वार्तालाप: भिक्षा ही कामधेनू
समर्थ म्हणतात भिक्षाही सर्व सांसारिक आणि अध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी कामधेनू रुपी गाय आहे. समर्थांनी भिक्षा मागून संपूर्ण भारताचे भ्रमण केले. त्याकाळी भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या. हीन भावनेनेग्रस्त सामान्य जनता दुःख आणि दारिद्र्यात खितपत पडलेली होती. महाराष्ट्राची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. समर्थांनी हे सर्व बदलण्याचे ठरविले. भिक्षेच्या बळावर ज्या काळी मंदिरे आणि मठ उध्वस्त होत होती त्या काळात त्यांनी समर्थ मठांची स्थापना केली. भिक्षेच्या मदतीने त्यांनी त्यांच्यासारखे शेकडो समर्थ ब्रह्मचारी तयार केले.
कर जरा कंट्रोल...! :-)
किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू
कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू
मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी
तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी
राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे
लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे
फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले
चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले
ठेवला मी फोन होता मूक सारा वेळ तो
एवढीशी चूक झाली, मजवरी का उखडतो
नाहि जमला घ्यायला रे फोन तव तेथे मला
बिल कुणी भरणार माझे, मित्र जर रागावला?
शंका नको घेऊ जरा तू निखळ मैत्री ही असे
माझिया डीपीवरी तो फक्त 'लाईक' देतसे
एकदा केवळ तयाने टाकला होता बदाम
सोड तो तू विषय त्याला अर्थ नसतो एक छदाम
बिघडले कोठे
स्वप्नजा!
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!! :-)
कोण तू, माझी कुणी आहेस का?
स्वप्नजा.. जागेपणी आहेस का?
त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी..
ब्रह्मकमळाची सखी आहेस का?
चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक!
चालुनी येते खरी आहेस का?
राग छेडी तार हृदयाचीच माझ्या..
अजुनी तू "रागा"वली आहेस का?
काल मज दिसलीस तू होती म्हणूनी..
आज वाटे, तू उद्या आहेस का?
---
का तुझा मी शोध घेतो पण, निरंतर?
सर्वस्व माझे व्यापुनी आहेस का?
राघव
[१९ जुलै २३]
काव्यरस
जुलाबावरील जीवरक्षक प्रथमोपचाराचा मौलिक शोध
"हगवणीवर बहुगुणी
मीठ साखर पाणी"
या शासकीय जाहिरातीने आपल्या सामाजिक आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ अधिराज्य गाजवलेले आहे. अतिशय सोपा असलेला हा घरगुती प्रथमोपचार म्हणजे जुलाबाच्या रुग्णांसाठी वरदान असते. जुलाब ही पचनसंस्थेशी संबंधित असलेली समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते. मुळात जुलाब हा ‘आजार’ नाही, परंतु ते काही आजारांचे एक लक्षण आहे. विविध प्रकारचे सूक्ष्मजीव संसर्ग आणि अन्नातून झालेली विषबाधा ही त्याची प्रमुख कारणे. जुलाबाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे चयापचय आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो.
चीझी पालक मका
हे सुरांनो चंद्र व्हा
https://www.esakal.com/desh/woman-climbs-tower-in-madhya-pradeshs-shivp…
या बातमीवर कविता
(कुसुमाग्रजांची क्षमा मागून)
हे सर्वांनो, तारयंत्र व्हा!
हे सर्वांनो, तारयंत्र व्हा!
नांदण्याचे निरोप माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
वाट एकाकी प्रेमाची,
हरवलेल्या बाईमाणसाची,
बरसुनी आकाश सारे,
अमृताने नाहवा ॥
वयाच्या ४० नंतर राजकारणात प्रवेश
नमस्कार
तसे बरेच लोक जुन्या धाग्यावरून ओळखतात
सॉफ्टवेअर मध्ये काम करून कंटाळला आलाय
जास्त पैसे पण जमा नाही आणि ओळखी पण नाही
अश्या वेळी राजकारणात कसे जावे
१) सरकारी नोकरी पकडून ओळखी वाढवावया मग तिकीट मिळवावे ?
२) सतरंज्या उचलण्यापासून सुरु करायचे
३) काहीतरी पराक्रम करायचा
४) वाळू सप्लाय किंवा बिअर बार सारखे सुरु करायचे
रानभाजी - आघाडा
रोजच्याप्रमाणे आजहि सकाळी भुईकोट किल्ला परिसरात आमच्या मातोश्री फिरायला गेल्या व येताना "आघाडा" या रान वनस्पतीला घेऊन आल्या.
हाडाची शिक्षिका असल्याने आधी सर्वांना त्या भाजीचे महत्व समजावून सांगितले व नंतर हळुवारपणे भाजी निवडून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढली .... नंतर जिरे, मोहरी, मीठ,मिरची, थोडासा दाण्याचा कुट व लसूण एव्हढ्या अल्प सामग्री च्या बळावर अफलातून अशा चवीची हि पालेभाजी खाऊ घातली.
आईकडून समजलेली माहिती हि अशी : पावसाळा सुरु झाला कि बहुतांश ठिकाणी रानभाज्यांना बहर येतो.
मिसळपाव
