Skip to main content

का कळत नाही तुला

लेखक सोहम कामत यांनी मंगळवार, 25/10/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
का कळत नाही तुला.. माझ्या प्रेमाचे तराणे.. तुझ्यासाठी केलेले ते.. वेडपट निरागस बहाणे.. तु जवळ नसताना ती.. होणारी असह्य तडफड.. अन् तुझ्या सुखासाठी.. केलेली विचित्र धडपड.. का कळत नाही तुला.. तुच माझी राणी.. तुच माझी कविता.. माझ्या ओठांवरली गाणी.. माझा प्रत्येक श्वास.. माझा एकला ध्यास.. माझ्या वाटेवरली तु.. प्रेमाची ती आस...

मला गरज आहे तुझी

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 25/10/2016 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
गरज आहे मला आज त्या तुझ्या आधाराची अडखळणारे पाऊल माझे सावरणार्या तुझ्या हातांची गरज आहे मला तुझ्या त्या मोहक मिठीची दडपण असता या मनी तुझ्यात स्वत:ला सामावून टाकणार्या त्या बाहूंची गरज आहे आज मला त्या तुझ्या कोमल प्रितीची भय दाटताच या मनी आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजही मला माझ्यावरच्या त्या तुझ्या नि:स्वार्थी प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटतांना तू जवळ आहेस या जाणिवेची गरज आहे मला खूप गरज आहे....
काव्यरस

वाट हरवून गेली...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 25/10/2016 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
वाट हरवून गेली... अशीच ती माझ्या समोरून गेली जणू नभात वीज चमकून गेली मिळता नजर डोळे दिपवून गेली उधळीत गंध उडता पदर सावरून गेली जाता मागे मागे मने जुळवून गेली कळलेच नाही कधी वाट हरवून गेली राजेंद्र देवी

सोनचाफ्याची फुलं आणि त्तो स्पर्श(भाग २)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/10/2016 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तीला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची.

देशपांडे -आमचे वडील!

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 25/10/2016 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो.

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 25/10/2016 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का? मूलतः हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न. आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले. आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले,अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव).

भटकंती इर्शाळगडची

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 25/10/2016 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी एक्सप्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईला जाताना अनेक गडकिल्ले दिसत राहतात. पहिला टोलनाका पार केला कि डावीकडे धीर गंभीर लोहगड विसापूर उभे असतात तर जरा दूरवर तुंग मान उंचावून बघत असतो.उजवीकडे राजमाचीच्या तुंगारली धरणाजवळचे टॉवर दिसतात. खण्डाळ्याला नागफणी हात हलवून दाखवतो.