इंग्रजी शब्दांच्या गमती
💬 प्रतिसाद
(78)
अ
अन्वय
गुरुवार, 09/24/2009 - 18:40
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/04/2009 - 18:39
नवीन
(घुसखोरीबद्दल क्षमस्व!!!)
मी काही वर्षांपूर्वी एक खूप जुनी कादंबरी वाचली होती. अगदी शे सव्वाशे वर्षांपूर्वीची कादंबरी आहे ती. जेव्हा भारतात इंग्रजी शिक्षण सुरू होऊन फार तर २०-२५ वर्षं झाली असतील तेव्हाचा काळ आहे कादंबरीतला. एक मुलगा खूप शिकून मोठा होतो. त्याला सरकार ऑनररी मॅजिस्ट्रेट करते. तेव्हा त्याची अडाणी आई दुसर्या एका बाईला सांगते की "आमच्या xxxला सरकारने अन्नावारी म्याजिष्ट्रेट केले आहे."
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
अ
अभिजा
गुरुवार, 09/24/2009 - 19:34
नवीन
मराठी माध्यमाच्या शाळेतून एकदम कालेजच्या विंगज्री माध्यमात जाऊन 'पडलो'. तेव्हा इतर मोठ्या लोकांप्रमाणेच आम्ही पोरंही अरनॉल्ड श्वार्जनेगर ह्या बलदंड अभिनेत्याचे 'शॉल्लेट' फॅन होतो. पण करता काय! अरनॉल्ड श्वार्जनेगरच्या आडनावाचा उच्चार लै जड जायचा. म्हणून आम्ही त्याच्या नावाचे (आडनावाचे) सहज उच्चारण्याजोगे फोनेटिक सुलभीकरण केले होते - अरनॉल्ड शिवाजीनगर! :-)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 09/24/2009 - 19:38
नवीन
आम्ही अरण्या शिवाजीनगर केले होते. ढमी मोरे, समता कोल्हे या अजुन लाडक्या वस्तु... गेले ते दिन !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
अ
अभिजा
गुरुवार, 09/24/2009 - 19:41
नवीन
अवलीया, जेम्स बाँड राजू मोरे हे नाव सांगायचे राहिले! :-)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 09/24/2009 - 19:42
नवीन
येस्स... वय झालं बघा.. विसरायला होतं.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Sat, 09/26/2009 - 08:55
नवीन
रमेश मंत्र्यांनी त्याचे "जनू बांडे" असे नामकरण केंव्हाच केले होते!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
- Log in or register to post comments
अ
अभिजा
गुरुवार, 09/24/2009 - 19:50
नवीन
बाईकचा शॉक अॅब्जॉर्बर = चॉकप्सर
ट्रकचा क्लीनर = किन्नर
कंप्यूटर = कँपूटर
झेरॉक्स = झोरॅक्स
सायकलची चेन = चैन
गाडी वेळेआधीच पोहोचणे = गाडी 'बिफ्फोर' आली.
छे! फारच मोठी लिस्ट होईल! :-)
- Log in or register to post comments
S
sujay
गुरुवार, 09/24/2009 - 20:32
नवीन
मी चुकुन "बाईकचा" एवजी "बाईचा" वाचलं ;) ;)
सुजय
मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?
- Log in or register to post comments
च
चिरोटा
गुरुवार, 09/24/2009 - 20:00
नवीन
ट्रॅफिकचा उच्चार काही लोक ट्रॉफिक असा करतात. एकदा दोन बायकांचे ऐकलेले संवाद-
"कोणीतरी मुलगी प्रेगमेट(pregnant) होती ना"
"हो"
"तिची डिलिवरी निर्मल (normal) झाली का?"
लहानपणी शाळेत असताना ऐकलेले हे संवाद्.घरी येवून अर्थ विचारणार होतो. :)
गाडीच्या चाकाचे पंक्चर काढण्याऐवजी पंचरच काढले जाते.
दुकानाबाहेर एकदा 'कोल्ड्रींग मिळेल' अशी पाटी होती.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 09/24/2009 - 20:08
नवीन
मी सुद्धा एका दुकानाबाहेर एकदा मिल्क शेख मिळेल अशी पाटी वाचली होती !!! ;)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 09/25/2009 - 11:57
नवीन
इकडे बेंगलोरमध्ये कोल्ड्रींक म्हणण्याऐवजी कूलड्रिंक (cool drink) असे म्हणतात.
- Log in or register to post comments
श
शेखर
गुरुवार, 09/24/2009 - 20:22
नवीन
पेग = पॅक .
शेखर
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 09/24/2009 - 20:25
नवीन
माझ आवडत ड्रिंक प्येप्सी.
आँडी गाडी लईईई भारी.
लेडीस बाया
एटीयम ब्यांकेत गेल्तो..
यादी खुप मोठी आहे.. पण टाईम पास धागा आहे. :)
- Log in or register to post comments
S
sujay
गुरुवार, 09/24/2009 - 20:28
नवीन
बरेच जण कस्टमर ला कस्टंबर, पंक्चर ला पंप्चर, लायसंन्स ला लायसन म्हणतात.
लपाछपी खेळताना सगळेच जण "ईस्टोप" म्हणतात.
माझा १ मित्र "बीलेटेड" ला "बेलीकेट" म्हणतो.
आमच्या शेजारी १ गावाकडचा मुलगा नवीनच रहायला आल होता, ११ वीत क्लास ला जाताना त्याने दुकानावर "ज्युस बार" अशी पाटी वाचली अणी मला म्हणे चल सुज्या ज्युस बार खाऊ (त्याला वाटल चोको बार सारखाच ज्युस बार पण असतो) =)) =))
सुजय
मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 09/24/2009 - 21:15
नवीन
यांच्यापैकी अनेक शब्द वापरायला मला आवडतात. मुळीच लाज वाटत नाही.
पंचर (पंक्चर)
टायर
वाल (वॅल्व)
पाना (स्पॅनर)
फलाट (प्लॅटफॉर्म)
पायडल (पेडल)
बिगुल (ब्यूगल)
रम्गरूट (रिक्रूट)
इंजिन (एंजिन)
वाघीण (वॅगन)
टोंबाटू (टोमॅटो)
फरसबी (फ्रेंचबीन)
फ्लावर (कॉलीफ्लावर)
...
या धाग्यातून काही छान शब्द मिळाले तर मी जरूर वापरायला घेईन.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/25/2009 - 12:44
नवीन
हे शब्दतर आता मराठीतले शब्द म्हणून बहुतेकसे लोक वापरतातच.
मी फसले होते, एकदा ऑफिसमधला एक ड्रायव्हर मला सांगत होता, "ते तुमच्या पुण्या-मुंबैत (मी या दोन शहरांमधे, जवळ राहिल्याचा संदर्भ होता, प्रांतिक वाद उकरू नयेत) पिव्वर दूद मिळत नाय. त्यासाठी हितेच या तुम्ही, नारायणगावात."
बराच वेळानंतर पिव्वर म्हणजे शुद्ध, प्योर अशी माझी ट्यूब पेटली.
पुण्यातल्या हापिसातच एक चौकीदार सांगत होता, "म्याडम, तिकडनं जाऊ नका, हिकडनं जरा लांबून जा."
मी: "का हो? त्या बाजूला पावसामुळे निसरडं झालंय का?"
चौकीदारः "नाही हो म्याडम, आता पावसापाण्याचे दिवस. स्लिपरी होतं ना!"
अदिती
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 09/25/2009 - 15:56
नवीन
घसरला बिचारा 'निसरड्या'वरुन! ;)
(धप्प)चतुरंग
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 09/25/2009 - 16:08
नवीन
(धप्प)चतुरंग
=)) =)) =)) =))
- Log in or register to post comments
अ
अमृतांजन
Fri, 09/25/2009 - 17:27
नवीन
टोंबाटू (टोमॅटो) टंबाटं
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/04/2009 - 18:34
नवीन
टांबाटे... टांबाटी...
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
गुरुवार, 09/24/2009 - 21:28
नवीन
काही इंग्रजी शब्द भारतीय भाषांतून निर्माण झाले. ते बनताना त्यांचेही अपभ्रंश झाले पण केवळ ते इंग्रजांनी केल्यामुळे आपण ते मोठ्या कौतुकाने स्वीकारतो. आपण मूळ शब्द इंग्रजीत वापरले तर लोक हसतील!
जगरनॉट = जगन्नाथ.
शाम्पू = चंपी
बंगलो = बंगला
कोप्रा = खोबरे
कुशी = खुशी
कॉट = खाट
टीपॉय = तिपाया
प्लॅटफॉर्मचे फलाट झाले की मराठीत सहज वापरता येणारा शब्द बनतो. सगळ्याच भाषा परके शब्द आपल्या भाषेत आणताना हा प्रकार करतात.
असो.
- Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी
Fri, 09/25/2009 - 00:17
नवीन
डिक्शनरीच आहे hobson jobson नावाची. मला वाटतं आशियायी (की हिंदी?) भाषेतून इंग्रजीत उसन्या घेतलेल्या शब्दांची.
ह्याचं hobson jobson हे नाव तो शब्द्कोष संपादन करणा-याला कसं सुचलं? तर आपल्याकडे मुहर्रम्च्या वेळी जी ताबूतांची मिरवणूक असते असतात त्यावेळी "या हसन या हुसेन" असं म्हणतात. ते त्याला "hobson jobson" असं ऐकू आलं म्हणे.
आपणही इंग्रजी आपल्या परीने वळवली तर त्यात काहीही वावगं नाहीच :)
- Log in or register to post comments
न
नंदू
Fri, 09/25/2009 - 07:18
नवीन
"राँकेल भरण्यासाठी पुनेल(फनेल)"
राँकेल पण रॉक-ऑईल चा अपभ्रंश आहे. ;)
नंदू
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 09/25/2009 - 07:31
नवीन
एके ठिकाणी गणपतीची फार सुंदर आरास केली होती. ती पाहून एक सरदार खुश झाला आणि म्हणाला, 'देखो रे शान' (गनपतीची शान तर पाहा!) तिथे बाजूलाच एक गोरा फोटो काढत उभा होता त्याला वाटले केलेल्या आरासलाच 'देखो रे शान' म्हणतात. त्यातून 'डेकोरेशन' शब्द जन्माला आला. (एक गंमत).
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 09/25/2009 - 07:48
नवीन
कंट्रक्शन हा पण शब्द चांगले शिकलेले व त्याच लाइनीतले लोक सुद्धा वापरतात.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
- Log in or register to post comments
व
वि_जय
Fri, 09/25/2009 - 09:23
नवीन
लव्ह मॅरेज लग्न केल..
जस्ट आताच आलो..
चल एक गोल राऊंड मारून येऊ.
ऑन द स्पॉट.. जाग्यावरच खल्लास झाला..
- Log in or register to post comments
अ
अमृतांजन
Fri, 09/25/2009 - 17:18
नवीन
दौंडला "गोल राऊंड" नावाचा चौकच आहे. भली मोठी पाटी लावली आहे
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 09/25/2009 - 09:23
नवीन
आलाराम
सुलोचन
पम्चर
मूळ शब्द ओळखा!
- Log in or register to post comments
झ
झकासराव
Fri, 09/25/2009 - 10:12
नवीन
आलाराम- अलार्म
सुलोचन - सोल्युशन (पंक्चर काढण्यासाठी वापरायचे)
पम्प्चर- पन्क्चर.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 09/25/2009 - 09:31
नवीन
हाहाहा ... अंमळ मजेशीर धागा ... काही काही ठिकाणी खुदकन हसलो .. :)
धनंजयचा टोंबाटू तर अक्षरश: फुटेश !! =))
-(आनंदित) टारझन
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 09/25/2009 - 10:38
नवीन
आता ह्याचा मूळ शब्द सांगा.
बोवनी.
- Log in or register to post comments
ग
गावरान
Sun, 10/04/2009 - 17:41
नवीन
गावरान
माझ्या समजुतिप्रमाणे 'बोहनी' हा मूळचा शब्द. कोठल्याहि दुकानात पहिल्या विक्रिला आजची 'बोहनी' झाली असे म्हणतात. काहि ठिकाणी 'भवानी' झाली असा वाक्प्रचार रूढ आहे.
- Log in or register to post comments
क
किट्टु
Fri, 09/25/2009 - 12:29
नवीन
शाळेत असताना... एका विद्यार्थ्याने 'Judge' (जज) ला 'जुडगे' केलं होतं...
पुर्ण २ महीने त्याला सर्वांनी चिडवल होतं......
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sat, 09/26/2009 - 13:10
नवीन
गोष्टी सांगण्यात तरबेज असलेला आमचा एक मित्र एका पुढार्याचा त्याने स्वतः अनुभवलेला किस्सा सांगायचा. पुणे- कोल्हापूर रस्त्यावरून जातांना एका ठिकाणी Diversion होते तेव्हा Danger अशी त्या ठिकाणाच्या थोडे अगोदर पाटी लावलेली. त्याला हा पुढारी 'डांगेर' असे म्हणालेला (म्हणे)! त्याची आठवण झाली.
[अवांतरः शाळेत एका मुलाने 'रूखरूख' चे 'रूरवरूरव' असे वाचून आमची खूप करमणूक केलेली].
- Log in or register to post comments
य
योगी९००
Mon, 09/28/2009 - 14:24
नवीन
ख ला र व असे आम्ही बर्याच वेळा गंमतीत म्हणायचो..
रवडी सारवरेचा रवडा रवा. (खडीसाखरेचा खडा खा).
रवादाडमाऊ
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Fri, 09/25/2009 - 13:59
नवीन
गुजराथी लोक 'अनाउन्स'ला अलाउंस म्हणतात.
हॉल ला होल.
प्रोग्रॅम ला पोग्राम
बरेच लोक ग्लॅक्सो ला ग्लॅस्को म्हणतात.
ट्रेन ला टिरेन म्हणतात.
नॉन युज ला नानुज
ह्या शब्दाची गंमत कळण्यासाठी ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसमध्ये जावं लागेल...
सरकारी जुनी गाडी(मोटर) भंगारात काढल्याशिवाय...इंग्लिशमध्ये 'नॉन-युज' सर्टिफिकेट ट्रॅकं ऑफिसकडून मिळाल्याशिवाय नवी गाडी खरेदी करता येत नाही....तेव्हा तिथे सरसकट शिपायापासून ते वरच्या साहेबापर्यंत नॉन-युज ला
नानुज म्हणतात....अर्थात हे क़ळायला,डोक्यात शिरायला थोडा वेळ लागतो म्हणा. ;)
पोलिस खात्यातले काही शब्द...
सिक(आजारपण)....शिक,शिकात जाणे
आहारभत्ता......आरभत्ता,आरबत्ता
ड्रेस ....गणवेश,युनिफॉर्म
ड्रेस मध्ये नसणे(हाहाहा.अहो तसे नाही)...साध्या वेशात
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Fri, 09/25/2009 - 14:16
नवीन
"विलायत" हा एक जुना शब्द. हा शब्द blighty (wound) ह्या वरुन आला आहे. सैनिक युद्धात गंभीर जखमी झाल्यावर त्याना तेथून दूर (कधी कधी इंग्लंडला)इस्पितळात नेण्यात येई.त्यावरुन बिलायती-->विलायती.
गायक विलायत खाँ मधील विलायत कसा आला हे मात्र कोडे आहे.
भेंडी.
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Sun, 09/27/2009 - 21:11
नवीन
"विलायत" शब्द मूळचा आहे, अरबी उगम आहे. हिंदुस्तानी लोकांशी बोलताना इंग्लंडचा उल्लेख "विलायत" असा व्हायचा. त्याचा अर्थ "परदेश" आहे, हे इंग्रजांना ठाऊक नव्हते. त्यांना वाटले, की तो "इंग्लंड"साठी प्रतिशब्द आहे. त्याचा भ्रष्ट उच्चार इंग्रज लोक "ब्लायटी" असा करत.
"रोग" अर्थाचा इंग्रजी शब्द "ब्लाइट" आणि "आमचे इंग्लंड" या अर्थीचा शब्द "ब्लायटी" यांचा काहीएक संबंध नाही.
- Log in or register to post comments
अ
अमिगो
Mon, 09/28/2009 - 15:17
नवीन
काही दिवसां पुर्वी टिव्ही वर असे ऐकले होते की:
वास्को द गामा समुद्र मार्गे भारतात येण्या आधी जेंव्हा आशिया खंडातील लोक युरोपातील देशां मध्ये जमिनी च्या रस्त्याने जायचे (किंवा यायचे )तेंव्हा तुर्कस्थानातील विलायत नावचे गाव त्यांचा आशिया मधिल शेवटचा थांबा असायचा. आणि एकदा ते विलायते ला पोहचले की ते असे समजले जायचे कि ते युरोपात पोहचले...त्या वरुन विलायते ला गेला किंवा विलायते हुन आला रुढ झाले असावे.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sat, 09/26/2009 - 13:21
नवीन
सांगूच नका. Engineering चे 'इजनरिंग' असे लिहीतात, 'डोसा' चे 'ठोंसा' ,'इडली'चे 'इटली' लिहीतात. (ही दोन्ही होतीही तशीच, मी अहमदाबादेत असतांना अख्य्ख्या शहरात चांगले उडुपी खाणे कुठेही मिळत नसे, त्यासाठी अहमदाबाद रेल्वे स्टेशनातील पहिल्या मजल्यावरील कँटीनात जावे लागे). आणि कहर म्हणजे 'कंपनी' चा शॉर्टफॉर्म 'कांऊ' (इथे तो लिहीताही येत नाही-- त्या 'कां'लाच उ'कार') असे काहीतरी लिहीतात. अजून त्यांची गम्मत म्हणजे tape ला 'टॅप' म्हणतात आणि tap ला टेप!! हे उच्चाराचे गौडबंगाल काही उमगले नाही.
- Log in or register to post comments
त
तर्री
Fri, 09/25/2009 - 15:50
नवीन
लॉर्ड फॉक्लंड = ऐयाशी करणारा / आळशी.
प्रप्-गंडा = प्रोपागंडा
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 09/25/2009 - 15:57
नवीन
=हंपर
हॅहॅहॅ
- Log in or register to post comments
M
mahalkshmi
Fri, 09/25/2009 - 16:28
नवीन
काका शीक होते, आता त्याना सौलीट विकनेसपणा आला आहे.दवा,इनजीशन चालु आहे.
असे बोलणारे अनेक आहेत.
- Log in or register to post comments
व
विलास आंबेकर
Fri, 09/25/2009 - 16:59
नवीन
झक्कास!
अजुनही Glaxo ला Glasko म्हणणारे कंडक्टर भेटतात.
Certificate ला सर्टफिकेट म्हणणारे महाभाग भरपुर सापडतील की!
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Fri, 09/25/2009 - 17:15
नवीन
मुझे नटवर किंग सिखाओ म्हणून एक ओळखीचा टॅक्सीवाला सरदारजी मागे लागला होता. नंतर ते networking आहे हे मला कळले.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
अ
अमृतांजन
Fri, 09/25/2009 - 17:25
नवीन
फूट वॉल्व्हः फूट बॉल
बल्बः बल
शॉक अब्सॉर्बरः शॉकॉप, शॉकप्सर, शॉक आब्सरव्हर. एक जण माझी मो. सायकलचे शॉक अब्सॉर्बर पाहून " शॉकॉपकी नल्ली के झुल्ले हो गये है" असे म्हणाला.
सकाळमधे अनेक दिवस ब्यारीकेडस ला "ब्यारीगेट" म्हणायची प्रथा होती.
तसे आपण सगळे जण अनेक इंग्रजी उच्चार चुकीचे करतो- कंफर्टेबल हा चूकीचा उच्चार आहे. तो कंफर्तबल असा करतात म्हणे.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sat, 09/26/2009 - 09:10
नवीन
माझ्या मैत्रिणीचा मुम्बईत 'रेन्ट अ कार' चा व्यवसाय आहे. तिच्या बर्याच गाड्या बॉलिवुडवाले वापरतात. तर एकदा राणी मु़खर्जी हिच्या गाडीत बसली. ड्राइव्हर परत आला तो सान्गु लागला कि राणीची तोचा फार छान आहे. आम्ही खुप हसलो त्याला त्वचा म्हणायचे होते. :D
तसेच काही लोक चर्चगेट ला चरचगेट म्हणतात. ~X(
चुचु
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Sat, 09/26/2009 - 10:57
नवीन
डॉ़क्टर - डागदर
एरिआ - विरा
ऑप्ट्रा (कार) - ओपत्रा
स्कॉर्पिओ (कार) - कार्पिओ
ट्युसॉ (कार) - टकसन
सिंपल - शिंपल
गाडी चालु करणे - सेल मारणे
टेलीकम्युनिकेशन - टेलीकमीशन
स्पेशिअल टी - पेश्शल चहा
हॉटेल - हाटेल
ट्युब - टुप
सिक्स सिटर रिक्षा - डुक्कर रिक्षा/टमटम
ट्रक - टरक
सिनेमा - शिनिमा
क्रिकेट - किरकेट
एकदा आमचे प्रोफेसर "Toughened Glass" ला टोनेड ग्लास म्हणाले होते आणी आम्ही हसलो तर क्लासरुम मधुन बाहेर काढले होते :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
- Log in or register to post comments
स
सन्दीप
Sat, 09/26/2009 - 11:14
नवीन
काशमिर ते कन्याकुमारी सगळे ड्रायवर रेडीयेटर ला रेडी वौटर बोलतात.
सन्दीप
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »