आमचं एकत्र मालवणी भोजन.
“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.”
बाबल्या हळदणकराच्या खानावळीत मी पूर्वी अनेक वेळा जेवलो आहे.हळदणकर दांपत्यांची मुलं मोठी झाल्यावर आणि कामा-धंद्याला लागल्यावर मुलांनीच त्यांची खानावळ बंद केली होती.
” आयुष्यभर आमच्यासाठी खस्ता खाल्लात.आता थकावट येण्याच्या वयात आरामात रहा”
असं आम्ही आमच्या आईबाबांना विनंती करून सांगीतलं आणि त्यांनी ते मानलं.”
गुरूनाथ-हळदणकरांचा मोठा मुलगा-मला सांगत होता.
“तुमच्या खानावळीत मी अनेकदां जेवलो आहे.जेवणाची चव अजून माझ्या जीभेवर आहे.”
मी गुरूनाथल म्हणालो.
“तु
सोने की चिड़ियां
हे गाणं माझं खूप म्हणजे खूप फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा हे कानावर पडतं तेव्हा स्वर्गात विहरत असल्यासारखे वाटते. लहानपणी २६ जानेवारीला युनिफॉर्ममधे शाळेत ध्वजारोहणाला सकाळी सकाळी जायचो तेव्हा हे गाणं कुठे न कुठे चालू असायचं. तेव्हा मन देशाभिमानानी भरून यायचं. आपल्या मनात ही भावना येते याचंच अप्रूप वाटायचं. आपण अशा एका देशाचे नागरिक, वंशज, मालक आहोत ही भावना भारावून टाकायची. कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच.
गुरु (मराठी)
गुरु (मराठी)
मराठीतले करिष्माई दिग्दर्शक संजय जाधव त्यांच्या ‘दुनियादारी’ आणि ‘तू ही रे’या मागील वर्षीच्या सिनेमांच्या यशानंतर आता ‘गुरू’ हा नवा सिनेमा घेऊन आलेले आहेत. मराठी सिनेमाचा एकूणच प्रेक्षकवर्ग बघता हा सगळा इत्यंभूत विचारशील प्रेक्षकवर्ग असतो त्यामुळे दक्षिण भारतीय पद्धतीच्या कथा पडद्यावर मांडल्यावर प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतील हे बघण्यासारखे राहील. दुनियादारी अन तू हि रे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून गेले. कदाचित त्यामुळे या चित्रपटाची पब्लिसिटी इतर मराठी सिनेमांपेक्षा भरपूर होत असल्याचे जाणवले.
एअरलिफ्ट
एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो.
पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स.
शेवग्याचे सार
शेवग्याच्या शेंगाना डांबेही म्हणतात. शेवग्याच्या पानांची, फुलांचीही भाजी करतात.
मिसळपाव
.