Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माणिक प्रभू

ह
हुप्प्या
Wed, 09/16/2009 - 20:47
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2580 वाचन

💬 प्रतिसाद (4)
र
रामदास गुरुवार, 09/17/2009 - 17:48 नवीन
यमुना तिरी जो वाजवी वेणू संगे गोपाळांचा हार अशा काही ओळी ऐकलेल्या आठवतात. माझ्याकडे एका जुन्या पुस्तकात माणिकप्रभूंची माहीती आहे. नंतर सविस्तर लिहीतो.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 09/17/2009 - 18:34 नवीन
रतिलाल भावसार हे कुमार गंधर्वांचे गुरुबंधू होत. ते प्रो.देवधरांकडे गाणं शिकलेत. त्यांचा आवाज बायकांसारखा खूपच पातळ असल्यामुळे म्हणावे तितके व्यावसायिक यश त्यांना आले नाही. त्यांनी बरेचसे माणिक प्रभूंचे अभंग गायलेले आहेत....त्यात एक चांगला आठवतोय तो म्हणजे..... दावा नयनी यशोदेचा सुकुमार.....हा अभंग त्यांनी खूपच छान म्हटलाय. तसंच त्यांनी गायलेली एकदोन नाट्यगीतांच्या ध्वनिमुद्रिका ऐकल्याचं स्मरतंय. मी शाळकरी वयाचा असताना माझ्या लहान भावाला नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत ते गायन मास्तर होते आणि त्यांच्यासमोर मी एक गीतही गायल्याचं आठवतंय. अजून एक पुसटशी आठवण स्मरतेय तीही माझ्या बालपणातील आहे... त्यांची एक मैफल मालाडच्या ब्राह्मणसभेत झाली होती तेव्हा मी माझ्या वडिलांच्या बरोबर तिथे हजर होतो. रतिलालजींचा आवाज अतिशय कोमल आणि त्यातून ते आवाज तारसप्तकापर्यंत क्वचितच न्यायचे...अशाच एका गाण्याच्या वेळी एका टारगट श्रोत्याने त्यांनी आवाज अजून वर चढवावा ह्या उद्देशाने म्हटलेले शब्द होते... अरे वरड,वरड! वरडकी अजून जोरात. क्षणभर गोंधळ माजला पण मग नंतर लोकांनी त्या श्रोत्याला बाहेरचा रस्ता दाखवला आणि कार्यक्रम पुन्हा पूर्वीसारखाच व्यवस्थित सुरु राहिला. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 09/18/2009 - 18:19 नवीन
अशी दुर्मिळ माहिती मिसळपाववरच मिळणार ह्याची खात्री होती. देवसाहेब, तुमचे आभार. रतिलाल भावसार म्हणजे गुजराथी भाषिक का? कुठल्या शहरात / गावात रहायचे ते? मला त्यांचा दावा नयनी हा अभंग खूप आवडला. आणि हल्लीच खूप दिवसांनंतर ऐकायला मिळाला. रामदास साहेब, तुमच्या माहितीची वाट पहातो.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 09/19/2009 - 13:22 नवीन
पंडीत रतिलालजी मूळ गुजराथी भाषिकच आहेत; मात्र तरीही ते १००%मराठी आहेत. ते स्वतः महानगरपालिकेच्या मराठी माध्यमात गायन-शिक्षकाची नोकरी करत होते(हे आधीच सांगितलंय) आणि त्यांचा मुलगा रघुवीर माझ्या धाकट्या भावाच्या वर्गात होता...म्हणजेच पूर्णपणे मराठी माध्यमात शिकलेला आहे. आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून (आताची ’अस्मिता’ वाहिनी) अजूनही ते नियमितपणे सुगम तसेच शास्त्रीय गायन सादर करत असतात. रतिलालजींच्या अजून काही ध्वनिमुद्रिका आहेत... १)ऐसा महिमा प्रेमाचा... २)रमवी नयना ही प्रभूलीला ३)लागती गे काळजाला तीर..... लागती गे काळजाला तीर हे तेढे तुझे आवळाया कंठ माझा नागिणी वेढे तुझे बाई गं पुसता पुसेना झाक ही गालावरी काय ही किमया कळेना वाढते लाली तरी सोडविता ही सुटेना लाजरे कोडे तुझे ॥१॥ भाव मनीचे कोवळे की पारिजाताची फुले नाचता झेलावया ते मखमली ही पाऊले चालवी हृदयावरी गे कथ्थकी तोडे तुझे ॥२॥ गायक रतिलाल भावसार संगीत श्रीनिवास खळे कवीः राजा बढे संग्रह तो राजहंस एक (श्रीनिवास खळे) (गीताचे शब्द मायबोलीवरून साभार) विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा