Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत` - भाग २

प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/03/2009 - 08:36
🗣 33 प्रतिसाद

Book traversal links for विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत` - भाग २

  • ‹ विंगकमांडरांचा बहुरंगी वहुढंगी वग- नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत' भाग १
  • Up

प्रतिक्रिया द्या
19050 वाचन

💬 प्रतिसाद (33)
आ
आम्हाघरीधन गुरुवार, 09/03/2009 - 08:58 नवीन
नाडीपट्ट्या व्यक्तिश: कुणासाठी लिहिलेल्या नव्हत्या म्हणून त्यात कुणाची नावे असणे शक्य नाही. कुठल्या चड्डीच्या नाडी ची पट्टी कुणासाठी बनवायची हे फक्त दादा कोंडके यांच्या नाडी वाल्या चड्ड्या शिवणार्‍या शिंप्यालाच माहित असणार...... संपर्क : चड्डीवाले नाडीकर. (येथे चड्डीच्या नाडी ची पट्टी तयार करुन मिळेल.) बाकी अवांतर : हे नाडी परिक्षा वगैरे झेपत नाही बघा.... २१वे शतक सुरु आहे.... विज्ञान युगाचे. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 09/03/2009 - 09:06 नवीन
>>>आगामी शेकडो पिढ्यांचे कल्याण ( ! ) साधण्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य वेचले, आणि आजही ओकांच्यासारखे झपाटलेले नाडी-ऎडिक्ट आपली सरकारी नौकरी संभाळून नाडी भविष्याचा म्हणजे पर्यायाने नाडी-केंद्रांच्या धंद्याचा प्रचार 'लोकांच्या कल्याणासाठी' करीत आहेत. लेख अंमळ चांगला ... पण ( ! ) हे चिन्ह जास्त हिणकस वाटले ... बाकी काही म्हणने नाही !! ;)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/03/2009 - 09:11 नवीन
९९ सालचा लेख आहे. जसाच्या तसा दिला. उद्गार चिन्हा ऐवजी प्रश्नचिन्न पाहिजे व्हत काय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन गुरुवार, 09/03/2009 - 09:30 नवीन
ते उग्दारचिन्ह वाटलं असतं तर हिणकस कसं बरं वाटलं असतं घाटपांडे काका ? आता जाऊ द्या .. बाकी चर्चा खरडवहीत !! -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
विजुभाऊ गुरुवार, 09/03/2009 - 09:19 नवीन
श्रीकान्त शहां आणि ओम्कार पाटलांचे अनुभव मी ऐकले आहेत. श्रीकान्त ला अगोदर ते सर्व खरे वाटले होते. पण नन्तर ओंकारपाटीलानी पुन्हा मद्रासला जाऊन तेथले लॉजीक ओळखले. नाडी ज्योतीष वाले जे प्रश्न विचारतात त्या ऐवजी तेथे जर एखादी लेखी प्रश्नपत्रिका ठेवली तर साधे एक्सेल सुद्धा उत्तम नाडी ज्योतिश साम्गु शकेल पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/03/2009 - 12:52 नवीन
ओंकार पाटील यांचा लेख हा इथे दिलाच पाहिजे. भला थोरला लेख आहे. (आता टंकुन घ्यावा लागेल) त्यांनी हळुच पॉकेट टेपरेकॉर्डर ठेवल्या मुळे त्यांना नंतर लेख व्यवस्थित लिहिता आला. तांबारम च्या नाडी केंद्रात त्यांना एकुण २६० प्रश्न विचारले गेले. किस्त्रीम साठी मी जेव्हा हा लेख हमो मराठ्यांना दिला तेव्हा त्यांना यातील 'न्युज व्हॅल्यु' पकडता आली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/03/2009 - 12:38 नवीन
दोन्ही लेख वाचले. अगदी मुद्देसूद वाटले. बाकी नाडी वगैरेबद्दल काय बोलणार. व्यक्तिशः काही अनुभव नाही. पण थोतांडच वाटते आहे. ओकांचे काहीकाही मुद्दे तर सरळ सरळ हास्यास्पद वाटले. असो. खरं तर आता मला नाडीपरिक्षेच्या खरेपणापेक्षा अजूनच मोठी चिंता सतवते आहे. असे लोक जर का देशाच्या संरक्षण यंत्रणेत सक्रिय होते या विचारानेच घाम फुटतोय !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/03/2009 - 14:22 नवीन
दोन्ही लेख वाचले. अगदी मुद्देसूद वाटले. बाकी नाडी वगैरेबद्दल काय बोलणार. व्यक्तिशः काही अनुभव नाही. पण थोतांडच वाटते आहे. सहमत आहे. ओकांशी माझी नुकतीच ओळख झाली आहे. भविष्यकथनाचे जाऊ द्या. पण, नाडीपट्टीचा विषयच मला खूप अनोळखी होता. नाडीपट्टीची ओळख झाली, होत आहे. वैचारिक वाद-प्रतिवादातून सत्य काय असेल ?ते समजण्याचा मार्ग मोकळा होतो असे वाटते. तेव्हा कृपया वाद (व्यक्तीगत न होता) थांबवू नका. चालू द्या......! लेखनाबद्दल घाटपांडे साहेबांचे आभार...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अवलिया गुरुवार, 09/03/2009 - 14:51 नवीन
हे सगळे वाचुन मी एकदा एका नाडिकेंद्राला गंमत म्हणुन भेट दिली होती, तो अनुभव टाकावा की काय असे वाटत आहे. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/03/2009 - 15:12 नवीन
एकदा एका नाडिकेंद्राला गंमत म्हणुन भेट दिली होती, तो अनुभव टाकावा की काय असे वाटत आहे. टाका..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/03/2009 - 15:12 नवीन
अरे मंग टाका कि राव! अनुभव म्हंतोय मी प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नितिन थत्ते गुरुवार, 09/03/2009 - 15:43 नवीन
आयला, म्हणजे ओकांना पट्ट्यांवरचा मजकूर वाचता येतच नाही तर!!! मला वाटत होते की ओक स्वतः पट्ट्या वाचून भविष्य सांगतात. आणखी एक म्हणजे प्रत्येक माणसाची युनीक पट्टी असेल तर जातकाला भविष्य सांगितल्यावर पट्टी देऊन टाकायला पाहिजे (कारण त्या पट्टीचा पुन्हा काही उपयोग नाही). जातकांकडच्या अशा पट्ट्या पाहून मग आपल्यालाही काही वाचून पहायचा प्रयत्न करता येईल. यापुढे जाऊन पट्ट्या जशा अतिंद्रिय शक्तीने लिहिल्या आहेत तशाच त्या वाचायलाही अतिंद्रिय शक्ती लागते असेही ओकसाहेब म्हणू शकतील. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/03/2009 - 16:12 नवीन
प्रत्येक माणसाची युनीक पट्टी असेल तर जातकाला भविष्य सांगितल्यावर पट्टी देऊन टाकायला पाहिजे अहो, कशी देता येईल पट्टी. लेखातील खालील वाक्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदशन होत राहील यात शंका नाही.' ही जरा चालाखीच आहे, असे वाटायला लागले आहे. पट्ट्या जशा अतिंद्रिय शक्तीने लिहिल्या आहेत तशाच त्या वाचायलाही अतिंद्रिय शक्ती लागते असेही ओकसाहेब म्हणू शकतील. हा हा हा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ट
टिउ गुरुवार, 09/03/2009 - 18:26 नवीन
बरीच नवीन माहिती कळाली! लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद घाटपांडे काका...एकुण हा सर्व प्रकार बंडलच वाटतोय. पण लोक कशावर विश्वास ठेवतील काही सांगता येत नाही! बाकी दाभोळकर, नारळीकर मंडळी पब्लीक फिगर्स आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न न विचारताही त्यांची 'नाडीपट्टी' आम्हीसुद्धा शोधु शकतो... ;)
  • Log in or register to post comments
अ
अजुन कच्चाच आहे Fri, 09/04/2009 - 08:06 नवीन
ओकांच्या 'नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो' या धाग्यावर मी व खडूस यांनी प्रतीसाद दिले आहेत. सर्व मिपाकरंना विनंती की या प्रयोगास पुर्ण पाठींबा द्यावा व त्यासाठीचे नियम बनवण्यास मदत करावी. संपादक मंडळातील काही लोकांनी पुढाकार घ्यावा. ................. अजून कच्चाच आहे. (पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/02/2010 - 15:05 नवीन
......ओंकार पाटील यांचा लेख हा इथे दिलाच पाहिजे. भला थोरला लेख आहे. (आता टंकुन घ्यावा लागेल) त्यांनी हळुच पॉकेट टेपरेकॉर्डर ठेवल्या मुळे त्यांना नंतर लेख व्यवस्थित लिहिता आला. तांबारम च्या नाडी केंद्रात त्यांना एकुण २६० प्रश्न विचारले गेले. किस्त्रीम साठी मी जेव्हा हा लेख हमो मराठ्यांना दिला तेव्हा त्यांना यातील 'न्युज व्हॅल्यु' पकडता आली....... .....हा ओंकार पाटीलांचा लेख मिपावर दिलेला आहे का? असल्यास त्याचा दुवा? नसल्यास अजून अवश्य द्यावा......
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 04/02/2010 - 16:28 नवीन
चांगला लेख आहे... अभिनंदन. विना नाडी नाही गोडी! (सौजन्य: बिपीन कार्यकर्ते) -- (नाडी पेक्षा चड्डीची नाडी जास्त वेळा बघणारा) इंटरनेटप्रेमी!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 04/02/2010 - 18:54 नवीन
योगायोगाने धागा वर आला. घाटपांडे काकांना जोरदार पाठिंबा. नाडी वरील लेख अंधश्रद्धा पसरवत आहेत. सबब, तशा लेखांना संपादकांनी सामाजीक जाणिवेतून बंदी आणावी किंवा लेखकाला सुचना द्यावी. (भले ते लेखक मोठे असतील, लेखाला सुचक प्रतिक्रिया येत नसतांना देखील लिहीण्याचा प्रयत्न करत असतील किंवा तात्या त्यांचे कौतूकही करत असतील तरीही.) Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 04/03/2010 - 04:47 नवीन
ओकांची मते भले मला पटत नसली तरी त्यांच्या लेखावर बंदी आणावी असे मला वाटत नाही. असे केल्यास त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येईल.त्यांच्या लेखाचा वैचारिक प्रतिवाद करणे, मतभिन्नता व्यक्त करणे या बाबी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करुन देखील करता येतात. मी व्यक्तिशः ओकांचा व्यक्ति म्हणुन आदरच करतो. त्यांच्या चिकाटीचे मला कौतुक देखील वाटते. नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता! या राजेश च्या विडंबनाला त्यांनी दिलेली दिलखुलास दाद ही त्यांच्या खिलाडुपणाचे प्रतिक आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पाषाणभेद Sat, 04/03/2010 - 08:51 नवीन
काका, माझी तरी कुठे त्यांच्याशी दुश्मनी आहे. त्यांचे रेल्वेतील किस्से तर फारच छान असतात. नाडीग्रंथ हा अनेक प्रश्नांना बगल देत पुढे चाललेला आहे. केवळ लढाई करणारा सैनिक म्हणून लढावू बाण्याने पुढे जात राहणे मला चुकीचे वाटले म्हणून मी तसे लिहीले. अर्थात अंधश्रद्धा अन भारतीय समाज, इतर देशांनी केलेली प्रगती, संस्कृती, विज्ञान, आजचे युग, प्रगती या सामाजीक जाणीवांच्या बाबतीत बरीच चर्चा होवू शकते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून जॉर्ज बुश यांच्या वरचा विनोद आठवला. बुश एका शाळेत जातात. मुले त्यांना युद्धावरून प्रश्न विचारतात. एक एक मुलगा गायब होतो. शेवटचा मुलगा वेगळा प्रश्न विचारतो, "माझ्या वर्गातील इतर मुले कोठे गायब झाली". या पुढेही त्यांचे नाडिवरील लेख आले तर माझी काही हरकत नाही. (मी कोण टिकोजी हरकत घेणारा?) त्यांनी इतर विषयावर लिहीले तर मी त्यांचा आनंद घेईल. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ब
बहुगुणी Fri, 04/02/2010 - 19:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
N
Nile Sat, 04/03/2010 - 00:37 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
म
मी-सौरभ Sat, 04/03/2010 - 13:02 नवीन
=)) =)) =)) =)) सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
च
चित्रगुप्त Sat, 04/03/2010 - 05:49 नवीन
.....मतभिन्नता व्यक्त करणे या बाबी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करुन देखील करता येतात........... अगदी खरे. ओंकार पाटलांनी नाडी-प्रसंगाचे गुपचुप आडियो रेकॉर्डिंग करून नाडी संबंधी खर्‍या संशोधनाची सुरुवात केली, असे म्हटले, तर आता विंग कमांडरांनी अनेक लोकांचे नाडीवाचन होत असतानाचे व्हिडियो शूटींग करून यूट्यूब वर टाकावे, म्हणजे या बाबतीत सत्य काय आहे, हे समजणे सुकर होईल. गिर्‍हाइकाकडून नेमकी कोणती माहिती पट्टी हुडकताना घेतली जाते, हा कळीचा मुद्दा आहे, त्याची शाहनिशा अश्या रेकॉर्डिंग मधूनच होउ शकते. नाडीवाल्यांकडे विंग कमांडरांची एवढी वट असावी, असे वाटते, त्यांना देखील जर असे शूटिंग करण्यावर बंदी असेल, तर या सर्व प्रकारात बनवाबनवी असते, या मताला बळकटी येते. असे काही प्रयत्न केले गेले आहेत का?
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sat, 04/03/2010 - 10:48 नवीन
मी इन्टरनेटवर नाडीग्रंथांच्या पट्ट्यांचे कार्बन डेटिंग अ‍ॅनॅलिसिस झाले आहे काय, त्यात वापरलेल्या शाईचे पृथःकरण, व्याकरण - वृत्त - छंद इत्यादि संदर्भ, नाड्यांमध्ये येणार्‍या देवीदेवता - औषधी वनस्पती इ.इ. व तत्कालीन संदर्भ ह्या विषयांच्यावर कोठे लिखाण मिळते काय हे (इंग्रजीतून) हुडकले. अद्याप मिळालेले नाही. नाडीग्रंथांवर अद्याप अशा प्रकारचे संशोधन भारतात झालेले नाही हेच मुळात आश्चर्यजनक आहे!! असे काही संदर्भ असल्यास मला त्यांविषयी जरूर जाणून घ्यायला आवडेल. तसेच आधुनिक विज्ञानावर आधारित जर नाडीग्रंथांवर संशोधन झाले असले तर त्याविषयीही जाणण्यास आवडेल. आधुनिक विज्ञान ज्या प्रकारचे पुरावे मागते, जे निकष लावते त्या त्या निकषांचे समाधान झाल्याखेरीज ओक म्हणतात त्याप्रमाणे त्यांची (नाडीग्रंथांची) सच्चाई लोकांसमोर प्रस्थापित होणार तरी कशी???? अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/03/2010 - 11:16 नवीन
बरोबर.... श्री ओक यांनाच असे सर्व संशोधन करणे त्यातल्या त्यात सुलभ असणार, कारण अन्य कुणास शक्य नसलेली नाडीवाल्यांशी ओळख आणि निकटता, त्या मंडळींचा त्यांच्यावर बसलेला विश्वास. ते अनेक वर्षां पासून अत्यंत आवडीने आणि हिरिरीने नाडीग्रंथ आणि तत्संबंधित अन्य विषय आणि व्यक्ती यांची तरफदारी करत आहेत, परंतु मी खरा की तू खरा, यापेक्षा खरे काय, हे बघणे जास्त महत्वाचे ...... काही वर्षांपूर्वी काही कारणाने हा सर्व प्रकार खरा असून यात बनवाबनवी नाही, असे त्यांचे मत झाले, हे ठीक, पण आता एवढे घडून गेल्यानंतर पुन्हा एकदा जास्त चिकित्सक वॄत्तीने सर्व प्रकाराचे आकलन करून घेणे, तसेच व्हिडियो शूटिंग करणे, वगैरे केल्यास या अत्यंत महत्वाच्या विषयावर खरोखर संशोधन घडून येइल...
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 04/03/2010 - 12:59 नवीन
चित्रगुप्त, नाडीग्रंथांतील "मजकूरात खरे काय?" बघणे जर महत्वाचे असेल तर ओकांच्या काठीचा टेकू कशाला? आपणच सुरवात करा. तो तमिळ मजकूर विविध लोकांनी ओकांच्या अपरोक्ष नव्याने पहावा, अर्थ काढावा, सादर करावा. त्यातच व्हीडिओ वा अन्य आधुनिक शोधसाधनांचा ही समावेश असावा. नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
श
शशिकांत ओक Sat, 04/03/2010 - 12:47 नवीन
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही {प्रियालींच्या धनंजयांना अन्यत्र ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील? स्वतःशी प्रामाणिक, ()कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का? {धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व. या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो : ...धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती..... ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे.. .. {कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते. नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत. आपल्या बाबतीतील मत की आपण सर्व विरोधी प्रतिक्रिया देणारे "अनुभव घेणार नाही" ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती. नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल. नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे. नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Sat, 04/03/2010 - 18:44 नवीन
पायदळ आणि वायुदळ यांचं महायुद्ध परत लागलं वाटतं... :) ओक साहेब, मी पूर्वी काही प्रश्न विचारले होते.... एकाच लोकेशनमधील लार्ज स्केल्वर नाड्या बघून भुकंप, पूर इ चे अंदाज का नाही बघत? वैयक्तिक भविष्यापेक्षा सामाजिक भविष्य प्रयोग म्हणून का नाही करत? *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 04/05/2010 - 15:05 नवीन
...............ओकांच्या काठीचा टेकू कशाला? आपणच सुरवात करा. तो तमिळ मजकूर विविध लोकांनी ओकांच्या अपरोक्ष नव्याने पहावा, अर्थ काढावा, सादर करावा. त्यातच व्हीडिओ वा अन्य आधुनिक शोधसाधनांचा ही समावेश असावा........... अगदी बरोबर, ओकसाहेब..... मिपा वर नाडीसंबंधी उलटसुलट चर्चा व एकमेकांवर गरळ ओकत राहणे, यातून काहीही साध्य होणार नाही. नाडीसंबंधाने अरुंधती यांनी सुचवलेले मुद्दे जरी योग्य असले, तरी तश्या प्रकारचा अभ्यास मुळात हा सर्व बनवाबनवीचा प्रकार नाही, हे (मिपाकरांनी विविध नाडीकेंद्रांना स्वतः भेटी देऊन तेथील संभाषण टेप करून) सिद्ध झाले, तरच करणे योग्य व गरजेचे असेल. या विषयी मिपा सदस्यांना खालील प्रमाणे कार्य करता यावे: १. यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांची यादी (संपर्क क्रमांक व गावाचे नाव यासह) बनवणे. २. त्याप्रमाणे कोणकोणत्या नाडीकेंद्रांना भेट देणे सोयीचे होईल, याची यादी बनवणे (तिथले पत्ते, फोन, फी, वगैरे माहितीसह). यात श्री. ओकांचे सहकार्य मोलाचे आहे. ३. जे सदस्य स्वतः नाडीकेंद्रांना भेट देऊ शकत नाहीत, परंतु काही सहभाग देउ शकतात, त्यांनी ते काय करू शकतात, हे कळवावे. उदाहरणार्थ टेप रेकॊर्डर्स ची वा वाहनाची सोय करणे, गरज असल्यास आर्थिक भार उचलणे, नाडी केन्द्रांना फोन करणे, एकंदरीत या प्रकल्पाचे नियोजन, को-ऒर्डीनेशन करणे, वगैरे. ४. नाडी वाचनाचे वेळी व्हिडियो शूटिंग व ऒडियो रेकॊर्डिंग करणे शक्य आहे का, नाडी केन्द्रवाले तसे करू देतील का, हे श्री. ओक यांनी सांगावे. ते तसे करू देत नसल्यास गुप्तपणे करणे भाग आहे. श्री. ओकांनी उल्लेख केलेला केन्द्रवाल्यांचा टेपरेकॊर्डर हा नाडी वाचनाचे वेळी सुरू केला जात असेल. त्यापूर्वी पट्टी शोधताना विचारल्या जाणा‍र्‍या प्रश्नांचे व जातकाने दिलेल्या उत्तरांचे रेकॊर्डिंग केले जाते का (जसे श्री ओंकार पाटील यांनी केले आहे), हे श्री ओक यांनी स्पष्ट केलेले नाही. आपल्या संशोधनाचे दॄष्टीने, तेच जास्त महत्वाचे आहे. ५. त्यानंतर प्रत्यक्ष नाडीकेंद्रांना भेटी देऊन आपापल्या पट्ट्या काढवून त्या संपूर्ण प्रसंगाचे रेकॊर्डिंग करणे. यात काही जातकांना तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगितले जाईल, तरीही काय संभाषण झाले, याची नोंद करावी. ६. आपण या प्रकाराची चिकित्सकपणे तपासणी करायला आलेलो आहोत, असे नाडीकेंद्र वाल्यांना वाटले, तर ते तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगून वाटेला लावतील, अशी बरीच शक्यता वाटते, तरी आपण खरोखरच संकटात सापडलेले आहोत, व पट्टीत पापक्षालनार्थ सांगून येणारी धार्मिक कॄत्ये करण्यास उत्सुक आहोत, असा अविर्भाव असावा. हल्ली मिळणारे अगदी लहान, खिश्यात पेन सारखे अडकवता येणारे रेकॉर्डर्स खूपच सोयिस्कर पडतील. मुख्य म्हणजे यात डिजिटल फ़ाईल्स च्या स्वरूपात रेकॉर्डिंग होत असल्याने ते मिपावर सर्वांना ऐकता येइल. सहज सुचलेले मुद्दे वर लिहिले आहेत, सर्वच मिपाकर अतिशय सूज्ञ, बुद्धिमान व कर्तबगार असल्याने या विषयी अजून जास्त चांगले नियोजन करून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात करता येईल.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 04/05/2010 - 20:36 नवीन
त्यापूर्वी पट्टी शोधताना विचारल्या जाणा‍र्‍या प्रश्नांचे व जातकाने दिलेल्या उत्तरांचे रेकॊर्डिंग केले जाते का (जसे श्री ओंकार पाटील यांनी केले आहे), हे श्री ओक यांनी स्पष्ट केलेले नाही.{जर विनंती केली तर काही नाडी केंद्र संचालक तशी सोय करू शकतात असा अनुभव आहे -ओक }
चित्रगुप्तजी, आपले धन्यवाद। पुर्वग्रह सोडून नाडीग्रंथांच्या अभ्यासाला मनापासून आपणासमान आता आणखी विचारक मिळतील तर 'अब दिल्ली दूर नहीं'। नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Mon, 04/05/2010 - 21:05 नवीन
७. व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित. . - संपादक
  • Log in or register to post comments
श
शेखर काळे Tue, 04/06/2010 - 02:08 नवीन
नाडी वाचण्याची एजन्सी ऊपलब्ध असेल तर घ्यावी म्हणतो. मराठी माणसाच्या पोटातही चार घास आणि खिशात चार पैसे जाऊ देत ना.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा