Skip to main content

गाव तस न्यार

लेखक शाहिर यांनी सोमवार, 07/03/2016 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावामंदी बगा, समदं कसा निवांत हुतं ! समदे पब्लिक गुन्या गोविंदाने नांदायचा आणि भांडायचा . त्याच असा हाये , आमच्या गावात हये एक पार, चार गल्ल्यातले चार रस्त्ये हितेच येउन टेकत्यात. दिवसभर कुठ कुठ काम करून माणस , बाया बापड्या यायच्या. चार घटका पारावर टेकायच्या, काय सुख दुख असेल तर सांगनार, कुनाला काय दवा पानी विचारणार , कुणाच्या घरी काय कालवणं याची बातमी काढणार आणि कुनी नवीन पाव्हना घावला तर येड्यात काडून रिकामा व्हनार ! सगळी टाळकी एकदम १२ **ची ! पण टाईम कसा जायचा कळ्ळाचा नाही आणी थोरामोठ्याकंन कायबाय कानावर पडायचा त्यात ज्ञानाचा मार्जिन पन निघायचा.. पन गेल्या साली घोळ झाला..

तेरे इष्क मे मेरी जान फना हो जाये..........

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 07/03/2016 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
काय म्हणताय मॅडम तुम्हाला काय वाटते यात गिल्टी कोण आहे? नवरा की बायको? सांगणं अवघड आहे सर. प्रथमदर्शनी पाहिलं तर एकावर दुसरा अन्याय करतोय हे नक्की. खलील जीब्रानच्या प्रॉफेट पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे "रॉब्ड इज ईक्वली रीस्पॉन्सिब्ल अ‍ॅज द रॉबर इज" चोरीसाठी ज्याच्याकडे चोरी झाली तोही चोरा इतकाच जबाबदार आहे. अन्याय करणारा इतकाच अन्यान सहन करणारा देखील अन्यायासाठी जबाबदार आहे. अहो मॅडम असा विचार केला तर मग न्यायदानाची गरजच उरणार नाही. सगळी कडे अराजक माजेल. सर खरं सांगु माझ्या कडे उत्तर नाही. मला जे वाटते ते मी इथे व्यक्त करणे कितपत योग्य आहे माहीत नाही.

राईट टू (बी) लेफ्ट !

लेखक चिनार यांनी सोमवार, 07/03/2016 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
"तू लेफ्टी आहेस?" मी डाव्या हाताने लिहितोय हे दिसत असूनही त्याने मला विचारलं. पण ह्या प्रश्नाची मला सवय आहे. " हो", मी उत्तरलो. "लहानपणापासून ?" मी दचकलो. आता हे काय नवीन ? एखाद्याला व्यक्तीला ," का हो तुम्ही चालायला लागल्यापासून दोन पायांवरच चालता का ?" असं विचारलं तर कसं वाटेल ? तरीही सयंम राखून मी उत्तर दिलं. "हो अर्थातच" "जरा वेगळं नाही वाटत का असं?” " नाही...

निशब्द

लेखक हरिदास यांनी सोमवार, 07/03/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांनी आज बंड केले होते नव्हते सर्व नेले उरावे हाती असे जमवलेच नाही क्षणभंगुर लालसेने षंड केले वाटते वाचा पांगुळ झाली निराशा आशेस वांझ झाली ओहोटीने भरतीस दिला नकार नकळे कोणती ही भूल झाली प्रकाशाने रविसंगे घात केला वसंताला ग्रिष्माने आघात केला डोळ्यांनीच काळजाची वाट पुसली लेखणीचा प्राण का गर्भात गेला शायराच्या शायरीतून भाव गेला काटयांनीच गुलाबाशी घाव केला दिव्यास पतंगाने का बदनाम केले शब्दांनी भावनांशी लपंडाव केला शब्दास शब्दांनी हे शब्द द्यावे शब्दांचे शब्द शब्दात ल्यावे शब्दाविण ना आधार आम्हास कुणाचा शब्दसुमने रसिकांनी निशब्द व्हावे
काव्यरस

मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/03/2016 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुर्ती पुजा आणि सगुण पुजे बाबत बरीच उलट-सुलट चर्चा होत असते. भारतात मुर्ती पुजा केली तर जाते पण तत्त्वज्ञानाच्या बाजूला अद्वैतींचे प्राबल्य असल्यामुळे का काय मुर्ती पुजा आणि सगुण पुजेची बाजुने सहसा परंपरेचा हवाला दिला जातो तर्कसुसंगत मांडणी मात्र कमी दिसते, या धागा लेखात मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस म्हणजे सामर्थ्य, दुर्बलता, संधी, जोखीम आणि 'वैशिष्ट्य, ऊपयोग, लाभ' ; शंका निरसन अशा प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न आहे. सामर्थ्य १.१) निव्वळ प्रेरणा घेण्यासाठी, देवघर शेवटी एक आदर्शांचा कृतज्ञता आणि श्रद्धायुक्त अल्बम असते का ? (देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ?

#PledgeForParity शपथ समतेची

लेखक आतिवास यांनी सोमवार, 07/03/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या ८ मार्च. उद्या आहे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’. उद्या आहे शुभेच्छांची देवाणघेवाण. उद्या आहे समस्यांची आकडेवारी आणि चिंता. उद्या काही भाषणं, काही लेख, आणि थोडे सुस्कारे. उद्या प्रगतीची काही उदाहरणं वाचून जागा होणारा आशावाद. उद्या रेडिओ, वर्तमानपत्रं, टीव्ही इकडं सगळीकडं झळकणारं अभिवादन, अभिनंदन आणि कौतुक. ‘महिलांसाठी अमुक इतका डिस्काउंट’ असा बाजाराचा गोंगाट. उद्या महिला मेळावे, ठेवणीतले कपडे घालून आलेल्या स्त्रियांचे एकत्र जेवणाचे कार्यक्रम. उद्या थोडं हसू, काही उद्विग्नता.. अनेकांसाठी ही तर फक्त १७-१८ तासांची कसरत, फार नाही,. ९ मार्चला पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

नाव सोनीबाई आणि ................

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 07/03/2016 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

स्वानंदचा बावरा आणि कबीराचा निरंजन

लेखक Anand More यांनी सोमवार, 07/03/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक सकाळ एक एक नवीन गाणं घेऊन येते. आणि मग तेच गाणं दिवसभर माझा ताबा घेऊन बसतं. दोन दिवसापूर्वी असंच झालं. "हजारो ख्वाहिशे ऐसी" या चित्रपटातलं, "बावरा मन देखने चला एक सपना" हे गाणं आठवलं. स्वानंद किरकिरे साहेबांनी एकंच शब्द वापरला आहे "बावरा" पण काय मौज केली आहे ! या "बावराला" समर्पक शब्द मला मराठीत सापडला नाही. पण त्याला जवळ जाणारा एक शब्द आहे बेभान. तुम्हाला अजून चांगला शब्द सापडला तर कमेंट मध्ये सुचवा. गाण्याचे बोल खाली देतोय.

सेल्फी-एक विकार???

लेखक पिके से पिके तक.. यांनी रविवार, 06/03/2016 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच वृत्तपत्रात बातमी वाचली, " सेल्फी काढताना हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्यामुळे तरुणाचा मृत्यू ".....!! एकीकडे जगामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागत असताना , तेच विज्ञानिक शोध दुसरीकडे माणसाच्या मृत्यूचे कारण बनत आहे... एका US संस्थेच्या सर्वेनुसार मागील दोन-तीन वर्षात जगभरात ७५० पेक्ष्या जास्त लोकांचा मृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे..लोक स्वताचाच फोटो काढण्यात इतके मश्गुल होतात कि आजू-बाजूचे त्यांना ध्यानाच राहत नाही.. आतापर्यंत हृदय-विकार, अपघात,आत्महत्या,cancer , आजार , वृद्धपण असे विविध प्रकार हे मृत्यूचे कारण बनत होते...मात्र आता त्यात सेल्फी विकार किंवा सेल्फीहत्या(सेल्फी काढतान