पाककृती

बिटाच्या वड्या

Primary tabs

साहित्य: लालबुंद बीटरूट्स, होल मिल्क, साखर, वेलदोड्यांची पूड. कृती: बीटरूट्सची साले काढून ती किसणीवर बारीक किसून घ्यावीत. जड बुडाच्या कढईत कीस वाटीने मोजून घ्यावा. जेवढा कीस त्याच्या अर्धे माप साखर व किसाच्या मापाएवढेच दूध घ्यावे. एकत्र करून मध्यम आचेवर शिजण्यास ठेवावे. मधून मधून उलथण्याने हलवत रहावे. तळाला लागता कामा नये. मिश्रण शिजून कढईचा तळ स्वच्छ दिसू लागेल, दूध आटून स्निग्धांश बाहेर आल्याने ते चकचकीतही दिसू लागेल. त्यात वेलदोडापूड घालावी. पाव चमचा मिश्रण ताटलीत काढून घ्यावे. अर्ध्या मिनिटात त्याची गोळी वळता आली पाहिजे. तसे झाल्यास ट्रे ला तुपाचा पुसट हात लावून हे मिश्रण सारखे पसरावे व लगेच वड्या पाडाव्यात. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात. *आठ मध्यम आकाराच्या बीटरूट्सच्या साधारण ४० वड्या होतात. *किसताना बिटाची चव बघावी; किंचित गोडसर असल्यास साखर थोडी कमी घातली तरी चालते. *दुधाऐवजी क्रीम वापरल्यास आटवण्याचा वेळ वाचतो. Image removed. रेवती
सहज

बीटाचा हलवा /शिरा/वड्या/उत्तपे.... आता घाउक मधे बीट घ्यायला हरकत नाही. :-)

चित्रा

छान आहे.

आणि मी आतापर्यंत केवळ बिटाची कोशिंबीर करत होते - दही + साखर + कांदा घालून. आता बराच स्कोप आहे असे दिसते.

धन्यवाद.

मी पण बिटाची कोशिंबीर करते.कटलेटमध्येही घालते.पण गोड पदार्थ नव्हता केला कधी.आता करुन पाहीन्.वड्या फारच छान दिसताहेत.

सुंदर दिसताहेत वड्या..पण बीटाची मळकट चव नाही लागत कां या वड्यांना??

दिपाली :)

दशानन

बिटाच्या वड्यापण तयार करतात माहीत नव्हतं बॉ... आम्हाला तर सलाद मधील एक आयटम म्हणजे बिट येवढंच माहीत होतं..... :)

* ह्म्म्म परत किचन मध्ये डोकावून पहावे असे वाटत आहे.. पापकृती सोपी आहे.. नै :D

निमीत्त मात्र

बिटाच्या वड्यापण तयार करतात माहीत नव्हतं बॉ.

मग तुम्हाला काय वाटलं बिटाच्या 'विड्या'?? म्हणूनच हा धागा पाहायला आलात की काय? ;)

* ह्म्म्म परत किचन मध्ये डोकावून पहावे असे वाटत आहे.. पापकृती सोपी आहे.. नै

ओये राजे, पापकृती नाही हो... पाककृती!!!!!!!! तसंही तुम्ही किचनमधे जाऊ जो राडा घालणार ती पापकृतीच होईल बहुधा... ;)

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

अवलिया

आणि जे काही तयार होईल त्याला "माती" म्हणावे की काय असा विचार मनात येवुन गेला.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गणपा

असेच म्हणतो, आज वर बीट केवळ सलाड आणि गाडीवर मिळणार्‍या सँडवीच मध्ये खाल्लय. बीटाच हा नवा अवतार लै आवडला.

-गण्या.

अवलिया

वा ! मस्त !!!
एकदम भन्नाट!

:)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

(अरे नीलकांत, एखादी लांऽऽऽब श्वास सोडण्याची स्मायली असली तर कर बाबा उपलब्ध)

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग

अगदी ऑफबीट पाकृ आहे.
आणि हो, वड्या मस्तच लागतात, मला विचारा ना! ;)

(टेस्टर)चतुरंग

न खाऊन तो सांगतोय कुणाला ;)
-----
च्यायला बीटाच्या वड्याही करतात माहिती नव्हतं रेवती.
वड्या दिसतायत मस्त पण असे टेम्प्टिंग दार्थ खाल्याशिवाय आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही :)

रेवती

कधीही घेउन ये सगळ्यांना. वड्यांची चव घेउन प्रतिक्रिया दे म्हणजे झालं! :)

रेवती

शाल्मली

व्वा!
मस्त दिसताहेत बिटाच्या वड्या!

माझी आई करते नेहमी बिटाच्या वड्या. थोड्या वेगळ्या पद्धतीने-त्यात नारळ, खवा वगैरे घालते. त्याही फार मस्त लागतात.
त्या लाल वड्यांवर काजूची अर्धी पाकळी लावली की त्या अजूनच छान दिसतात. :)

ह्या सोप्या वाटताहेत करायला. करुन बघीन..

--शाल्मली.

साखर वर्ज्य आहे. फोटोवरच समाधान मानून आहे.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

रेवती

आपण फारच संयमित प्रतिक्रिया दिलीत.
माझ्या वडिलांनाही गोड वर्ज्य असल्याने त्यांना वाईट वाटले त्यांनी वड्यांना 'बिटाच्या विटा' असे नाव दिले आहे.

रेवती

सचीन जी

>> बिटाच्या वड्या

हम्म्म! मी गडबडीत 'बिटाच्या विड्या ' असं वाचलं!
म्हणलं भलताच भन्नाट प्रकार दिसतोय!
पुर्ण वाचल्यावर खुलासा झाला!
छान दिसत आहेत! लागतात कश्या ......

सचीन जी!

रंग मस्त आला आहे वड्यांना...
रेसिपी छान आणि सोपी आहे...
करून पाहायला पाहीजे...

मदनबाण

व्वा... भारी प्रकार दिसतोय !!! :)
बिटाच्या वड्या सुद्धा होऊ शकतात असा कधी विचार सुद्धा मनात आला नव्हता. एक वेगळीच पाकृ वाचायला मिळाली. :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

http://www.timesnow.tv/videoshow/4327416.cms

समंजस

वडया सुंदर दिसत आहेत!!!
वडया, कुठल्याही का असेनात, मला प्रिय आहेत :)

एका नवीन वडी ची पाकृ दिल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद!!

रेवती

धन्यवाद मंडळी!
काही दिवसांपूर्वी बिटाच्या पाकृ मिपावर आल्याने मलाही वड्यांची पाकृ द्यावीशी वाटली. वड्या चवीला मस्तच लागतात. बिटाची स्पेश्शल मळकट चव नंतर येत नाही. हा पदार्थ करायला जरा जास्त वेळ लागतो, मात्र त्या कष्टांचे फळही मिळते.:) गाजराच्या वड्याही अश्याच प्रकारे कराव्यात. दिवाळीच्या फराळात रंगीत वड्या उठावदार दिसतात.

रेवती

स्वाती२

वड्या मस्त दिसतायत. लो फॅट इवॅपोरेटेड दूध वापरून करुन बघेन.

समिधा

खुपच सुंदर दिसतायत.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

सोनम

अजून बिटाच्या पाककृती येऊ द्या.
बिटाचा शिरा नाही करुन पाहिला :( तर बिटाच्या वड्या ही आल्या..
छान आहे.. :)
अजून बिटाची काय काय पाककृती करतात :?

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"