"याच साठी का केला होता अटटाहास".......
💬 प्रतिसाद
(42)
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 10/05/2009 - 15:21
नवीन
आपल्या खरडींमधला राग शेवटी काकुतुन निघालाच का ??
असो , सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Mon, 10/05/2009 - 15:24
नवीन
आमचा राग अथवा मनापासुन वाटणारी कळकळ व्यक्त करायला आमच्या कडे जाहिर सभांमधे आवेशपुर्ण भाषणे ठोकायचा मार्ग उपलब्ध नाही ........मिपाने उपलब्ध करुन दिलेल्या या व्यासपिठाचा वापर करणेच आमच्या हाती आहे.
इतकी मुभा तरी आहे असे मानायला हरकत नसावी
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 10/05/2009 - 16:17
नवीन
खुपच विनोदी आहात तुम्ही.
मराठी चा मक्ता फक्त राज आणि उध्दव दोघांकडे कुणी दिला? कॉग्रेस व राष्ट्रवादी मध्ये सगळे अमराठीच नेते आहेत काय?
वेताळ
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Mon, 10/05/2009 - 16:39
नवीन
माझे असे मुळीच म्हणणे नाहि की मराठी माणसाचा सगळा मक्ता याच दोन सेनांनी घेतलाय.
इतर पक्षांमधे देखिल आहेत की मिशीला पिळ देत,व छाती(पोट असे वाचावे)पुढे काढत स्वतःला मराठे म्हणवुन घेणारे नेते.पण त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात हे माहित असायला हवे ना?(मुळात मराठी अस्मिता म्हणजे नक्की काय हाच प्रश्न आता मला देखिल पडलाय?)
तसे नसते मुंबईतल्या मतदार संघात स्वतःला जाणताराजा म्हणवुन घेणार्या नेत्याने हिंदितुन भाषण केले नसते.
माझ्या लिखाणाच उद्देश तुंम्हास उमजला नाही असे समजावे का मी?
तुमच्याकडुन अश्या प्रकारे खिल्ली उडवली जावी हे नवलच म्हणायला हवे!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 10/05/2009 - 16:57
नवीन
शिवसेनेची स्थापना केली कशासाठी व नंतर सेनेने मराठी तरुणाचा वापर कशासाठी केला हे जर कळाले तर तुम्हाला लक्षात येईल मला हसु का आले. सेनेचा वापर भाजपाने खुपच व्यवस्थित करुन घेतला आहे.सेना आपल्या मुळ हेतुशी जर प्रामाणीक राहिली असती तर आज स्वःबळा वर महाराष्ट्रात सत्तेवर असती.
वेताळ
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Mon, 10/05/2009 - 17:05
नवीन
आपला मुद्दा एकदम मान्य.........पण त्या झाल्या गोष्टिंवर चर्चा करुन साध्य काय करणार्?भाजपाच्या हेतुबद्दल पुर्वी पासुन शंका होती महाविद्यालयात असताना मित्रंमैत्रिणिंशी कायम यावर वाद व्हायचे
पण म्हणुन आता हा कलगितुरा सुरु करण्याचा उद्देश काय ?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 10/06/2009 - 06:59
नवीन
सेनेचा वापर भाजपाने खुपच व्यवस्थित करुन घेतला आहे.सेना आपल्या मुळ हेतुशी जर प्रामाणीक राहिली असती तर आज स्वःबळा वर महाराष्ट्रात सत्तेवर असती.
केवळ मराठीचा मुद्दा लढवूनसुद्धा सेना स्वबळावर सत्तेवर येऊ शकली असती. भाजपच्या नादाला लागून मराठीचा मुद्धा सेनेने हरवून टाकला.
भाजपसुद्धा कुठे स्वतःशी प्रमाणीक राहिला आहे? अन्यथा जसवन्तसिंहाना एक न्याय आणि अडवाणीना दुसरा असे झाले नसते.
रामजन्म भुमी बाबत सेना हा एकच पक्ष असा होता की ज्याने झाल्या गोष्टीची जबाबदारी नाकारली नव्हती. भाजप चे मात्र तळ्यातमळ्यात असे अजूनही चालूच आहे.
भाजपची गोची ही होते की त्याना बरेच जणांचे सहकार्य हवे असते. पण त्याना अंकुश लावणारे वेगळेच असतात. काँग्रेसवर टीका करायची पण धोरणे मात्र काँग्रेसची राबवायची. हेच त्यांचे धोरण असते.
पाहुण्याच्या काठीने साप मारणे हा मराठी वाक्प्रचार भाजपच्या बाबतीत परफेक्ट फिट्ट बसतो.
काँग्रेस पेक्षा वेगळे आस्तित्व टिकवायचे म्हणून सेना भाजपच्या नादाला लागते. त्यामुळे सेनेने स्वतःच्या विचारांचे आस्तित्व अदचणीत आणले आहे.
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Wed, 10/07/2009 - 07:33
नवीन
एकाच वेळी सगळ्यांनाच समाधानी करण्याचा अट्टाहास केला की त्याची परिणीती अशीच व्हायची?(भाजपा बद्दल बोलतेय)
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
ग
गोगट्यांचा समीर
Mon, 10/05/2009 - 16:30
नवीन
शेवटी सगळे सत्तेसाठी चालले आहे.. त्याचसाठी हा अट्टाहास ..
>>वाईट वाटतय ते बाळासाहेबांच..
असे वाटत नाही , मधे त्यांची मुलाखात बघितली , त्यावरून हे म्हणतो..आणि तसे जर वाटत असेल , तर त्यांनी सर्व सत्ता
उध्दवला देण्यापूर्वी राजचा विचार करायला हवा होता..
दुसरे म्हणजे हा कलगीतुरा जो चालला आहे तो बालिशपणा वाटतो..
दोघे केवळ हवेत बोलतात असे वाटते.
एक मात्र खरं आहे , मराठी माणसात ही अशी दुही पाहून वाईट वाटतं..
दोघे एक असते तर बरं झालं असतं असं राहून राहून वाटतं..
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 10/05/2009 - 18:33
नवीन
उद्धव राज एकत्र असते तर मराठी माणसांचे हित साधले गेले असते या काल्पनिक गृहीतकावर आधारलेला लेख आहे.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
अ
अडाणि
Mon, 10/05/2009 - 18:59
नवीन
चुकीच्या अपेक्षा ठेवून (चुकीच्या लोकांकडून असे वाचावे) मग अपेक्षाभंग झाल्यावर रडू नये.
-
अफाट जगातील एक अडाणि.
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Mon, 10/05/2009 - 19:51
नवीन
एकत्र असते तरी काही फारसा फरक पड्ला नसता कदाचित पण म्हणुन चाळीतल्या नळावर बायका भांडतात तश्याप्रकराची भांडणे पचनी पडत नाहीत् .......आणि तुमच्या मते आमचे गृहितक चुकीचे असेलही कदाचित पण म्हणुन आमच्य विचारांना आम्ही वाचा फोडुच नये असे तुमचे म्हणणे आहे का?
विचारसरणी कुणी कुठली अंगिकारायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.....आता आंम्हाला बाबा जन्मापासुन सेने बद्दल नितांत प्रेम अभिमान इत्यादी इत्यादी आहे ,जसा तुंम्हास तो काँग्रेसबद्दल असायची शक्यता आहे.......मग आता काय करु म्हणता ?.......की आमच्या सारख्य सेनाप्रेमींनी आपल्याला वाटणारी कळ्कळ व्यक्त देखिल करु नये?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Mon, 10/05/2009 - 18:50
नवीन
मलाही अगदी असेच वाटले. गल्लीतले, चाळीतले सवंग भाषेत चाललेले भांडण हे आज विधानसभेच्या प्रचारात ऐकू येते. एक दुसर्याला दगड म्हणतो तर दुसरा पहिल्याला गोटा म्हणतो. आणि असलेच मूर्ख संवाद टाळ्या मिळवून जातात.
एक दुर्दैव म्हणजे कुणाही नेत्याला आपण असे बोलल्यामुळे आपल्या सिटा कमी होतील, मते कमी होतील अशी भीती वाटत नाही. म्हणजे इथे लेखन करणार्यांना ह्याची खंत वाटते पण अन्य सामान्य लोकांना ही डायलॉगबाजी मोठी सुरस वाटते असे दिसते आहे. बाकी पक्षही ह्या आगीत आपल्या तर्फे दोनचार काड्या सारून आग भडकलेली ठेवत आहेत.
असल्या भांडणात खरोखरचे मुद्दे जसे वीज, पाणी, रस्ते, रेल्वे हे सगळे फारच दूर राहिले. कुणी काही ठोस योजना मांडत नाही निव्वळ शिव्या आणि टीका.
मूर्ख, अडाणी, उथळ लोकांची संख्या जास्त असेल तर ते असली साठमारीच बघायला मिळणार ही आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे.
घराणेशाही, पैशाला राजकारणात आलेले अफाट महत्त्व असल्या कारणांमुळे असे होणे अपरिहार्य आहे.
आलिया भोगासी असावे सादर!
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 10/05/2009 - 19:44
नवीन
>>पण अन्य सामान्य लोकांना ही डायलॉगबाजी मोठी सुरस वाटते असे दिसते आहे.
४० वर्षे असल्या डायलॉगबाजीच्या जोरावरच एकाच्या वडिलांनी आणि दुसर्याच्या काकांनी लोकांना झुलवले.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
- Log in or register to post comments
च
चेतन
Tue, 10/06/2009 - 06:52
नवीन
४० वर्षे खोट्या धर्मनिरपेक्ष मुद्याच्या (हा हा हा.....) जोरावर बर्याच पक्षांनी लोकांना झुलवले.
चेतन
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Mon, 10/05/2009 - 19:52
नवीन
तुमच्या मताशी सहमत
अगदी हेच म्हणायचे आहे मला............
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
व
विकि
Mon, 10/05/2009 - 19:16
नवीन
राज्यात इतरही पक्ष आहेत,मराठी माणसाचे तारणहार म्हणुन शिवसेना आणि मनसेचा उल्लेख केला तोच मुळी चुकीचा आहे.अस असत तर मराठी माणुस मुंबईतून हद्दपार व्हायची वेळच आली नसते. केवळ भावनिक मुदयावर असे काही लिहीणे चुकीचे आहे.जर केवळ मराठीचा अजेंडा राबवायचा होता तर पुर्णपणे राबवायचा होता तो राबविला गेला नाही.परप्रांतियांची संख्या वाढलीच का?याच मुळाशी जाणे गरजेचे आहे.बाकी काही नाही.
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Mon, 10/05/2009 - 20:17
नवीन
कॉम्रेड !
तुमच हे नेहमीचच आहे.......आता इथे कुठेही मी दोन्ही सेना मराठी माणसाच्या तारणहार आहेत असे काहिहि लिहिलेले नाही..........पण तुंम्हास उगीचच किस काढत बसायची सवयच जडली आहे जणू!
आता उत्तरभारतियांचे वर्चस्व वाढविण्याला सेनाच जबाबदार आहे असे धरुन चालु पण आता तर सेनेमधे उत्तरभारतियांचे नेतृत्व करणारे निरुपम काँग्रेसच्या वळचणीला गेलेत तिथे जाऊन त्यांनी जास्ती जास्त जागांवर उत्तरभारतियांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली .काही अंशी ती पुर्ण देखिल झाली आहेच निदान मुंबई पुरते बघता तरी तसेच अढळते आहे.......तसेच तुमच्या पक्षानी आपली मोट आठवले गटाबरोबर बांधली म्हणजेच रिडालोस का काय ते आहे त्याच्याशी?आता त्यांचे उमेदवार कोण हेच आंम्हास माहित नाही..............आणि कदाचित उभे असतील तरी त्यांना मते किती पडतील याचा अंदाज नाही ?तसेच त्यांची अनामत रक्कम जप्त होण्याचा संभव अधिक.......पण असे असुनही तुंम्ही मात्र दोन्ही सेनांच्या बाबतीत तोंड सुख घेण्याची एकही संधी दवडु नका.....मग भले मुंबईच्या विकासात आपला सहभाग किती? याचे आत्मपरिक्षण करायची गरज तुंम्हास भासत नाही.........
काय आहे ?सेनेने आता मराठी माणसासाठी काही केले अथवा करते आहे किंवा नाही हे मला माहित नाही......पण सेनेच्या स्थापनेनंतर मराठी लोकांना रोजगार मिळवुन देण्यात सेनेने किती प्रयत्न केलेत हे आमच्या डोळ्यांसमक्ष बघितले असल्यामुळे इतर नकारात्मक प्रचार करत सेनेची बदनामी करणार्या ऐकीव गोष्टिंवर आंम्ही तरी विश्वास ठेऊ शकत नाही.(बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल या पठडितले आहोत ).......आणि महाराष्ट्रात व पर्यायाने मुंबईत मराठी टक्का का कमी झालाय? अथवा होतोय याची कारणमिंमांसा करण्याच कर्तव्य प्रत्येक राजकिय पक्षाच आहे.अस निदान आमच्या अप्लमतीप्रमाणे आंम्हास तरी वाटत.......सेनेचा मराठी माणसाची तारणहार तत्सम असल्याचा दावा खोटा ठरवयची आयती संधी या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुंम्हास चालुन आली आहे तेंव्हा आता कंबर कसा आणि कामाला लागा.कसें?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
व
विकि
Mon, 10/05/2009 - 20:33
नवीन
आमचे आत्मपरिक्षण आम्ही केलेय मी मराठी दुकानांतुनच वस्तु खरेदी करतो.मराठी हॉटेलातच जातो.ज्या कम्युनिष्ट पक्षाने संयुक्त महाराष्ट्रासह मुंबई मिळावी म्हणुन लढा दिला त्याच पक्षात मी आहे.
जर या लोकांनी लोकांना रोजगार दिले असे तुम्ही म्हणता असे असते तर मुंबईतून जाण्याची वेळच आली नसती.तुम्हीच पाहा गिरण्यांच्या जमिनी जेव्हा विकल्या जात होत्या तेव्हा कोणि काय केले.आजही मुंबईच्या जुन्या म्हाडा वसाहतीत पुर्नविकासाच्या नावाखाली उंच उंच टॉवर होत आहेत तिथे मराठी माणसाला धक्क्याला लावायचे काम होत आहे ,कामगार संपला,गँगवार मध्ये कोण पोर होती हो मराठीच ना तेव्हा कुठे होते मराठी मराठी करणारे सांगा ना.काय दिशा दिली मराठी तरुणांना.
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Mon, 10/05/2009 - 20:38
नवीन
भले शाब्बास..........तुमचा निर्धार व प्रयत्न वाखाणण्याजोगेच आहेत...........तुमच्या प्रश्नांना विचारपुर्वक उत्तरे सवडीने देईनच्........तो पर्यंत कळ सोसा.......
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
च
चेतन
Tue, 10/06/2009 - 06:55
नवीन
माझ्या माहितिप्रमाणे उघड उघड मराठीच्या मुद्यावर स्थापन झालेले आणी मराठीची बाजु घेतलेले दोनचं पक्ष आहेत.
चेतन
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Mon, 10/05/2009 - 19:48
नवीन
जसे सगळे पक्ष उखाळ्या-पाखाळ्या काढत एकमेकांशी भांडत बसतात त्यांच्यात आणि ह्या दोन पक्षांत काही वेगळे आहे असे आम्ही मानत नाही.
आत्ताच नळाला ३ दिवसांनी पाणी आल्याचं शेजारच्या अय्यरांनी मोडक्या तोडक्या हिंदित सांगितलंय..आम्ही घागरी घेऊन पळतो आता.मराठी अस्मितेबद्दल बोलूच नंतर !!
अरे हो..जय भवानी, जय शिवाजी !!
-शाहरुख
- Log in or register to post comments
स
सुहास
Mon, 10/05/2009 - 20:52
नवीन
सध्या ठाकरे बंधुंमधे जी वर्चस्वाची लढाई सुरु आहे आणि त्यानिमित्ताने विधानसभा निवडणु़कीत उमेदवारांचा प्रचार करताना उपलब्धहोणारे व्यासपिठ हा जणु एखाद्या तमाशातील फड आहे ..................व सभांना उपस्थित असणारी जनता ही फेटे उडवुन दाद देणारी व नेहमीच बारिला हजेरी लावणारे रसिकजन आहेत अश्या थाटात ठाकरे द्वयींचा कलगीतुरा सुरु आहे .......
एकुणात सर्वच व्यासपीठावरून तेच चाललेय.. मग ते सेना-भाजपाचे असो, आघाडीचे असो, किंवा मनसे, जनसुराज्य, रिडालोस चे...!
तिथे राजने राजु परुळेकरांना हाताशी धरुन लोकसत्तामार्फत उद्धवच चारित्र्यहनन चालवलय
माफ करा, मी गेली ४ वर्षे रोज लोकसत्ता वाचतोय, पण राजु परुळेकरांचे लेख गेल्या महिन्याभरात लोकसत्तात वाचल्याचे आठवत नाही.. आणि तसे लोकसत्ता मनसे चा खाजगी पेपर नाहीय, त्यामुळे राजु परुळेकरांना राज ने हाताशी धरलंय असे म्हणता येत नाही.. (तसं बघायला गेलं तर मटा वाल्या राऊतांना शिवसेनेने हाताशी धरलंय असे ही आहे...) या उलट सामना वाल्या राऊतांचे आहे आणि सुरूवात तर तिकडूनच झालीय... एक सांगू का? मराठी माणूस सूज्ञ आहे, तो पेपर वाचून मतं देत/ठरवत नाही/नसावा...
वाईट वाटतय ते बाळासाहेबांच व सेना घडविण्यात अपार कष्ट घेत योगदान देणार्या त्यांच्या शिलेदारांच व अखेरचा श्वास देखिल सेनेवर निष्ठा ठेउन घेतलेल्या आनंद दिघे,साबिर शेख,दत्ताजी साळवी, यासारख्या मातब्बर नेत्यांच
मलाही वाईट वाटतंय, पण थोडा विचार करा हे काय होतंय याचा.. राजला विसरा आणि विचार करा युतीच्या गेल्या ५ वर्षांतील कामाचा, आणि निवडून आल्यानंतर काय करायचे याच्या त्यांच्या जाहीरनाम्याचा, मग कळेल तुम्हाला ते राजच्या मागे का लागलेत ते...
असो.. मी राजसमर्थक नाही याची नोंद घ्यावी...!
--सुहास
एकच वादा, बंडखोर दादा...!
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Tue, 10/06/2009 - 06:55
नवीन
माफ करा, मी गेली ४ वर्षे रोज लोकसत्ता वाचतोय, पण राजु परुळेकरांचे लेख गेल्या महिन्याभरात लोकसत्तात वाचल्याचे आठवत नाही
माफी असावी लोकप्रभा असा उल्लेख करावयाचा होता पण अनवधानाने तो लोकसत्ता असा झाला.....सध्या राजु परुळेकर लोकप्रभा मधे अल्केमेस्ट्रि नावाचे सदर लिहित आहेत्.....राजु परुळेकर हे माझे आवडते लेखक पत्रकार तत्सम आहेत म्हणुन अश्या प्रकारचे लेखन त्यांच्या सारख्या कडुन अपेक्षीत नाही.
राऊतांचे लिखाण सामनामधुन कित्येक वर्षापासुन वाचतोय्..तसेच मटाला देखिल सेनेने दावणीला बांधलाय .......पॉलिटिकल ऑब्लिगेशन का काय म्हणतात तस झालय मटाच्या राऊतांच ......त्याला काय करणार?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Mon, 10/05/2009 - 21:53
नवीन
भांडणातून जन्म घेतलेल्या पक्षाकडून भांडणांव्यतिरिक्त काय अपेक्षा असु शकते?
ऋषिकेश
------------------

- Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र
Tue, 10/06/2009 - 02:11
नवीन
तसेही कुठल्याच पक्षाकडून कसलीच अपेक्षा ठेवण्यात काहीच हशील नाही.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 10/06/2009 - 07:53
नवीन
अनामिकाताईंच्या सुंदर लेखावरील मराठी प्रतिक्रिया वाचल्यावर मराठी लोकांनी आजची दुरवस्था का झाली हे सहज लक्षात येते. खरंच आपल्यासारखे नतद्रष्ट आपणच.
शिवसेनेशिवाय (व आता मनसेची त्यात भर पडली) असा एकही पक्ष नाहीं जो छातीवर (किंवा अनामिकाताईंनी म्हटल्याप्रमाणे "पुढे आलेल्या पोटावर") हात ठेवून सांगतो, "मी मराठी माणसासाठी लढेन".
बाळासाहेबांनी चुका केल्या असतील, नाहीं संजय निरूपमसारख्या सापाला दूध पाजण्याच्या केल्याच, पण तरी ते १००-नंबरी सोनं आहे. त्यांची पुत्रप्रेमाने आंधळे व्हायची चूक सर्वात मोठी. पण तरीही आज बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मराठी माणसासाठी जाहीरपणे बोलणारा कोणीही "माईचा लाल" दुसरा नाहीं. बाकीचे नेते तर सगळे दिल्लीकडे पहात बोलणारे!
रहाता राहिले कम्युनिस्ट! अमेरिकेबरोबरच्या अणूविद्याकरारासंबंधातली त्यांची चीनधार्जिणी भूमिका व चीनवरील निष्ठा पाहिल्यानंतर त्यांची भारतावरचीच निष्ठा जिथे शंकातीत नाहीं तिथे मराठीबद्दलच्या निष्ठेबद्दल कशाला बोलायचं?
अनामिकाताई, तुम्ही अजीबात वाईट वाटून घेऊ नका. आपलंच नाणं जिथं खोटं तिथे देव जरी खाली उतरला तरी तो तरी काय करणार?
मी मागे एक शिवसेनेवर लेख लिहिला होता तो आपण वाचला नसेल तर आपला ई-मेल आय.डी. कळवा. मी पाठवून देईन.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 10/06/2009 - 08:25
नवीन
अनामिकाताई,
आणखी एक गोष्ट लक्षात ठेवाया हवी कीं मिपा-सभासदांसारख्या सुखवस्तू लोकांसाठी शिवसेनेची तेवढी गरज नाहीं जेवढी अशिक्षित किंवा निमशिक्षित लोकांसाठी, तृतिय-चतुर्थ श्रेणीच्या नोकर्यासाठी प्रयत्नशील लोकांसाठी आहे. "मेरिटवरच निवड व्हावी" असे म्हणणार्या माझ्या कांहीं यशस्वी नातेवाइकांत पण मला ही उदासीनता दिसते.
पण उच्चपदस्थ असोत किंवा कनिष्ठ, पण महाराष्ट्र हा मराठी लोकांसाठीच हे तत्व लागू झालेच पाहिजे व त्यासाठी शिवसेना ही एकच शक्ती आज तरी मला दिसते.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Tue, 10/06/2009 - 11:40
नवीन
पुत्रप्रेमाचा अट्टाहासच शेवटी दु:खात पाडून गेला...
...
अवांतर : आयुष्यभर घराणेशाहीला शिव्या देणारे लोक आता मस्तपैकी आपापल्या पोरांना / पोरींना / पुतण्यांना वगैरे वगैरे पुढे सरकवताना पाहून मज्जा वाटते....
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
- Log in or register to post comments
व
वि_जय
Tue, 10/06/2009 - 12:08
नवीन
अनामिकाजी,
एवढ्या पोटतिडकीने आपण लेख लिहलाय. खरेच आपले मनापासून अभिनंदन..
मुळात लेख वाचून त्याचा अर्थ न कळताच..प्रतिक्रिया देण्यार्यांकडे कॉम्रेड सारख्यांकडे दुर्लक्ष करा. असो.
ज्या कम्युनिष्ट पक्षाने संयुक्त महाराष्ट्रासह मुंबई मिळावी म्हणुन लढा दिला त्याच पक्षात मी आहे. -विकि
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा पक्षीय राजकारणाचा लढा नव्हता.. तर अवघा मराठी माणूस पक्षभेद विसरुन एक झाला होता हे लक्षात ठेवा. संयुक्त महाराष्ट्राचा कलश ज्यांनी आणला ते यशवंतराव हे कॉग्रेजी होते..
मुळात राज यांची बाळासाहेबांची तुलना होऊच शकत नाही.. या 'ना'राज ठाकर्यांचे कर्तूत्व काय हो? साडेतीन वर्षात प्रथम मुंबई महानगरपालीका, नंतर लोकसभा, आणि आता विधानसभा आल्यावर काकांचे मुद्दे त्यांचीच नक्कल मारुन जनतेसमोर ठेवायचे.. दुसर काय केलय?मधल्या काळात काय करत होते असे विचारल्यावर म्हणे विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करतोय.. केव्हा ? महाराष्ट्र काळानिळा पडल्यावर?
उद्धव यांनी आपला वेगळा ठसा नक्कीच उमटवला आहे.. बापासारखा अॅग्रेसिव्ह नसेल पण बापापेक्षा प्रोग्रेसिव्ह नक्कीच आहे.. वडीलांची नक्कल करीत मतांचा जोगवा तर मागीतला नाही ना?
मुख्यमंत्री अशोकराव म्हणाले ना ना'राज' म्हणजे ' पावसाळ्यातील बेडू़क'.
बाळासाहेबांनी रक्ताचे पाणी करुन स्वतची संधटना तयार केली. ह्या 'ना'राजांनी काय केल? आयत होत त्यांना भडकवून आपला वेगळा सवतासुभा तयार केला ना? बाळासाहेबांनी आपल्या सैनिकांना अन्याय दिसला तर पेटून उठा असा आदेश दिला.. कुठल्या शिवसैनिकाला महीलांना त्रास दिला म्हणुन गेल्या बेचाळिस वर्षात अटक झाली आहे? यांचे पदाधिकारी बलात्काराच्या आरोपाखाली.. आणि म्हणे नवनिर्माण.. हेच काय.. ?
या ना'राज' ठाकर्यांनी, मा. बाळासाहेबांनी आतापर्यंत न मांडलेला असा एक तरी मुद्दा स्वतंत्रपणे मांडला असल्यास मिपाकारांनी जरुर कळवावे.
अनामिकाजी पुन्हा एकदा आपले अभिनंदन
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/06/2009 - 13:32
नवीन
निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...
निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...
निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...
बाकी आपले कर्तूत्व एकायला आवडेल...
सू हा स...
- Log in or register to post comments
व
वि_जय
Tue, 10/06/2009 - 14:51
नवीन
निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...
वाट बघतोय
निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...
वाट बघतोय
निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...
वाट बघतोय
निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला.
वाट बघतोय
निवडणुका झाल्यावर ईथेच उत्तर देईन मी तुला...
वाट बघतोय
बाकी आपले कर्तूत्व एकायला आवडेल...
बेटा सुहास,
१४ जून १९६८ पासून काहिही कामधंदा न करता काकाच्या जीवावर ऐयाशी करत , आणी आता कोहीनूर मिल्स खरेदी करुन, बिल्डर बनून, त्याचीच नक्कल करुन मतांचा जोगवा मागून त्याचीच ....मारायची, एवढे थोर कर्तूत्व नाही रे राजा माझ.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/06/2009 - 13:36
नवीन
. संयुक्त महाराष्ट्राचा कलश ज्यांनी आणला ते यशवंतराव हे कॉग्रेजी होते..
हाही एक मोठा विनोदच आहे. अत्र्यांची भाषणे ऐका कळेल यशवंतराव नेहरुंचे पाय कसे चाटत होते ते. म्हणे कलश आणला.
असो. कोणाला कितीही वाईट वाटले तरी राजमुळे आज मराठी लोक बर्याच आयटी कंपन्यांमधे मराठी बोलताना कचरत नाहीत हे खरे आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
- Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™
Tue, 10/06/2009 - 13:55
नवीन
तु भेट, तुझे आणि माझे मतेजुळतत
---------------
जुन्या मंपनीत एका मराठी मुलीला हिंदीतुन कोड सागत होते. तिने मला झापले.
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Tue, 10/06/2009 - 13:24
नवीन
आज राज - उध्दव एकत्र असते तर नक्कीच शिवसेनेच्या रुपाने एक समर्थ पर्याय महाराष्ट्रात उभा राहिला असता.
आपला
(मराठी ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Tue, 10/06/2009 - 14:58
नवीन
तसे ते गेल्या विधानसभा निवडणूकीपर्यंत एकत्र होतेच.५० हून अधिक वर्षे काँग्रेस केवळ महाराष्ट्रातच सत्तेवर का राहिली ह्याची मूळ कारणे मिळत नाहीत तो पर्यंत धर्म्,भाषा वगैरे मुद्द्यांवर निवडणूक लढवून मर्यादितच यश हाती येईल असे मला वाटते.
प्रत्येक राज्यात लोकांची मानसिकता वेगळी आहे.राज्याचा शहरी/विकसित भाग वगळला तर ईतर भागांत मराठी-अमराठी मुद्द्यांचा लोकांवर किती प्रभाव पडू शकतो?
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Tue, 10/06/2009 - 16:11
नवीन
मला वाट्ल नव्हत ठाकरे बंधूंच्या कलगीतुरा इतका प्रभाव टा़केल लोकांवर .. निदान मिपासदस्य अपवाद ठरतील अशी अपेक्षा होती पण ती देखिल फोल ठरतेय की काय अशी भिती वाटतेय ......त्या बारिच लोण इथे मिपावर पण पसरले.....कर्म माझ?
(स्वगत)याच साठी का केला होता कळकळ व्यक्त करण्याचा अट्टाहास?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/07/2009 - 04:25
नवीन
आपला अट्टाहास समजू शकतो. दोन भावांचे राजकारण आता बरेच पुढे गेले आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणीतरी आपली तलवार म्यानात घालावी असे होऊ शकत नाही असे वाटते. काल नाश्कातली राज ठाकरेंची सभा काही मराठी वाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपित केली गेलेली होती. राज ठाकरेंचे भाषण चर्चेचे का होते ते अनेकांच्या लक्षात येईल. कालच्या भाषणात पुन्हा परप्रांतियांचा मुद्दा होताच, हे परप्रांतीय केवळ मुंबई पुरते राहिले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कसे पसरले आहेत त्याची व्यवस्थीत आकडेवारी त्यांनी वाचून दाखवली त्याच बरोबर विविध पक्षांच्या आश्वासनांची पॅकेज'ची लबाडी कशी असते तेही सांगितले. असो, तेव्हाच कोणत्यातरी वाहिनीवर उद्धवजी भाषण करीत होते. च्यायला, हा माणूस राजकारणा का आला असे वाटायला लागते. असो, कार्याध्यक्ष असल्यामुळे काही दिवस शिवसेनेचा गाडा ओढता येईल. पण लवकरच त्यांची दुकानं बंद होतील असे वाटते. बाळासाहेबांची सेना वेगळी होती आणि उद्धव ठाकरेची सेना वेगळी आहे. पण, जाऊ द्या ना ! आपण योग्य माणसं निवडली पाहिजे, उगाच भावनेच्या आहारी कशाला जायचं नै का ?
मरण होतय आमच्यासारख्या सेनेवर बाळासाहेबांवर ,उध्दव राजवर नि:स्वार्थी निस्पृह व मनापासुन प्रेम करणार्यांच.
बाळासाहेंबावर प्रेम करणारी माणसं खूप आहेत. दादा,नाना,आप्पा, यांची राजकारणातील वतनदारी बाळासाहेबांनी मोडली. राजकारणात कोणीही सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो हे त्यांनी दाखवुन दिले त्याबद्दल महाराष्ट्रात 'सामान्यांचे राजकारण' यावर मोठा इतिहास लिहिल्या जाईल. त्यांच्या वकृत्वावर प्रेम करणारी खूप मराठी माणसे इथे आहेत. पण, उद्धव साहेबांच्या हातात नेतृत्व दिले ही 'चूक' बाळासाहेबांना आतल्या आत नक्की सलत असेल असे वाटते.
अवांतर : आमच्या तालुक्यात दोनदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. आमच्या तालुक्यात नुसता भगवा रुमाल ज्या माणसाच्या गळ्यात टाकला जाईल तो आमदार होतो. पण, सांगू दहावर्षात केवळ त्या आमदाराचा विकास झाला. याही निवडणूकीला त्यांनाच तिकीट दिलंय शिवसेनेने. ते जर निवडून आले तर जनता सुज्ञ नसतेच असे मी म्हणेन.
-दिलीप बिरुटे
(राष्ट्रावादी समर्थक )
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
Wed, 10/07/2009 - 08:10
नवीन
...सामना चांगलाच रंगतोय असे दिसते आहे!
भेंडीबजार आणि दिलीप बिरुटेंशी सहमत आहे.
राज ठाकरेंना आपला वेगळा सवतासुभा का मांडावा लागला? शिवसेनेत असतांना त्यांची गळचेपी करणारे कोण होते? राज ठाकरे यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंपेक्षा कितीतरी पटीने सरस आहे, हे दिसू लागताच त्यांच्या नावावर मराठी मते फोडल्याची पावती फाडण्याचे धंदे सुरू झाले आहेत.
शिवसेनेने जे पेरले, तेच आता उगवते आहे!
"Great Power Comes With Great Responsibilities"
- Log in or register to post comments
१
१.५ शहाणा
Wed, 10/07/2009 - 15:29
नवीन
राहुल व व रु ण............चे काय ........जरा मुसळ पहा
- Log in or register to post comments
प
प्रभो
Wed, 10/07/2009 - 15:33
नवीन
राहुल व व रु ण............चे काय ........जरा मुसळ पहा???
दोघेही खासदार आहेत/झालेत....
राज आणी उध्दव दोघे मुख्यमंत्री होतील असं म्हणायच का तुम्हाला?????
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Wed, 10/07/2009 - 17:10
नवीन
कुणाला राज व उद्धव ठाकरे यांचा खासगी ई-मेल आय.डी. माहीत आहे का जो ते रोज स्वतः उघडतात?
असल्यास मला सांगा. दोघांना बाकी कसला हक्क नसला तरी वयाच्या हक्काने "सांगेन गोष्टि युक्तिच्या चार"!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
- Log in or register to post comments