Skip to main content

राँग नंबर : अंतीम

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/02/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रॉंग नंबर : मागील कथानक तीने फार मोठी घोडचुक केली होती. अर्थात चुक टकल्याची होती, चैतन्यबद्दलची सगळी माहिती तिला द्यायला हवी होती. पण चैतन्य अविवाहीत आहे हे तिला माहीत नव्हते आणि फोनवर पलिकडच्या बाजुला मुंबई पोलीसांचा एक अतिशय धुर्त आणि चाणाक्ष पोलीस अधिकारी आहे याचा तिला संशय येणेही शक्य नव्हते. चैतन्यचा फोन चालु ठेवणे ही टकल्याची मोठी चुक होती.

मेरा भारत महान

लेखक बाप्पू यांनी मंगळवार, 24/02/2015 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्याबद्दल तुम्ही मला नकारात्मक विचार करणारा म्हणून हिनवाल. काही लोक मला देशद्रोही असल्याचा शिक्का मारून देश सोडायला देखील सांगतील. पण खरच मित्रांनो मला कधी कधी खूप राग येतो या देशाचा, या देशाचा म्हणण्यापेक्षा या देशातील लोकांचा आणि त्यांच्या मानसिकतेचा. राग येतो या देशातील राज्यकर्त्यांचा आणि सिस्टीम चा. नुकतीच घडलेली एक घटना. माझ्या एका मित्राच्या घरी चोरी झाली. जवळपास १ लाख रुपयांचा ऐवज घरातून चोरी झाला. मित्राने पोलिसांकडे मदत मागितली तेव्हा पोलिसांनी ती तक्रार नोंदवून न घेता त्याला २ दिवसांनी ये, तोपर्यंत आम्ही तपास करू असे सांगितले.

रुसलेले शब्द

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/02/2015 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द माझ्यावर रुसलेत... बहुतेक कोप-यात लपलेत. शोधून त्यांना दामले; मीच फ़ुरगटुन बसले! वाटल येतील सोबतीला... फुगा फोडतील मनातला... वाट पाहून थकले; ते अजुनही लपले. लिहायची होती एक शायरी... निदान एक इटकुली नज्म तरी.. बहुतेक त्यांना वाटल... हिला जमणार कुठल? त्यांच ही बरोबरच आहे; नज्म-शायरी... अपना बस कुठे? नाद मी सोडून दिला... शब्दांनी परत हात दिला!

खुशबू (भाग ५)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 23/02/2015 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ 'अरे हरदीप आज नयी बाइक' 'हा पाजी, आज वो कनद्दा से आई सुसान, मेरे नाल आई, अपनी बाइकको ग्राउंड पे छोड, उपरसे अपनी टीशार्ट, जीन्स, सारे कपडे उतार कर ग्राउंड पे फेक देके, बोली, हरदीप- I am offering you ANYTHING you want !' 'तो तुने क्या किया' 'क्या करता पाजी, बाइक उठाके चला आया ' 'अच्छा किया हरदीप, वैसेभी वो जीन

वृक्षारोपण माहिती हवी आहे

लेखक देवांग यांनी सोमवार, 23/02/2015 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करतो. आम्हाला सिंहगडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे(प्रती वर्षी १५०० ) ज्या द्वारे तिथे जास्तीत जास्त घनदाट झाडी करता येईल. परंतु आम्हाला ह्याबाबत जास्त माहिती नाही. कृपया तुम्हास ह्या विषयाची माहिती असल्यास ती शेअर करावी. १. कुठल्या महिन्यात कार्यक्रम हाती घ्यावा २. कुठल्या प्रकारची झाडे लावावीत ज्यासाठी कमी पाणी लागेल आणि त्यांची वाढ जास्त काळजी न घेत होऊ शकेल ? ३. छोटी रोपे लावावीत कि मध्यम आकाराची रोपांची लागवड करावी ? अजून काय काळजी घ्वावी ?

गुंतागुंत - (पार्ट -२)

लेखक Maheshswami यांनी सोमवार, 23/02/2015 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पार्ट -१ इथे वाचा.Part-1 "सत्याएन्शी रुपये साठ पैसे झाले साहेब", या वाक्याने जाग आली अभयला. रिक्षात झोपी गेला होता तो. स्टेशनहून ससूनपर्यंत रिक्षा पोचली, तेव्हाच झोप लागली बहुतेक आपल्याला. शंभराची नोट रिक्षावाल्याचा हातात देत म्हणाला "राहू द्या काका वरचे चहा पाण्याला", आणि घराकडे वळला. प्रवासानी अंग शिणून गेलं होतं. काश्मीर पासून पुणे, कितीही नाही म्हटलं तरी थकवणारा प्रवास होता. नेत्राला वाटेत डेक्कन वर ड्रोप करून आला होता. संध्याकाळी भेटायचं पण ठरलं होतं त्याचं. घरी जाऊन आता एक मस्त झोप काढणार होता तो . अकरा वाजता जाग आली.

ऐ....चल न....

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/02/2015 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

संसद: अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१५

लेखक सव्यसाची यांनी सोमवार, 23/02/2015 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक २३ फेब्रुवारी ते ८ मे या दरम्यान असणार आहे. हे अधिवेशन २ टप्प्यात होईल. दि. २० मार्च ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये संसदेला सुट्टी असेल. या दरम्यान वेगवेगळ्या विभागाच्या स्थायी समित्या अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींचा अभ्यास करतील. पहिल्या ५ दिवसांचे वेळापत्रक असे : २३ फेब्रु: राष्ट्रपतींचे अभिभाषण २४ आणि २५ फेब्रु: अभिभाषणावर चर्चा आणि धन्यवाद प्रस्ताव २६ फेब्रु: रेल्वे अर्थसंकल्प २७ फेब्रु : आर्थिक सर्वे २८ फेब्रु: केंद्रीय अर्थसंकल्प रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प हे २ महत्वाची विधेयके असली तरी या अधिवेशनामध्ये तब्बल १७ नवीन विधेयके मांडली जाणार आहेत.

रुसवा

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 23/02/2015 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
बरं नाई हे रुसनं मुकं मुकाट बसनं डोया भिळूनं डोयातं थोळं गालात हासनं असा कसा हा रुसवा होटं टाकला शिऊनं नको धरुस अबोला देतं काऊनं भिऊनं ? लाली दिसते साजरी तुह्या फुगल्या गालाची कायं फिकीरं सांगना तुले माया या हालाची ? अशी लाळा ची तू मैंना तयं हातावर्ला फोळं लाऊ जीवं मी कितीकं सांगं कायं तुले थोळं ? बस्सं झालं पुरं झालं चाल्ला जीवं खोलं खोलं देनं सोळूनं रुसवा आता बोलनं गोळ गोळं

काही गंभीर सामाजिक्/राजकीय प्रश्न/शंका

लेखक तुषार काळभोर यांनी रविवार, 22/02/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक मंडळास विनंती: हा धागा/त्यातील प्रश्न/त्यांची उत्तरे/प्रतिसाद यातील काहीही जर कोणाच्या संवेदना दुखावणारे असेल तर लागलीच उडवून टाकावे. १. जातीयवादी म्हणजे कोण्/काय? २. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोण्/काय? ३. पुरोगामी विचार म्हणजे कसले विचार? ४. प्रतिगामी विचार म्हणजे कसले विचार? ५. समाजवाद म्हणजे काय? ६. 'बहुजन समाज': यामध्ये कोणते सामाजिक घटक येतात? जर 'बहुजन समाज' ही संज्ञा जातिविषयक असेल तर, त्यात कोणत्या जाती येतात? ७. 'अल्पसंख्यांक' म्हणजे किती अल्प? किती टक्के असल्यावर एखादा घटक अल्पसंख्य ठरतो? की सर्वात मोठे सोडून इतर सर्वच अल्पसंख्यांक? ८. 'प्रार्थनास्थळ' म्हणजे काय?