पाककृती
बेरीचे पराठे
Primary tabs
नमस्कार खवय्यानो ,
झटपट व सोपे ह्या प्रकारातले हे पराठे. लहान मुलांसाठी पण पौष्टिक.
साहित्य
तूप काढून झालयावर उरलेली बेरी, कणीक, ओवा,मीठ व पाणी
कृती
बेरी मध्ये ओवा, कणीक व मीठ घालून चांगले एकत्र करावे. त्यात लागेल तेवढे पाणी घालून कणीक भिजवावी. पुरी प्रमाणे थोडी घटटसर असावी. १५-२० मिनिटे ठेवून मग त्याचे पराठे करावे. तव्यावर चांगले भाजून घ्यावे. खमंग लसूण चटणी सोबत खावे.
ह्यात करता येण्या सारखी वेरीयेशन्स:
कणीक भिजवताना त्यात, लालतिखट किंवा हिरवी मिरची वाटून (चवीप्रमाणे) कांदा किसून मग भिजवावी व पराठे करावे.
फोटो काढलेला नसल्यामुळे इथे टाकता आला नाही. तेव्हा हा पाककृती लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न गोड मानून घ्यावा.
मी मुबैत असताना शेजारणीला बेरी आवड्त असे म्हणुन तिला देत असे. ई़कडे तुप वैग्रे नाही करत मी. आता परत गेले कि मस्त बेरिचा उपयोग करेन. सही आयदिया ;;)
चुचु
आजवर बेरीची फळं असतात हे माहिती होतं....
उदा. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्ल्यूबेरी....
हे तुपावरची बेरी म्हणजे काय असतं?
अहो काका लोणी गॅस वर ठेवुन कढ्वले कि तुप तयार होते आणी खाली जे खरपुस ब्राउन रन्गाचे उरते ति बेरी..
चुचु