पाककृती
ओट्सचे लाडू
Primary tabs
साहीत्यः- १ वाटी ओट्स, १/२ वाटी पीथीसाखर, पाव वाटी तूप, वेलची पूड, सजावटीला काजू
क्रुती :- प्रथम ओट्स मीक्समधून वाटने. वाटलेले ओट्स गरम तूपावर खमग भाजने. भाजलेल्या ओट्समधे १/२ वाटी पीथीसाखर व वेलची पूड घालने. या मिश्रनाचे मध्यम अकाराचे लाडू वळने.लाडूवर सजावटीला काजू लावने. हे लाडू अतीशय पोश्टीक असतात.

पोश्टीक :D
चुचु
लाडू छान आहे. :) :)
फोटो दिसत नाही....... :(
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
फोटो उप्लोड कसा करायचा ते मला अजुन नीट माहीती नही. तुम्ही मार्गदशन करु शकाल क
मी एकदा ओट्सची खीर करून खात होतो तर माझी एक डाएटिशियन बहीण म्हणाली, " ओट्स कमी क्यालरीयुक्त आणि पौष्टिक आहार म्हणून खायचे असतात, त्यात मस्त तूप साखर घालून क्यालरी का वाढवायच्या?"...
मी म्हटलं, " मला मजा येते म्हणून खाणार"...
____
आता असे लाडूही बनवून खाईन... मस्त डिश आहे.
फोटो दिसला असता तर बरं झालं असतं...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
कसा केला उप्लोड?
कोड असा आहे -
< img src="http://farm4.static.flickr.com/3013/2807160434_8555fdeec6.jpg" alt="" />
< आणि img याच्या मधील स्पेस काढुन टाकायची.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
>लाडूवर सजावटीला काजू लावने
लाडु छान आहेत. काजु दिसत नाहीत :(
काजू सर्व लाडवांच्या पलिकडच्या बाजूला असतील..
किंवा लावायच्या आधीच खाऊन संपले असतील...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
सोपे आहेत करायला.करुन पाहीन.
करून पाहिन
मस्त दिसतायत लाडु पण गुळ घालुनही करता येतील कां? कारण ओट्समध्ये साखर-तुप घातले तर मग ओट्स तरी कां वापरावेत? :D
दिपाली :)
लवकरच करुन बघायला हवेत! ;)
किंचित अवांतर - तूप आणी साखरेला इतके का घाबरतात लोक? >:) दोन्ही खायचेच पदार्थ आहेत ;) दोन्ही शरीराला आवश्यक असतात. असे घाबरुन खाण्यात मजा नाही! :D
चतुरंग
तुमचंच संपादकीय वाचून लोकं घाबरत आहेत.
आगाऊ सल्ला: मध वापरून पहा!
अदिती