Skip to main content

कोवळीक

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/10/2014 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
कोवळीक आताशा आयुष्यात माझ्या येवून जा आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा तुझीच वाट पाहते कधीची आर्त पाण्यासाठी तगमगलेली कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची फुले तर तर भरपुर निघाली पण अजूनही आस आहे फुलायची - पाभे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका - अंदाज अपना अपना

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 16/10/2014 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
यावेळेस मिपावर कोणीच निवडणूकींच्या अंदाजाचा धागा काढला नाही. म्हणून आता मी काढत आहे. (आन्यथा क्लिंटन, श्रीगुरुजी, ऋषिकेश इत्यादी नेहमी धागे काढतातच. आसो, आपल्या महाराष्ट्रात आज निवडणूका पार पडल्या. यावेळच्या निवडणूका खर्‍या अर्थाने उत्कंठावर्धक ठरणार आहेत. पंचरगी लढतीतुन कोणाला काय मिळते याचा अंदाज बांधणे कठीण होतेय. एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय. चाणक्य वगळता इतर सर्वांनी भाजपा ला १२५-१३० च्या आसपास जागा सांगतल्या आहेत. व्यक्तिशः मला चाणक्यवर जास्त विश्वास आहे.

कळकट कंदील जीवनावरील महाभाष्य

लेखक शरद यांनी बुधवार, 15/10/2014 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कंदील कळकट ..जीवनावरील महाभाष्य कवीवर्य समीरसूर यांच्या या महान कवितेवर लिहावयाचे भाग्य मला लाभले, धन्य, धन्य झालो मी ! ज्यांचे नावच इतके काव्यमय, त्यांचे काव्य महान असणारच. समीरसूर म्हणजे वेळूच्या बनातून वारा वहातो तेव्हा येणारा मधूर आवाज, वाह वाह. वेळू हा शब्द वेणूपासून आला असे म्हटले म्हणजे यमुनाकाठच्या कुंजवनातील बासरीचे मधुर स्वर व त्यावर जीव ओवाळणार्‍या गोजिर्‍या गोपी आठवतात.

हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 15/10/2014 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मिपावर हजारो धागे येऊन गेलेत... त्यातले काही मोजकेच ध्रुवासारखे अढ्ळ झाले....बाकी यथेच्छ पेटवले, उसवले आणि तुडवले गेले. तर त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की नेमकं काय लागतं धागा शतकी करायला? असे शतकोत्सुक प्रचंड प्रमाणात हल्ली ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे हा धागा त्यांना समर्पित आहे. दुसरा फायदा असा की निदान ह्या निमित्ताने अशा घटकांची एक यादी तयार करून ते विषय थोडे बाजूला ठेवून नवीन विषयांवरही साधक बाधक चर्चा करता येईल कारण बरेच विषय परत येत आहेत आणि त्यामुळे चर्चेला मर्यादा येऊ लागली आहे असे कुठेतरी वाटतयं. आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत......

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो.

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल!

अमेरिकन चिकन

लेखक रवीराज यांनी बुधवार, 15/10/2014 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया - युक्रेन वादामधे अमेरिका आणि यूरोपने रशियावर आर्थिक निर्बंध लादले त्याला प्रत्युत्तर म्हणुन रशियानेही अमेरिका आणि यूरोपमधुन आयात होणाऱ्या पोल्ट्री आणि डेअरी उत्पादनावर निर्बंध लादले.

आप्पा परब यांच्यासोबत राजगड फिरण्याच्या संधी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 15/10/2014 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मागे एकदा एका संस्थेने आयोजिलेल्या ट्रेकबद्दल माहिती देण्यासाठी धागा उघडला होता. तसेच दोन आकर्षक ट्रेक आयोजिल्याचे समजले आहे. अनेक मिपाकरांकडून ट्रेकबद्दल विचारणा आल्या, 'आम्हाला घेऊन न गेल्याने निषेध' :) असे प्रतिसाद आले. म्हणून म्हटलं की मला कळलेली ही माहिती इथे शेअर करावी म्हणजे इच्चुकांना लाभ घेता येईल. आयोजक संस्थांशी/ग्रूप्सशी माझा काहीही संबंध नसून ही केवळ माहिती म्हणून इथे टाकत आहे; जाहिरात करायचा हेतू नाही.