हरवलेलं विश्व (भाग २)
होणा-या अनाऊन्समेंटमुळे जयूची झोपमोड झाली. विमान कैरो विमानतळावर उतरत होते. जाग आल्यावर क्षणभरासाठी जयु गोंधळली आणि मग एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यावर तिच्या चेहे-यावर मंद स्मित तरळल. आयुष्यात पहिल्यांदाच ती अशी पूर्णपणे एकटी बाहेर पडली होती. आणि ते ही परदेशात. ती सुशुक्षित होती त्यामुळे ती एकटी फिरू शकेल याचा तिला आत्मविश्वास होता... आणि म्हणूनच ती स्वतःवरच खूप खुश होती.
विमानातून उतरून तिने स्वतःचं सामान ताब्यात घेतल आणि बाहेर आली. तिच्यासाठी तिथे एक स्पेशल टॅक्सी उभीच होती. साधारण सकाळचे 8/8.30 झाले होते. पण वातावरण चांगलच तापायला लागल होत.
मिसळपाव