जे न देखे रवी...

(ताळमेळ)

Primary tabs

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ताळमेळकाव्य हे जुळे कधी कधी उगाच शब्दभेळहा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ
सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरातही विडंबने तुझी कुणी अता न वाचतातऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥
काव्य पाहता तुझे मनात जागतो छचोरअन मनातल्या मनात हासतो मी अघोरलोक हासता खुलून, सोडतेस ताळमेळ ॥
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपूनएकदा तुला खरेच काढणार झोडपूनये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!--केशवसुमार(माघ वद्य ७ शके १९२९,२८ फेब्रु. २००८)

बेसनलाडू

आवडले.
हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ
ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
मस्त!
(आस्वादक)बेसनलाडू

काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपूनएकदा तुला खरेच काढणार झोडपूनये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
लई आवडले बॉ....
पुण्याचे पेशवे

प्राजु

केशव, खरंच मस्त जमलीये...
- (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग

पण मला नेहमीची 'किक' नाही आली. (केशवा, कदाचित थोडा जेटलॅग असावा का?:))
चतुरंग

विसोबा खेचर

काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपूनएकदा तुला खरेच काढणार झोडपूनये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
लय भारी रे केशवा, वरील लायनी सर्वात आवडल्या... :)
तात्या.
 

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

भरतभूमीवर पोहोचता क्षणी दोन कवितांच्या चिंध्या करून मोकळा जाहला !!जबरा !!- सर्किट

वरदा

सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात

आम्ही वाचतो की...मस्तच असतात एकाहून एक छान..
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून.....

सहिच....