Skip to main content

सबकाँशस मधलं काही...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 06/08/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरचा हा पहिलाच लेख... तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा!! ---------------------------------------------------------- कजग्जझगजड़कन!!शजसब्दक,ण्डजकसब्.जस:जबसहस्जबक्स. धस्खड्ज्ज्सब शजसजशब्सज्जश् ज्जज्जबजशीजशहीह्ह्ज्झह... तो नुकताच वाचायला शिकला आहे. रोज रात्री चौकातल्या सायकल पंक्चरच्या दुकानात जाऊन तो पेपर वाचत आहे. वाचायला यायला लागलं अन तो आनंदला. वाचलं. कर्जमाफी होणार. अन तो आनंदला. तो मजूर, त्याला स्वत्:चं शेत नाही. त्याला वाचायला येतं म्हणून तो आनंदला. कर्जमाफीला नाही. जाहिरात आहे. संतूर साबनासोबत 10 रूपयाचं कोलगेट फ्री.

स्पर्धा - शतशब्दकथा.( स्पर्धेसाठी नाही)

लेखक जेपी यांनी गुरुवार, 06/08/2015 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
तो - हे बघ मिपावर शशक स्पर्धा सुरु आहे.तु पण त्यात भाग घे. ती- छे आप्ल्याला नाही जमणार हे कथा बिथा लिहीने.तुच लिहीत बस. तो - मी सध्या सन्यास घेतला आहे,नाहीतर लिहीली असती. ती - प्ण हे लीहिने काय सोप नसत. तो - अग सोप असत काहीतरी प्रसंग डोक्यात ठेवायचा आणी त्याभोवती शब्द रचत जायचे.हे बघ इथेच पन्नास एक शब्द झाले.आता इकडुन तिकडुन हुकडुन अजुन एक पन्नास शब्द जमा करायचे आणी घुसडवायचे .झाली शशक तयार हाकानाका. ती - पण नंतर त्याचा सिक्वल ही लिहावा लागेल ना ? तो - ते नंतर पुढच्या फेरीत गेलतर बघुया. ती - शिर्षक काय द्यायच कथेला ? तो - स्पर्धा !!! ह्हीह्हीह्ही.

[शतशब्दकथा स्पर्धा ] टॅक्सी

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 06/08/2015 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
तिने हळूच बाहेर पाहिलं. टॅक्सी सिग्नलवर थांबली होती. बाबा टॅक्सीवाल्याच्या शेजारी बसला होता. तिने एक सुस्कारा सोडला. त्यांच्या कारच्या सीटस् किती छान होत्या. मऊमऊ. पण बाबाला गेले वर्षभर एकपण पिक्चर किंवा सीरियल मिळाली नव्हती. म्हणून मग गेल्या आठवड्यात बँकवाले येऊन कार घेऊन गेले होते. तिला काहीच कळलं नव्हतं. तसंपण मम्मा दोन वर्षांपूर्वी बाबाला सोडून निघून गेल्यापासून बाबा कसंतरीच करायचा. रडायचा काय, ओरडायचा काय. फोनवरून कुणाला तरी घाणघाण बोलायचा. आणि कसलंतरी ब्राऊन कलरचं ज्यूस प्यायचा. एकदा तर बाटलीच तोंडाला लावून पीत होता. ती खडबडून जागी झाली. बाबा कुठे आहे?

[शतशब्दकथा स्पर्धा] दैवी शक्ती

लेखक दिनु गवळी यांनी गुरुवार, 06/08/2015 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
आजुबाजुला मिट्ट काळोख होता. पक्या अजुनही पळतच होता शेताच्या बांधावरुन पळायला नीट जमतही नव्हते , पण जीव वाचवायचा होता , म्हणुन पळावे तर लागणारच होते. पायातील चप्पल अचानक तुटली पण चपलेची पर्वा न करता तो अनवाणी पायानी पळत होता ,गावातील दिवे अजुनही दुरवर दिसत होते , कधी एकदा गाव येते असे पक्याला झाले होते.

[शतशब्दकथा स्पर्धा] निर्णय

लेखक नाखु यांनी गुरुवार, 06/08/2015 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
"वार्‍याने पण सकाळीच उच्छाद मांडलाय !" ती पुटपटली. पण खरंच वैताग बाहेरच्या घोंघावणार्याबद्दल का मनातल्या , नीट समजेना. महिनाभरातल्या अनाकालनीय घडामोडी आणि हा असा ह्ट्टी..नको म्हटलं तरी कालची भेट आठवलीच. "मग सांगीतेलस ना तुझ्या घरच्यांना ?" ..... "धडाधडा बोल घुमेपणा सोड आता." "मला धीरच होत नाही, सांगायला" " पण कधीतरी कळणारच ना मग तूच सांगीतलेले चांगले ,तेही लगेचच" "अरे याचे परिणाम काय होतील माहीतीयत ना ?

[शतशब्दकथा स्पर्धा] हेल्पिंग हँड

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 06/08/2015 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेे साचेबद्ध होते. साडेनऊला मेट्रोत शिरणे. तिथे खांबाला टेकून उभे राहणे. तो आल्यावर समोर 'महिलाओं के लिए' खाली कोपऱ्यात रेलून बसणाऱ्या 'तिची' एक नजर त्याच्याकडे आणि परत कानात इयरफोन हातात स्मार्टफोन. दर मिनिटाला गाणे बदलायच्या तिच्या सवयीची ह्याला मौज वाटे. त्या दिवशीही दोघे करोल बाग़ ला उतरले आणि आपापल्या गेटकड़े वळले. तो अचानक थबकून, उगाच बैगमध्ये शोधाशोध करत थांबलेल्या तिच्याकडे वळला. " आप कोई गाना पूरा क्यों नहीं सुनती?" " पता नहीं,बस हाथ आगे बढ़ के गाना बदल देता है। Bad habit, isn't it?" " I think you need a helping hand stopping your hand from changing songs." ती चमकून बघतच राहिली.

बुधा!

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 06/08/2015 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला फारशा आवडत नाहीत पण नंतर कधीतरी अचानक आपल्याही नकळत त्या आपल्या मनाचा ताबा घेतात! तसच काहीस माझ बुधाच्या बाबतीत झाल. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा हा मोतीबिंदू झालेला म्हातारा मुंबई सोडून एकटाच कुठे त्या राजमाचीला निघाला आहे हा प्रश्न पडला. त्याला उतारवयात त्या माचीची, श्रीवर्धन, मनरंजन गडांची ओढ का लागली आहे हे काही समजत नव्हते आणि तेव्हा ते जाणून घेण्यात रसही वाटला नाही. त्यामुळे ती पहिली भेट अगदी थोडक्यात आटपली! पण मनात कुठेतरी बुधाविषयी उत्सुकता राहिली असावी कदाचित!

[शतशब्दकथा स्पर्धा] शाळा

लेखक सटक यांनी गुरुवार, 06/08/2015 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
ही काय पद्धत आहे लोकांशी वागण्याची? श्वेतांबरा बाईंच्या डोळ्यात राग मावत नव्हता. भितीने जणू अद्रुश्य झाला तो.. काय केले होते त्याने? एका छोट्याश्या मुलीला ती हरवलेली असताना मदत केली होती. बाईंचा तास सोडून... त्यांची शाळा होतीही तशी मोठी..सरदारांच्या वाड्यातच भरायची. कोपर्यात बसून रडणार्या त्याला बाई समजावू लागल्या..हे बघ, शाळेचे काही नियम आहेत ते पाळायला नकोत का? वेताळे गुरुजींना कळले तर तुझे काही खरे नाही! तुला आवडली की नाही ती मुलगी? "हो"! मग ती इथे यायला हवी की नाही? "हो"!