Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आंबा कोणता , देवगड की रत्नागिरी..

ग
गोगट्यांचा समीर
Wed, 10/07/2009 - 06:40
🗣 26 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7550 वाचन

💬 प्रतिसाद (26)
प
पर्नल नेने मराठे Wed, 10/07/2009 - 06:42 नवीन
Image removed. चुचु
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/07/2009 - 06:44 नवीन
अधीक माहितीसाठी http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६) http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७) http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८) http://misalpav.com/node/2538 = एप्रिल फळ (९)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/07/2009 - 07:07 नवीन
बाठीला खराब निघत असेल तरी देवगड हापूस. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 10/07/2009 - 07:18 नवीन
>>तर देवगड दिसायला आकर्षक आणि आकाराने जरा अंमळ मोठा करेक्ट ... बाकी देवगड असेल हो सर्वात बेश्ट, अजुन कुठला असायला ? दुसरा कुठला जरी असला तरी देवगड त्याला फाट्यावर मारेलच, मग बाकीच्याच्या भारी असण्याला अर्थ काय उरला ? त्याचा भारीपणा आम्ही कुठल्या खात्यावर मांडायचा ? आमचे मत देवगडला ..!!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/07/2009 - 07:22 नवीन
आमचंही मत देवगडला. अदिती तुम्हाला गुळाची चव समजत असेलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/07/2009 - 07:25 नवीन
आमचेही मत देवगडाला आहे याचा आम्ही पुनरुच्चार करतो. बाकी देवगडाला फाट्यावर मारायला माणकूर कशाला पाहीजे? देवगड सोडून कुठलाही चालेल. फाट्यावर मारणं महत्वाचं. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नंदन Wed, 10/07/2009 - 07:31 नवीन
पेशव्यांशी सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
निखिल देशपांडे Wed, 10/07/2009 - 08:02 नवीन
आमचही मत देवगडलाच निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
सखाराम_गटणे™ Wed, 10/07/2009 - 08:21 नवीन
आमचे ही मत देव्ग्द ला देवगड कोणत्याही आंब्याला फाट्यावर मारु शकतो. अगदी अमेरिकन अल्फासो सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
श
श्रावण मोडक Wed, 10/07/2009 - 08:24 नवीन
आंब्यांची उस्तवारी इतक्यात सुरू झाली? छान. आमचे मत देवगडलाच. फळ गोमटे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
ग
गोगट्यांचा समीर Wed, 10/07/2009 - 07:33 नवीन
>>त्याचा भारीपणा आम्ही कुठल्या खात्यावर मांडायचा ? रत्नागिरी.. या खात्यावर / नावावर मांडा की हो ... अस्सल रत्नागिरीकर तर म्हणतात की रत्नागिरीच्या १०० किमी परिघाबाहेर आंबा कळत नाय विशेष ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ज
जे.पी.मॉर्गन Wed, 10/07/2009 - 07:22 नवीन
ही अशी छायाचित्र कृपया टाकू नका हो ! न ते ही ऑक्टोबर महिन्यात ......... त्रास होतो ! आमचं मतही देवगडलाच बरंका !
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 10/07/2009 - 08:11 नवीन
दोन्ही आंबे पेटीभर पाठवा, पुर्ण अभ्यासाअंती निर्णय जाहीर करतो. एक्स्परीमेंटलीस्ट, ५-६ वर्षांपासुन पायरीची पण चव विसरलेला. :|
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Wed, 10/07/2009 - 08:37 नवीन
गोगट्यांच्या समीरशी सहमत रत्नागिरी हापूसला तोड नाही.
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Wed, 10/07/2009 - 08:40 नवीन
खोबरी आंबा हा प्रकार कोणी खाल्लाय का? हे फळ कितीही कच्चं असलं तरी याला यत्किंचितही आंबटपणा नसतो.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 10/07/2009 - 08:52 नवीन
दोन्ही प्रकारचे आंबे दोन दोन डझन पाठवुन द्या. खावुन सांगतो कोणता चांगला ते ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 10/07/2009 - 09:51 नवीन
समीर, का रे तुला आंबा आठवला? @) Image removed. Image removed. Image removed. या दिवसात मस्त पेरु, पपई, संत्रे, मोसंबे, डाळिंबे, सफरचंद खायची सोडुन आंब्यांची अवदसा कोठुन आठवली बाबा तुला? चुचुताई, असे फोटो टाकुन बादलीभर लाळ गाळायला लावणे, बास करा आता ;;) ;;) सध्या देवगड हापुसच्या रसाने भरलेल्या (घरघुती) बाटल्या संपविण्यात मग्न आहोत, त्यामुळे आंब्याची अशी ऊणीव भासत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गोगट्यांचा समीर Wed, 10/07/2009 - 11:02 नवीन
आठवणेच हातात आहे म्हणून आठवला... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
ग
गणपा Wed, 10/07/2009 - 11:20 नवीन
आज आत्ता ताबडतोब आंबे चापून येतो !! आलोच थांबा !! (इकडे १२ मास आंबे मिळतात) बाकी आपण आंबे देवगड की रत्नांगिरी असल्या वांझोट्या चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा , सरळ संपवतो .. ;)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 10/07/2009 - 11:57 नवीन
इकडे पण १२ महिने मिळ्तात पण ते फिलिपिन्स चे असतात :S चुचु
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 10/07/2009 - 18:40 नवीन
इकडे पण १२ महिने मिळ्तात पण ते फिलिपिन्स चे असतात
हॅहॅहॅ ... फिलीपिन्स चे आंबे फारंच छोटे असतात म्हणे ... अफ्रिकेत एकेक आंबा हे एवढा एवढा ... कितीपण खा .. :) एकात गार .. बाकी आपल्याला तर ह्या आधीच म्हंटल्याप्रमाणे तोतापुरी आंबाच आवडतो .. बाकी आंबे कसे थुलथुलीत न लिबलिबीत, पिचलेले.. खराब होतात लगेच .. ह्याआआआआ !! - (तोतापुरी आंबे प्रेमी) टार्‍या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
आ
आर्य Wed, 10/07/2009 - 16:31 नवीन
का असा काटा कढताय, असे झकास फोटु लाऊन. आंबा म्हणजे आंबा, पण ...देवगडला तोड नाहि.....................
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Wed, 10/07/2009 - 21:03 नवीन
कनचा पन.. देवगडचो असा, रत्नागिरीचा असो नायतर आमच्या चिपलूनचा.. जल्ला आम्बा म्हनला की आपन 'ठार'.. माझे खाजगी मत मात्र 'देवगड'च्या हापूस आंब्यालाच!! ह्याच विषयाला धरून थोडे बोलू इच्छितो.. ( कृपा करून 'विषयांतर..विषयांतर.. म्हणून ओरडू नये, ही विनंती.. :) ) वर 'खोबरी आंबा' चा उल्लेख आला आहे. कधी जमले तर्र या आमच्या गावाला.. शेजार्‍यांच्या पडवीत आहे एक झाड.. आम्ही ह्या प्रकारच्या आंब्याला 'खोबरांबा' म्हणतो.. हा खरेच आंबट नसतो.. लहानपणी आम्ही सवंगडी गोळा करून हे आंबे दगडाने पाडून, अंगावरच्या शर्टाला पुसल्यासारखे करून खोबर्‍याची कवड खावी तसे खायचो.. आमच्याकडे बहुतांशी 'रायवळी' आणि 'कलमी' प्रकारचे आंबे असतात. 'रायवळी' प्रकारात.. 'साधा हिरवा', 'रातांबा' (हा देठाकडे थोडा लाल-पिवळसर असतो), 'खोबरांबा' आणि 'आमटांबा' (हा फारच आंबट असतो).. हे आंबे येतात.. आफ्रिकेत (नायजेरियामध्ये) जवळजवळ ९ महिने भरपूर आंबे मिळायचे.. पण त्यांची तुलना इथे करणे म्हणजे 'पु.लं.'च्या भाषेत 'गांडूळाला शेष म्हणन्यासारखेच आहे' ह्या धाग्याच्या अनुषंगाने आपणही माहितीत थोडी भर घालावी ही नम्र विनंती.. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी ताज्या कैरी पाडून आजीच्या हातून त्याला तिखट-मीठ-तेल लावून जेवणावर बचकाभर खाल्लेल्याच्या आठवणी जाग्या होतात.. सुट्टी संपत आली की आजीची आंबे-फणसाची 'साठे' (आंबा-पोळी, फणस-पोळी) करतेवेळी होत असायची ती लगबगही आठवते.. ह्या आठवणी अजूनही हळव्या करून जातात.. - हुंड्यात हापूस आंब्याची झाडे मागण्याच्या विचारात असणारा.. कोकणी फणस
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/08/2009 - 04:40 नवीन
आमच्याकडे रातांबा कोकमालाच म्हणतात. त्याचा उच्चार रातांबीचं झाड असा असतो. म्हणजे झाडाला रातांबीचं झाड म्हणतात. त्याची लाल फळं पाडवून ती फळं फोडून त्यापासून आमसोलं करतात. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 10/08/2009 - 02:50 नवीन
आंब्यात आंबा देवगडचा.रत्नागिरी आंबा म्हटलं तरी तो देवगडचाच अश्या उद्देशाने म्हटलं जातं. पातळ साल,केशरी रंग,भरपूर गर,आंबा चांगला पिकला म्हणजे त्याच्या सालीला सुरकुत्या पडतात,एक वेळ "एलिझाबेद परफ्युम" लपवूं शकाल पण देवगडचा हापूस अश्यक्य.नाकाजवळ आंबा आणल्यावर सुगंध दरवळतोच शिवाय डोळे चमकतात,तोंडात लाळ येते,पोटात भूक वाढते,आणि खाऊ का गिळू असं वाटतं. मी कोकणातलो म्हणून देवगडच्या आंब्याचे गुण गातंय! काय समजल्यात? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 10/08/2009 - 06:23 नवीन
रत्नागिरी आंबा म्हटलं तरी तो देवगडचाच अश्या उद्देशाने म्हटलं जातं
बरोबर. १९८१ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा नव्हता.देवगड रत्नागिरी जिल्ह्याचाच भाग होता. नविन जिल्हा झाल्यावर देवगड हापुस बाजारात येवू लागला. २० वर्षापुर्वीपर्यंत लाकडी पेटीतून आंबे येत. परळ बस स्थानकातून आंब्याची पेटी एस टी वरुन उतरवताना बघणे हा सुट्टीच्या दिवसांतला एक भाग असायचा.खिळे ठोकून बनवलेली पेटी उघडणे ही एक डोकेदुखी असायची.आता जाड पुठ्ठ्यांच्या पेट्या असल्याने पेटी उघडून पटकन आंबे खाता येतात. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा