Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंग्रजी शब्दांच्या गमती

स
सुनिल पाटकर
गुरुवार, 09/24/2009 - 18:38
🗣 78 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
18585 वाचन

💬 प्रतिसाद (78)
व
विदेश Sat, 09/26/2009 - 11:28 नवीन
"मॉडर्न"- हा शब्द बरोबर उच्चारला जातो, पण हमखास "मॉर्डन" असाच लिहिलेला आढळतो !
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sat, 09/26/2009 - 13:32 नवीन
ह्या संबोधनाचा आपल्याकडील वापर वेगळाच आणि अर्थपूर्ण आहे. मूळ भाषेत तो अभिप्रेत नव्हता :)
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 09/26/2009 - 13:42 नवीन
चिनी लोकांना "थ" चा उच्चार करता येत नाही त्यामुळे ते "स" म्हणतात. विद्यापिठात असताना सुरवातीस त्यामुळे "सिसिस" म्हणजे काय ते कळायचे नाही! :) तेच थोडेफार इस्रायली ज्यूंचे पाहीले आहे. मराठीतील आवडलेला एक प्रयोग म्हणजे "फोटो काढताना, जवळून क्लोजअप घे". डागडर अर्थात अमेरिकन्सपण आपल्या नावाचे असेच काही करून टाकतात. विठ्ठलचे व्हायटल अथवा विटाली ;) आणि भारतीयांनी पाश्चात्यांकडून चुकीचा वापरात घेतलेला स्वतःचा शब्द म्हणजे गंगेला गँजीस म्हणणे.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 09/26/2009 - 14:24 नवीन
आपण अजूनही सन्मानाने मिरवतोय. शीव--सायन वसई--बेसीन वांद्रे-बॅन्ड्रा मुंबई--बॉम्बे......वगैरे वगैरे नावांची लावलेली वाट... भट्टाचार्य---बॅनर्जी चट्टोपाध्याय--चटर्जी..चॅटर्जी ठाकूर-टागोर.....वगैरे वगैरे अशी शेकडो उदाहरणे आपल्या आसपास आहेत आणि गंमत म्हणजे आपणही सवयीने तेच बोलत असतो.त्यामुळे... कुणी शुल्ड,वुल्ड,हुक्ड,कुक्ड,लोडगे,दोडगे वगैरे असे उच्चार केले तर तेव्हढंच मला इंग्रजीवर आणि खास करून इंग्रजांवर सूड उगवल्यासारखं वाटतं. ;) विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सखाराम_गटणे™ Mon, 09/28/2009 - 07:22 नवीन
>>तेव्हढंच मला इंग्रजीवर आणि खास करून इंग्रजांवर सूड उगवल्यासारखं वाटतं. +२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
वि_जय Mon, 10/05/2009 - 10:54 नवीन
कुणी शुल्ड,वुल्ड,हुक्ड,कुक्ड, खर आहे.. असेच लूक आणी लव्हचा उच्चार ऐकतांना.. ढूमच्याक..ढण...ढण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 09/26/2009 - 18:46 नवीन
रबर---लब्बर बल्ब---ब्लब डोक्याला हेडेक नका देवु.. संट्रो.....संत्रो पळशिकर....पळ शी कर बशी..सासर
  • Log in or register to post comments
स
सुनिल पाटकर Sun, 09/27/2009 - 10:46 नवीन
काही जण बल्बला गुलोब असंही म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
न
नितिन थत्ते Sat, 09/26/2009 - 18:54 नवीन
गाडी टो करून नेली याला टोचिंग करून नेली असे म्हणतात. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sat, 09/26/2009 - 23:10 नवीन
आमच्या गावी आजोबा लोक ब्लेड ला बिलेट-पान म्हणतात. अजुन शब्द्संग्रह वाढवायचा असेल तर हा धमाल लेख वाचा ... बर्मंगठिव्का!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 09/28/2009 - 18:26 नवीन
बर्मंगठिव्का!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।। रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।। -कवी कलश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान
स
संदीप चित्रे Sun, 09/27/2009 - 01:13 नवीन
ह्या शब्दाऐवजी बर्‍याच जणांना सर्रास 'अ‍ॅक्सिलेटर' म्हणताना ऐकलंय :) तसंच सिंगल, डबल, ट्रिपल आणि नंतर 'चौबल' ही ऐकलंय :) धागा मात्र मजेशीर आहे. आवडला.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Sun, 09/27/2009 - 04:36 नवीन
उदाहरण बरोबर आहे की नाही माहित नाही पण बरीच जण पाच रुपयाच्या नाण्याला पाचचा डॉलर म्हणताना ऐकलं आहे :)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे Mon, 10/05/2009 - 08:32 नवीन
पुण्यात तर सर्रास असेच म्हणतात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी
अ
अनिरुध्द Sun, 09/27/2009 - 05:08 नवीन
मागे ३-४ वर्षांपूर्वी मित्राच्या गावाला गेलो होतो - कोकणात - तेव्हाची गोष्ट. तेव्हा तिथल्याच एका घरात वाढदिवसानिमित्त मोठ्या आवाजात गाणी लावली होती. मित्राकडे आलेल्या सुताराला त्याबद्दल विचारलं - मित्रः काय रे! आज काय लग्नं वगैरे आहे काय गावात? तो : नाय. आज आमच्या शेजारी पोग्राम है. मित्र : कसला रे? काय हळद वगैरे. तो : नाय. आड्डी-बड्डी आम्ही दोघं गार एकदम. मित्र : काय? तो: त्ये नाय का ल्हान मुलाचा करतात १ वर्स झाल्यावर. त्याच्याच बरोबर आलेल्या, पण जरा शिकलेल्या तरुण मुलाने सांगितलं की हॅप्पी बड्डे आहे. :)) हा धक्का पचवत नाही तर पुढे दुसरा धक्का. तो : (चेह-यावर आपण काही चुकीचं बोलतोय हे काहीही भाव न आणता म्हणाला) : त्या तुकारामचा 'पिकर' चा धंदा हाय ना, म्हनून ह्यो पिकर. आम्ही दोघं : पिकर ? तो : ह्ये काय गानी लावल्यान् त्यो. इथे सुद्धा मदतीला त्याच्या बरोबर आलेल्या मुलाने सांगितलं की त्याला 'स्पिकर' असं म्हणायचं होतं. एवढं सगळं झाल्यावर आम्ही त्याच्याशी बोलणं सोडून आमच्या कामाला लागलो. पुढे काय बोलणार होतो आम्ही.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 09/27/2009 - 11:01 नवीन
माझे एक-दोन गुजराती मित्र एनेबल (Enable) चा उच्चार अनेबल असा करतात. ते म्हणजे Unable च्या उचारासारखे वाटते. त्यामुळे प्रोग्रॅमिंग करताना नीट विचारून घ्यावे लागायचे, "बाबा रे, ते बटन एनेबल करू की अनेबल?" :) पण नंतर जरी तो अनेबल म्हणत असला तरी संदर्भ जोडून आम्ही बरोबर तो अर्थ घ्यायचो.
  • Log in or register to post comments
ह
हैयो हैयैयो Mon, 09/28/2009 - 15:54 नवीन
माहिती.
  • माझे श्रीलंकेतील नातलग हे आंग्लभाषेमध्ये R असलेल्या शब्दांमध्ये R चा उच्चार ழ (ऴ) करतात. (उदा. रबर = ऴबऴ, रोल = ळो़ल इत्यादि.)
  • तेच लोक सिंहलभाषा अथवा तमिऴभाषा बोलताना र चा उच्चार मात्र र असाच करतात. (उदा. रत्नम, श्रीलंका, भारतम इत्यादि.)
  • स्वभाषेमधले शब्द आंग्लभाषेतून इतरांस सांगावयाचे झाले तर पुन्हा R चा उच्चार ழ (ऴ) असा करतात. (उदा. ऴत्नम, श्ळी़लंका इत्यादि.)
  • अवांतर. 'ழ' चा उच्चार मराठीभाषकांना लिहून (अथवा बोलून) समजावून सांगणे केवळ आणि केवळ अशक्यप्राय आहे. तो मराठी ळ च्या आसपास आहे असे सांगता येते. 'ழ' च्या जवळपास जाणारा एक उच्चार रशियनभाषेमध्ये आहे.
  • र च्या उच्चारावरून एक आठवते, पूर्वी माझा एक क्लाएण्ट कोरीअन (सिओळ चा राहणारा) होता. तो र, ल, न आणि ण ह्या सार्‍या अक्षरांचा उच्चार मराठी ळ च्या जवळपास जाणारा असा करी.
हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/28/2009 - 16:04 नवीन
अवांतर. 'ழ' चा उच्चार मराठीभाषकांना लिहून (अथवा बोलून) समजावून सांगणे केवळ आणि केवळ अशक्यप्राय आहे.
आणि तो शिकायचा असेल तर क्विकगन मुरुगन चित्रपटातला एक सीन पहावा.... त्यामध्ये मुरुगन समोरच्याला 'ळ' कसा म्हणायचा हे शिकवतो :D (मलातरी तो ळ 'र्ळ'च्या जवळपासचा वाटला....जीभ प्रचंड गुंडाळुन सप्पकन सोडताना उच्चार करताना दिसला मुरुगन.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हैयो हैयैयो
श
शक्तिमान Mon, 09/28/2009 - 16:59 नवीन
'ழ' कोझिकोड मध्ये वरील अक्षर येते का? कोझिकोड = कोळिकोड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ह
हैयो हैयैयो Mon, 09/28/2009 - 17:40 नवीन
കോഴിക്കോട് = कोळिक्कोडऽ (ड चा उच्चार पूर्ण. अवग्रहचिह्नासह) तमिऴ 'ழ' = मलैयाळम 'ഴ' हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/05/2009 - 08:49 नवीन
कोझिकोड = कोळिकोड?
या स्टेशनात देवनागरीमधे 'कोषिकोड्ड' (किंवा 'कोष्षीकोड' किंवा अशा उच्चाराच्या आसपासचा शब्द) लिहीला आहे. तसंच अलेप्पीचं मूळ नाव आळपुळ्ळा किंवा आळपुष्षा म्हणे! स्पेलिंग आणखी तिसरंच. या अलेप्पी गावाच्या मूळ नावाची एवढी व्हर्जन्स ऐकली की मी शेवटी अलेप्पी हेच नाव डोक्यात फिक्स करून घेतलं. इंग्रजी 'झेड' चा उच्चार केरळी लोकं ष किंवा ळ असा लिहीतात हा माझ्यासाठी सांस्कृतीक, भाषिक, सामाजिक धक्काच होता. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान
स
सुनील Mon, 10/05/2009 - 11:23 नवीन
इंग्रजी 'झेड' चा उच्चार केरळी लोकं ष किंवा ळ असा लिहीतात हा माझ्यासाठी सांस्कृतीक, भाषिक, सामाजिक धक्काच होता. हे उलटे असावे! मल्याळममधिल हा विवक्षित उच्चार रोमन लिपीत दर्शविण्यासाठी "Z" चा उपयोग करतात, असे म्हणायचे आहे का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ह
हैयो हैयैयो Wed, 10/14/2009 - 07:26 नवीन
कोळिक्कोडऽ (ड चा उच्चार पूर्ण. अवग्रहचिह्नासह) Image removed.Image removed. समीपात मी कोळिक्कोडास गेलो होतो, तिथे काढलेले प्रकाशचित्र.
कोझिकोड = कोळिकोड? या स्टेशनात देवनागरीमधे 'कोषिकोड्ड' (किंवा 'कोष्षीकोड' किंवा अशा उच्चाराच्या आसपासचा शब्द) लिहीला आहे.
ह्या स्टेशनात देवनागरीमध्ये कोषिक्कोड असे लिहिले आहे. देवनागरीमध्ये लिहिण्यासाठी पूर्वी उत्तरेकडून कामगार आणावे लागत. तमिऴ 'ழ' = मलैयाळम 'ഴ' असे जे लिहितात, तो उच्चार देवनागरी पाटी बनवून देण्यासाठी उत्तरेकडील कामगारांना कळावा म्हणून मलैयाळी कामगार तो आंग्लभाषेत zh असा लिहून देत. उत्तरेकडील कामगार ते zh ला 'ष' वाचत. त्यांनी एकदा तो पायंडा पाडला आहे, तो अजूनही चालू आहे. आम्ही मात्र zh ला ऴ वाचतो. (ळ चे दोन प्रकार आहेत. एक ळ, दुसरा ऴ. मराठी ळ - गुजराती ળ हा ह्या दोन्ही प्रकारांपेक्षा वेगळा, तिसराच असा आहे.)
तसंच अलेप्पीचं मूळ नाव आळपुळ्ळा किंवा आळपुष्षा म्हणे! स्पेलिंग आणखी तिसरंच. या अलेप्पी गावाच्या मूळ नावाची एवढी व्हर्जन्स ऐकली की मी शेवटी अलेप्पी हेच नाव डोक्यात फिक्स करून घेतलं.
आलप्पुळा़ हे मूळ नांव आहे. ആലപ്പുഴ असे मलैयाळम लिपीत लिहितात, तर ஆலப்புழா असे तमिळ लिपीत लिहितात. आपण मात्र अलेप्पी असेच म्हणावे, कारण त्यातील ऴ हा आपल्याला ह्या जन्मात उच्चारता येणार नाही ह्याची १००००% खात्री आहे. 'ழ'/'ഴ' चा उच्चार मराठीभाषकांना लिहून (अथवा बोलून) समजावून सांगणे केवळ आणि केवळ अशक्यप्राय आहे. तो मराठी ळ च्या आसपास आहे असे काहीसे सांगता येते. त्यामुळे तेवढी सूट आपणांस मिळेल. ;-)
इंग्रजी 'झेड' चा उच्चार केरळी लोकं ष किंवा ळ असा लिहीतात हा माझ्यासाठी सांस्कृतीक, भाषिक, सामाजिक धक्काच होता.
  1. झेड चा नाही, झेडहेच चा. (zh)
  2. zh चा उच्चार ष असे स्वतः मलैयाळी लोक लिहित नाहीत.
  3. zh चा उच्चार ऴ असे मलैयाळी लोक लिहितात.
हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चिरोटा Mon, 10/05/2009 - 08:55 नवीन
इंग्रजीतल्या H चा उच्चार दक्षिणेत(विशेष करुन आंध्र्/कर्नाटक) 'हेच' असा का करतात हे कळत नाही.circuit चा उच्चार सर्क्युट असाही केला जातो. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 10/05/2009 - 15:47 नवीन
H ने चालु होणार्या बहुतांश शब्दांचा उच्चार हा "ह" ने केला जातो. उदा. हॅन्ड,हर्ट,हट इ.इ. त्यामुळे बहुदा दाक्षिणात्य लोक H चा एच असा उच्चार न करता "हेच्च" असा करत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 10/10/2009 - 05:28 नवीन
आमच्या न्यूयॉर्कमधील हापिसात २ कर्नाटकी मुली होत्या. त्या बरेच वेळेला 'H' चा उच्चार 'A'सारख्या करायच्या. उदा.'Hairfall' चा उच्चार एयरफॉल. 'Horn' ला 'ऑर्नं'. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
व
विष्णुसूत Sat, 10/10/2009 - 03:24 नवीन
मला इन्ग्रजी-मराठी तील शब्द वापरातील अनेक मजेशीर किस्से अनुभवास आले आहेत. त्यातील एक किस्सा असा : एखादा मराठी नाव/आडनावा चा कोणी कधी भेटला /भेटली तर मी हमखास मराठित बोलतो. जगभर फिरताना कुठल्याहि देशात मराठि माणुस मी ओळखु शकतो , हि माझी खासियत आहे. बरेच मराठि लोकं एक "अ‍ॅक्सेन्ट" घेवुन बोलतात, मग ते किती हि वर्ष अमेरीकन इन्ग्रजी बोलण्याचा प्रयत्न करोत किंवा अन्य कोणती हि भाषा... असो. एकदा टेनीस खेळताना ,शेजारील कोर्ट वरुन ,एक भारतीय मुलगी सारखी , नोकरी -नोकरी असे काहितरी म्हणत होती असे मला ऐकु आले. ( बहुतेक हि मुलगी पहिल्यांदाच टेनीस खेळत होती ) मला काहि समजले नाहि. काहि वेळा नंतर तिच्या पार्टनर मुलीला मी विचारले कि हि मुलगी नोकरी कर... मी नोकरी करते... वैगरे का म्हणते आहे ? तेव्हा मला त्या मुलींच्या मराठि बोलण्यातले गुढ कळाले. त्या मुली पहिल्यांदाच टेनीस खेळत होत्या व सर्विस करणे चा अनुवाद नोकरी करणे असा करत होत्या. ( बहुतेक ह्या दोघि अमेरीकेत नुकत्याच आल्या होत्या आणि अस्खलित मराठि शाळे मधे शिकलेल्या होत्या !). मला माझे हसु आवरत नव्हते .. पण त्या मुलींच्या मराठि भाषांतरा ची मजा वाटत होती. ह्या गोष्टिला आता बरीच-बरीच वर्ष झाली तरी हे "नोकरी करणे" भाषांतर नेहमी आठवते आणि हसु येते. अजुन एक भाषांतर जे मला नेहमी ऐकु येते .. ते म्हणजे जवळ जवळ ८०% मराठि लोकं टेनिस ला "लॉन्ग टेनिस" म्हणतात !
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 10/14/2009 - 13:30 नवीन
बिझी ला ( व्यस्त) असणे याचा उच्चार मी कार्यालयात बुझी असा करत असे. सर्व सहकारी करपल्लवी करत आहे असे मला जाणवले आणि प्रयत्नपुर्वक बिझी म्हणण्याचा प्रयत्न करी, तरी कधी बुझी असताना बुझी असे म्हणत असे. ( मनात म्हणे, हसा लेकानो)...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा