किलर फ्रॉम हैद्राबाद - २ (अंतिम)
किलर फ्रॉम हैद्राबाद - १
दिगुवामेट्टाला वनखात्याची कचेरी होती. तिथे जोसेफ नावाचा एक ख्रिश्चन फॉरेस्ट ऑफीसर होता. मी दिगुवामेट्टाला दोन जनावरं बांधल्यावर त्याला साथीला घेऊन दिवसभर जंगल पालथं घातलं होतं. या परिसरात अनेक वाघ होते आणि माचाणावरुन त्यांची शिकार करणं नित्याचंच होतं असं त्याने मला सांगीतलं. जोसेफ ब्रम्हचारी होता. त्याच्याबरोबर त्याच्या घरी मी राहण्यात त्याची कोणतीच अडचण होणार नाही असं त्याने मला खात्रीपूर्वक सांगीतल्यावर मी त्याचं आमंत्रण स्वीकारलं.
मिसळपाव