प्रियजनांसाठी स्पेशल

उद्या लेक आणि तिची आई (सौ) येतायत.. म्हटल त्यांच्या स्वगता साठी काही तरी खास करुया.

नेटावर भटकताना एक कृती दिसली.
So this is for your loved ones.

साहित्यः
कुंडीच्या आकाराचे कप. स्ट्रॉ.

मावा केक.

काळ्या / चॉकलेटी रंगाची बिस्कीटे. (मिक्सर मध्ये बारीक चुरा करुन)

आइसक्रिम.
गमी वर्म्स (ऑपशनल).
सजावटीसाठी फुलं

कृती:

१) मावाकेकचे गोलाकार तुकडे करुन कपच्या तळाशी ठेवावे.

२) कपच्या मधोमध, कपच्या उंचीचा स्ट्रॉ केक मध्ये उभा खोचा.

३) स्ट्रॉ च्या भोवतीने हव्या आसलेल्या चवीचे (फ्लेवरचे) आइस्क्रिम टाका.

४) गमी वर्म्स वरुन पसरा.

५) वरुन बिस्किटाच्या चुर्‍याचा थर लावा. फ्रिजर मध्ये ठेवा.

६) सर्व्ह करताना स्ट्रॉ मध्ये फुल अडकवुन द्या.

द्या तोफेच्या तोंडी ह्या गणपाला

दुस-याला का सांगता‍‍‍? तुमच्या तोफेत पाणी का?

गणपा ---- बेस्ट ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गणप्या लेका कुठून कुठून शोधतोस इतक्या पाकृ?

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

आजच बनवुन पाहिली. बच्चेकंपनीनेच बनवली आणी खूप धमाल केली.
मी म्हातारीचे केस ( बुढ्ढीके बाल ) आईस्क्रीम घेतल होत.

ह्या गनप्याचं कायतरी करा राव...
छळ लावलाये मेल्यानं......~X(
अवांतरः गणप्या,तुला आनी तुझ्या पाककॄतीज् ला साष्टांग दंडवत रे बाबा !!
:-)

(गणपा) चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

बायको आली - आता तरी थांबशिलना रे बाबा. च्यामारी काय वैताग होता.

पूढील एक वर्ष एकपण रेसिपी बघायला मिळायला नको तुझी. नायतर बघून घेऊ.

तळटीप - सगळ्या पाककॄतीज् छान!!!

सगळ्या रेशिप्या आवडल्या तशी हीसुद्धा आवडली. मला आधी वाटलं की कुंडीत फुलं लावलियेत्.......पण हे सरप्राईझ आवडलं. माझ्या मुलाचे मित्र आल्यावर मी हा प्रकार करून पाहीन.

रेवती

आंणि काय आता मातीच्या पण चविष्ट रेसिप्या शिकवतो आहेस की काय असं वाटलं :D
पण खरंच सही आयडिया आहे. मी घरी जायच्या आधी तिथल्या लोकांना शिकवून ठेवीन...माझं स्वागत करायला!

गण गण गणपा बोले
पाकृंचा पाऊस पाडे
ओलेचिंब पावसात धुंद आम्ही
गणपाच्या पाकृंना तोड नाही

लगे रहो... अजुन सुध्दा स्वयंपाकघराचा ताबा सोडु नका...
चालु राहु देत...

हेच राहिलं होतं बाकी..! शिकवा... लोकांना मातीच खायला शिकवा!!! ;)

काय तुफ्फान आहे हा प्रकार.. मुलाच्या मित्रमंडळींसाठी नक्कि होइल आता.. :) मस्त!!
तुझे आभार नक्की कितीवेळा मानावे हेच कळत नाही..
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/

अतिशय आकर्षक पुष्परचना आणि त्यात लपलेले चविष्ट गुपित.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.