पाककृती

सुधारस

Primary tabs

काल दिवसभर टंकाळा केल्याने रात्री स्वतः काहीतरी बनवून खायचा मूड आला.. बरेच दिवसात सुधारस खाल्ला नव्हता, बनवायला ही सोपा म्हणून बनवला आणी फस्त केला. त्याचीच ही पाकृ. कच्चा मालः १. अर्धी वाटी साखर २. ३-४ चमचे लिंबाचा रस ३. पाण्यात भिजवलेलं केशर अथवा जिलेबीचा रंग ४. वेलदोडे (३-४) ५. सुका मेवा (काजू, बदाम, बेदाणे आणी चारोळे) Image removed. एका पातेल्यात साखर आणी समान पातळीत पाणी घ्या. त्याचा पाक बनवा. साखर विरघळत आल्यावर त्यात वेलदोडे टाका. Image removed. पाक थोडा घट्ट झाल्यावर थंड व्हायला ठेवा.त्यात पाण्यात भिजवलेले केशर / रंग घाला. थोडा थंड झाला की त्यात ३-४ चमचे लिंबाचा रस घालून ढवळा. Image removed. त्यात सुका मेवा टाका. आणी थंड होऊ द्या. Image removed. वाढायच्या वेळेस बाउल मधे काढा आणी सर्व करा. Image removed. ह्यासोबत मी बनवलं होतं बॉईल्ड स्वीट कॉर्न. यासाठी स्वीट कॉर्न उकडून घ्या. एका पातेल्यात थोडीशी फोडणी करा. त्यात थोडे शेंगदाणे भाजा. त्यात स्वीट कॉर्न टाका. वरून धणेपूड, तिखट मीठ भुरभुरवा. एका बाउल मधे काढून सर्व करा. सर्व करताना वरुन थोडं लिंबू पिळा. Image removed. हे माझं जेवणाचं ताट. सुधारस , बॉईल्ड स्वीट कॉर्न आणी पोळी (पोळी भाजी केंद्रातली) Image removed.
श्रावण मोडक

विजोड वाटतं रे... सुधारस म्हटलं की, ओल्या खोबऱ्याची ओली चटणी, डावीकडंच काकडीची कोशिंबीर, उजवीकडं बटाट्याची ती टिपिकल ब्राह्मणी सण-भाजी, तुरीच्या डाळीचं सार म्हणतात ते आणि मगच पोळी.
मका कुठनं आणला? आणला तर खाऊन मोकळा व्हायचं ना... अशी काही जोडी जमवल्याचं जाहीर कशाला करायचं?
सुधारसात रंग कधी टाकायचा तो? 'रंग टाकण्यास' विसरलं की पंचाईत होईल ना?
सुकामेवा कच्चा टाकायचा की किंचित वाफवून वगैरे?
आत्ता कळलं ती पोरगी का तुला लगेच हो म्हणत नसावी ते.
हा सारा प्रतिसाद गोड मानून घे रे...
---
पाकृ गोड आहे हे खरं. :)

शाहरुख

हाण तिच्या मारी..
राजे महाराजे अगदीच नाईलाज झाल्यास पक्वान्न म्हणून जो सुधारस खात असतील तसा शाही झालाय की रे तुझा सुधारस..ऐष आहे राव !!

सुधारसात द्राक्षं झक्कास लागतात एकदम..ट्राय मारा एकदा.

आणि मक्याचं जे काही केले आहे त्यात शेंगदाणे घातलेले बघून आपण समस्त बॅचलर बल्लवाचार्यांचं प्रतिनिधित्व करता याबद्दल आम्हास निस्संशय खात्री झालीय.

बाय द वे, लहानपणी आमच्या ताटातच सुधारस वाढला जाई..मग तो मिठा-चटणीत जाऊ न देण्याची कसरत करत आम्ही तो पोळीला लावून खात असू याची आठवण झाली.

- बाळ शाहरुख

अवलिया

काय करावं बाबा आता या बाब्याला?????

चालु दे चालु दे.... :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

चतुरंग

सुधारस झक्कास आहे पण मकेके साथ बात कुछ हजम नहीं हुई! :(

(भरपूर तूप लावलेल्या गरमागरम मऊसूत पोळ्या फक्त सुधारसाशी जेवणारा)चतुरंग

प्रभो

(भरपूर तूप लावलेल्या गरमागरम मऊसूत पोळ्या फक्त सुधारसाशी जेवणारा)चतुरंग

मी पण असेच करतो हो...फक्त सुधारस पोळी.... पण मका तोंडी लावायला घेतला होता...
मस्त लागतो असा....

--प्रभो

आयला या मुंबईत आल्यापासुन आईच्या हातचा खास ब्राह्मणी स्वयंपाक दुर्मीळच होत चाललाय आणि त्यात तु असे एकामागुन एक पदार्थ टाकुन जीभ चाळवतो आहेस. झायीर णिशेद ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आपल्याला भाजी बिजी आवडत नसल्यानी नीस्ती चपाती / भाकरी आनी सुदारस आसन तरी बी आपल जेवन व्हतय.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सगळ्या माझ्या आवडत्या पदार्थांच्या पाककृति एकामाहुन एक देऊन? असो. हे पाहिल्यावर आधी जाऊन सुधारसाचं जेवलोय अन आता परत येऊन प्रतिक्रिया देतोय. मस्त दिसतोय सुधारस!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)

लग्नाची...

मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..

सू हा स...

पुढच्या वेळी सुधारस करताना त्यात पिकलेल्या केळीचे काप टाकून पाहा... :)