Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टाटा स्काय प्लस... माहिती हवी आहे...

भ
भडकमकर मास्तर
Fri, 10/09/2009 - 12:50
🗣 33 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19590 वाचन

💬 प्रतिसाद (33)
ट
टारझन Fri, 10/09/2009 - 13:02 नवीन
नुसतीच माहिती मिळवण्यासाठी "एक लाईनचे पुचाट धागे" काढणारांनी शिकावे असा धागा !! मास्तर योग्य प्रकारे मदत मागितली आहे. तुम्ही काय हो पर्वा करता ९ हजाराची .. २ दाढा कोरल्या की झाले :) डिटीएच च्या कोणत्याही सर्व्हिसची क्लिअ‍ॅरिटी कळण्यासाठी आपल्या कडे अंमळ मोठा टिव्ही हवा ... आपल्या २१-२९ इंची टिव्ही वर काही फरक कळत नाही. स्वस्त असेल ते घ्या !! रेकॉर्ड करून कार्यक्रम पहाण्याच्या फंदात कोणी पडतो असे वाटत नाही ... तरीही ब्रांड मुळे टाटा स्कायची सर्व्हीस चांगली आहे !
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 10/09/2009 - 13:20 नवीन
असे ऐकले आहे की टाटा स्काय च्या सेट्टॊप बॊक्सला मागे ऎचडीटीव्हीसाठी यूएस्बीची सोय आहे. पण हे एचडी टीव्ही काय अस्ते म्हणे? रेकॉर्ड करून कार्यक्रम पहाण्याच्या फंदात कोणी पडतो असे वाटत नाही मी पाहीन असे वाटते. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 10/09/2009 - 13:16 नवीन
एच डी टिव्ही. हाय डेफिनेशन टि व्ही. जास्त चांगल्या पिक्चर क्वालिटी असते म्हणे त्याची. बहुद्धा पिक्सेल प्रति स्केअर इन्च जास्त असतील. ................................................. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 10/09/2009 - 13:30 नवीन
http://electronics.howstuffworks.com/hdtv.htm येथे बरीच सविस्तर माहिती दिली आहे. बाकी टाटा स्काय (+) बद्दल काहिच माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ज
ज्ञानेश... Fri, 10/09/2009 - 14:31 नवीन
माझ्याकडे टाटा स्काय (साधे) आहे. डिश टीव्ही आणि बिग टीव्ही(रिलायन्स) पेक्षा निश्चितच चांगली सेवा आहे. (एयरटेलच्या डिजीटल टीव्हीबद्दल माहिती नाही.) 'प्लस' यापेक्षा नक्कीच चांगले असणार. पाच हजारात मिळतंय, तोवर घेऊन टाका. कार्यक्रम/मॅच रिवाईंड किंवा रेकॉर्ड करून बघता येईल. दाल- चावल ऐवजी दम बिर्यानी मिळत जाईल, शिवाय केव्हाही उठून सुसूला जाता येईल. मज्जा! "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/09/2009 - 13:51 नवीन
जास्त माहिती नाही, पण डिश टी.व्हीपेक्षा टाटा स्कायची क्वालिटी चांगली आहे. रिलायन्सची त्यापेक्षा चांगली असण्याची दाट शक्यता आहे. ज्या प्रकारचं एन्कोडींग करतात त्यावर हे अवलंबून असतं. ही माहिती या क्षेत्रात काम करणार्‍यांकडून! मी स्वतः डीश टी.व्ही. वापरायचे, ठीकठाक होती क्वालिटी. अदिती
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 10/09/2009 - 14:25 नवीन
झिंगालाला, झिंगालाला हुर्र हुर्र
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Fri, 10/09/2009 - 15:56 नवीन
आमी माय बाप स र का र ची D T H सेवा वापरतो. लइ बरि वाटते
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Fri, 10/09/2009 - 18:12 नवीन
टारूभाउने सांगीतल्या प्रमाणे जंगी मोठा फ्लॅट्स्क्रीन टी.वी. घरात हवा. चित्राचा दर्जा उत्तम. महीना रु. ५००/- रिचार्ज ला पडतात. एअरटेल सुद्धा उत्तम. सध्या जमशेदपुरला आहे, हॉटेलवाला एअरटेल सुविधा देत आहे. एल्.सि.डी.- टी.वी. वर चित्राचा दर्जा व आवाज उत्तम . तुम्ही काय हो पर्वा करता ९ हजाराची .. २ दाढा कोरल्या की झाले घेऊन टाका! तिच्या आयला! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 10/09/2009 - 18:31 नवीन
>>चित्राचा दर्जा उत्तम. महीना रु. ५००/- रिचार्ज ला पडतात. क्काय ? ते कसं काय शेठ ? मी गेले अलमोस्ट २ वर्षे टाटास्काय वापरत आहे, क्वालिटी बेस्ट ह्यात वादच नाही, अगदी घातलेल्या पैशाचा पुर्ण आनंद मिळतो मला. पण हे रेट्सचे आकडे माझे वेगळे आहेत ... १. सुपर सेव्हर पॅक : २६० / महिना २. लाईफ स्टाईल गोल्ड = ४० रुपये / महिना ३. ई एक पी एन/ स्टार स्पोर्ट्स = ४० रुपये / महिना हे सध्या मी वापरतो .... तुम्ही म्हणता ते ५०० चे पॅकेज कुठले शेठ ? अवांतर : भडकमकर मास्तर्,माझा पर्सनल सल्ला असा आहे की ही सुविधा वापरणार असाल तर पहिल्यांदा कमीत कमी "३२ इंची प्लास्मा किंवा एल सी डी टीव्ही"घ्या, मगच ह्याचा आनंद एकदम खटाखट मिळेल ... मुद्द्याचे : ५००० ची ऑफर लै भारी आहे, घेऊन टाका. मी स्वतः घेत आहे, कितपत वापरेन ते माहित नाही पण घेत आहे. माझी बर्‍याच दिवसाची इच्छा होती जेव्हा हे लाँच झाले त्यापासुन, आता तेच ५००० ला मिळते आहे तर का सोडा ? अर्थात मी सद्यस्थिती ग्राहक असल्याने मला अजुन स्वस्तात मिळेल. पण तुम्ही घेऊन टाका बिनधास्त .... ------ (टाटा स्कायप्रेमी ) टाटोबा स्कायर ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
भ
भडकमकर मास्तर Sat, 10/10/2009 - 06:01 नवीन
मस्त.. धन्यवाद... टाटास्कायच्या वेबसाईटवरती माझे नाव घेण्यासाठी इच्छुक म्हणून टाकून ठेवले होते काल दुपारी ४ वाजता. ५ वाजता फोन आला... क्रेडिटकार्डावरती बुकिंग करून सुद्ध टाकले आहे. ( पहिला महिना फ्री सब्स्क्रिप्शन आणि बिनव्याजी आणि बिनप्रोसेसिंग फीचे सहा हप्ते ईएमाय कार्डावरती लावून दिले आहेत....४९९९ अधिक १००० रुपये इन्स्टॉलेशनचे असे ५९९९ रुपये होताहेत ते सहा महिन्यांच्या ९९९.८३रुपयांच्या हप्त्यात आहेत.... हे तर येकदम परवडणारे आहे... घेऊन टाकले...) शिवाय पॅकेजेस विविध उपलब्ध आहेत... मला २७५ मध्ये मला हवी अस्लेली चॅनेल्स मिळत आहेत... बाकी स्टार क्रिकेट वगैरे लागतील तशी घ्यायची... चाल्तंय... फक्त टाटाच्या टायमिंगच्या आश्वासनावर साशंक आहे,. :( ( टाटा ब्रॉडबँड पाच दिवसात इन्स्टॉलेशन होईल म्हणाले होते आणि पैसे भरून २५ दिवस झाले तरी कोणाचा फोन नाही, इन्जिनियराचा पत्ता नाही...मी तीन चार दिवस कस्टमर केअरशी अर्धा अर्धा तास फोन वरती एस्केलेशन करून करून भांडाभांड करत होतो, तेव्हा कुठे काम झाले.... ) .... ४८ तासांत इन्जिनियर ये ई ल म्हणत आहेत.... अगदी ४८ नाही निदान ९६ तासांची मनाची तयारी केली आहे...... त्यानंतर कस्टमर केअर आहेच... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सखाराम_गटणे™ Sat, 10/10/2009 - 06:07 नवीन
चांगलेच नेट लावुन नेट आणले तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
द
दशानन Sat, 10/10/2009 - 06:10 नवीन
मेट्रो सिटी मध्ये टाटाची सर्व्हिस चांगली आहे... मी ऑफिस मध्ये टाटा स्काय वापरत आहे... चांगली सर्विस आहे व ऑनलाईन जवळ जवळ सर्व कामे होतात त्यांच्या साईट द्वारे त्यामुळे आज पर्यंत तरी ग्राहकसेवा केंद्राशी संपर्क करण्याचा दिवस आलाच नाही ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Sat, 10/10/2009 - 06:13 नवीन
४८ तासांत इन्जिनियर ये ई ल म्हणत आहेत.... अगदी ४८ नाही निदान ९६ तासांची मनाची तयारी केली आहे.. हे लिहिल्यानंतर दोन मिन्टातच इन्जिनियराचा फोन आला... दुपारी बसवून टाकत आहेत.... उत्तम झाले... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
द
दशानन Sat, 10/10/2009 - 06:14 नवीन
पेढे वाटा पेढे ;) तुम्हाला तर टाटा पावला =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Fri, 10/16/2009 - 06:32 नवीन
सध्या लै भारी चालले आहे... सर्व कार्यक्रम रेकॉर्डेड पाहतो... एक दोन दिवस आधी सर्व चॅनल चेक करत रेकॉर्डिंग लावून ठेवायचे, घरी आले की प्लॅन करून भराभरा पाहायचे.. उत्तम आहे.... नेहमी न पाहिले जाणारे इंग्रजी सिनेमे पुष्कळ सापडले. ( काल एक मेसेज इन अ बॉटल नामक छान सिनेमा पाहिला) ... सारेगमप मध्ये पल्लवीची बडबड आणि नॉन्सेन्स न पाहता गाणी ऐकायची बाकी सारे पुढे ढकलतो.. अर्ध्या तासात पाहून होतो कार्यक्रम.. ;) असे काही सध्या टाटास्काय प्लसचे फायदे जाणवले आहेत... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
स
संजय अभ्यंकर Sat, 10/10/2009 - 17:57 नवीन
मी रु. ५००/- प्र. म. भरतो. तपशील पहावा लागेल, बहुदा किती चॅनल घेतलेत त्यावर असावे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ह
हरकाम्या Fri, 10/09/2009 - 21:41 नवीन
माझे " टाटा ईंडिकॉम " व "टाटा कार्ड " चे अनुभव न विसरण्यासारखे आहेत त्यामुळे मी "टाटा स्कायच्या " नादी लागलो नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमित बेधुन्द म… Sat, 10/10/2009 - 06:38 नवीन
टाटा स्कायची क्वालिटी चांगली आहे. आणि महिना बिल रीचार्ज पद्त आहे , तांत्रिक सपोर्ट उत्तम आहे कारण बेस्ट सर्विस आणि क्लॆरिटी यावरच कस्ट्मर टाटा स्काय कडे आकर्षित होतात मी स्वता टाटा स्काय मध्ये ३ १/२ वर्ष काम केले आहे
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 10/11/2009 - 04:23 नवीन
मीही दोन तीन वर्षे टाटा स्काय (साधे) वापरत आहे. तशी चांगली सेवा आहे, पण एकच प्रॉब्लेम आहे. मी जेंव्हा घेतले तेव्हा जुने चित्रपट व गाणी दाखविणारा झी क्लासिक नामक चॅनेल होता जो माझ्या वडिलांना आवडत असे तो दोन महिन्यातच बंद झाला. त्यामुळे पुष्कळदा असे होते की कुठल्याच चॅनेलवर पाहण्यासारखे काही नसते. त्यापेक्षा आमच्या केबलवाल्याच्या एका चॅनेलवर सतत जुनी किंवा रिसेंट चांगली गाणी वा पिक्चर्स सतत चालू असायचे जी एक बर्‍यापैकी एन्टरटेन्मेंट होती. गुबगुबीत गुल पनागला सारखे पाहून घ्यावेसे वाटत होते पण किंमत अंमळ जास्त वाटली..
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 10/11/2009 - 04:30 नवीन
>गुबगुबीत गुल पनागला सारखे पाहून घ्यावेसे वाटत होते पण किंमत अंमळ जास्त वाटली.. हर हर हर (काळे काकांच्या सौजन्याने) डॉक्टर तुम्हीसुद्धा? :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/12/2009 - 11:39 नवीन
ही आमची गुल पनाग. हीच्या अ‍ॅक्टींगवर आमचा भारी जीव! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ऋ
ऋष्या Mon, 10/12/2009 - 11:32 नवीन
माझ्याकडे साधे टाटा स्काय कनेक्शन आहे. एकूण अतिशय छान आहे. डाऊन टाईम एकदमच कमी. (आतापर्यन्त दोनदाच जोराचा पाऊस आला असताना १/२ तास बन्द होते. तसा मेसेज ही दिसतो आणि नन्तर आपोआपच सुरूदेखिल होते. ) मी १०००/१५००/- चे टॉप अप करतो आणि परिस्थिती प्रमाणे पॅकेज ठरवतो. (स्पोर्टस वगैरे). ईतर वेळी २७५/- चे पॅकेज चालू देतो. मी घरात जेव्हढा वेळ असतो त्यासाठी ते पुरते. प्लस चा अनुभव नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/14/2009 - 18:49 नवीन
आमच्या संकुलात टाटा स्काय आहे. एक वर्षे वॉरंटी नंतर जर दोष झाला तर त्याचे प्रत्येक वेळी चार्जेस ३५०/- आपण अ‍ॅग्रिमेंट सही करताना वाचले तर ते पुर्ण एकतर्फी आहे.एवढे मोठे अ‍ॅग्रीमेंट वाचायला वेळ नसतो. त्यापेक्षा सही पटकन केली की झाले. कराराने हार्डवेअर ही त्यांची मालमत्ता आहे. पण नीट ठेवण्याची जबाबदारी तुमची.तुम्ही टाटास्कायचे सेट टॉप बॉक्स एलएनबी (अँटेना) फक्त भाड्याने घेतल्यासारखे आहे. एकावर्षानंतर ए एमयु करण्यासाठी सांगतात.त्याचे चार्जेस २०००/- प्रतिवर्ष. नाही केले आन बिघडले कि सेवामुल्य भरपुर. म्हण्जे टाटाला आपल्या प्रॉडक्ट बद्दल वर्षाने खात्री नाही. परवा नो सिग्नल दोषासाठी टाटा स्कायवाला आला. काही तरी कनेक्षनचे केले हँग झाले सांगुन रिसेट केले. चालु झाले व तो गेल्यावर पाचच मिनिटात पुन्हा तोच दोष. मग जालावर तक्रार केली तोपर्यंत प्रिपेड मधुन ३५०/ कट व बॅलन्स ऋणभारित. आज येउन एम्डीयु ( बिल्डींगचे कॉमन अँटेना / मल्टी ड्वेलिंग युनिट) ते सेट टॉप बॉक्स मधील कनेक्टर पुन्हा बसवले व चालु झाला. आमचे संकुल साल टाटामय आहे. सध्याच्या मार्केटिंग मध्ये छुप्या गोष्टी खुप असतात. विक्रीपश्चात सेवा ही वाजवी मुल्यात कधिच नसते. आपण वस्तु खरेदी करेपर्यंत अगदी गोड बोलतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश सहस्त्रबुध्दे गुरुवार, 10/15/2009 - 08:29 नवीन
टाटा स्काय वा डिश टिव्ही व सेट टॉप बॉक्स ह्यांच्या मध्ये नक्की काय फरक आहे? मी मुंबईत राहतो व मी आमच्या केबलवाल्याकडून १२०० रुपयात सेट टॉप बॉक्स बसवून घेतला आहे.त्यावर मला जवळपास २७० चॅनेल्स दिसतात. व ती देखील २०० रु प्रतिमहिना ह्या दरात. सर्वच चॅनेल्स चा दर्जा चांगलाच दिसत आहे. पुर्वी नुसती केबल असताना काहि चॅनेल्स फारच खराब दिसत होती. सेट टॉप बॉक्स बसवल्यापासून सर्वच चॅनेल्सचा चित्राचा दर्जा फारच चांगला झाला आहे. हा एक स्वस्त पर्याय असताना टाटा स्काय वा डिश टिव्ही हे नक्की वेगळे काय देत असतात? कुणाला माहिती आहे काय? अविनाश सहस्त्रबुध्दे
  • Log in or register to post comments
प
प्रशु गुरुवार, 10/15/2009 - 13:33 नवीन
या सगळ्या डी टी एच वर सगळ्या मराठी वाहिन्या एकत्र दिसतील असे एखादे पेकेज आहे का? आमच्या कडे झी २४ तास, झी ची चित्रपट वाहिनी दिसत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुहास गुरुवार, 10/15/2009 - 22:29 नवीन
हे टाटा स्काय किंवा डीश चे सेट टॉप बॉक्स computer मध्ये TV tuner card टाकून जोडता येतात काय? --सुहास
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 11/05/2009 - 18:28 नवीन
माझ्या अनुभवाप्रमाणे ते TV Tuner Card ला जोडता येईल. मी आमच्याकडीत सेट टॉप बॉक्स (CAS अर्थात केबलचालकाने दिलेला)मध्ये तसे केले होते. फक्त आवाजाकरीता वेगळा मार्ग अवलंबिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 11/05/2009 - 10:56 नवीन
कळवण्यास आनंद होतो की आमचेकडे टाटास्कायप्लस उत्तम चालू आहे. सर्व सुविधा मजेदार आहेत.... रात्री-अपरात्री असलेले सिनेमे रेकॉर्ड करण्यासाठी ( आणि नंतर सवडीने पाहण्यासाठी भयानक उपयोगी).... सारेगमप मधली पल्लवी जोशीची बडबड ( आता कसं वाटतंय? ऑल द बेस्ट.. खूप शुभेच्छा, .... जोरदार टाळ्या... याच्यात्याच्या स्मृतीमध्ये टाळ्या ) , शिवाय जाहिराती वगैरे पुढे ढकलून काही चांगली गाणी पहायचा आनंद मिळतो...... अशा प्रकारे कार्यक्रम अर्ध्या तासात पाहता येतो... वेळेची बचत हाच पैसा.. ;) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/05/2009 - 18:42 नवीन
फक्त एक राहिलं मास्तर आमचेकडे श्री कृपेकरुन टाटास्कायप्लस उत्तम चालू आहे. .....असं हवं होतं!! (कृपाळू)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
वेताळ Fri, 11/06/2009 - 06:53 नवीन
रात्री-अपरात्री असलेले सिनेमे रेकॉर्ड करण्यासाठी ( आणि नंतर सवडीने पाहण्यासाठी भयानक उपयोगी).... कसले सिनेमे रात्री अपरात्री तुम्ही रेकॉर्ड करता? काही माहिती मिळेल का? वेताळ
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Fri, 11/06/2009 - 07:18 नवीन
कसले सिनेमे रात्री अपरात्री तुम्ही रेकॉर्ड करता? काही माहिती मिळेल का? हो हो... आम्हाला पण माहिती पाहिजे... स्क्रीनशॉट / क्लिपा डकवल्यास उत्तम. आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
भ
भडकमकर मास्तर Fri, 11/06/2009 - 12:49 नवीन
कसले सिनेमे रात्री अपरात्री तुम्ही रेकॉर्ड करता? काही माहिती मिळेल का? अहो भारतीय दूरचित्रवाणीवरचे " गेले ते दिन गेले" ... इतकेच म्हणेन... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा