काथ्याकूट

मराटी टायपि॑ग

Primary tabs

फोनटिक किबोर्ड शिवाय ईतर किबोर्ड वापरता येतील का ? उदा. टायपि॑ग मशिन किबोर्ड

नीलकांत

येथे किंवा एकूनच महाजालावरचे लिखाण हे युनिकोड मानकाचं आहे.

तुमच्या जवळ युनिकोड लिहीणारं व ज्यात असे वेगवेगळे किबोर्ड उपलब्ध आहेत असं सॉफ्टवेअर असेल तर त्यात लिहून येथे चिटकवता येईल.

कदाचित 'आकृती' मधे ही सोय आहे. किंवा मग तुमच्या आवडीच्या फॉन्ट मधे लिहीलेलं युनिकोड मधे रुपांतरीत करून येथे चिटकवता येईल.

नीलकांत

हर्शल

मजकूर वेगळया फॉन्ट मधे असल्यास युनिकोड मधे टान्सफर कसा करावा ?

http://www.chhahari.com/unicode हे पान अतिशय उपयुक्त आहे.

ते उपयोगकर्त्यासाठी मैत्रिपूर्ण (user friendly) पण आहे. इथे तुम्ही थेट युनिकोड मध्ये टंकित करू शकता.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

हर्शल

धन्यवाद वेबसाईट उपयुक्त होईल असे वाटते.

चिकटवावेत? मी पीडीएफ फाईल्मधील फोटो कॉपी केले. परंतु नवीन लेखन करतांना पेस्ट ची कमांड पुसट होऊन अकार्यरत होती. फोटो लेखात चिकटविण्यासाठी काय करावे? मी सॉफ्टवेअरमध्ये फारच नवखा आहे. मला फक्त टंकवून अपलोड करता आले. तेपण ५-१० असफल प्रयत्नानंतर. सध्या मी बरहा मध्ये टंकित करून कॉपी करतो आणि नवीन लेखनात चिकटवतो. फोटो बरहामध्ये पण चिकटवता येत नाहीत. तेथे देखील असेच होते. पेस्ट ची कमांड अकार्यरत होते.