Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पान -रंगीत, गुळगुळीत

च
चित्रा
Fri, 10/23/2009 - 03:10
🗣 68 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21696 वाचन

💬 प्रतिसाद (68)
ल
लबाड लांडगा Fri, 10/23/2009 - 07:23 नवीन
नऊवारी साडी घातलेली,नथ घातलेली कत्रिना कैफ बघायला आवडेल. बिपाशा बसु पण चालेल.आंतर्राष्ट्रीय दर्जा पाहिजे तर पॅरिस हिल्टन नऊवारीत बघायला आवडेल. लबाड लांडगा
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 10/26/2009 - 15:05 नवीन
हा प्रतिसाद लांडगा यांना नाही. या धाग्याशी संबंधित आहे. ------------------------------------------------ भारतीय स्त्री-पुरुषांचे "सौष्ठव" आणि त्या अनुषंगाने चाललेली "जेंडर बायास" (मराठी शब्द ?) इत्यादि विषयांवरची एक चर्चा. http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=7741&st=0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड लांडगा
ट
टारझन Mon, 10/26/2009 - 15:25 नवीन
कोदांचं बक्षिस स्विकारतानाचं चित्र लावलं तर ? मिपावरचं ट्राफिक थोडं अटोक्यात येऊ शकेल असं वाट्टंय !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
न
निमीत्त मात्र Mon, 10/26/2009 - 15:37 नवीन
कोदांचं बक्षिस स्विकारतानाचं चित्र लावलं तर ?
उत्तम कल्पना! कोदा आणि मुक्तसुनित दोघेही मिपाचे हिरे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रभो Mon, 10/26/2009 - 15:48 नवीन
सहमत आहे --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
निस्का गुरुवार, 04/22/2010 - 16:34 नवीन
लैंगिक पूर्वग्रह नि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/23/2009 - 07:23 नवीन
मिसळपाव या संकेतस्थळाची खासियत नक्की काय याचा विचार करताना खरे तर शाहरूख खानच्या चित्रपटातील "हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी" या गाण्याप्रमाणे मिपाचा स्वभाव आहे असे मला वाटले. स्सही. सहमत आहे. :) नवीन धागा काढल्याबद्दल धन्यू...:) मिपाचा दिवाळी अंक निघाला तर सुंदर आणि उत्तान स्त्रीचेच चित्र मुखपृष्ठावर असेल. रडका सॉरी जरासा हळवा, हातात दिव्याची ज्योत धरुन आकाशाकडे पाहाणारी सुंदर स्त्री असे काही तरी असेल. अर्थात मुख्य संपादक भारतीय असला तर असे होईल, असे वाटते. पुरुषप्रधान संस्कृतीला काय आवडेल असा भारतीय विचार मिपावर असल्याने [माझी समजूत]पुरुषांची आवड जोपासल्या जाईल, असेही एक मिपाचा रसिक म्हणून वाटते. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Fri, 10/23/2009 - 15:46 नवीन
सुंदर आणि उत्तान स्त्रीचेच चित्र मुखपृष्ठावर असेल.
अरे वा प्राध्यापक अंमळ शौकिन दिसतात. मला वैयक्तिकरित्या सुंदर स्त्री आवडेल पण दिवाळीअंका सारख्या सोज्वळ विशेषांकावर उत्तान स्त्री रुचणार नाही. अर्थात तात्यासाहेबांच्या आवडीनुसार उत्तान स्त्रीच येण्याची शक्यता जास्त आहे ;) पण मिपाचा दिवाळी अंक निघाल्याच्या आनंदात आम्ही ते चालवून घेऊ. अवांतर : तात्यासाहेब, मंडळी इतकी प्रेमाने विचारपुस करत आहेत तर काढाच की एक फक्कड दिवाळी अंक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर Fri, 10/23/2009 - 07:42 नवीन
अंकाची म्हणून एक खासियत असते त्याच्याशी तिचे साधर्म्य असावे ही देखील अपेक्षाही ग्राहकाची/संस्थापकांची असते किंवा असावी.
हम्म! केवळ एखाद्या विषयाला वाहिलेला अंक असल्यास साधर्म्य असावे हे पटते..
पण मिसळपाव या संकेतस्थळाची खासियत नक्की काय याचा विचार करताना खरे तर शाहरूख खानच्या चित्रपटातील "हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी" या गाण्याप्रमाणे मिपाचा स्वभाव आहे असे मला वाटले.
क्या केहेने! :)
या गाण्याप्रमाणे मिपाचा स्वभाव आहे असे मला वाटले. त्यामुळे (पुढेमागे कधी काढला तर अशा) अंकावर केवळ स्त्रीचेच चित्र का असावे असा प्रश्न पडला.
हम्म! :)
किंवा मिसळपावावर येणारे स्त्री आणि पुरूष हे अंकावर केवळ चित्ताकर्षक स्त्रीचेच चित्र का पसंत करतील असे संस्थापकांना वाटले असावे?
उत्तर माहीत नाही.. :)
एखाद्या सुरेख चेहर्‍याकडे पाहताना नजरेचेच सुख मिळवायचे असले तर ते सुख सगळ्यांना मिळण्याची समान संधी असावी, नाही का?! मग तो चेहरा पुरूषाचा का नको?!
हम्म! :)
किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रे का नकोत?
छ्या! चित्रातै, तुमचा हा मुद्दा मात्र आम्हाला मान्य नाही! ते अ‍ॅब्स्ट्रॅक्ट वगैरे सगळं उपक्रमासारख्या संस्थळालाच शोभतं. तिथं सगळंच अ‍ॅब्स्ट्रॅक्ट! :)
बरे सवय आहे म्हणून स्त्रीचा फोटो, तर तसे असावे.
सवय? बरं बरं! :)
धनंजय यांनी माझ्या अवांतराला दिलेल्या खेळकर प्रतिसादात नऊवारी साडीतील आणि नथ घातलेल्या स्त्रियांची चित्रे असलेल्या अंकांची आठवण करून दिली होती.
वा! चांगली कल्पना आहे! :)
पण कितीही सोयीचा असला तरी तो एक साचाच.
साचा कसा काय? अहो नौवारीतली एखादी बया काय छान दिसते! अगदी जिवंत. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट वगैरे नाही बर्र का! :) माझ्या संग्रही शिल्पा शेट्टीचा एक नौवारीतला फोटू आहे! ;) असो, बाकी चर्चा चालू द्या.. :) या महत्वाच्या चर्चेची भविष्यात मदत होईल असे वाटते..! :) चित्राताईंचे ह्या धाग्याबद्दल मनापासून आभार...:) महत्वाची सूचना - प्रतिसाद लिहितांना सर्वांनी तारतम्य बाळगावे. मिपाने त्याच्या मुखपृष्ठावर आजपर्यंत अगदी जरूर स्रियांची काही चित्रे झळकवली परंतु सभ्यतेच्या मर्यादा कुठेही सोडल्या नाहीत. त्याच मर्यादा या चर्चेदरम्यानही पाळल्या जाव्यात ही विनंती... तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/23/2009 - 07:45 नवीन
बाय द वे, मिपाचा दिवाळी अंक निघालाच तर फक्त मुखपृष्ठाचेच काम आम्ही पाहू. बाकी सर्व जबाबदारी नंद्या आणि त्याच्या टीमची असेल.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/23/2009 - 08:06 नवीन
बाय द वे, मिपाचा दिवाळी अंक निघालाच तर फक्त मुखपृष्ठाचेच काम आम्ही पाहू. व्वा ! लै भारी. बाकी सर्व जबाबदारी नंद्या आणि त्याच्या टीमची असेल.. अजून काय चाल्लंय तात्या, तुमच्याकडे कोण निवडून आले. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
निमीत्त मात्र Fri, 10/23/2009 - 15:50 नवीन
असं काय करता तात्यासाहेब? मुखपृष्ठा व्यतिरिक्त खास तुमच्या शैलीतले संपादकिय आणि किमान २-३ खुसखुशीत लेख तुमच्याकडून आले पाहिजेत. नंद्या टीम वगैरे मुद्रित संशोधन की काय ते करायला ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/23/2009 - 07:51 नवीन
मला काय आठवतं: 'फिर भी दिल है हिंदूस्थानी'च्या गाण्याशी सहमत आहे. माझा विचार विचारशील चित्राताई, तर मला सद्यस्थितीतली पठारावरची (हरिद्वारच्या पुढची) गंगा आठवते. मला (सगळ्यांसाठी उघड असलेल्या) मराठी अंकात पहायला काय आवडेल, अर्थात प्रॅक्टीकल विचारः महाराष्ट्रातलं सृष्टीवैभव, मराठी बोलणार्‍या लोकांचं कर्तृत्व दाखवणारी छायाचित्रं, भले ते हळदीचं (संदर्भ: रघुनाथ माशेलकर) असेल वा एखाद्या कोपर्‍यात रहाणार्‍या शेतकर्‍याने केलेल्या प्रयोगाबद्दलचं, किंवा राजा केळकर वस्तुसंग्रहालयाचं नाहीतर नागपुरी संत्र्यांच्या किंवा नारायणगावच्या द्राक्षाच्या बागांचं! पण माझी सद्यमिपापद्धतीची आवड: अर्थातच Image removed. चित्राताई, तुझी मतंही वाचायची उत्सुकता आहे, तेव्हा फारवेळ कोंबडं झाकू नकोस. अदिती ता.क. वरचं चित्रं सभ्यतेच्या मर्यादेत बसत असावं. तात्यांचा प्रतिसाद माझा प्रतिसाद प्रसिद्ध झाल्यावर पाहिला म्हणून हे "स्पष्टीकरण"!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 10/24/2009 - 05:55 नवीन
डिस्क्लेमर : हा प्रतिसाद अदितीबाईना नव्हे. या धाग्यावरचा आहे. धागा आणि त्याच्यातले प्रतिसाद रोचक वाटले. गुळगुळीत पानांवरची स्त्रियांची छायाचित्रे या प्रकारातून आपले छापील दिवाळी अंक काही सुटायला तयार नाहीत. (२००९ चे दिवाळी अंक पाहायचेत. २००८ पर्यंतचे जे आठवतात त्यावरून सांगतो. ) यातून महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक सकाळसुद्धा सुटलेले नाहीत ही गमतीचीच बाब आहे. "बाई छान दिसते. तिच्यात एक आव्हान आहे किंवा ती सोज्वळ आहे " वगैरे वगैरे गंमत म्हणून ठीक आहे. पण एका गुळगुळीत नटीची गुळागुळीत पानावरची गुळगुळीत प्रतिमा हे फारच धोपटमार्गी झाले असे मला वाटते. आणि "इतकी वर्षे स्त्रिया छापल्या ; आता जॉन एब्राहम छापा" हेदेखील गमतीपुरतेच ठीकाय. काही मुखपृष्ठे मात्र कायमचा ठसा उमटवणारी. "चिन्ह" नावाचा दिवाळी अंक निघतो. त्याच्या वरचीच नव्हे तर आतली चित्रे यांचे वर्णन "मातबर" या एका शब्दात करता येईल. गेल्या वर्षीच्या चिन्हच्या अंकावर प्रभाकर कोलते यांचे चित्र होते. पूर्ण अंकात त्यांची चित्रे होती. (यातली काही लक्षावधी डॉलर्सची.) त्याआधीच्या एकवर्षी पॉल क्ले चे चित्र मुखपृष्ठ होते. मुखपृष्ठाचीच तुलना करायची तर "चिन्हा"च्या आसपास सुद्धा इतर अंक येत नाहीत. दुसरे नाव अर्थातच मौजेचे. प्रत्येक दिवाळी अंकावर वैशिष्ट्यपूर्ण, नामवंत चित्रकारांची चित्रे. हेच "शब्द"बद्दलही सांगता येईल. बाकी "अक्षर"दिवाळीचे मुखपृष्ठ हे कलादृष्ट्या कितपत महत्त्वाचे/महत्तेचे आहे ते माहित नाही; परंतु चालू काळाच्या प्रश्नांशी म्हणा, काळाच्या एकंदर नादाशी म्हणा , मेळ घालणारे असते असे मला वाटते. आणि हो, वसंत सरवट्यांची मुखपृष्ठे फार आनंद देणारी. त्यांनी दिलेल्या आनंदाचे स्वरूप घरगुती आहे; पण वर्षानुवर्षे ते आपली सुरेख अर्कचित्रे देत आलेत. गेली अनेक वर्षे ललितचे मुखपृष्ठ ते करतात. ते पाहिले की दिवाळी आली असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 10/24/2009 - 07:33 नवीन
श्री मुक्तसुनीत, माहितीपूर्ण प्रतिसाद.
आणि हो, वसंत सरवट्यांची मुखपृष्ठे फार आनंद देणारी.
या वाक्याने श्री विनाकारण रंगकर्मी यांची आठवण झाली. खास करून 'आणि हो' असा शब्दप्रयोग. ते नेहमीच महत्त्वाचे शेवटी विसरतात. -(कोल्हापूरी) अक्षय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Sat, 10/24/2009 - 07:37 नवीन
रंगकर्मी म्हणजे कोण ते कळले नाही. माझ्या एकंदर प्रतिसादात काहीच महत्त्वाचे असण्याची शक्यता नसल्याने "महत्त्वाचे शेवटी विसरण्याची" शक्यताही खुंटते असे मला वाटले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 10/24/2009 - 07:38 नवीन
श्री मुक्तसुनीत, शब्दप्रयोग समान वाटला. मोटिवेशन नाही. तुम्ही हळवेच फार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Sat, 10/24/2009 - 07:43 नवीन
तुमची कमेंट सरळसरळ व्यक्तिगत स्वरूपाची आणि काँडसेंडींग आहे खरी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 10/24/2009 - 07:46 नवीन
श्री मुक्तसुनीत, आपला गैरसमज होणारा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व. व्यक्तिगत काही नाही. माहितीपूर्ण सोडून बाकीचे काढून टाका हवेतर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मिसळभोक्ता Sat, 10/24/2009 - 10:10 नवीन
रंगकर्मी म्हणजे कोण ते कळले नाही. अरे, श्री. पूर्णपात्रे हे मिसळपावावर फक्त ५ दिवस जुने आहेत. त्यामुळे त्यांनी श्री. विनायक गोरे, ह्यांना श्री. विनाकारण रंगकर्मी म्हटले, एवढे सोप्पे तुला कळले नाही होय ? मिसळपावाला आपलेसे करण्यासाठी श्री. पूर्णपात्रे किती प्रयत्न करताहेत, कळले ना ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 10/24/2009 - 16:25 नवीन
अरे, श्री. पूर्णपात्रे हे मिसळपावावर फक्त ५ दिवस जुने आहेत. त्यामुळे त्यांनी श्री. विनायक गोरे, ह्यांना श्री. विनाकारण रंगकर्मी म्हटले, एवढे सोप्पे तुला कळले नाही होय ?
श्री मिसळभोक्ता, श्री रंगकर्मी यांचा हा लेख तुम्ही वाचला नाही का?
मिसळपावाला आपलेसे करण्यासाठी श्री. पूर्णपात्रे किती प्रयत्न करताहेत, कळले ना ?
अजुन गोड पापे घ्यावे लागले नाहीत बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
श्रीयुत संतोष जोशी Fri, 10/23/2009 - 07:50 नवीन
चित्रातै एक लक्षात घ्या की कोणीही पुरुष दिसायला कितिही देखणा असला ना तरी मनोरंजनासाठी असलेल्या दिवाळी अंकावर त्याचं चित्र कोणीही पसंत करणार नाही. आता स्त्री म्हणजे काय मनोरंजनाचे साधन आहे की काय वगैरे करुन कोणीही प्रश्न काढु नयेत ही विनंती . आमच्या मनात तसे काहीही नाही. माझं म्हणणं इतकच आहे की हापिसातून घरी आल्यावर त्या शिणलेल्या अवस्थेत जर समोर एखाद्या दिवाळी अंकावर प्रसन्नपणे हसणा-या स्त्री चे चित्र तुम्हाला दिसते तर मी खात्रीने सांगतो की आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि हे सामर्थ्य फक्त स्त्री च्याच चेह-यात आहे. आणि त्याचे कारण आहे ती स्त्रियांच्या ठायी असलेली ममता आणि करुणा. आणि त्यामुळे आम्ही पुढेमागे कधी दिवाळी अंक काढला तर मुखपृष्ठांवर प्रसन्नपणे हसणा-या स्त्रीचे च चित्र असेल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/23/2009 - 08:00 नवीन
दिवाळी अंकावर त्याचं चित्र कोणीही पसंत करणार नाही.
-१!
... प्रसन्नपणे हसणा-या स्त्री चे चित्र तुम्हाला दिसते तर मी खात्रीने सांगतो की आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि हे सामर्थ्य फक्त स्त्री च्याच चेह-यात आहे. आणि त्याचे कारण आहे ती स्त्रियांच्या ठायी असलेली ममता आणि करुणा.
असं का, बरं बरं! चालू द्या!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीयुत संतोष जोशी
ल
लवंगी Sat, 10/24/2009 - 01:38 नवीन
का नाही पसंद करणार.. जरूर करु :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पिवळा डांबिस Fri, 10/23/2009 - 07:59 नवीन
मिसळपावचा दिवाळी अंक जर कधी निघालाच तर त्यावर एकतर "मिसळपावा"चे किंवा एकमेकांची अस्सल मराठीत थट्टामस्करी करत बसलेल्या जिवलगांचे (मग त्यांचे पोशाख देशी-विदेशी कसेही असोत!!!) चित्र असावे असे मला उगीचच वाटते.... हल्ली मिपाला प्रगल्भ बनवण्याचे प्रयोग चालले आहेत... असोत बापडे... आम्हाला आपला मिपाकट्टाच आवडतो... प्रगल्भ (पक्षी: संभावित) मिपा आमच्या दृष्टीने असून नसल्यागत!!!!
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Fri, 10/23/2009 - 08:10 नवीन
एक नंबर पिडाकाका.. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
श्रावण मोडक Fri, 10/23/2009 - 08:45 नवीन
मुखपृष्ठ कशासाठी, त्यावर उत्तर अवलंबून राहील. अंक खपाऊ करायचा असेल तर एखादी नटवीच पहावी. अंकात काय आहे त्याचे दर्शन घडवायचे असेल तर एखादा चित्रकार नेमावा. वेगळंच काही करतोय असं दाखवायचं असेल तर अॅब्स्ट्रॅक्ट करावं. अंक महिला विश्वाचा असेल तर जरूर एखाद्या पुरूषाचे छाया-चित्र वापरावे... वगैरे. हा केवळ प्रारंभीक प्रतिसाद. इतर प्रतिसाद पाहून यात बदल होतील.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 10/23/2009 - 08:50 नवीन
मिपाचा दिवाळी अंक व त्यावरचे मुखपृष्ठ हे तर मालकांनी ठरवले आहेच त्यामुळे त्यांच्या मनात आल्याशिवाय दुसरे काही होणे नाही. :-) वर म्हणालात त्याप्रमाणे मिपाकरांच्या आवडी भिन्न आहेत त्यामुळे फक्त एक स्त्री किंवा पुरुष असण्यापेक्षा मुखपृष्ठावर कोलाज असेल त्यात वेगवेगळे "विषय" हाताळले जातील. किंवा एखादा पुरुष पहात आहे बाईकडे, बाई बघत आहे अजुन कुठेतरी, मग त्याचित्राच्या फोकस अजुन कुठेतरी वेगळीकडे लिंक अजुन कशाशी .. अशी साखळी व त्यातुन उलगडणारे वेगळे विषय बघायला आवडेल...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/23/2009 - 09:01 नवीन
अरे पाच सहा बनवा मुखपृष्ठ... आहे काय अन नाही काय? १) सोज्वळ बाई - नउवारी , नथ, वगैरे २) सोज्वळ बाप्या - धोतर, टोपी वगैरे ३) वाह्यात बाई - जाणकारांना सांगायलाच हवे का ? ४) वाह्यात बाप्या - यातले मला समजत नाही.. तज्ज्ञ सांगतील ५) निरर्थक अर्थवाही - ४ प्रमाणे ६) प्रभुचित्र - प्रभु नाम ही काफी है... ज्याला जे आवडते त्याला क्लीक करुन अंक वाचेल. कसे ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
S
shweta Mon, 10/26/2009 - 04:33 नवीन
अगदि बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
श्रीयुत संतोष जोशी Fri, 10/23/2009 - 09:05 नवीन
हे चालेल का ? Image removed. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 10/23/2009 - 09:44 नवीन
Image removed. अजून काही वेगळी आवड असल्यास कळवावे. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 10/26/2009 - 15:09 नवीन
=)) =)) =)) हा अंक हातात घेतल्याघेतल्या हात डुलायला लागेल =)) - देवात आनंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
विंजिनेर Fri, 10/23/2009 - 09:29 नवीन
चित्रा तै, अहो हा प्रश्न काही मिपाच्या (किंवा इतर कुठल्याही) दिवाळी अंकापुरता नाही. असो. प्रश्नाचं उत्तर टायरच्या किंवा शेविंग क्रिमच्या जाहिरातीत बायका कशाला किंवा डिटर्जंटच्या जाहिरातीत पांढरी शुभ्र साडी नेसलेली स्त्री का (किंवा त्याच डिटर्जंटच्या जाहिरातीत एकही पुरूष कपडे धुताना का नसतो) ह्या आणि अशा प्रश्नांमधे मिळेल. खवचट ढुढ्ढाचार्य ह्याचे उत्तर "पुरुषप्रधान संस्कृती" असे देतील किंवा संभवित पांढरपेशे "दृष्टी सुख" असे देतील पण खर कारण मात्र असे असावे की बहुतांश समाज स्त्रीला अजून ही उपभोग्य वस्तू मानण्यापलिकडे गेला नाहीये हे आहे. (तसे बघायला गेले तर तथाकथित स्त्रीमुक्तीवाद्यांनी (!)चालविलेली "प्ले गर्ल" नावाची बिभत्स, तद्दन बाजारू मासिके आहेतच की पण ते दुसरे टोक झाले) असो. स्त्री/पुरूष चित्रे सोडले तर अनेक विषय मुखपृष्ठासाठी असतात. विषयानुरूप/धाटणीनुरूप निवड उत्तम.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Fri, 10/23/2009 - 09:30 नवीन
मिपावर अनुष्कावहिनीं शिवाय दुसरं असणार कोण?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/23/2009 - 09:51 नवीन
लाख मोलाची बात! अनुष्का किंवा माझी मैत्रीण व अशील दीपशिखा! :) ही पाहा आमची दीपशिखा - Image removed. दीप हल्ली भेटली नाही बर्‍याच दिसात! लौकरच एखादी ट्रीट घ्यायला पायजेल तिच्याकडनं पार्ल्याच्या गजालीत! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/23/2009 - 09:32 नवीन
मुद्दामच देवांना उप-प्रतिसाद देत नाही आहे, जेणेकरून हा प्रतिसाद पाहिल्यावर त्यांना स्वतःलाच लगेचच आर्नीचं ओंगळ चित्रं काढून टाकता येईल. तो दुसरा चड्डीवालाही फार काही आकर्षक वगैरे वाटत नाही आहे. असो. अदिती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 10/23/2009 - 09:35 नवीन
+१ हा अर्नी पूर्वी 'तसल्या' पटांमध्ये काम करायचा म्हणे. तेव्हाचा फोटो आहे का हा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/23/2009 - 09:49 नवीन
मूळ प्रतिसाद बदलल्यामुळे वरचे प्रतिसाद उडवायला हरकत नाही. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Fri, 10/23/2009 - 09:53 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ग
गणपा Fri, 10/23/2009 - 10:26 नवीन
स्त्री की पुरष या वादावर आम्ही तोडगा काढलेला है.. ;) ह्यो फटु कसा वाटतु . Image removed. Image removed. व्यक्तीशः हा फोटु आवडेल.. ह्या पोरीवर आमचा भारी जीव ;) Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 10/23/2009 - 10:35 नवीन
आपल्याला तर बॉ एखादा फोटोजेनिक, सुंदर, मोहक चेहरा पहायला आवडेल (उगाच खोटं कशाला बोला बॉ!). तर तात्या, काढा तुमच्या पोतडीतून काहीतरी नवीन! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Fri, 10/23/2009 - 11:16 नवीन
तात्या परत एकदा विनंती..मुखप्रुष्ठाची कल्पना चांगली आहे पण पुढच्या दिवाळी पर्यंत लांबवु नका.. बाकी त्यावर कोण का असेना काय फरक पडतो. तिचं कौतुक दोन दिवस्...त्यानंतर लगेच दुसर्या मासिकाचं मुखप्रुष्ठ.. पण एक ग्यारंटी आहे..तात्या आपल्या मासिकाचा कंटेंट दुसर्या मासिकापेक्शा लैलैलै भारी असणार... (आपलं मासिक मराठी तर मग मुखप्रुष्ठावरची कन्या, स्त्री, बाई पण मराठी असली तर जास्त बर होईल) बाकी चालुद्या चर्चा...
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 10/23/2009 - 14:47 नवीन
ज्यांनी प्रतिसाद दिले आहेत त्यांचे सर्वांचे आभार. आज जरा वेळ कमी पडतोय, त्यामुळे जमेल तसा प्रतिसाद थोड्या वेळाने देते. प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते आहे.
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 10/23/2009 - 15:37 नवीन
अशाच एखाद्या साच्यातली स्त्री तुम्हाला आजही मुखपृष्ठांवर बघायला आवडेल का, आणि का आवडेल? का तुम्हाला काही वेगळे अपेक्षित असेल? का आणि काय? तुम्हाला समजा मुखपृष्ठ ठरवायचे आहे, तर तुम्ही काय विचार कराल?
चित्रा, स्त्रियांची चित्रे आजकाल सगळीकडेच दिसतात. मुखपृष्ठावर दिसले तरी काही हरकत नाही. साचाची व्याख्या बदलून सर्वच चित्रे एकाच साच्याची आहेत असे म्हणता येईल. दिवाळी अंकात प्रयत्नपूर्वक वेगवेगळे विषय हाताळले जात असल्याने चित्रही थोडेसे अभिनव असावे, अशी अपेक्षा आहे. शेवटच्या प्रश्नाचा विचार करण्यास काही अपरिहार्य कारण नसल्याने पास. श्री खेचर जरी स्त्रियांच्या चित्रांचे फॅन असले तरी मिपाच्या मुखपृष्ठावर नेहमीच ज्ञानेश्वर आणि तुकाराम असतात, हे नमुद करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 10/23/2009 - 19:03 नवीन
मिसळपावाच्या कुठल्याही अंकाच्या मुखपृष्ठावर, फक्त गणपाच्या पाककृतीची चित्रे असावीत. (फूड पॉर्न) (आता कुणाला "अमेरिकन पाय" मधला "पाय" चा शीन आठवू नये, म्हणजे झालं.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 10/23/2009 - 19:13 नवीन
आता कुणाला "अमेरिकन पाय" मधला "पाय" चा शीन आठवू नये, म्हणजे झालं.
इकडे बरेच आत्मलिंगी तुंबलेले बोळे आहेत असे तुम्हाला सुचवायचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
निमीत्त मात्र Fri, 10/23/2009 - 19:17 नवीन
होय. आणि त्यांच्या बोळ्यांवर विरजण घालणारे दुग्धव्यावसायिकही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
श
शेखर Fri, 10/23/2009 - 19:22 नवीन
छोटी दुरुस्ती: त्यांच्या बोळ्यांवर विरजण घालणारे दुग्धव्यावसायिकही आहेत. च्या ऐवजी त्यांच्या बोळ्यांवर विरजण घालणारे दहीव्यावसायिकही आहेत. असे चालु शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र Fri, 10/23/2009 - 19:27 नवीन
दही हा दुग्धजन्य पदार्थ असल्याने दही विक्रेत्याला दुग्धव्यावसायिक म्हणण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा