कशाला उगीच वाद घालताय? मी आमच्या ८० टनाच्या भट्टीचे वेगवेगळ्या 'अवस्थे'तले १५-२० फोटो पाठवले. आणि या भट्टीइतकी 'सेक्सी' बाई दुसरी कुणी असूच शकत नाहीं. अहो, हीच 'ती' रात्रंदिन माझ्या डोळ्यासमोर असते, तिला जरा कुठं दुखलं-खुपलं तर डोळ्यात पाणी येतं माझ्या. आणि ही रागवली की माझ्यासकट सगळे चळा-चळा कापतात! या उलट ती चांगल्या मुडात असते तेंव्हा तर ती एक कामधेनूच जणू!
तिचे "कमी-जास्ती" पोजमधले फोटो हवे असतील तर देऊ पाठवून. तात्यांनी फक्त हुकूम करावा!
सुधीर
-----------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
भट्टीइतकी 'सेक्सी' बाई दुसरी कुणी असूच शकत नाहीं
शब्दशः सहमत आहे. फक्त 'भट्टी' निराळी.
पण जोक्स अपार्ट. काळेकाका, तिच्याशी जास्त लगट करू नका हो. गरम असते म्हणतात.
तुम्ही ज्या गोष्टी (शस्त्रक्रियेशिवाय) बदलू शकत नाही, त्या गोष्टी भट्टी सहज करू शकते. ते स्वीकारायची शक्ती हवी.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
नुसतीच गरम नाहीं, तर sizzling hot!
आणि ही सेक्सी बाई 'अंगा'ला हात लावू देत नाहीं बरं का! हाहाहा!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
मुखपृष्ठाची कल्पना छान!
ही आमची सेक्सी भट्टी ह्यावर आमचा भारी जीव! असे मुखपृष्ठाचे वर्णन पण देत येइल.
अवांतर: मुखपृष्ठा सारखेच मिपाच्या दिवाळीअंकाला मलपृष्ठही असावे का? आंतरजालिय दिवाळीअंकामध्ये ते दिसत नाही. मिपाला त्यातून वेगळेपण दाखवता येईल. तुमचे मत काय?
ही चर्चा सुरू करण्याचे कारण एक प्रकारचे टेंपरेचर घ्यायचे होते.
ह्या चर्चेत स्त्रियाही भाग घेतील अशी अपेक्षा होती, पण उत्तरे देणारे बरेचसेजण - अदिती सोडून -पुरूषच आहेत. त्यामुळे एका टोकाला हळवी, देखणी आणि सालस स्त्री तर दुसरीकडे उत्तान आणि आव्हानात्मक भासणारी स्त्री अशा दोन टोकांच्या मधली मते आली यात नवल वाटले नाही. तात्यांचाही प्रतिसाद अपेक्षित होता तसाच आला.
फक्त खरे तर ही चर्चा दिवाळी अंकासाठी दिसत असली तरी खरे तर तेवढीच ती मर्यादित नव्हती. त्यामुळे ज्यांनी खरोखरच मनापासून अंकावर कसले चित्र असावे हे सुचवले त्यांची क्षमा मागते आणि प्रतिसादांबद्दल आभारही मानते. (तरी तात्यांना बहुदा या विद्याचा/डेट्याचा उपयोग होईलच).
आता या चर्चेविषयी -त्यात मी खरे तर मी एक प्रश्न विचारला होता, "अशाच एखाद्या साच्यातली स्त्री तुम्हाला आजही मुखपृष्ठांवर बघायला आवडेल का, आणि का आवडेल?" जरी सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची गरज नव्हती तरी ह्या प्रश्नाचे उत्तर कोणीतरी देईल अशी अपेक्षा होती. पण तो प्रश्न बहुदा फारच अवघड निघाला आणि कोणीच त्याचे उत्तर दिलेले आढळले नाही!
म्हटले तर फक्त तात्यांनी याचे उत्तर त्यांच्या स्वभावाप्रमाणे दिले आहे. प्रा. बिरूटे यांनी दिलेल्या उत्तरात त्यांचे उत्तर असे नाही. श्रावण मोडक यांच्या "वेल" मधून बरेच काही वाचता येऊ शकते पण त्यांनी चेंडू दुसर्यांकडेच भिरकावून दिला आहे. पि. डां. यांनी प्रगल्भ/अप्रगल्भतेचा मुद्दा काढून सरळ प्रश्नाला सरळ बगल दिलेली आहे. बाकीच्यांनी उत्तरे न देता भट्टी लावणे, आणि विरजण लावणे अशी कामे करून टाकली आहेत! विंजीनेर यांनी " कारण मात्र असे असावे की बहुतांश समाज स्त्रीला अजून ही उपभोग्य वस्तू मानण्यापलिकडे गेला नाहीये हे आहे." असे म्हटले आहे, पण प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.
खरे तर मुद्दा हा दिवाळी अंकाचा नव्हताच. तो स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे का नाही, आणि स्त्रीला इतकी वर्षे उपभोग्य समजल्याबद्दल पुरूषांना आता शिक्षा म्हणून उपभोग्य वस्तू करावे का असा चर्चाविषय म्हणूनही तो माझ्या मनात नव्हता. (जरी आमच्या टॉम ब्रेडीचे फेटा घातलेले चित्र दिवाळी अंकावर चांगले दिसू शकेल असे वाटले तरी!) खरे तर स्त्रीचे लिबरेशन, स्वातंत्र्य जे काही म्हणाल ते याच्या कल्पना खूप बदलत गेल्या आहेत. माझ्या स्वतःच्या त्या बदलल्या आहेत. फक्त एक जाणीव होत असते, की एक व्यक्ती म्हणून पुरूषांना आजवर आयुष्यात ज्या पद्धतीची चढाओढ, ज्या पद्धतीची दगदग सहन करावी लागत आली आहे तशीच ती आता स्त्रीलाही करावी लागते आहे. अपेक्षा - स्वतःकडून आणि इतरांकडून बदललेल्या आहेत. ही सगळी बदलती परिस्थिती आज मिसळपाव वर येणार्या स्त्री-पुरूषांच्या नजरेस येतच असणार. त्यामुळे मुद्दा असा होता की आपण (म्हणजे तुम्ही/मी सगळेच) नव्या काळाचे काही भान ठेवून आहोत का नाही? मिसळपावच्या अंकावर नथ घातलेली कट्रिना कैफ किंवा नऊवारीतील शिल्पा शेट्टी मलाही पहायला गोड वाटेल. पण स्त्रीच्या अशा छायाचित्रांप्रमाणेच तरही बरेच काही पहाण्या-बोलण्यासारखे आहे याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. आपल्या खेरीज इतर कोणाच्या इच्छा/अपेक्षांचे भान आपल्याला वैयक्तिक दृष्ट्या किंवा एकत्र समूहाच्या दॄष्टीने आलेले असणेही महत्त्वाचे आहे. ते भान मिसळपाव वरच्या आपल्याला सर्वांना वैयक्तिक आयुष्यात आलेले नाही असे म्हणणार नाही, पण असले तरी ते इथे मान्य करण्यात मात्र कमी पडतो आहोत असे वाटते. काहीसे जैसे थे चालले आहे ते चालू दे अशी ही वृत्ती आहे. किंवा विशिष्ट समूहात असेच बोलायचे असते अशी पण काही भावना असावी की काय अशीही कधीकधी शंका येते.
असो.
आता दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी - मला कुठचेही रंगसंगती सुरेख असलेले, दर्जेदार चित्रे असलेले अंक आवडतात -स्त्रियांची चित्रेही असलेली आवडतात!
चित्रा, मी गूढ जपण्याचे तंत्र जाणण्याचा प्रयत्न करत आहे असे आपल्याला का वाटले बरे? श्री सहज हे चांगले मासे वाफवतात व श्री मिभो दुधाचा जालीय व्यवसाय करतात एवढेच माहीत होते. अधिक माहितीबद्दल धन्यवाद.:)
चित्राताई,
माझ्या मतें हा प्रश्न "स्त्री-पुरुष" असा नसून बलवान वि. कमजोर हा आहे. बलवानची व्याख्या संदर्भानुसार बदलते. दोन देशांच्या संदर्भात ती शस्त्रे किंवा सैन्याची संख्या असू शकते, नवरा-बायकोत कुणाच्या हातात तिजोरीची किल्ली ही असू शकते, किंवा 'कॉर्पोरेट' संदर्भात 'बॉस व सबॉर्डिनेट' अशी असू शकते. कंपन्यांचे मालक तर (कांहीं ना कांहीं कारणाने) नोकरांचे शोषण करतच असतात, नाहीं का?
जो पैसे कमावतो तो सर्व गोष्टींचा उपभोग घायचा प्रयत्न करतो. पूर्वी जमीनदारीच्या काळात स्त्रीला वारसा हका नव्हता. "नवरा गेला कीं बाईचं पोतेरं होतं" असं माझी आजी म्हणायची व तशी उदाहरणे मी माझ्या लहानपणी पाहिलीही आहेत. माझ्या आजीच्याच वयाच्या पण बालविधवा असलेल्या एक आजीबाई आमच्या शेजारी आमच्या वाड्यात भाड्याने रहायच्या. तांबडे वस्त्र नेसलेल्या व केशवपन केलेल्या त्या आजीबाईंची मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. ना मूल ना बाळ. त्या गेल्यावर त्यांचे अंत्यविधी नीट होतील कीं नाहीं याचीच त्यांना धास्ती उरली होती व ते आमच्याकडून (काळे मंडळींकडून) व्यवस्थित होतीत अशी त्यांना खात्री होती. या बद्दल त्या माझ्या वडिलांना नेहमी आठवण करून द्यायच्या! माझे वडील कधी बाहेरगावी जायला निघाले तर "बाळू, तुझ्या मित्रांना सांगून जा हो माझं प्रेत नदीवर जाळण्याबद्दल" अशी सूचना करायला विसरायच्या नाहींत.
पण आज वारसाहक्काने बायकांना ही भीती नाहीं व आपल्या लोकशाहीने हे एक मोठे काम केले आहे. आणखी एक चांगली गोष्ट आपल्या लोकशाहीने (मुस्लिमेतर नागरिकांसाठीतरी) केली आहे ती म्हणजे बहुपत्नीकत्व (polygamy) बेकायदेशीर ठरविण्याची.
पूर्वीच्या काळी जमीनदार नसलेल्या कुटुंबातही - अगदी आता-आतापर्यंत - पुरुषच कमावायचे त्यामुळे स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून मानले जाऊ लागले. या उलट परिस्थिती असती तर नक्कीच पुरुष एक उपभोग्य वस्तू झाला असता व नऊवारी साडीतल्या कत्रीनाऐवजी 'हनुमान चड्डी'तला सौष्ठवस्पर्धेत पहिले बक्षिस मिळविलेला एकादा गुलजार तरुण दिवाळी अंकावर दिसला असता. आताशा पाश्चात्य देशांत तर स्त्रिया पुरुषांचे 'स्ट्रिप-टीज डान्स' पहायला गर्दी करतात अशा तर्हेच्या बातम्या सर्रास आपल्या वाचण्यात येतात आणि त्याचे मला (व इतर पुरुषांना) तरी वैषम्य वाटण्याचे कारण नाहीं. "कमाओ और उडाओ" ही "नीती" आजवर पुरुष पाळत आले तर आता तेच बायकांनी केले तर त्यात काय गैर?
तीच गोष्ट वेश्याव्यवसायाची. आज कितीतरी पुरुष अशा "सेवां"साठी स्वत:ला उपलब्ध करून देतात असे आपण वाचतोच. माझ्या एका पारशी मित्राचा मित्र एका वृद्ध पारशी बाईचा असा "बॉयफ्रेंड" होता व तिची "तीच" सेवा करायचा.
तेंव्हां स्त्री ही उपभोग्य वस्तू कधीच नव्हती तर ही haves and have-nots मधली one-up-man-ship होती."
तरी स्त्रियांनी या बाबतीत स्वतःच्या जातीला कमी मानू नये! त्या एरवीही बरोबरीच्याच आहेत, पण केवळ पैसे पुरुषाच्या हातात होते म्हणून पुरुषाची अरेरावी होती इतकेच. पण आता परिस्थिती वेगाने बदलत आहे.
परमेश्वर बहुदा पुरुष असावा! कारण त्याने पुरुषाला फटाफट बनविले, पण स्त्रीला घडवताना मात्र खूप वेळ दिला! त्यामुळे पुरुष स्त्रीइतका आकर्षक कधीच दिसू शकणार नाहीं व 'दिसण्याच्या' बाबतीत तरी स्त्रिया केंव्हाही फड जिंकणारच!
तेंव्हां माझी आपल्याला विनंती आहे की केवळ समाजाचा एक कमजोर घटक म्हणून स्त्रीच्या वाट्याला शोषण आले. जमीनदारांनी कुळाला शोषले, बलवान देशांनी आपल्यासारख्या राष्ट्रांना गुलाम बनवून शोषले. तीच गत पूर्वी बाईची झाली. पण आज परिस्थिती सुदैवाने झपाट्यात बदलत आहे.
व दिवाळी अंकावर एकाद्या सुंदर स्त्रीचे चित्र असावे असे जर आज कुणी म्हटले तर ते स्त्री एक उपभोग्य वस्तू म्हणून नव्हे तर पुरुषांत "बघण्यासारखं" फारसं नसतं म्हणून.
सुधीर काळे
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
मी आधीच म्हटल्याप्रमाणे या लेखातून स्त्री उपभोग्य वस्तू नसावी, पुरूषांना शिक्षा म्हणून उपभोग्य वस्तूच्या दर्जाला नेऊन ठेवणे किंवा त्यांचे फोटो मुखपृष्ठावर द्यायला बंदी घालणे, असे काही सहमत व्हावे असे अभिप्रेत नव्हते. प्रश्न एवढाच होता की दरवेळी कोणाही व्यक्तीला एकाच पद्धतीने बघण्याची गरज आहे का? जे आजवरचे साचे आहेत ते तसेच वापरण्याची गरज आहे का याचा विचार करणे. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे ललितचे अंक सुंदर असतात; मौजच्या अंकावर काढलेली स्त्रियांचीच चित्रे लक्षात राहण्यासारखी असतात.
पुरुषच कमावायचे त्यामुळे स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून मानले जाऊ लागले.
हे मान्य नाही. स्त्रिया कमावू लागल्या की त्या पुरूषांना सरसकट उपभोग्य वस्तू मानायला लागल्या असे होत नाही. हे होण्याचे कारण ती नंतरच्या काळात केवळ घरामध्येच सीमित झाली, ह्याच असे नव्हे पण अनेक कारणांनी तिचे अनुभवविश्व मर्यादित झाले, सोबतीच्या स्त्रियाही तिच्याचसारख्या होत्या/असाव्या किंवा असेच बरेच काही. पण तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे.
दिवाळी अंकावर एकाद्या सुंदर स्त्रीचे चित्र असावे असे जर आज कुणी म्हटले तर ते स्त्री एक उपभोग्य वस्तू म्हणून नव्हे तर पुरुषांत "बघण्यासारखं" फारसं नसतं म्हणून.
हेही मान्य नाही! बघण्यालायक पुरूषांची यादीही मोठी आहे.
वाचायला मजा आली.
मला वाटते की पुढील सर्व गोष्टी झाल्या तर मासिकनिर्माते जरूर पुरुषांची चित्रे देतील :
(१) पुरुषांची चित्रे बघून मासिक खरेदी करणार्यांच्या हातात पैसे खुळखुळले पाहिजेत
(२) या ग्राहकांची खरेदी कोठे होते, ती गोम प्रकाशकांना कळली पाहिजे
मला वाटते, यात काही ठिकाणी फरक आताच दिसतो. सिनेमांविषयीच्या मासिकांत, व्यायामविषयक मासिकांत मुखपृष्ठावर नटाचे किंवा पिळदार शरीरयष्टीच्या पुरुषाचे रंगीत गुळगुळीत चित्र पुष्कळदा दिसते.
असा फरक दिवाळी अंकांतही कालांतराने होईल असे वाटते. दिवाळी अंक इतके आहेत - प्रत्येक विशिष्ट ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पैकी कुठल्यातरी मासिकात एखाद्या देखण्या पुरुषाचे चित्र येईलही. आणि एकदा का वाचकवर्ग सापडला, तर पुरुषांची चित्रे अधिक-अधिक प्रमाणात येतील.
<<अनेक कारणांनी तिचे अनुभवविश्व मर्यादित झाले, सोबतीच्या स्त्रियाही तिच्याचसारख्या होत्या/असाव्या किंवा असेच बरेच काही. पण तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे>>
सहमत! अनुभवविश्व मर्यादित होणे वगैरेसारख्या गोष्टी स्त्रीवर परिस्थितीने लादल्या. सुरुवातीपासूनच परिस्थिती उलटी असती तर पुरुषाचे अनुभवविश्व मर्यादित झाले असते व स्त्रीने त्याला वापरले असते असे मला वाटते.
खरंच तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे.
<<दिवाळी अंकावर एकाद्या सुंदर स्त्रीचे चित्र असावे असे जर आज कुणी म्हटले तर ते स्त्री एक उपभोग्य वस्तू म्हणून नव्हे तर पुरुषांत "बघण्यासारखं" फारसं नसतं म्हणून.>>
Well, I do stand by my statement! सुंदरता किंवा देखणेपणाच्या बाबतीत पुरूष बायकांच्यापुढे "किस झाडकी पत्ती"!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी