आणि तिथे भारतीय गरुड उतरला ....
💬 प्रतिसाद
(15)
व
विकास
Tue, 09/22/2009 - 13:23
नवीन
चांगलीच बातमी आहे. ह्यात बर्याचदा आपण संदेश देत असतो तो इथे पण दिला गेला आहे असे वाटते.
बाकी आपले राजकीय नेते आणि उद्योगधंदे आंतर्राष्ट्रीय (राजकीय) मर्यादा पाळत चीनपासून कसे चार हात ठेवून वागतील यावर बरेच काही अवलंबून होते आणि राहणार आहे.
- Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे
Tue, 09/22/2009 - 13:42
नवीन
जिस मुल्क की सरहद के निगेबान हैं आँखे |
उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता ||
विशाल, तुमच्या सतर्क राहून कळीची माहिती इथे प्रसृत करण्याखातर तुम्ही कौतुकास पात्र आहात.
भारतीय हवाईदलाच्या/लष्कराच्या या भावी-आक्रमण-निरस्तक (pre-emptive) कारवाईखातर त्यांचे हार्दिक अभिनंदन.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 09/22/2009 - 14:14
नवीन
वाssssssव! खरंच या अभिमानास्पद व जलद कारवाईबद्दल भारतीय वायुदलाचे अभिनंदन!
हल्ली चिनी लोक जरा जास्तच धीट होऊ लागले होते! अशा जलद व ठाम कारवाईमुळे त्यांच्या हिमतीचे खच्चीकरण होवो हीच इच्छा!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
- Log in or register to post comments
ल
लवंगी
Tue, 09/22/2009 - 15:13
नवीन
चीनच्या दबावाला न घाबरता पुढिल कारवाई झाली तर बर, कारण आपले राज्यकर्ते कुठे कशी टोपी फिरवतील सांगता येत नाही.
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
Tue, 09/22/2009 - 19:27
नवीन
"कारण आपले राज्यकर्ते कुठे कशी टोपी फिरवतील सांगता येत नाही.."
१९६२चे युद्ध या राजकारण्यांच्या नकर्तेपणामुळे हरलो.
ले.ज. थोरातांचे "रेवेली टू रिट्रिट" पुस्तकात याबाबत विवेचन आहे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
- Log in or register to post comments
द
दिलीप वसंत सामंत
Wed, 09/23/2009 - 08:34
नवीन
पण त्या गरूडाचा रिमोट बलदंड हातात आहे का ?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 09/23/2009 - 09:14
नवीन
हो नक्कीच !!!
http://www.8ak.in/8ak_india_defence_news/2009/09/feature-facing-the-chinese-threat-an32-in-nyoma-and-fast-interceptor-boats-in-pangong.html
हे पण नक्की पहा :---
http://www.youtube.com/watch?v=j80E1mHAohU
http://www.youtube.com/watch?v=Zu5gzo_wXko&feature=related
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
Indian-Made Stealth Frigate To Add To Navy’s Firepower
http://www.indiatvnews.com/main/newsdetails.php?id=3991&pg=index
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 09/23/2009 - 16:43
नवीन
आपले हवाईदल अतिशय सशक्त आहे ह्यात शंकाच नाही. फक्त राजकारणी लोकांनी कणखरपणा दाखवला की सगळे काम फत्ते होते!
दोन-तीन आठवड्यांपूर्वीचा अनुभव. मी तैवानला निघालो होतो. बॉस्टनहून - एलए मार्गे तैवान असा प्रवास होता. बॉस्टन -एलए विमानात माझ्याशेजारी बसलेली व्यक्ती पायलट होती. तो सुट्टीला निघाला होता. त्याच्याशी बर्याच गप्पा झाल्या. होताहोता गप्पांची गाडी भारतावर आली. त्याने सांगितलेली हकीगत अशी की त्याने फायटर पायलट म्हणूनही काम केलेले होते. काही वर्षांपूर्वी अमेरिका-भारत अशा संयुक्त हवाईदल कार्यक्रमात त्याचे काही सहकारी पायलट्स सहभागी झालेले होते. ते जेव्हां भारतातून परत आले त्यावेळी काय म्हणाले ते त्याच्याच शब्दात -
"इंडियन फायटर पायलट्स आर अमेझिंग! दे आर सो टॅलेंटेड, दॅट दे पिस्ड अस ऑफ ईवन विथ देअर ओल्डर फायटर प्लेन्स! नोबडी कॅन बीट दीज गाईज इन दि एअर!"
माझी छाती अभिमानाने भरुन आली आणि डोळ्यात पाणी आले!
'नभ: स्पृशं दीप्तं!'
चतुरंग
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 09/23/2009 - 16:57
नवीन
चतुरंग, येस्स. त्या वेळच्या स्टोरीसाठी या कोटचा उपयोग अनेकांनी केला होता हे आठवलं.
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
Wed, 09/23/2009 - 19:39
नवीन
चतुरोवस्की, जरा अर्थ स्पष्ट करा!
मला संस्कृत कळत नाही!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 09/23/2009 - 19:51
नवीन
हे भारतीय वायुसेनेचं घोषवाक्य आहे!
'नभाला तेजाने स्पर्श करा!'
चतुरंग
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
Wed, 09/23/2009 - 20:01
नवीन
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2009 - 05:48
नवीन
डोळे भरुन आले चतुरंगजी !
परिस्थिती काही असो, मी तरीही हेच म्हणेन...
"मेरा भारत महान!"
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 09/23/2009 - 18:01
नवीन
भारतीय हवाईदलाला मानाचा मुजरा..!!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
उ
उपाशी बोका
गुरुवार, 09/24/2009 - 19:48
नवीन
ही बातमी पण वाचा.
उपाशी बोका
- Log in or register to post comments