Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ब्लॉग कसा बनवावा?

अ
अविनाश ओगले
Wed, 09/23/2009 - 16:08
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4366 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्रमोद देव Wed, 09/23/2009 - 16:19 नवीन
www.blogspot.com वर जाऊन खातं उघडा आणि सुरु करा. तिथे सगळ्या शंकांचे उत्तर मिळेल. त्यातूनही जर काही कळलं नाही तर आम्ही आहोतच. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Wed, 09/23/2009 - 17:47 नवीन
मला पण सांगा मी पण ब्लॉग तयार करत आहे. :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 09/23/2009 - 19:09 नवीन
मला पण मला पण ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 09/23/2009 - 19:41 नवीन
माझी मराठी ब्लॉग कसा बनवायचा ते वरच्या दुव्यावर वाचा. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 09/23/2009 - 19:44 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे इथे मिपावर "स्टार माझा" ने आयोजीक केलेल्या "ब्लॉग माझा" ह्या स्पर्धेचे विजेते हे इथले सन्माननीय सदस्य आहेत. तेच योग्य प्रकारे "उत्तम ब्लॉग कसा बनवावा" ह्याची व्यवस्थित माहिती देऊ शकतील. बाकी वर दिलेले देवकाकांचे दुवे आहेतच. आमचाही तसा एक ब्लॉग आहे, वाचणासारखा अजिबातच नाही मग त्याच्या लुक्सची तर बातच सोडा !!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 09/23/2009 - 19:54 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे मिसळप्रेमी आणि मचमचपुरी नावाचे उत्कृष्ट ब्लॉग तयार करणारे दोघेही मिपाचे सदस्य आहेत. ते तुम्हाला खूप माहिती देऊ शकतील. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/23/2009 - 21:07 नवीन
मिसळप्रेमी आणि मचमचपुरी नावाचे उत्कृष्ट ब्लॉग तयार करणारे दोघेही मिपाचे सदस्य आहेत. ते तुम्हाला खूप माहिती देऊ शकतील. मिभोशी सहमत आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
द
दिपक गुरुवार, 09/24/2009 - 05:46 नवीन
ब्लॉग कसा बनवावा? आणि भेटसंख्यादर्शक इथे पहा.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/24/2009 - 05:52 नवीन
wordpress.com देखील चांगले संस्थळ आहे ब्लॉग बनवण्यासाठी. माझ्या ब्लॉगसाठी मी त्याचाच वापर केला आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
न
नीलकांत गुरुवार, 09/24/2009 - 07:10 नवीन
नमस्कार, संकेतस्थळ काढण्याचे कसलेही विशेष तांत्रीक ज्ञान नसतांना आपले संकेतस्थळ ब्लॉगच्या स्वरूपात आपण बनवू शकतो. खरं तर ब्लॉग म्हणजे नेटवरची अनुदिनी. रोज काही तरी लिहीण्याची जागा. आपलं स्वत:चं जे लिहायचं असेल ते प्रकाशित करण्यासाठीची उत्तम सोय. आपला ब्लॉग बनवण्यासाठी अनेक मोफत पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी ब्लॉगस्पॉट आणि वर्डप्रेस हे दोन उत्तम पर्याय आहेत. ब्लॉगस्पॉटला जीमेलच्या खात्यानेच ब्लॉग बनवता येतो. वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही. ब्लॉगस्पॉट हा गुगलचा असल्यामुळे गुगलची अनेक विजेट्स येथे लावता येतात. गुगल शोध मध्ये लेखन लवकर जोडता येते. येथे ब्लॉग बनवण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर जाऊन लॉग इन करा आणि create blog वर टिचकी मारून ब्लॉग्ग बनवा. प्रत्येक टप्यावर सोबत सुचना दिलेल्या आहेत. आणि अगदी सोप्पं आहे. फार काही अडचण येत नाही. आल्यास लोकायत.कॉम अडचण देऊ शकता. वर्डप्रेस हा ब्लॉग बनवण्यासाठीचा दुसरा पर्याय आहे. वर्डप्रेस ही साहित्य व्यवस्थापन प्रणाली (CMS) आहे. याचा वापर दोन प्रकारे करू शकतो. एक तर वर्डप्रेसच्या सर्व्हरवर मोफत ब्लॉग बनवू शकतो. किंवा वर्डप्रेस डाऊनलोड करून आपल्या सर्व्हरवर आपला ब्लॉग बनवू शकतो. वर्डप्रेस हे सामुदायीक भागीदारीने बनवलेले आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एडऑन्स येथे उपलब्ध आहेत. हवे तसे वापरता येतात. अनेक सुंदर थीम्स लावता येतात. वर्डप्रेसचे स्वतःच्या सर्व्हरवर इन्स्टॉलेशन असेल तर खुप काही करता येते. वर्डप्रेस च्या सर्व्हरवर ब्लॉग असेल तर थोड्या मर्यादा येतात. चाचणी करायला कुठलेही एक चांगले आहे. मात्र पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या सर्व्हरवर ब्लॉग ठेवणार असाल तर मात्र वर्डप्रेसचा विचार करावा असे सुचवेन. बाकी काही अडचण असल्यास नेमकी विचारा म्हणजे उत्तर द्यायल सोप्पं होईल. नव्या ब्लॉग करीता शुभेच्छा ! :) - नीलकांत
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 09/24/2009 - 08:35 नवीन
ओगले साहेब, काय माहिती पाहिजे आहे ते विचारा . मला देखील मदत करायला आवडेल. माझ्या ब्लॉगची लिंक खाली दिली आहे. आपला अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 09/24/2009 - 09:20 नवीन
अतिशय उत्तम आणि माहित नसलेली माहिती मिळाली !! धन्यवाद लेखकाचं आणि प्रतिसाद्यांचही !! * बाकी मचमचपुरी पहिल्यांदाच पाहिला ..(अर्थात मिभो कृपा) तिकडे आमचं नाव वाचून अंमळ करमणूक झाली :) तिकडे आमच्या नावा खाली लिहीलेली सही म्हणजे आमचं नाव वापरणार्‍याचा मम्मी ने त्याला सांगितलेली गोष्ट असावी काय ? *
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 09/25/2009 - 12:41 नवीन
हा विषय कालच वाचला आणि मलाही वाटले आपला ब्लॊग बनविण्याची काही तरी सोपी पद्धत शोधावी. माझ्या संग्रही गेल्या पाच वर्षांपासून मी लिहीलेले विविध विषयांवरचे लेख आहेत परंतू ते सर्व फोनेटीक कीबोर्ड व विविध फॊन्ट (शिवाजी, किरण व श्री लिपी इत्यादी) च्या साहाय्याने टंकलिखीत केलेले आहेत. ते कुठे मांडायचे तर पुन्हा सारा मजकूर टंकलिखीत करावा लागतो. काल सहज शोध घेतला तर असे लक्षात आले की गुगल ने आपल्याला डॊक्युमेंट अपलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तिथे आपली पीडीएफ़ फ़ाईल टाकून त्याची लिंक दिली की आपला ब्लॊग आपण कुठेही सहज पोचवू शकतो. म्हणून मी माझे ९ लेख टाकून त्याच्या लिंक्स मिसळपाववर दिल्या. त्यापैकी भारताला गरज भरताची, एक अमेरिकन प्रेमकथा व फक्त रुपये पाच हजारात जग प्रवास हे विषय पुर्वीच मांडले होते परंतू भारताला गरज भरताची ह्या लेखाची लिंक दुस-या संकेतस्थळावरची होती. ती अनेक वेळा नीट दिसत नसे. एक अमेरिकन प्रेमकथा व फक्त रुपये पाच हजारात जग प्रवास ह्या कथा ऒर्कूट वर मी पुर्वी मांडल्या होत्या त्या ऒरकूट वरील संदर्भासह दिल्यामुळे येथे पुन्हा संपादित करायला हव्यात असे इथल्या वाचकांनी सूचविले होते. परंतू मिसळपाववर संपादन न करता आल्याने मी त्या पुन्हा मांडल्या आहेत. या पद्धतीने मांडणी केल्यामुळे माझे सर्व लेख / कथा एका क्रमात आल्या आहेत. (९५१९ ते ९५२७) मराठी स्त्रीचं 'माहेर' बदलतंय http://www.misalpav.com/node/9519 फक्त रुपये पाच हजारात जग प्रवास http://www.misalpav.com/node/9520 एक अमेरिकन प्रेमकथा http://www.misalpav.com/node/9521 सरकार कडून अपेक्षा http://www.misalpav.com/node/9522 उत्तर http://www.misalpav.com/node/9523 मल्लिका शेरावत चे उदाहरण आदर्श ठरावे. http://www.misalpav.com/node/9524 भारताला गरज भरताची http://www.misalpav.com/node/9525 तुम्ही दूध पिणे गाई म्हशींनाही हानिकारकच http://www.misalpav.com/node/9526 आमिताभ आणि प्राण http://www.misalpav.com/node/9527 मला तरी ब्लॊग मांडायची ही सर्वात सोपी पद्धत वाटली. यापुर्वी मी अनेकदा मिसळपाव वर इतरांचे लेख वाचून जात असे परंतू आपल्याकडे लिखाण उपलब्ध असूनही ते मांडता येत नसल्याबद्दल मला वाईट वाटे. आज मी लिखाण मांडले तर इतर अनेक सदस्यांना वाईट वाटले. मी माझे संपूर्ण खरे नाव लिहून इथे वावरतो तर अवलिया असे नाव धारण केलेल्याने *** वैयक्तिक रोखाचा मजकूर संपादित. *** माझ्या आडनावाचा अपमान केला. असो, हाथी चले बाजार तो कुते भौंके हजार हे सर्वश्रुतच आहे तेव्हा मी त्यावर आधिक काही भाष्य करणार नाही. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 09/25/2009 - 17:00 नवीन
`एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे' सर्व मिपाकरांचे आभार!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा