विंगकमांडरांचा बहुरंगी वहुढंगी वग- नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत' भाग १
Book traversal links for विंगकमांडरांचा बहुरंगी वहुढंगी वग- नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत' भाग १
💬 प्रतिसाद
(10)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/03/2009 - 14:11
नवीन
घाटपांडे साहेब, चांगले लेखन.
आजवर जेवढी माणसे जन्मली आणि पुढे जन्मणार आहेत त्या सर्वांची भाकिते लिहिलेल्या पट्ट्या उपलब्ध आहेत,
घाटपांडे साहेब, या पट्ट्या दाखवा हो.
त्यावर भाकित कसे केलेले असते आणि ते वाचायचे कसे. काही नमुना आहे का ?
नाडी-भाकिते हजारो वर्षांपूर्वी त्रिकालज्ञानी महर्षींनी अतींद्रिय ज्ञानाच्या सहारयाने लिहून ठेवली आहेत, प्रत्येक माणसाचे भाकित कूटलिपीत ताड-पट्टीवर कोरून लिहिलेले आहे,
हम्म, अतिंद्रियाच्या साह्याने माणसाचे भाकित कुटलिपीत असतील तर काही नैसर्गिक घटनांच्या भाकितेही त्यात असतात असा दावा नाडीपट्टीचे अभ्यासक करतात काय ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/03/2009 - 14:43
नवीन
ते कूट लिपीत असते. फक्त नाडी वाचकांना वाचता येते
http://www.misalpav.com/node/3664#comment-52213
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/03/2009 - 14:58
नवीन
ते कूट लिपीत असते. फक्त नाडी वाचकांना वाचता येते
हम्म :(
काय बोलायचे आता ?
कूट लिपीत असेल तर अन्य कूट लिपी समजणार्यांना त्याचा सारखा अर्थ बोध होतो का ? उदा. आपण दिलेल्या दुव्यावर 'शशिकांत' हा शब्द उमटलेला दिसला तोच अर्थ किंवा शब्द आणखी कोणा नाडीपट्टी जाणकाराला दाखवल्यास तोच शब्द किंवा अर्थ दिसतो का ?
ताडपत्रावर जे लिहिलेले असते. त्याची भाषा तमिळ असते. (ती कूट कशी असेल ) तेव्हा ती सर्वांना समजायला पाहिजे ना ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/03/2009 - 15:04
नवीन
सांकेतिक शब्दांत देखील गट असतात. त्यांच्यापैकी कुणाला तो वाचता येइल.तो शब्द पाच हजार वर्षांपुर्वी नाडीपट्टीत लिहिला होता काय?
नाडीपट्टीच वय काय? मजकुराच वय काय? अशी ती गोची आहे
डॉक्टर च गचाळ अक्षरातील प्रिस्क्रिप्शन केमिस्टला वाचता येत
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 09/03/2009 - 15:32
नवीन
श्री ओक यांनी एका पट्टीचे चित्र काही संकेतस्थळांवरती प्रकाशित केले आहे.
त्यात बाणांनी दाखवलेली अक्षरे लावण्या इतपत तमिळ लिपी मला वाचता येते. (पण बाकी पट्टीतले क्वचितच एखादे अक्षर मला लागते.)
बाणाने दाखवलेली अक्षरे अशी आहेत :
१. 'च' (तमिळ लिपीमध्ये च, छ, ज, झ, स, श, ष या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
२. 'चि' (तमिळ लिपीमध्ये चि, छि, जि, झि, सि, शि, षि या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
३. 'का' (तमिळ लिपीमध्ये का, खा, गा, घा या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
४. न्
५. त (तमिळ लिपीमध्ये त, थ, द, ध या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
असे सर्व पर्याय असले तरी बहुतेक तमिळ वाचक "ससिकान्त" किंवा (वाचक ब्राह्मण असल्यास) "शशिकान्त" असाच उच्चार करेल.
परंतु त्या चित्राचे कशाबद्दल प्रमाण (यात नेमका काय चमत्कार) म्हणून काय अर्थ आहे, ते मला कळले नाही.
माझ्याकडील एका पुस्तकात "धनंजय" असा शब्द स्पष्ट छापलेला आहे, तो मी बघितला आहे. पण त्यावरून गीताप्रेस-गोरखपूर-भविष्य केंद्राचा चमत्कार असे कोणी म्हटल्यास मी अत्यंत संभ्रमित होईन.
त्याच प्रमाणे माझ्याकडील एका ग्रंथात (अमरकोष) जवळजवळ सर्व सामान्य संस्कृतोद्भव नावे कुठे ना कुठे सापडतात. या ग्रंथाची छापील प्रत मी वापरतो, पण या ग्रंथाचे हस्तलिखित (माझ्या खापरपणजोबांच्या माळ्यावर सापडलेली बरीच जीर्ण पाने) माझ्यापाशी आहेत. त्यातही खूप नावे सापडतील. माझ्या आजोबांना अमरकोष तोंडपाठ होता, त्यांना फार शोधाशोध न करता नाव असलेले पान लगेच सापडले असते. पण त्यात "नेमका चमत्कार तो काय?" हे कोणालाही पटवून देणे कठिण जाईल. "धनंजयचे पणजोबा हस्तलिखित बाडे भविष्य केंद्रा"स या चमत्कारातून काहीही सामर्थ्य मिळत नाही, असे मला तरी वाटते.
फरक हा की त्या अमरकोषाच्या हस्तलिखितातले सर्वच शब्द सुवाच्य आहेत, आणि श्री. ओक यांनी प्रकाशित केलेल्या चित्रात तो एकच शब्द सुवाच्य आहे.
असो. "चमत्कार" म्हणजे नेमके काय, या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी असावी. व्याख्या-परिभाषांची निश्चिती झाल्याशिवाय संवाद आणि तर्क निष्फळ असतात. म्हणून त्या चित्राच्या संदर्भात मी आजपर्यंत काहीच बोललेलो नाही.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/03/2009 - 18:55
नवीन
चेन्नईला इन्स्टीट्यूट ऑफ मॅथ्समधे डॉ. रणजय (रॉणॉजय) अधिकारी हडप्पा संस्कृतीमधल्या चित्रलिपीला भाषेचा दर्जा द्यावा का नाही यावर संशोधन करता येईल. सदर कूट तमिळ किंवा जी काही भाषा आहे असं म्हटलं जात आहे, त्याबद्दल रॉणॉजॉयच्या गटातल्या लोकांशी बोलता येईल.
अर्थात या चमत्कारांवर माझा अजिबात विश्वास नाही हे मला नव्याने सांगायची गरज नसावी.
अदिती
- Log in or register to post comments
ह
हैयो हैयैयो
Sat, 09/05/2009 - 06:00
नवीन
कूटतमिळलिपी
मान्य.
अमान्य. तुम्ही डोके लढवलेत तर तुम्हालाही वाचता येणे शक्य आहे. येथे श्री. धनंजय सर ह्यांनी तमिळलिपिच्या प्राथमिक ओळखीवर आधारीत पट्टीतील काही अक्षरांबाबत आपले मत प्रदर्शित केले आहे. आपण स्वतः प्रयत्न करून पाहिला आहेत काय?
हैयो हैयैयो!
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 09/05/2009 - 11:19
नवीन
नाही. खुद्द तामिळ लोकांना कुट तामिळ फारसे समजत नाही आम्हाला काय समजणार? डॊकटर चे प्रिस्क्रिप्शन सुद्धा आपल्याला समजत नाही नीट.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
ह
हैयो हैयैयो
Sun, 09/06/2009 - 17:54
नवीन
चिकित्सक?
स्वतःस काहीच येत नाही, तरी शिकण्याची इच्छाही नाही आणि तरीही स्वत:स चिकित्सक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे असे आपणास वाटते काय?
हैयो हैयैयो!
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 09/03/2009 - 15:08
नवीन
बराच इतिहास आहे तर.
- Log in or register to post comments