Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओबामा चे नोबल -काहि बातम्या आणि प्रतिक्रिया

व
विष्णुसूत
Sun, 10/11/2009 - 03:56
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2751 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रशांत उदय मनोहर Sun, 10/11/2009 - 05:55 नवीन
"नोबेल" आहे त्या पुरस्काराचं नाव. आपला, (त्रस्त) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Sun, 10/11/2009 - 07:36 नवीन
त्रस्त मनोहर पंत, क्षमस्व ! आमच्या सारख्या अडाणि माणसाला "नोबेल" आणि "नोबल" एकच कि हो ! भावना पोहचल्या म्हणजे झालं. आमच्या विठ्ठ्ला ला तो पुरस्कार आता मिळाला आहे त्यामुळे नक्की उच्चार काय ते जाणुन घेयला आवडेल . जर आपल्याला काहि संदर्भ देता आला तर तो देण्याची कृपा करावी. असो! आपण त्या नोबेल का नोबल बाईंच्या झग्यातुन पडलात म्हणुन आपल्याला स्वीडिश उच्चार बरोबर माहित असावेत असा समज चुकिचा नसावा. असो. असे त्रस्त होउ नका नाहितर परत कुठे तरी भरकटायचात. आपल्या नावाची शिफारस अम्ही "भरकटलेले उच्चार शास्त्र" ह्या वर्गिकरणात "मपा गौरव नोबल पुरस्कारा" साठि जरुर करु. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर
ज
ज्ञानेश... Sun, 10/11/2009 - 09:25 नवीन
आल्फ्रेड नोबेल हा पुरूष होता हो! "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विष्णुसूत
व
विष्णुसूत Mon, 10/12/2009 - 06:32 नवीन
ज्ञानोबा, मला क्षमा करा हो. अल्फ्रेड नोबल हा पुरुष होता हे मला माहित नव्हते. माझ्यावर रागावु नका हं. (स्वगत: "झग्यातुन पडणे" हि फ्रेज आजकाल वापरत नाहित का? माझ वय झालं हे आता लक्षात येयला लागलय. लोकांनी आता मला काका न म्हणता अजोबा म्हणले तरी चालेल ! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 10/11/2009 - 06:17 नवीन
एका वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन सांगायचं तर, "धर्म संस्थापना्र्थाय संभवा मी युगे युगे" हे म्हणणं खरं करण्यासाठी ह्या "पंढरीच्या विठ्ठलाने " -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय. रि.प पक्षाच्या शंभर कौरवानी गेली आठ वर्ष अमेरिकेत आणि जगात धुमाकूळ घालून मनुष्यधर्म बुडवला.बुशरूपी दुर्योधनाने इराकच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करून लाखो निरपराध लोकांना यमसदनी पाठवलं. सादाम जरी दुष्ट असला तरी ९/११ ला तो कारणीभूत नव्हता.ब्रिटनचा पंतप्रधान टोनी ब्लेअर शकूनीमामा त्याला सामील झाला होता. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Sun, 10/11/2009 - 06:31 नवीन
"पंढरीच्या विठ्ठलाने " -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय. जय हरी ! वारक-यांनो चलो अमेरिका. :) -बाबुराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
व
विष्णुसूत Sun, 10/11/2009 - 07:30 नवीन
वाह वाह सामंत साहेब, क्या बात है ! तुम्ही अगदि सुरेख उपमा दिली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
स
सुधीर काळे Mon, 10/12/2009 - 06:44 नवीन
"संभवामि युगे युगे" असा आहे त्या श्लोकाचा शेवट! इथं मी म्हणजे "मी स्वतः" असा अर्थ नाही! क्षमस्व! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
च
चिरोटा Sun, 10/11/2009 - 11:08 नवीन
मराठी पत्रकार कामाला लागले- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=14590:2009-10-09-12-25-02&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7 ओबामा-मुत्सद्दी शांतीदूत . लेखातले एक वाक्य-
अमेरिकेकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत, म्हणूनच अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारीही अमेरिकेवर येऊन पडते, हे ओळखण्याएवढा सुज्ञपणा ओबामांकडे आहे.
मग "अमेरिकेने त्यांची सर्व अण्वस्त्रे नष्ट केली आहेत" ही बातमी आम्ही पामर कधी वाचणार?Milatary Industrial Complex चे अमेरिकन पुढार्‍यांवरील प्रभुत्व कमी होणार की नाही? भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 10/11/2009 - 11:09 नवीन
>>>अमेरिकेकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत, म्हणूनच अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारीही अमेरिकेवर येऊन पडते मला हे कळत नाही आहे लोक असली स्वप्न का बघतात ? अमेरिका अथवा कुठला ही देश एवढा मुर्ख नसावा की आपल्या शत्रु जवळ / मित्राजवळ शस्त्र आहे तरी ही आपल्या हातातील शस्त्र खाली टाकून शेळीला दुध पाजायला जाईल. आजच्या जगात हे शक्य आहे ? कुठला मित्र कधी शत्रु होईल हे सांगणे जेथे अशक्य आहे तेथे आपले शस्त्र टाकण्याचा / नष्ट करण्याचा धोका अमेरिका का घेईल ? व आपण तरी घेऊ का असला धोका ? पाकिस्तान / चीन असे डोक्यावर नाचत असताना ? एकच धाक राहिला आहे तो पण जर नष्ट करायला घेतला तर... हाल विना दात व विषाच्या सापा सारखा होऊन जाईल व हे आतंकवादी देश जग भर दंगा करत फिरतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
प
प्रभो Sun, 10/11/2009 - 11:11 नवीन
एकच धाक राहिला आहे तो पण जर नष्ट करायला घेतला तर... हाल विना दात व विषाच्या सापा सारखा होऊन जाईल व हे आतंकवादी देश जग भर दंगा करत फिरतील ! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
व
विष्णुसूत Mon, 10/12/2009 - 08:19 नवीन
"ओबामा पुरस्कार स्विकारणार नाहि. " अशी अधिकृत ब्रेकिंग न्युज आहे (ट्विटर) http://www.nbc.com/saturday-night-live/video/clips/powerball-cold-open/1165585/ http://www.nbc.com/saturday-night-live/video/episodes/?vid=1163334#vid=1163334 SNL चे वरील दोन कार्यक्रम बघुन ओबामा व्यथित झाला आहे. नोबल पिस प्राइज जो पर्यंत महात्मा गांधिना मिळत नाहि तो पर्यंत ते न स्विकारण्याचा , ओबामा विचार करत आहे ! अमेरीकेच्या अर्थ व्यवस्थे ला सुधारण्या साठि तुर्त फक्त कॅश अ‍ॅवार्ड स्विकारावे असे अनेक लोक ओबामा ला आग्रह करत आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा