Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऐरावती रत्न थोर

व
विकास
Fri, 10/09/2009 - 17:32
🗣 35 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
9221 वाचन

💬 प्रतिसाद (35)
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/09/2009 - 18:43 नवीन
ओबामाला फायदा कमी आणि तोटा जास्त होइल याचा. अवांतरः ते पैसे टॅक्स फ्री असतात का?
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 10/09/2009 - 19:01 नवीन
भांडखोर जोशांना भांडणापासून परावृत्त करण्यासाठी जसा 'जेपी' हा किताब दिला गेला....वपूंची गोष्ट...जेपी... तसंच अमेरिकेच्या राष्टाध्यक्षांवर हे नैतिक बंधन घातले असावे.....अण्वस्त्र प्रसार आणि युद्धखोरीपासून परावृत्त करण्यासाठी...असं तर नाही ना आपल्याला म्हणायचे? विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 10/09/2009 - 21:41 नवीन
ओबामाने ह्या पारितोषकाला नम्र नकार द्यावा. दोन चार वर्षात काही ठोस कामगिरी झाली तर जरूर विचार करा असे सांगावे. नाहीतर विरोधकांच्या हातात आयतेच कोलित. अफगाणिस्तान वा इराकमधून माघार घेतली तर विरोधक जोरात बोंबलणार की नोबेलची लाच मिळाली म्हणून हा असे बुळेपणाचे काम करत आहे. (ह्या गटाचे विरोधक कमालीचे आक्रमक, आक्रस्ताळे आहेत. माघार, शांतता, मुत्सद्दीपणा, विरोधी देशांशी वाटाघाटी असे काही ऐकले की ह्यांचे पित्त खवळते आणि आश्चर्य म्हणजे ह्या लोकांना अनेक लोक पाठिंबा देतात. विशेषतः धार्मिक ख्रिश्चन लोक!) युद्धातून माघार न घ्यावी तर अत्यंत खर्चिक, निरर्थक, अनंतकाळ चालणारे युद्ध लढत रहाण्याचा पर्याय. एकंदरीत हे विकतचे दुखणे आहे. वरवर दिसायला बरे वाटले तरी नंतर त्रासदायक. मूळ लेखाशी अगदी १००% सहमत.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 10/11/2009 - 08:29 नवीन
पुरस्काराचा स्वीकार केला आहे पण एक आव्हान म्हणूनच. लोकसत्तातील बातमी. 'हा सन्मान न्याय व शांततेसाठी लढणाऱ्या सर्वाचाच’; पुण्यातील प्रकाशकाला ओबामांचा ई-मेल त्यानुसार त्यांनी म्हटले आहे की, "केवळ एखाद्या गोष्टीतल्या यशासाठीच नोबेल पुरस्कार दिले गेलेले नाहीत, तर त्यामागच्या प्रयत्नांसाठीही हे पुरस्कार दिले जातात याची मला जाणीव आहे. त्यासाठीच एक आव्हान म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारत आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
द
दशानन Sun, 10/11/2009 - 10:40 नवीन
एक चुक ;) तो मेल पुण्याच्या प्रकाशकाला नाही आला आहे तो आला आहे ओबामाच्या मित्राला दिल्ली मधील एक वकील सूरत सिंह यांना.. ओबामा व ते एकत्र शिकत होते हावर्ड मध्ये :) दुवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
श
श्रावण मोडक Sun, 10/11/2009 - 10:50 नवीन
सध्या सज्जनव्रती आहात ना? तरी या वादात असे कसे पडताहात? अहो, ओबामांचे असे मेल जगभरात किमान काही हजार लोकांना गेले आहेत. त्यात हे दोन आहेत. ओबामांचे असे मेल एरवीही अनेकदा जात असतात. आणि ते का आणि कसे जातात हे काय सांगण्याची गरज आहे? एकूण मी आधी म्हटलं तसं, ओबामांना नोबेल म्हणजे आपलाही सन्मानच की हो. शेवटी ते हनुमानभक्त आहेतच. पुण्याच्या बातमीत एक बरा भाग आहे, ओबामांच्या मेलिंग लिस्टवर हे प्रकाशक आहेत असा उल्लेख त्यात आहे. एकूण, काय त्या मेलचे कौतूक, त्याची काय ती बातमी आणि त्या बातमीची काय ती बातमी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Sun, 10/11/2009 - 10:54 नवीन
आताच हि चुक लक्ष्यात आल्यावर दुरुस्त करायला आलो होतो, ते दोघे मेलिंग लिस्ट मध्ये आहेत व अजून खुप जणे आहेत त्यांच्या मेलींग लिस्ट वर ;) स्वारी बरं का.. मी आपला परत सज्जन मोड मध्ये जोतो .... जय श्री राम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ध
धनंजय Fri, 10/09/2009 - 22:25 नवीन
हे नोबेल पारितोषिक म्हणजे ओबामा यांना "अवघड जागी मुका" होणार असे दिसते. प्रेम दाखवणार्‍याला फटकारताही येत नाही, पण लफड्याचा बभ्रा करणार्‍यांसाठी आयता प्रसंग मिळतो. लेखात चांगला आढावा घेतला आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/11/2009 - 17:52 नवीन
लेख आवडला. चांगल्या पद्धतीनेही (नेहेमीप्रमाणे) मांडला आहे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विष्णुसूत Fri, 10/09/2009 - 22:42 नवीन
विकास , आपण केलेले मुद्देसुद अ‍ॅनालिसीस ( मराठि शब्द ?) आवडले. हा पुरस्कार म्हणजे एक प्रकारे अमेरीके वर युध्दबंदि ( अफगाणिस्तान व इराक) व माघार घेण्यासाठि वापरलेले एक दबावतंत्र आहे असे माझे हि मत आहे. लेख आवडला. (एन पी आर श्रोता) विष्णुसूत
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/09/2009 - 23:46 नवीन
अ‍ॅनालिसीस - विश्लेषण, चिरफाड,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विष्णुसूत
व
विष्णुसूत Fri, 10/09/2009 - 23:56 नवीन
विश्लेषण हा शब्द नेमका आठवत नव्हता. चिरफाड काहि बरा वाटत नाहि. अ‍ॅनालिसीस हा शब्द एकदम "फिट्ट" वाटतो ! असो ! मराठि लिहिताना काहि "पर- भाषिय" शब्द देवनागरी तुन लिहिले तर ते खपवुन घ्वावे हि मिपाकरांना विनंती. धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अडाणि Sat, 10/10/2009 - 00:27 नवीन
विकासराव, सुंदर विवेचन. लेख आवडला. देव काकांशीही सहमत. - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Sat, 10/10/2009 - 00:34 नवीन
लेख बराचसा पटला असला तरी नोबेल सारख्या पातळीवर असे घडावे हे पचत नाही. स्वगतः- लेका शाहरुख, जागतिक राजकारणावर भाष्य करण्याआधी प्रोजेक्ट टीमने तुला न समजणारे राजकारण करून ज्यादा काम टाकलंय तुझ्यावर ते बघ आधी..
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 10/10/2009 - 04:29 नवीन
असे म्हणतात की ओबामाचे पुरस्कारासाठी नामाकंन ओबामा राष्ट्राध्यक्ष व्ह्यायच्या २ आठवडे आधी केले गेले होते. म्हणजे तो राष्ट्राध्यक्ष व्हायच्या आधीच्या त्याच्या कामगिरीवर त्याची निवड झाली? ह्या पुरस्काराने ओबामावर अजुन चांगल्या भरीव, ठोस कामगिरीसाठी दडपण येणार नक्की. बिचारा..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/10/2009 - 04:42 नवीन
आवडला लेख.
  • Log in or register to post comments
N
Nile Sat, 10/10/2009 - 06:43 नवीन
सो मच फोर नोबेलः हे घ्या: http://gregmankiw.blogspot.com/2009/10/first-year-grad-student-wins-nobel.html :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 10/10/2009 - 07:31 नवीन
नो कमेंटस् --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 10/10/2009 - 08:29 नवीन
माहितीपूर्ण लेख. क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 10/10/2009 - 13:44 नवीन
चांगला लेख! माझ्या मुलाने शाळेत जाता जाता बातमी ऐकली. घरी आल्यावर दारातच तो म्हणाला, 'what these people really want?'.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/10/2009 - 14:14 नवीन
लेख आवड्ला. काही एक अपेक्षीत धोरण ठेवून असा मोठा पुरस्कार दिला जातो, असे असेल तर चांगलीच गोष्ट. पण जगभरातून नोबेल पुरस्कारासाठी ज्या नावांच्या शिफारशी आल्या होत्या त्यात त्यांचे नावच नव्हते म्हणे (बातम्यांवरुन म्हणतो ). आणि नोबेल समितीला खुलासा करावा लागतोय. (म्हणजे हा पुरस्कार का दिला हे सांगतच असतील म्हणा) तसेही तज्ञांच्या उलटसुलट प्रतिक्रिया वाचायला मिळतच आहेत. म्हणजे पुरस्कार जरा लवकर मिळाला कर्तृत्व अजून सिद्ध झाले नव्हते. 'जगाला अण्वस्त्रमुक्त करण्याच्या दृष्टीमुळे शस्त्र नियंत्रणाला बळकटी मिळत आहे वगैरे इत्यादी हे नोबेल चे कारण असेल तर आणखी एक वाचले की, मुस्लीम राष्ट्रांचा विश्वास मिळवला आहे, असेच काही तरी. (म्हणजे मुस्लीम जगाच्या दृष्टीने इतके अविश्वासू आहेत ? ) असो, विषयाला खूप फाटे फूटतील. "जागतीक नेतृत्वास" जेंव्हा अचानक सर्वोच्च पारीतोषिक त्याची राजकीय घडी बसत असतानाच मिळते तेंव्हा ते बक्षिस नसून एकीकडे मागणी असते'' वाक्यातला विचार पटला ! लेखाबद्दल धन्यू...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 10/10/2009 - 14:32 नवीन
पुरस्कारावरून कार्याचे मोठेपण ठरवणे चुकीचेच, सर्वसामान्य लोक किंवा माध्यमे ही चूक नेहमीच करत असतात. कालपर्यंत मला तरी कोणीही ओळखत नव्हते... - नोबेल विजेते वेंकटरामन रामकृष्णन. I think it's a mistake to define good work by awards. This is a typical mistake that the public or even the press make. No one knew me before today... - Venkatraman Ramakrishnan, Nobel laureate
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/10/2009 - 14:42 नवीन
>>पुरस्कारावरून कार्याचे मोठेपण ठरवणे चुकीचेच... पुरस्कारांचा गौरव अशा मोठ्या कार्यामुळे होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
च
चिरोटा Sat, 10/10/2009 - 16:27 नवीन
बरेचसे पुरस्कार कार्य केल्यानंतर मिळतात असा माझा समज होता.हा मागणीचा नियम भौ.र्.जी. च्या नोबेल पुरस्कारांना नाही लावला म्हणजे मिळवली.!एक बरे झाले-उ.कोरिया,इराणच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. पुढचे ३.५ वर्षे तरी अमेरिका ह्या देशांवर बाँबफेक करण्याची शक्यता मावळली. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 10/10/2009 - 16:56 नवीन
एक बरे झाले-उ.कोरिया,इराणच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. पुढचे ३.५ वर्षे तरी अमेरिका ह्या देशांवर बाँबफेक करण्याची शक्यता मावळली. ती गोष्ट सामान्य अमेरिकन नागरीकाच्या बाबतीत पण लागू होते. हकनाक सैनिक मरतात, त्यांची घरेदारे उध्वस्त होत आहेत.... माझ्या मुलीच्या शाळेत एका वडलांना बर्‍याचदा मुलांना सोडायला आलेला असताना भेटतो. स्वतःची कामे सांभाळत सर्वकाही चालले आहे, पण बायकोला मिलीटरीने बोलावून घेतल्याने इराक-अफगाणीस्तान मधे.... का तर कधीतरी (९/११ च्या आधी) कॉलेजचे शिक्षण फुकट होणार या नादात मिलीटरीचे फॉर्म्स भरले आणि आता ही परतफेड. हे अनेकांच्या बाबतीत. शिक्षणातून, "नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड" असा कायदा बुश सरकारने संमत करून घेतला, टाळ्या मिळवल्या पण त्यातच मिलीटरीला रिक्रूटमेंटसाठी अधिक सोय करून ठेवली हे नंतर कळले... एकंदरीत पुढच्या अनेक पिढ्या जशा आत्ताच्या पिढ्या व्हिएटनाममुळे होरपळल्यात तसे होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
प
प्रदीप Sat, 10/10/2009 - 18:01 नवीन
चा प्रॉब्लेम समजतो, पण ते जिथे आक्रमण करतात त्या देशांतील जनतेविषयी जास्त सहानुभुति वाटते. व्हिएटनाम, कंबोडिया हे तर होरपळून निघालेत, अजूनही त्यांच्या पिढ्या अमेरिकन्सांच्या नापाम बाँब्समुळे झालेले भीषण परिणाम भोगताहेत. जपानचे ही तेच. इराकमधे त्यांनी काय केले हे आपण पहातो आहोतच. अमेरिकन जनता सुरूवातीस काही म्हणत का नाही? कारण दुसरीकडे दूरवर कोठेतरी आपल्या उद्दामपणाची खुमखुमी दाखवण्यात त्यांनाही खरे तर तत्वत: काही चूक वाटत नाही. पण मग ते अंगाशी आले, स्वतःची पोरे मरू लागली, की मगच त्यांच्यातील बहुतांशांची रडारड सुरू होते. युध्द विनाकारण सुरू करतांना अंगी उद्दामपणा असतो. आताही तुम्ही जे नजरेस आणताय, तो ह्यातलाच प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विष्णुसूत Sat, 10/10/2009 - 19:03 नवीन
युध्दा मुळे अमेरीकन अर्थ व्यवस्था जोरात चालु रहाते. त्यामुळे अमेरीकन अर्थ व्यवस्थे च्या सुरळित चालना साठि युध्द होत रहाणे गरजेचे असते. रेगन , बुश १, बुश २, क्लिंटन यांनी अमेरीकेच्या हितासाठि जे करता येइल ते केलं. ह्यापेकि कोणाला हि नोबल मिळालं नाहि कारण ह्यांनी युरोपियन देशांचे प्रभुत्व कमी केलं. ओबामा ला नोबल देउन युरोपियन देश त्यांचा प्रभाव अमेरीकन परकिय धोरणावर पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते इतकं सोपं नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
च
चिरोटा Sat, 10/10/2009 - 20:09 नवीन
आपल्याला ओबामांना भारतरत्न्,महाराष्ट्रभूषण देवून काही प्रभाव पाडता येईल काय? आशियात चीननंतर आपणच नंबर दोनचे दादा आहोत असे म्हणतात्.(ह्.घ्या) भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विष्णुसूत
व
विष्णुसूत Sat, 10/10/2009 - 20:13 नवीन
महात्मा गांधी "उत्तेजनार्थ" पुरस्कार नक्कि मिळणार आहे ओबामा ला ! फक्त एक भारताची वारी केली कि झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिरोटा Sat, 10/10/2009 - 20:55 नवीन
सहमत.पण त्या बदल्यात व्हिसा वाढला पाहिजे.फुकट नाही मिळणार पुरस्कार. नाहीतर येतील,करतील राजस्थानमध्ये नृत्य,दुर्गम भागातील आदिवासींना भेट देतील्,ताज मध्ये भेटतील अंबानी,गांधीवादी लोकांना आणि अमेरिकेला परतल्यावर परत 'No to Bangalore' चा नारा लावतील. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विष्णुसूत
व
विष्णुसूत Sat, 10/10/2009 - 19:38 नवीन
एक वाक्य अमेरीकेत महत्वाचे आहे : "There are no free lunches in America" ज्या लोकांना फुकट काहि हवं असतं ते स्वतः ला फसवत असतात. अमेरीकन सरकार हे एका मोठ्या कॉर्पोरेशन सारख आहे. अमेरीकेत मिलिटरी रेक्रुटमेंट साठि सरकारला अशी शक्कल लढवावीच लागते. तुमच्या मित्रां बद्दल फक्त सहानुभुती व्यक्त करु शकतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
द
देवदत्त Sun, 10/11/2009 - 08:04 नवीन
ओबामांना पुरस्कार जाहीर झाल्याचे वाचले तेव्हा मित्रांशी बोलताना माझी हीच प्रतिक्रिया होती की 'कोठेही युद्ध न केल्याने दिले असेल :) '. नंतर बातम्यांमध्ये वाचले की फेब्रुवारी मध्येच त्यांची पुरस्काराकरीता शिफारस केली होती तेव्हा संभ्रम निर्माण झाला होता निकषांबद्दल. पण तुमचा लेख वाचून त्याची वेगळी बाजूही लक्षात आली. त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Sun, 10/11/2009 - 12:00 नवीन
विकासजी, छान लेख. तुमचा तर्कही पटण्यासारखा आहे. युद्ध न करण्याची जबाबदारी ओबामांवर या पुरस्काराने टाकलीय. तीते निभावतात की नाही ते पाहूया. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Sun, 10/11/2009 - 17:36 नवीन
असे पारितोषिक देऊन कोणी शांततेसाठी काही करणार असेल तर महाराष्ट्रातल्या जहाल नेत्यांना, अगदी नोबेल नव्हे, पण तत्सम काही देणे उचित ठरेल. ती आत्ताची गरज आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/23/2009 - 04:39 नवीन
आज एक मला नवीन असलेली बातमी टाईम साप्ताहीकात वाचली. गांधीजींचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी अनेकदा सुचवण्यात आले होते पण त्यांना मिळाले नाही. कदाचीत तत्कालीन आंतर्राष्ट्रीय राजकारण आणि ब्रितीश अधिपत्याखालील भारतीय पारंतत्र्य त्याला कारण असावे... मात्र १९४८ साली गांधीहत्ये नंतर त्या वर्षी हे पारीतोषीक कुणालाच दिले गेले नाही. का? - "to honor the missing laureate"!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा