काथ्याकूट

एका शब्दात उत्तर द्या

Primary tabs

मन म्हणजे काय

सुनील

प्रेमसाई,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं -
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं !
एका शब्दात न सांगता येण्यासारखं
 
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रियाली

मन म्हणजे मी
मी आहे म्हणून मन आहे. मी नसेन तर मनही नसेल.
तसं "मी" या शब्दात म्+ई अशी अक्षरे असली तरी एकत्र जोडली गेल्याने हे एका अक्षरातील उत्तर आहे.

जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणार्‍या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात.<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />
स्त्रोत : विकिपेडिआ
 अवांतर : हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....
- छोटी टिंगी ;)

इनोबा म्हणे

हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....आणि मनसेचा नसेल तर आमाला इचारु नका.आपूण आपल्या मना'चा मालक हाये,काय?
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

व्यंकट

वजन मोजण्याच्या परिमाणाचा अपभ्रंश. मूळ शब्द मण.

विकास

मिसळपावसारख्या उपक्रमावर मनोगत लिहीता येण्यासाठीचे म्हणून असलेले एक विचारांचे माध्यम आहे.

विसोबा खेचर

एका शब्दात न सांगता येण्यासारखं
सुनीलरावांशी सहमत...
विकासरावांचा कोटीक्रमही आवडला...
(मनस्वी) तात्या.

किशोरी

मन म्हणजे 'वारा'भावनांचे सुगंध घेउन कुठेही मुक्तपणे संचार करणारा

सख्याहरि

लाकूड मेजतान म्हंत्यात.. ते न्हवं का.. मन भर लाकूड..

कोलबेर

.. एका शब्दात उत्तर द्यायचे काय झाले? 

भाषाशास्त्र म्हणते समास करा. ;) दोन शब्दांचा एक शब्द करा. :):)

विचारगुन्ता = विचारांचा गुन्ता = षष्ठी तत्पुरुष....

*<|:-)}

परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

नन्दु

सुनिल शी पुर्ण पणे सहमत

तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं -

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर

किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं !

एका शब्दात न सांगता येण्यासारखं

मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

मनस्वी

मनिषाकोईरालाआणिआमीरखानचाएकहिंदीपिक्चर

मनस्वी

कुलभूषण

सर्वसंवेदनाग्रहणप्रतिक्रियात्मकतामाध्यम

नाना चेंगट

मन ही अस्तित्वात नसणारी भ्रामक कल्पना आहे.

(विज्ञानवादी) नाना

नाना चेंगट

मन म्हणजे बुद्धीची चंचल अवस्था आहे.

(अध्यात्मिक) नाना

प्यारे१

विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा चांचल्यामुळे नाना चेंगट चंचल (पक्षी :...)आहे हे सिद्ध होते....

झाली सिद्धता एकदाची. (कोण रे तो आम्हाला आधीच माहिती आहे म्हणणारा? ;) )

मन१

आम्ही अस्तित्वात नसल्याचे ऐकून मौज वाटली.

मन म्हणजे आमीर खान, मन म्हणजे मनिषा कोईराला..
मन म्हणजे काली नागीण के जैसी जुल्फे तेरी काली काली..

Gawade Jawahar…

मन म्हणजे आपला गुरु व देव . जवाहरलाल

Gawade Jawahar…

मन हेच आपला गुरु व देव . जवाहरलाल