारांपेक्षा जास्त क्यालरी खर्च होतात. त्याचेही बरेच नियम आहेत, कधी श्वास घ्यायचा कधी सोडायचा वगैरे. पुरातन भारतात त्याविषयी खूपच संशोधन झाले होते. आता संशोधन मागे पडले, पण अद्यापही सर्व जगात हे लोकप्रिय आहेत. पाश्चिमात्यांनी भारतीयांकडून चोरलेली आणखी एक कला/विद्या. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र Wed, 09/02/2009 - 21:11 नवीन
चला निदान एकाला तरी माझा प्रश्न समजला म्हणायचा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
द
दिपाली पाटिल Wed, 09/02/2009 - 18:50 नवीन
छान धागा आहे, मलाही फायदा होइलसे वाटतय... :D अवांतर : इकडे मी २४ तास फिटनेसमधे योगाच्या क्लाससाठी गेली होती पण तो ट्रेनर इतका काय मृदुपणे बोलत होता की मला सॉल्लिड डुलक्या यायला लागल्या आणि इतके भयानक आसनं पण दाखवत होता की जणू त्याला मला करता येऊ नये असंच वाटत असावं...मग काय अर्ध्यातुन घरी यावंच लागलं :D दिपाली :)
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 09/02/2009 - 19:20 नवीन
चतुरंगचा (अग्र)लेख सूर्यनमस्कार डेमो (या मधे पटकन १० भाग बघता येऊ शकतील). अमेरिकेत गेले तीन वर्षे होत असलेला जानेवारी मधील सूर्यनमस्कार यज्ञाचे संकेतस्थळ सूर्यनमस्कार (पुणेरी आणि अमेरिकन) माहीतीपटः (त्यात विशेष करून चौथ्या मिनीटावरून अधिक माहीती मिळू लागते).
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 09/03/2009 - 04:31 नवीन
छान धागा आहे. सगळे दुवे अतिशय उपयुक्त आहेत. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/04/2009 - 00:47 नवीन
व्यायाम सर्वांगसुंदर आहे. बर्‍याच आसनांचा त्यात सहज अंतर्भाव आहे. एका नमस्काराने नेमक्या किती कॅलरीज खर्च होतात माहीत नाही पण भरपूर होत असाव्यात. बारा सूर्य नमस्कार व्यवस्थित घातले तर मला बारीक बारीक घाम यायला सुरुवात होते असे माझे निरीक्षण आहे. मुख्यतः सर्व सांधे, मेरुदंड, पोट, मान, कंबर, हात, पाय असा चौफेर व्यायाम आहे. सर्वसामान्यपणे दिवसभरात आपल्या ज्या प्रकारच्या हालचाली होत नाहीत त्या आपसूकच नमस्कारात घडतात त्यामुळे शरीरात चैतन्य येते याची जाणीव तुम्हाला नमस्कार संपताच होते. अतिशय नव्याने व्यायाम सुरु करीत असाल तर सुरुवातीला जरा सांधे मोकळे करुन घ्या. बेतानेच सुरुवात करा. एकदम आसनाच्या शेवटल्या अचूक स्थितीला शरीर दामटवू नका त्याने अपायच होतो. पहिल्या आठ्वड्यात चक्क ३ नमस्कारांपासून सुरुवात करा. दुसर्‍यात ५, मग ७, ९, १२ असे सावकाश वाढवा. २४ नमस्कार मजबूत व्यायाम देतात. मानसिक फायदे म्हणजे मन शांत होते. मेरुदंडाचे आणी मानेचे व्यायाम असल्याने डोक्याकडचे रक्ताभिसरण सुधारते, सर्व जाणीवा तरतरीत झाल्याचे कळते. लास्ट बट नॉट लीस्ट २४ नमस्कार घातलेत तर थोड्याच वेळात चांगली भूक लागते! ;) (अय्यंगार)चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 09/04/2009 - 04:02 नवीन
च्यामारी ... आम्ही याम करताना कधी कॅलरी फिलरीचा इचार केला नाय ... याम करायचा तं एकदम रगाट ... पण येवस्थित ... बाझवला तिच्यामायला त्या कॅलरीच्या मंग ... चला आमची येळ झाली यामाला जायची !!! कॅलरी मोजकयंत्र कुठे आहे बरे माझे ? अरे .. कोण आहे रे तिकडे .. माझे नाईकीचे पादत्राणं ,कपाळावर आणि मनगटावर लावायचे अदिदासचे घाम पुसण्याचे वस्त्र, रिबॉक ग्लब्ज आणि प्युमाचे सॉक्स कुठे आहेत ? अंमळ ट्रेडमिलवर कॅलरी मोजत मोजत पळू म्हणतो आज ? आपण पण उच्चभ्रु होणार :) -(अंमळ पै) टारझन संपले ..... आता प्रतिसाद संपले !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Fri, 09/04/2009 - 04:09 नवीन
(मानव)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Fri, 09/04/2009 - 08:15 नवीन
छ्या ... तुम्ही तुच्छ मानव केंव्हा सुधारणार ? व्यायामापेक्षा त्या व्यायामात किती कॅलरी जळाल्या हे मोजण्यात अधिक कॅलरी जाळता :) -(महामानव) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/04/2009 - 05:45 नवीन
मला बराच वेळ खुर्चीत बसलं की पाठदुखी होते, खरंतर व्हायची. ताठ बसायचं हे कितीही ठरवलं तरीही दिवसभरात कधी ना कधी ते विसरायला होतंच. गेली काही वर्ष (अ)नियमितपणे सूर्यनमस्कार घालत आहे, आणि पाठदुखीही झाली नाही. मला वाटतं याचं कारण आपण नेहेमीच्या कामांमधे पुढे वाकतो पण मागच्या बाजूला वाकत नाही. सूर्यनमस्कारामधे तेही होतं. शिवाय व्यायामाचे इतरही अनेक फायदे असतात ते तर होतातच. लास्ट बट नॉट द लीस्टः चांगली भूक लागली तरी चीज-बटाटा रोल खाण्यापेक्षा सातूचं पीठ खावं. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मुक्ता Fri, 09/04/2009 - 06:54 नवीन
अतिशय उपयुक्त माहीती.. वेगवेगळ्या हार्मोन च्या संतुलीकरणाशी निगडीत कोणी काही आसने सुचवु शकेल का ? ../मुक्ता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा