Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

व
विजुभाऊ
Wed, 09/09/2009 - 06:41
🗣 199 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
63438 वाचन

💬 प्रतिसाद (199)
अ
अभिज्ञ Wed, 09/09/2009 - 07:02 नवीन
व्वा.... चांगला वैचारिक (?) लेख. "हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे." हे मात्र सर्वात विनोदी वाक्य. झोपलेल्यालाच उठवता येईल, झोपेचे सोंग घेणा-याला कसे काय उठवणार? सबब ह्या लेखावर जास्त प्रतिक्रिया देउ इच्छित नाही. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 09/09/2009 - 07:33 नवीन
सहमत! स्पष्टच बोलायचे तर हे वाचुन हसावे की रडावे तेच कळत नाहीय! :-( असो, ज्याची त्याची मते! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
अ
अवलिया गुरुवार, 09/10/2009 - 20:01 नवीन
१०० वा प्रतिसाद ! धाग्याचा खफ झालेला असुन संपादक मात्र डाराडुर झोपा काढत आहेत. असो ! नशीब असते एकेका लेखकाचे.. आमचे साले नशीबच गांडु.. ! दिसला धागा की खचाक करुन उडवला जातो.. असो. चालु द्या ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विकास गुरुवार, 09/10/2009 - 20:19 नवीन
१०० वा प्रतिसाद ! अहो "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" असे म्हणले की हळू हळू विस्तारच होणार! याला म्हणतात नामाचा महीमा! तुम्हाला पण असे हवे असेल तर एखादा संघावर/हिंदूत्वावर टिकात्मक लेख टाकून बघा. अभ्यासाची अथवा माहीतीची काही गरज नाही. वास्तवाला धरून नसले तर अधिक उत्तम... टंकायला सुरवात करायची आणि झोडपून काढायचे :-) बघा कसे दणादण प्रतिसाद मिळतात ते - बाजूने, विरुद्ध वगैरे. आपण तर खुद्द अवलिया, त्यामुळे याहून अधिक सांगायची काय गरज? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अमोल केळकर Wed, 09/09/2009 - 07:11 नवीन
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।। -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 09/09/2009 - 07:22 नवीन
वरील लेख हा वैचारिक दिवाळखोरी दाखवतो असेच मी म्हणेन. लेख वाचायला सुरूवात केल्यावर सविस्तर उत्तर द्यावे असा विचार होता. मात्र जस जसा लेख वाचत गेलो तेव्हा ह्या सामान्य नागरिकाचे ( नागरिक एकवचनी म्हणून एकेरी उल्लेख , लेखकाचा नाही.) असामान्य जावाईशोध आणि आधीच ठरवलेले मत काही घटनांचा संदर्भ देऊ चिकटवण्याची घाई पाहिली आणि ह्या लगबगीची चिड येण्या ऐवजी किव आली. भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे. ह्या वाक्यावर तर ठार उडालोच. धम्या इस्टाईलने म्हणायचे झाल्यास फुटलो.... धन्य धन्य ! ज्यांना संघ काय? संघाची रचना काय? आदींची प्राथमिक जरी माहिती असेल त्यांना सुध्दा वरील वाक्यातील विनोदाने हसू येईल. अशी वाक्ये हिंदीभाषी न्यूज चॅनेलमध्ये शोभून दिसतात हो ! कोट बदलला आणि आवाजाची पट्टी बदलली की त्या निवेदकांना जगातील कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार मिळतो. तुमचा तसा काही ग्रह झालाय का? :) असो... लेखकाला आपलं मत मांडायला अधीक भरपुर वाव आहे. माझं मत एवढंच की पुर्वग्रहदूषीत मत मांडतांना उगाच संघाचा आणि परिवारातील संघटनांचा आणि सोबतच गेल्या ६० वर्षांचा अभ्यास असल्याचा आव कशाला आणता? वर अभिज्ञ ने म्हटल्या प्रमाणे झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठवणार? - नीलकांत
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/09/2009 - 07:50 नवीन
एका सामान्यनागरीकाने ही मते व्यक्त केली आहेत. त्या नागरीकाला संघ नक्की काय कार्य करतो ते ठाऊक व्हावे ही अपेक्षा आहे. त्या नागरीकाची मते जशीच्यातशी दिली आहेत. संघाची भूमिका स्पष्ट करु शकत असाल तर बरे होईल अशी त्या नागरीकाची अपेक्षा आहे. त्या नागरीकाची मते ही वैचारीक दिवाळखोरी असू शकेल पण त्याबद्दल आपण त्याला नीट महिती सांगु शकतो. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 09/09/2009 - 09:50 नवीन
माफ करा मात्र ही एका सामान्य नागरीकाची मते नाहीतच. सामान्य नागरीक हे बिरूद येथे केवळ आपली तटस्थता जाणवावी म्हणून घेतलेलं आहे. लेखाच्या सुरूवातीच्या परिच्छेदात जसे संदर्भ दिलेले आहेत त्यावरून संघाच्या समग्र वाटचालीचा अभ्यास (?) करून केलेले विधानं दिसतात. संघसंबंधीत काही घटनांचा अभ्यास करून मग संघात कसा संभ्रम आहे आदींचे विश्लेशन करणार्‍या व्यक्तीला जेव्हा हे लक्षात येतं की हे फारच एककल्ली होतंय तेव्हा "ही सामान्य मानसाची मते आहेत" अशी झुल पांघरली की झालं. फारच सोईची वाक्ये आहेत ना? संघाबाबत येथे आणि इतरत्र आधीच अनेक लोकांनी खुप उत्तम लिहून ठेवलं आहे. सामान्य मानसाने केवळ शीर्षक लिहून गुगललं असतं तरी सर्व संभ्रम (?) दूर झाले असते. त्याच विषयावर नव्याने चर्चा करायला हरकत नाही. पण काही तर नवीन मुद्दे हवेत ना? - नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Wed, 09/09/2009 - 10:05 नवीन
तटस्थता वगैरे नाही. लिखाण एकांगी असु शकेल पण जे मुद्दे मला भेटलेल्या त्या इसमाने मांडले त्याचे मुद्देसूद उत्तर मला देता आले नाही हे खरे. निदान इथे त्यांची उत्तरे मिळतील म्हणून ते जसे च्या तसे लिहिले जो बोलला तो कदाचित सेवादलाचा कार्यकर्ताही असू शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
न
नीलकांत Wed, 09/09/2009 - 10:28 नवीन
स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे. बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे. संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे. संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे ही वाक्ये वाचली की मनोरंजन होतं आणि शेवटी एवढ्या संख्येने सामान्य लोक संघाचं चांगलं व्हावं असं म्हणत आहेत तर संघाची काळजी करण्यासारखं काही नाही असं सुध्दा वाटतं. खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्‍या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे. आधीच्या उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय? :) - (आनंदीत) नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पिशी अबोली Sat, 04/20/2013 - 19:30 नवीन
खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्‍या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे
+१ फार बुवा काळजी करतात हे लोक.. काळजी करण्यात इतके मग्न की संघाने केलेलं काम डोळ्यांसमोर असूनही दिसत नाही बिचार्‍यांना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
छ
छोटा डॉन Wed, 09/09/2009 - 07:53 नवीन
बरेच काही नवे वाचायला मिळाले. लेख पुन्हा एकदा व्यवस्थित वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देतो. तुर्तास ही पोच समजावी .. विस्तृत प्रतिक्रियेसाठी "ही जागा" राखुन ठेवत आहे ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/09/2009 - 07:59 नवीन
मागे विनायक पाचलग ह्यांनी ह्याच नावाने चालु केलेला काथ्याकुट आठवला आणी त्याच जोडीने पाचलगांना ९९% प्रतिसादातुन मिळालेला "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही" असा मिळालेला सल्ला आठवला. चालायचेच, इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/09/2009 - 09:37 नवीन
हीहीही ... कंपूतले म्हटल्यावर लिहावं लागतं म्हणून ... नाहीतर प्रतिसाद देणारच नव्हते ... अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/09/2009 - 09:51 नवीन
मला पण... :D आणि हो, "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही" हा सल्ला त्यांना खूपच उपयोगी ठरला म्हणे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 13:50 नवीन
पाचलगचा धागा पाहिला. तो धागा संघाची स्तुती करणारा होता. असल्या अतिरेकी संघटनेची भलवाण करणार्‍याला "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही"असे सांगणे जरुरी होते. त्यामुळे अश्या प्रतिक्रिया आल्यास ते योग्यच आहे. पाचलग जसजसा मोठा होत जाई/ भरपूर वाचन करेल तसतसे त्याचे विचार बदलतील अशी आशा करुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
द
दशानन Wed, 09/09/2009 - 14:01 नवीन
>>>असल्या अतिरेकी संघटनेची भलवाण करणार्‍याला बरं बरं... खान साहेब... समजला तुमचा अभ्यास :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 14:05 नवीन
खान साहेब? पहा धर्मांध विचारसरणीचा परीणाम. राजेंनी लगेच मला मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु इ.इ. ठरवुन टाकले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Wed, 09/09/2009 - 14:15 नवीन
>>धर्मांध विचारसरणीचा परीणाम =)) बरं बरं ! >>राजेंनी लगेच मला मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु इ.इ. ठरवुन टाकले असेल. टोमणा कळाला नसावा.. त्यामुळे होतं असे कधी कधी... चालू दे ! >>मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु =)) च्यामायला तुम्ही संघामधे असलेल्या एका विशीष्ठ धर्माशी संबधीत लोकाच्यावर लिहले तर तुम्ही .. काय म्हणात तुमच्या भाषेत... सेकुलर... च्यामायला आम्ही नुस्तं खान म्हणालो की धर्मांधं :? लै भारी... ! जरा चष्मा काढा... नाही तर... दवाची मात्रा वाढवा मात्र साहेब ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 14:22 नवीन
टोमणा कळाला नसावा.. त्यामुळे होतं असे कधी कधी... चालू दे !
टोमणा व्यवस्थित कळला. आणि बरोबर उत्तर दिले आहे. तुम्ही हसुन लोळणाररी चित्रे टाकून त्याकडे दुर्लक्ष केलेत. हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
J
JAGOMOHANPYARE गुरुवार, 09/10/2009 - 07:47 नवीन
पाचलग साहेबानी आधी सन्घावर चिखल्फेक सुरु केली होती... आधी मोठा हो बाळा, असा घाऊक सल्ला मिळाल्यावर मग त्यानी नमस्ते सदा वत्सले सन्घभूमे सुरु केलं होतं............ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
नाना बेरके Wed, 09/09/2009 - 11:26 नवीन
असे विचार कोणाचे कां असेनात, पण ते दळभद्री आहेत हे मात्र खरे. ज्यांचा पक्ष भारतात जवळपास ६०-६२ ( मधली काही भाजपा आणि जनता सरकारची वर्षे सोडून) वर्षे सरकार स्थापून आहे ( पक्षी : काँग्रेस पक्ष ) त्यांनी देशाला पुरते नागवले. "अजूनही पोटापाण्याचे प्रश्न नीटपणे सुटत नसलेल्या लोकांचा देश " अशी अवस्था ज्यांनी केली त्यांच्या बद्द्ल कोणी काही लिहित नाही. पण कुणाचे, कधीही, कुठल्याही प्रकारचे नुकसान केले नाही आणि करणार देखील नाही अश्या संघासारख्या संघटनेने जरा राजकारणात- अलिप्त किंवा सक्रीय काय असेल ते राहून - जरा डोके वर काढले कि बोंब मारायला सुरवात. खरोखरी, आपल्या अंतर्मनात जावून संघाच्या सुरवातीपासूनच्या वाटचालीचा त्रयस्थपणे आढावा घ्या आणि संघाने देशाचे, देशवासियांचे काही नुकसान केले आहे कां, ते पहा आणि मग विचार मांडा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/11/2009 - 06:27 नवीन
असे विचार कोणाचे कां असेनात, पण ते दळभद्री आहेत हे मात्र खरे. हे अतीअवांतर वैयक्तीक मत झाले. साधन्शुचितेबाबत चोखंदळ ,परखड असणारे लोक जेंव्हा वेगळे वागु लागतात तेंव्हा खटकते. याअ लेखात संघाबद्दल कोणतीच टीका केलेली नाही. फक्त बदलत्या राजकीय /आर्थीक्/जागतीक संदर्भात संघाची ध्येयधोरणे कशा प्रकारे आखली/बदलली/टिकवली आहेत. आणि ती नक्की काय आहेत हे विचारले आहे. कावीळ झालेल्याना म्हणे जग फक्त पिवळेच दिसते तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या बद्दल कोणी काही विचारले की त्याना थेट दळभद्री विचारांचे म्हणवले जाते.कोणतिही चिकित्सा नाकारायची आणि स्वप्रेमात मग्न व्हायचे या वृत्तीला नार्सीसस असे म्हंटले जाते. त्यामुळे कोणतीच प्रगती सुधारणा मात्र होत नाही. असो......... पवित्र डबक्यातले पाणी ......... त्यात शेवाळ आणि आणखी कायकाय साठून वास मारत असला तरी त्याबद्दल विचारायचे नसते...... पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना बेरके
न
निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 13:42 नवीन
संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/09/2009 - 15:39 नवीन
खरंच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/09/2009 - 14:18 नवीन
संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच. :) -दिलीप बिरुटे (दक्ष)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 04/23/2013 - 19:03 नवीन
संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच.
अगदी प्रा.डॉ. प्रतिसाद. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विकास Tue, 04/23/2013 - 19:29 नवीन
बिरूटे सरांच्या प्रतिसादास उत्तर देण्यास तब्बल साडेतीनवर्षांचा कालावधी! नशीब तुम्ही त्यांचे विद्यार्थी नाही आहात आणि हा गृहपाठ नव्हता! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Tue, 04/23/2013 - 19:38 नवीन
हाहाहा... धागाच आत्ता वाचतोय... आता लॉग काढून पाहू नका, की किती वेळेस 'श्रावण मोडक' या आयडीनं या धाग्यावर भेट दिलीये... ;-) कारण तसा अनेकदा उघडला, पण वाचलेला नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Tue, 04/23/2013 - 20:02 नवीन
आम्हाला असले लॉग वगैरे बघण्याचे हक्क नाहीत. :( पण नाही आहेत तेच बरे आहे. :) कारण तसा अनेकदा उघडला, पण वाचलेला नाहीये. हे तुम्ही कसे करू शकता? शिकले पाहीजे तुमच्याकडून! तसे करू शकलो तर भरपूर वेळ वाचेल आणि जरा मनःशांती देखील लाभेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
S
sujay Wed, 09/09/2009 - 15:38 नवीन
संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे. काय बोलणार?? आलाय हातात कळफलक, टंका हवा ते आणि करा प्रकाशीत. चालु द्या. सुजय
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 09/09/2009 - 15:47 नवीन
ह्म्म .. लेखाबद्दल बोलण्यासारखे माझ्याकडे काही नाही. संघाबद्दलची वाईट मते प्रतिसादांतून वाचूनही वाईट वाटले. -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/09/2009 - 15:54 नवीन
अतिशय एकांगी लेख आहे. संघाबद्दल काही जास्ती माहिती नसली तरी जे लिहिले आहे ते नक्कीच चुकीचे आहे... बाकी चालूद्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 09/09/2009 - 17:11 नवीन
लेख एकांगी आहे असं गृहित धरलं तरी मग ह्याची दुसरी बाजू वाचायला आवडेल. 'संघ म्हणजे नक्की काय', 'संघ नक्की काय करतो', 'संघाने केलेली काही ठळक विधायक कामे', 'संघात गेल्याचे काय व्यक्तिगत फायदे / तोटे आहेत' अशा स्वरूपाची माहिती संघाच्या जाणकारांनी दिली तर खर्‍या अर्थाने चांगली चर्चा होईल अन्यथा बहुतांश प्रतिसाद भरकटताना दिसतील. --------- अवांतरः मी स्वतः शाळेत असताना काही वर्षं संघात जायचो. 'संघात जाऊन संस्कारांच्या दृष्टीने नक्की काय मिळवलं / गमावलं ते आठवायचा प्रयत्न करतोय.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/09/2009 - 18:06 नवीन
लहानपणी मी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो. एकूणात शिस्त, वेळेचे महत्त्व, लोकसंग्रह इत्यादी शिकलो. आमच्या शाखेत धार्मिक शिक्षण नव्हते. देशप्रेमावर व्याख्याने व्हायची. गुरू-शिष्य नात्यावरही बौद्धीकं व्हायची. ह्याचा बर्‍यापैकी फायदा पुढील आयुष्यात झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
न
निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 18:25 नवीन
लहानपणी मी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो.
मग मोठे झाल्यावर ते बंद करावेसे का वाटले तेही कृपया लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/10/2009 - 12:56 नवीन
माझ्यामते लहानपणी असलेली एखादी चांगली सवय मोठेपणी बंद पडली म्हणजे ती आपण त्याज्य ठरवली किंवा टाळली असे नाही होत. मोठेपणी संसाराचे व्याप वाढले की आपोआप बाकी सगळे कमी होत जाते, पण त्याचा अर्थ जुने सगळे त्याज्य ठरवले आहे किंवा सोडले आहे असा होत नाही. कॉलेजमध्ये असताना मी ही संघात जायचो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे कार्य करायचो, जे आता इतर व्यापामुळे नाही जमत. पण याचा अर्थ आज मला स्वामी विवेकानंदांची किंवा कै. हेडगेवारांची , कै. गोळवलकर गुरुजींची मते पटत नाहीत असा नाही होत. माझ्या दुर्दैवाने त्या कार्याला मी तेवढा वेळ देवु शकत नाही एवढाच याचा अर्थ होतो. काय पेठकरकाका? चुकत असेन तर सांगा. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 13:44 नवीन
मला उत्तर पेठकरांकडून हवे होते. त्यांनी दिले नाही, त्यातच सगळे आले. तुमचा प्रतिसाद तुमच्या ख्यातीप्रमाणेच आहे..असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/10/2009 - 14:13 नवीन
आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझी ख्याती काय आहे ते पण सांगा ना राव! मला पण कळु दे मी ख्यातनाम आहे की कुख्यात? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/10/2009 - 22:07 नवीन
श्री. निमित्त मात्र, लहानपणी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचो म्हणजे त्यांच्या कुठल्या आदर्शांनी प्रेरित होऊन जात होतो अशातला भाग नाही. मला स्वयंसेवकांचा गणवेश, ते खेळ, तो दंड आणि ती एकसुरात गाईलेली प्रार्थना आवडायची. त्यामुळे मी शाखेत जाऊ लागलो. पुढे त्यात रस वाढू लागला. पण दुर्दैवाने, शाखेच्या मैदानावर एका इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि शाखा एका दूरच्या मैदानावर भरू लागली. तिथेही मी सुरूवातीला जात होतो. पण ते मैदान मला लांब पडायचे. त्याकाळातच आमच्या गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा सुरू झाली . तिथे मला वाचनाची आवड लागली. आमच्या गल्लीतच एका सेवाभावी डॉक्टरांनी एक मोफत वाचनालय सुरू केले होते. तिथेही मी जायचो. वाचनाच्या आवडीतून माझी 'पुलं'च्या साहित्याशी ओळख झाली तसेच काही प्रवासवर्णने , वासू मेहेंदळ्यांचे 'विचित्र विश्व', कुमार, नवनीत, विज्ञानयुग अशी काही नियतकालिके वाचावयास मिळाली. मधुनमधुन वेळ मिळाला आणि मनात आलं की मी शाखेवर चक्कर टाकायचो. पण वाचन, माफक प्रमाणात टेबलटेनिस, बॅडमिन्टन आणि काही तारूण्यसुलभ आकर्षणांच्या प्राधान्य क्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागे पडत गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मी काही फार प्रेमात होतो अशातला भाग नाही आणि त्यांचा मी कधी तिरस्कारही केला नाही. शाखेमुळे आयुष्यात जे माझे फायदे झाले त्याचे श्रेय मी त्यांना का नाकारू? ते मी त्यांना देतो आणि कायम देत राहीन. मला वाटते पुरेसे सविस्तर उत्तर मी दिले आहे. आपली जिज्ञासा शमली असेल असे मी मानतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
श
श्रावण मोडक Tue, 04/23/2013 - 19:08 नवीन
प्रांजळ प्रतिसाद आवडला. सहज विचार डोक्यात आला, शाखेच्या जागी वाचनालय! मला वाटतं, तुमच्याकडं असलेला समतोल दृष्टिकोन ही त्या वाचनालयाची देणगी असावी, आणि तुमच्यातली शिस्त शाखेची देणगी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बंडा मामा Sun, 04/28/2013 - 16:55 नवीन
सहमत आहे. वाचनालयात न जाता संघातच जात राहिला असतात तर समतोल दृष्टीकोन मिळाला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सुधीर काळे Wed, 09/09/2009 - 17:38 नवीन
खरं सांगायचं तर विजूभाऊना खूप सांगायचं/लिहायचं होतें पण जसजसा तो लेख मोठा होत गेला तसतसा त्यांना बहुदा अस्वस्थ वाटू लागलं असावं व त्यांनी तो घाईघाईने आटोपता घेतला. त्यामुळे या लेखाद्वारे त्यांना काय म्हणायचे आहे तेच समजत नाहीं. भरपूर 'डाटा' दिलाय, पण निष्कर्ष काढायचा राहून गेलाय असे मला वाटले. माझा त्यांना सल्ला आहे कीं त्यानी हा लेख स्वतःच एकदा नीट वाचावा व पुन्हा लिहावा. नक्कीच मस्त होईल. बघा पटते का. एक अशाच विषयांवरचा लेखक या नात्याने मी या चक्रव्युहात कधी-कधी सापडलो आहे. अशा वेळी एकाद्या मित्राला सल्ला विचारावा. मी असे खूपदा करतो. गैरसमज नसावा ही कळकळीची विनंती. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Wed, 09/09/2009 - 18:24 नवीन
संघाचे वास्तविक स्वरुप सांगणारा माझा प्रतिसाद का उडवला कळेल का? मी मिपाच्या संचालक, संपादक किंवा सदस्यांसह कोणावरही काही वैयक्तिक आरोप केले नव्हते. कोणत्याही जातीवर-धर्मावर टीका केली नव्हती तरीही हा प्रकार संतापजनक आहे. वर उदाहरणार्थ नाना बेरके यांचा दळभद्री विचार वगैरे शब्द असलेला प्रतिसाद मात्र तसाच आहे. काल मी म्हटले होते की ब्राम्हण विरोधी काहीही लिहिले की ते ताबडतोब संपादित होते त्याचा पुरावा एका संपादकाला हवा होता. जर त्या संपादकानेच माझा प्रतिसाद उडवला नसेल तर त्याला पुरावा मिळाला असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 18:28 नवीन
असे खरंच झाले असेल तर ते चुकिचे आहे. विचारांची मुस्कटदाबी होते आहे. शक्य असल्यास सदर संपादकांने खुलासा केल्यास गैर समज होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आण्णा चिंबोरी
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/10/2009 - 08:57 नवीन
मिपावर नवीन(पक्षी: हल्लीच जास्त कार्यरत झालेले) दिसता.. मागे मिपा मुखपृष्ठावर कोल्हापुरी चपलांचे चित्र होते. असो. चांदणी भयामुळे इथे जास्त काही लिहीत नाही. :) वरील लेख प्रतिक्रिया देण्यायोग्य वाटला नाही म्हणून प्रतिसादाला अवांतर प्रतिसाद देत आहे. पुण्याचे पेशवे हा मोनॅकोपॉवर्ड प्रतिसाद आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 13:47 नवीन
मिपावर नविन असणे, हल्लीच कार्यरत असणे हा गुन्हा आहे का? मला दुसर्‍यांदा ह्यावरुन डिवचले जाते आहे म्हणून विचारले. कृपया तात्या किंवा संपादक ह्यांनी खुलासा करावा. चप्पल घालून चालते व्हा म्हणून तुम्ही दिलेला सल्ला आवडला. आपल्या विचारांपेक्षा वेगळे विचार असणार्‍याच्या विचारांचा पराभा करण्याचा याहून सोपा मार्ग कोणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/10/2009 - 14:12 नवीन
हा प्रतिसाद मूळ चर्चेशी पूर्ण अवांतर असून विनाकारण वैयक्तिक रोख ठेउन दिलेला आहे. संपादकांनी कृपया कारवाई करावी. संदर्भः याच चर्चेवर सध्या पुढच्या पानावर बिल्ला क्र: २५८० यांनी दिलेला प्रतिसाद. प्रतिसाद मात्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 14:16 नवीन
कोणाचा प्रतिसाद माझा की पेशव्यांचा? आधी पेशव्यांचा प्रतिसाद वाचा. हा कसला पेशवा? हा तर चांदणीला घाबरणारा पळपुटा बाजीराव!! असले सवंग मलाही लिहिता आले असते. त्यावर तुमची ही प्रतिक्रिया योग्य ठरली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/10/2009 - 19:23 नवीन
हा प्रतिसाद मूळ चर्चेशी पूर्ण अवांतर असून विनाकारण वैयक्तिक रोख ठेउन दिलेला आहे. संपादकांनी कृपया कारवाई करावी. संदर्भः याच चर्चेवर सध्या पुढच्या पानावर बिल्ला क्र: २५८० यांनी दिलेला प्रतिसाद. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा