पाणी अडवा पाणी जिरवा - एक सफल प्रयोग.
मागे एकदा मी माझ्या कोकणातील गावाची काही चित्रे खफ वर डकवली होती. ही चित्रे गावातील पाणी टंचाई बाबत होती. पैसा ताइंनी मला याबद्द्ल लेख लीहीण्यास सुचवले म्हणून हा प्रपंच.
आज काल आपण जलयुक्त शिवार आणि अशाच काही सरकारी योजनांबद्द्ल ऐकतो. नाद खूळा यांची तर लेख मालाच आली होती पाणी नियोजनाबद्दल. अशा योजनांमधे सरकार जीतकी शक्य होइल तेवढी मदत करतच असते. (निदान नवीन सरकार तरी सकारात्मक आहे) बर्याच वेळेला शासकीय यंत्रणा काही कारणास्तव प्रत्येक गावात पोहोचू शकत नाही. पण सरकार काही करत नाही म्हणून बसून रहाण्यापेक्षा आपण जर योजना फक्त समजावून जरी घेतली तरी बरेच फायदे होउ शकतात. आता ते कसे ते पहा.
माकडीचा माळ
आखरी घाणा झाल्यावर झ्याटलींग माकडाने झाऱ्या आपटला. कढईतले तेल चुर्रर झाले. चावी फिरवून त्यानं स्टो बंद केला. दुकानासमोर एक फळी आडवी टाकून त्यावर लंबी ताटली ठेवली. तयार मालाची पाटी उचलून ताटलीत रिकामी केली. भलामोठा ढिगारा झाला !
आतून एक पोतं आणून माकडाने ते भुईवर टाकलं. खाली बसकण मारून त्याने गल्ल्यातले सुट्टे पैसे चापचले. मग उदबत्ती पेटवून ढिगाऱ्यात खोचली. शमनेश्वराचं स्मरण करुन त्याने आजूबाजूला नजर फेकली. आणि " ए चला पाच रुपय किलू, पाच रुपय किलू " म्हणत जोरात वरडायला सुरुवात केली.
'झ्याटलींग भजीपाव केंद्र' तयार माल खपवण्यासाठी सज्ज झालं होतं.
बाजार भरायला सुरुवात झाली होती.
कातरवेळ
कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो.
एकदा सुधागडला गेलो होतो. गडावर जायचा आजचा जो प्रचलित मार्ग आहे तो आहे पाच्छापुराहून. औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर शहेनशहाशी बगावत करून आला होता ते संभाजीराजांचे साह्य घेण्यासाठी तेव्हा राजांनी त्याच्या सोय गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका लहानशा वाडीत केली होती. तेव्हापासून अकबराच्या छावणीमुळे ते ओळखलं जाऊ लागलं पाच्छापूर ह्या नावाने. आज ह्या मार्गावर एक भक्कमशी शिडी लावलीय. तेव्हा ती नव्हती. नाडसूरच्या एसटीने उतरलो ते धोडसे गावात.
फक्त लढ म्हणा !!
शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांची.
ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत.
.
.
आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन शिकवतात.
लाकूडतोड्याची लोखंडी कुल्हाडी - कथेचा सार
लाकुडतोड्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहित असेल. लाकुडतोड्याची कुल्हाडी पाण्यात पडली. लाकुडतोड्याने जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली. जलदेवता सोन्याची, चांदीची आणि लोखंडी कुल्हाडी घेऊन वर आले. लाकुडतोड्याने लोखंडी कुल्हाडी आपली म्हणून ओळखली. जल देवता प्रसन्न झाले, लोखंडी कुल्हाडी सोबत सोन्या आणि चांदीच्या कुल्हाडी हि त्याला दिल्या.
काही दिवस आधी एका फेसबुक मित्राचा लेख वाचला होता. लेखाचा सार काहीसा असा होता - नीती कथा चतुर लोकांनी सामान्य लोकांना मूर्ख बनविण्यासाठी लिहिल्या आहे. सामान्य माणसांनी केवळ श्रम करावे आणि दाल-रोटी खाऊन गुजरा करावा.
समुद्र
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा
पूर्वी पायाशी येउन घोळणारा तो,
आता उगाच कोरड्या झालेल्या मला भिजवेल
अन निमूट माघारी वळणाऱ्या पायांना थिजवेल …
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा
माझ्यावर सोडलेली त्याची ती जालीम लाट,
उगाच आणलेले उसने आवसान जाताना पुसत जाणार
अन घट्ट रुतलेल्या पायांचाही पुन्हा पुन्हा तोल ढासळणार
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा
पसरला आहे मिट्ट काळोख चहूकडे,
हल्ली सूर्याबरोबर बहुदा तो रात्रीचे तारेही गिळतो,
अन दूरवर ते लाईट हाउस अन इथे मी दोघेच रात्रभर जळतो ….
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा
- विश्वेश
सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : २ :
सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : १ :
गड फिरून पूर्ण झाला आणि आता जायचं होत पांडवकालीन विमलेश्वर मंदिर.>>>>>
विमलेश्वर मंदिराच्या परिसरात विरगळ एका बाजूला मांडून ठेवलेत पण सगळ्याच विरगळावर युद्ध
Doodhsagar - Where milk flows..
अॅनिमेशनने ओतप्रोत भरलेला बाहुबली पाहण्याचा योग आला.सिनेमा आवडला,कथा तशी काल्पनिक असल्याने नक्कीच सुसह्य आहे.पात्रांची मांडणी आणि निवड योग्य वाटते.एकूण काय तर तीन तास निखळ मनोरंजन करण्याची क्षमता यामध्ये नक्कीच आहे.या तीन तासानंतर जेव्हा आपण थियेटरच्या बाहेर पडतो तेव्हा सर्वजण आपापल्या विचारानुरूप आठवणी घेवून तिथून बाहेर पडत असतात.
या तीन तासाने मला काय दिले याचा हिशोब जमवत असताना सुरुवातीला दाखवलेला धबधबा आणि सर्वात शेवटी दाखविलेली लढाई या दोन गोष्टींना झुकते माप गेले.अर्थात दोन्ही गोष्टी ग्राफिक्सच्या सहाय्याने भव्य दाखविल्या आहेत यात शंका नाही.पण या गोष्टी ज्या प्रकारे समो
मिसळपाव